आपल्या आरोग्यामध्ये दात किंवा हिरड्यांचे महत्त्व खूप असते. आपल्या आरोग्याची ओळख आपल्या दातांच्या स्थितीवरूनही ठरवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दात आहेत म्हणून आपल्याला खाता येते. पदार्थाचे तुकडे करणे आणि चर्वण करणे ही दातांची मुख्य जबाबदारी. आपल्या आरोग्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असली, तरी बहुसंख्य लोक तिकडे दुर्लक्ष करतात. दंततज्ज्ञांकडे जाणे शक्यतो टाळले जाते. नियमित आरोग्य तपासणीएवढेच महत्त्व दातांच्या तपासणीलाही दिले पाहिजे.
माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही.
मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच दातांना महत्त्व मोठं आहे.
काळजी न घेतल्याने दातांची कोणती समस्या होऊ शकते?
काळजी बरोबर न घेतल्यामुळे दातांच्या बऱ्याच अशा समस्या उद्भवू शकतात.
दातांची सळसळ
हिरडी मध्ये दुखणे
तोंडामधून दुर्गंधी येणे
दात किडणे
दातांचे हाड आणि हिरड्या खराब होण्याच्या आजाराला पायोरिया (Periodontitis/Pyorrhoea) असं म्हणतात. असा हिरड्या आणि हाड खराब होण्याचे आजार जेवणाचे कण अडकल्यामुळेच होतात.
जसं की हिरडीला सुज येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं, तोंडातून दुर्गंधी येणं, दात हालणं.
दाब देऊन दात घासल्याचे दुष्परिणाम :-
जोरात दात घासल्याने दातांची झीज होते. त्याला Dental Abrasion असं म्हटलं जातं. दात जोरात खरडून घासल्याने दात पांढरे शुभ्र होतात, हा गैरसमज आहे. उलट जोरात दात घासल्याने दात पिवळे होतात.
कारण दातांवरचा इनॅमल (Enamal) नावांचा थर झिजतो आणि आतला थर ज्याला डेन्टनि (Dentine) म्हणतात. तो थर उघडा पडतो. तेव्हापासून या झीजलेल्या दातांना थंड पाण्याची सणक, गार वाऱ्याची सणक, आंबट पदार्थांची सणक लागते. त्याला आपण दात आंबणं (Dental Hypersensivity) असं म्हणतात.
दातांविषयीचे विविध आजार इतर आजारांचेही संकेत ठरू शकतात.
हृदयासंबंधीचे आजार
आपल्या दातांमध्ये असलेले विषाणूच हिरड्यामध्ये होणाºया संक्रमणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे याविषयी जागरूक राहणे आवश्यक ठरते.
याविषयी दुर्लक्ष केल्यास हे विषाणू (बॅक्टेरिया) अर्थेक्लेरॉसिसला कारणीभूत ठरू शकतात.
अर्थेक्लेरॉसिस हा हृदयासंबंधीचा एक आजार आहे. या आजाराला बळी पडलेल्या व्यक्तींच्या आर्टरीजचा (धमण्यांचा) लवचीकपणा कमी होऊन त्यांचा वेग मंदावतो. हिरड्यांविषयी अनेक जणांना नेहमी त्रास होत असतो.
आपले दात हिरड्यांमध्ये फसलेले असल्याने दातामध्ये असलेले जिवाणू हिरड्यांविषयीचे आजार निर्माण करतात. शिवाय हे जिवाणू हिरड्यांद्वारे आपल्या रक्तवाहिन्यांमध्येही प्रवेश करतात. येथे हे जिवाणू ‘फॅटी प्लाक’ची निर्मिती करतात.
यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता असते, असे ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल सर्क्युलेशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आपल्या दातांमध्ये जिवाणू वाढणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक ठरते.
पचनक्रियेविषयी समस्या
आपली पचन क्रिया अनेक रसायनांसह सुरू होते. खाण्यात काही समस्या निर्माण करू शकणारे पदार्थ आले असेल तर पचनक्रिया तर बिघडते. मात्र, आपल्या दातांमधील जिवाणू त्यामध्ये भर टाकू शकतात.
जेवण योग्यप्रकारे पचण्यासाठी ते चावून करावे लागत असल्याने दातांमध्ये दडलेले विषाणूही आपल्या पोटात जातात.
त्यामुळे सुरुवातीच्या प्रक्रियेतच विषबाधा झाली तर पुढील पचनक्रियेवर परिणाम होणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे हे विषाणू आपल्या पचनक्रियेविषयीचे आजार निर्माण करू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
त्यामुळे जेवणापूर्वी किंवा काही खाण्यापूर्वी आपले दात स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी.
कमकुवत स्मरणशक्ती
ज्यांच्या हिरड्यांवर सूज येते किंवा त्यातून रक्तस्राव होतो, अशा व्यक्तीची बुद्धिमत्ता कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे बौद्धिक कार्याची पातळी कमी होते. शिवाय आकलन शक्तीचाही ºहास होत असतो. असे ‘जर्नल आॅफ न्युरॉलॉजी, न्युरोसर्जरी अॅण्ड सायकियाट्री’ यांच्या अहवालात म्हटले आहे.
शिवाय एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, ६० वर्षांवरील ज्या व्यक्तींना हिरड्यांचा त्रास होतो. अशा व्यक्तींची स्मरणशक्ती तीनपट कमी होण्याची शक्यता असते.
आत्मविश्वासाची पातळी खालावते
आपले हास्य ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची पहिली ओळख असते. समोरील व्यक्ती प्रथम आपले हास्यच टिपत असते व त्यावरून आपले अवलोकन करत असते. साहजिकच जर आपले दात स्वच्छ किंवा निरोगी नसतील तर आपल्या आत्मविश्वासाची पातळी खालावते.
त्यामुळे दातांची स्वच्छता आणि निरोगीपणाविषयी आपण सतर्क राहायला हवे. हास्याला आंतरराष्टÑीय भाषा मानले जाते. कारण आपण एखाद्या देशात गेलो आणि तेथील भाषेचे ज्ञान आपल्याला अवगत नसले तरी आपल्या स्मितहास्याने किंवा हावभावांमुळे आपले कार्य सिद्ध होऊ शकते.
शिवाय अनेक वेळा फक्त स्मितहास्य करूनही संवाद साधला जात असतो. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी व आत्मविश्वासाच्या पातळीत वाढ होण्यासाठी दात स्वच्छ आणि निरोगी ठेवणे उपयुक्त ठरते.
साखरेच्या पातळीमध्ये असंतुलन
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या दातांची काळजी घेणे जास्त गरजेचे ठरते. ज्या व्यक्ती उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) सारख्या समस्यांचे बळी ठरले आहेत, त्यांना ‘पिरिआडिकल डिसीज’चा त्रास जास्त होण्याची शक्यता असते.
या आजाराला बळी पडलेल्या रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण असंतुलित होण्याची दाट शक्यता असते.
दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीनेच दात स्वच्छ करणं या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात.
जर दातांतील जेवणाचं कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट (food lodgement) म्हणतात.
दातांची काळजी कशी घ्यावी यावरील उपाय
दात स्वच्छ करण्याची पध्दत :
१. ब्रशला दातांच्या मानेवर आणि हिरडीवर ४५ अंश कोनात १०/१५ वेळा हलक्या हाताने ब्रश मागे-पुढे करणं.
२. दातांच्या आतल्या बाजूस ब्रश करणंही आवश्यक असते.
३. दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावरही (Top surface) ब्रश करणं आवश्यक असतं.
४. ब्रशच्या शेंड्याचाही वापर करणं गरजेचं असतं.
बरेच रुग्ण सांगतात की, ते २-३ वेळा दात घासूनही त्यांना दातांचा आणि हिरडीचा त्रास आहे. रुग्णांची जर दात घासण्याची पध्दतच चुकीची असेल तर अनेक वेळा दात घासूनही उपयोग नाही. दात दिवसातून २-३ वेळा डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीने घासले गेले पाहिजेत किंवा प्रत्येक जेवणानंतर दात घासले तर अति उत्तम. प्रॉक्सा ब्रश आणि डेंटल फ्लॉस (Proxa Brush/ Dental floss)चा उपयोग केला तर अति उत्तम.
आपल्या नेहमीच्या ब्रशने दात घासल्यानंतर Dental floss किंवा Proxa ब्रशने प्रत्येक दोन दातांमधील अडकलेले जेवणाचे कण स्वच्छ करावेत.
नंतर गुळणी करुन शेवटी mouth wash ने गुळण्या करणं फायदेशीर ठरेल. माऊथ वॉशचा वापर केल्याने तोंडातला आम्ल PH नाहीसा होतो.
त्यामुळे दातांवर आणि हिरडीवर असलेले कीडजन्य जंतू कमी होण्यास मदत होते. (डायबेटीसच्या रुग्णाने अशा पध्दतीचे अवलंब करणं गरजेचं आहे).
ब्रश हिरड्यांवरुनही हलक्या हाताने फिरवला पाहिजे. जेणेकरुन हिरड्यांची मसाज होऊन हिरड्यांमधील रक्तप्रवाह वाढतो.
डॉक्टरांकडून दात स्वच्छ करणं- दातांवर आणि हिरडीवर जे काही जेवणाच्या कणांचे कडक थर साचलेले असतील असे दात डॉक्टरांकडून स्वच्छ करुन घ्या. हे साचलेले थर घरच्या घरी ब्रशने काढण्याचा प्रयत्न करु नये.
दातांच्या समस्येवर उपाय काय करायचं
दात चांगले ठेवण्यासाठी ब्रश करणे ही एक साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया बहुतेक लोकं करतातच परंतु त्यातून ही बहुतेक लोकांना दातांच्या समस्या उद्भवतात.
याला एक कारण म्हणजे दातांना बरोबर ब्रश न करणे हे आहे. कधीही हिरड्या वर आणि दातांवर दाबून ब्रश करू नये.
दातांवर ब्रश करताना देखील गोलाकार पद्धतीने ब्रश फिरवायला हवा. नेहमी लक्षात ठेवा की ब्रश दिवसातून कमीत कमी दोन वेळा करायलाच पाहिजे.
एक म्हणजे सकाळी झोपून उठल्यावर आणि आणि दुसरा म्हणजे रात्री झोपण्या अगोदर ब्रश करणे हे महत्त्वाचे आहे.
दात स्वच्छ करणे
दातांवर आणि हिरड्यांवर काही प्रमाणात अन्नाचे कण साचून राहतात, जे बऱ्याच दातांच्या समस्येला कारणीभूत असतात. बराच काळ हे अन्न साचून राहिल्याने, ‘प्लेक’ निर्माण होते आणि दात किडतात. याकरता, डेंटिस्ट दात स्वच्छ करतो त्यामुळे बरेच दातांच्या समस्या दूर होतात.
गैरसमजूती–
बऱ्याच रुग्णांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला आहे की, डॉक्टरांकडून दात स्वच्छ केल्याने दात ढिले होतात. पण याउलट दात स्वच्छ केल्यानेच दात पक्के होण्यास मदत होते आणि सगळ्या रुग्णांमध्ये दात स्वच्छ करण्याची गरज नसते. दात स्वच्छ केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस दात ढिले झाल्याची जाणीव होते.
कारण दातांवरचे किटाणू निघाल्यानंतर दात आणि हिरड्या तात्पुरत्या स्वरुपात मोकळ्या होतात. पण काही दिवसांनी या हिरड्यांची नव्याने वाढ होऊन दात पुन्हा पक्के होण्यास मदत होते आणि दातांचे आयुष्य वाढते.
हे डॉक्टरांकडून स्वच्छ केलेले दात डॉक्टरांनी सांगितलेल्या ब्रशिंग पध्दतीचाच उपयोग करुन दैनंदिन घरच्या घरी व्यवस्थित अवलंब करावा.
योग्य औषध घेणे
दातांची समस्या ही कधीही उद्भवणारी गोष्ट आहे, तर त्यावर एक बरोबर पर्याय म्हणजे योग्य औषध घेणे होय. एक डेंटिस्ट तुम्हाला तुमच्या समस्ये प्रमाणे बरोबर औषध सुचवू शकतो, जेणेकरून तुमची दातांची समस्या कमी होईल. सुचवलेले औषध बरोबर घेऊन तुम्हाला बऱ्याच प्रमाणात दातांच्या समस्या वर पर्याय काढता येईल.
हे सर्व डेंटिस्ट कडून भेटणारे पर्याय आहेत, जे तुमची दातांची समस्या कमी करतील.
डेंटिस्टकडे गेल्याने, ते आपल्याला दातांचे बरोबर निरीक्षण करून समस्यांच्या मूळ शोध काढतात. एकदाका दातांच्या समस्यांचा मूळ भेटल्यावर, त्यावर उपाय शोधणं फार सोपे होते.
तुम्हाला प्रत्येक वेळा खाऊन झाल्यावर योग्य प्रकारे तोंडाची साफ सफाई करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या तोंडातले सगळे अन्नद्रव्य साफ होतील.
दातांची समस्या कमी करण्याकरता, त्यामधले ‘बॅक्टेरिया’ कमी ठेवणे फार गरजेचे आहे. वाढते ‘बॅक्टेरिया’ चे प्रमाण हे दात दुखणे या मागचे मुख्य कारण आहे.
आहारात साखरेचे प्रमाण कमी करणे
आपल्या आहारात साखर ही कमी किंवा जास्त प्रमाणात असते, आणि ती शरीराला थोड्या मात्रा मध्ये आवशक्य सुद्धा असते. पण दातावर साखरेचे प्रमाण फार काळ राहिल्यावर, त्यावर ‘बॅक्टेरिया’ होण्याच्या संभावना होऊ शकतात.
ही बॅक्टेरिया, दातांची सळसळ, दात किडणे ही समस्या आणि बरेच काही समस्या निर्माण करू शकतात. ही बॅक्टेरिया, दातांची सळसळ आणि दात किडणे या समस्या आणू शकतात. म्हणून जास्त गोड खाणे टाळणे आणि आहारात कमी साखर असणे हे महत्त्वाचे आहे.
भरपूर पाणी पिणे
भरपूर पाणी पिल्यावर, दातांवरचे आम्लं युक्त पदार्थ कमी होण्यास मदत होते. जास्त पाणी पिल्याने लाळेचे प्रमाण ही वाढते जे दातांना ‘प्लेक्यू’ आणून किडन्या पासून दूर ठेवते. पाणी पिल्यावर ‘तोंड कोरडे पडणे’ अशा प्रकारची समस्याही कमी होऊ शकते.
एकंदरीत बघितले तर तोंडाच्या बरेच अशा समस्या पूरक पाणी पिल्यामुळे कमी होण्यास मदत होते. वरील नमूद गोष्टी काही मुख्य दात दुखीवर घरगुती उपाय सुद्धा आहेत. या पर्यायामुळे तुमच्या समस्या कमी करू शकतात अथवा तुम्ही टाळू सुद्धा शकता.
तेलाने चूळ भरणे
तेलाने चूळ भरण्यामुळे, दातांमध्ये कीड आणि छोटे जिवाणू हे नाहीसे होण्याची शक्यता असते. यामुळे दातांचे दुखणे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
लवंग ही दात दुखी वर फार गुणकारी उपाय आहे. जर कोणताही दात दुखत असेल तार त्यावर लवंग किवा लवंगाचे तेल एका कापसाच्या बोळ्यावर टाकून दाताखाली ठेवावा. हा उपाय केल्याने काही साइड इफेक्ट्स होत नाही आणि दातांचं दुखणं हे देखील कमी होण्यास मदत होते.
मौखिक आरोग्यात दात महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे.
वरील नमूद केलेले दातांची कीड, उपाय, आणि उपचार, हे नक्कीच तुम्हाला अनेक दातांसंबंधी तील समस्या दूर करण्यास मदत करतील. इतकेच नव्हे तर जरी तुम्ही घरगुती उपाय कराल, तरीही तुम्हाला एकातरी डेंटिस्टकडे जाऊन तपासणी करावी लागेल.
ते तुमची समस्या बरोबर समजून घेऊन, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. जेवढं शक्य होईल तेवढं, वरील नमूद पर्याय वापरण्याचा प्रयत्न करा.
दातांची काळजी योग्यरीत्या घेऊन तुम्ही बरेच दातांच्या समस्या टाळू शकतात.
शारीरिक आरोग्यात मौखिक, म्हणजे दातांच्या आरोग्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. पण, दातदुखी असह्य झाल्यावर उपचार घ्यावेच लागतात आणि ते महाग असतात.
पण, दातदुखी टोकाला जाईपर्यंत अनेक जण दुर्लक्ष करतात आणि मग उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. रूट कॅनॉलसाठी काही हजार रुपये आणि डेण्टल इम्प्लांटसाठी त्यापेक्षा जास्त खर्च येतो.
दंतोपचार आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये (ओपीडी) केले जातात आणि त्यासाठी रुग्णालयात भरती होण्याची गरज नसल्याने भारतातील बहुसंख्य इन्शुरन्स पॉलिसीज दंतोपचार कव्हर करत नाहीत. देशभरातील लाखो लोकांना दंत विम्याची गरज असते.
भारतात दतोपचारांचे कव्हर संपूर्ण का नाही, या प्रश्नाचे उत्तर खोटी बिले सादर केली जाण्याची मोठी शक्यता हे असल्याचे ‘हेक्साहेल्थ’चे प्रमुख अंकुर गिग्रास हे सांगतात. डेण्टल ओपीडी कव्हरेजमध्ये को-पेमेंट हा त्यावरील पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे फसवणूक टळेल आणि उपचारही व्यवस्थित होतील, असे त्यांना वाटते.
जर तुम्हाला दंत विमा किंवा दंत उपचार विषयी आणखी माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट करा.
4 thoughts on “दातांची काळजी कशी घ्यावी?”