तीळ गुळाचे आरोग्यासाठी असणारे महत्त्व

तीळ आणि गुळाचा 1 लाडू किंवा 20-25 ग्रॅम तीळ रोज खाल्ल्याने याचे अनेक मोठे फायदे तुम्हाला मिळू शकतात.
हिवाळ्यातील तीळ-गुळ हे सुपरफूड मानले जाते.

हिवाळा सुरु झाला की आपल्या शरीराला आपण उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स (dry fruits) खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे शरीर उबदार राहते. पण काजू-बदाम खाणे सगळ्यांनाच परवडणारे नसते.

त्यामुळे तुम्ही त्याला पर्याय म्हणून इतर गोष्टींचा देखील आहारात समावेश करु शकता. हिवाळ्यात अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कारण बदलत्या वातावरणामुळे सर्दी आणि खोकला सारख्या समस्या उद्भवतात.

थंडी वाढल्याने अनेकांना दरवर्षी याचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात आपल्याला आहारात देखील तसा बदल करणं गरजेचं असतं.

थंडीत प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने बॅक्टेरिया झपाट्याने पसरतात. पण जर तुम्ही तिळाचे लाडू गूळ एकत्र करुन खालला तर सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोकाही कमी होतो.

कारण तीळ आणि गूळ शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी गुणकारी आहेत. आयुर्वेदात गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे सांगितले आहेत. या दोन्ही गोष्टींपासून शरीरात उष्णता निर्माण होते.

यामुळे आपले शरीर उबदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवून देखील खावू शकता.
तिळाचे पदार्थ फक्त संक्रातीपुरतेच मर्यादित नसतात.

रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळाचे लाडू खाणं महत्त्वाचं मानलं जातं. 
तिळगुळ खा निरोगी राहा असं का म्हणतात, खुप कमी लोकांना माहितीयेत याचे फायदे

गुळाचे फायदे

गूळ शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो. जे लोक रोज गूळ खातात त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता नसते. गूळ खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. गूळ थकवा दूर करण्यास मदत करतो.

गुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक अॅसिड असते ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची (oxidative stress) पातळी कमी होते.

छोट्याशा झाडाला येणारे तीळ त्वचेसारख्या नाजूक घटकाचं संरक्षण करण्यापासून ते हदयासारख्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवाचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे असतात. 

तिळगुळाचे लाडू म्हणजे संक्रातीला आणि हळदी कुंकवाला वाटण्याचा प्रतिकात्म पदार्थ नसतो. तर तिळासारखा छोट्या वाटणाऱ्या घटकातून आरोग्य जपण्याचा चविष्ट पर्याय म्हणजे लाडू हे यातून सांगितलं जातं.

आपल्या एरवीच्या इतर लाडुंच्या तुलनेत तिळाचे लाडू हे अगदी लहान केले जातात. पण ते लहान यासाठीच असतात कारण आपल्या आरोग्यासाठी तीळ महत्त्वाचे असले तरी तीळ आणि तिळाचे पदार्थ हे प्रमाणात खाल्ले तर फायदेशीर ठरतात.

जाणून घेऊयात तीळ खाण्याचे फायदे…

शरीर उबदार ठेवण्यासाठी

थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ फार फायदेशीर आहे. तीळ हा मुळात उष्ण पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यात आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

थंड वातावरणात शरीराला उबदार ठेवण्यासाठी तीळ आणि गुळ एकत्र करुन त्याचे लाडू खावे. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य तीळ खावे.
ज्यांची त्वचा एरवीही कोरडी पडते त्यांनी एरवीही थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

Bad cholesterol (बॅड कोलेस्ट्राॅल) कमी करते

तिळाच्या आरोग्यदायी गुणधर्मावर झालेलं संशोधन सांगतं, की तिळामधे फिटोस्टेरोल्स हा घटक असतो. या घटकामुळे शरीरातलं बॅड कोलेस्ट्राॅल कमी होतं.
कोलेस्ट्राॅलचं प्रमाण नियंत्रित ठेवून हदयाचं आरोग्य जपण्याचं कार्य हा घटक करतो. म्हणून तिळाचा लाडू हदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.

तिळाच्या लाडुद्वारे शरीराला मोठ्या प्रमाणात फॅटस मिळतात. याचा फायदा शरीराला ऊर्जा मिळण्यास होतो. काम करण्याचा कंटाळा आल्यास तोंडात तिळाचा लाडू अवश्य टाकावा, यामुळे काम करण्याची ताकद मिळते. 

तिळामधून पाॅलिअनसॅच्युरेटेड (polyunsaturated) म्हणजे जे विरघळून त्याचं फॅटसमधे रुपांतर होत नाही असे फॅटी ॲसिड असतात. हे फॅटी ॲसिड म्हणजे एक प्रकारचे ॲण्टिऑक्सिडण्टस (antioxidants) असतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच तिळामधून ओमेगा 6 (omega 6) हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. आहारात असे खूप कमी घटक आहेत जे ओमेगा 6 हा घटक शरीरास देतात.

त्यात तिळाचा समावेश आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून तिळातील इतर महत्त्वाच्या घटकांचा फायदा चविष्ट् स्वरुपात करुन घेण्यासाठी म्हणूनच तिळाचा लाडू खाण्याला महत्त्व आहे.

कर्करोगापासून बचाव

तिळामध्ये सेसमीन नावाचे अँटी ऑक्सिडंट असते. जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करतात.

यामुळेच lumg cancer (लंग्स कॅन्सर), पोटाचे कॅन्सर, ल्यूकेमिया (blood cancer), प्रोटेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) यांसारख्या कर्करोगावर हे परिणामकारक ठरते. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.


तिळ हे अँटी कॅन्सर चे काम करतात. त्यामुळे कॅन्सर पेशिंची वाढ कमी होते. तसेच कॅन्सर होण्याचा धोका टाळण्यासाठी रोज तीळ खाणे खूप फायद्याचे ठरते.

कोणी खाऊ नये तीळ-गुळ

मधुमेहाच्या रुग्णांनी तीळ गुळाचे जास्त सेवन करू नये. कारण गुळ खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. तिळाच्या बियांमध्ये काही सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड देखील असतात, ते जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त तिळाचे सेवन करू नये.
मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत.

हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते

तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम हे पोषक तत्त्व असतात. हे सर्व हृदयासाठी फायदेशीर आहेत.

नुसते तीळच नाही तर जेवण बनवण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला तर हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.
तिळामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड उपलब्ध असते ज्याचा आपल्या हृदयाला चांगला फायदा होतो.

तिळामधील मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करते. तसेच हृदय निरोगी बनवण्यासाठी मदत करते. हृदयाच्या मांस पेशी मजबूत बनवतात.

तिळाच्या आरोग्यदायी गुणधर्मावर झालेलं संशोधन सांगतं, की तिळामधे फिटोस्टेरोल्स हा घटक असतो. या घटकामुळे शरीरातलं बॅड कोलेस्ट्राॅल कमी होतं.

कोलेस्ट्राॅलचं प्रमाण नियंत्रित ठेवून हदयाचं आरोग्य जपण्याचं कार्य हा घटक करतो. म्हणून तिळाचा लाडू हदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.

वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते

रोज तिळाचे लाडू खाल्ल्याने भूक कमी होते. तिळामध्ये तंतुमय घटक म्हणजेच फायबर्स असल्याने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रोज थोडे तीळ खाल्ले तर खूप फायद्याचे ठरेल.

छातीतील कफ कमी करण्यासाठी तीळ उपयुक्त ठरते :

जर छातीत कफ झाला असेल तर तीळ खाणे खूप फायद्याचे ठरते. शक्यतो तीळ खाताना ते भाजून खावेत तसेच त्यासोबत गुळ किंवा साखर खावी.
तीळ हे कफ नाशक असतात. कोरड्या खोकल्यासाठी तीळ आणि साखरेचे पाण्यासोबत सेवन केल्याने फायदा होतो.

तीळ वेदनाशक तसेच शक्तिवर्धक

तीळ हे वेदनाशामक तसेच शक्तिवर्धक असतात. वेदना होत असतील तर तीळ खाणे खूप फायद्याचे ठरते. तीळ हे वेदनाशामक असतात तसेच ते ऊर्जा प्रदान करणारे देखील असतात. रोज तीळ खाल्ल्यास तुम्हाला त्यापासून ऊर्जेचा साठा मिळेल.

तसेच रोज सकाळी एक ते दोन चमचे तीळ खाल्ले तर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. जर तुम्हाला वेदना होत असतील तर त्यापासून देखील आराम मिळेल.

तिळाच्या लाडुद्वारे शरीराला मोठ्या प्रमाणात फॅटस मिळतात. याचा फायदा शरीराला ऊर्जा मिळण्यास होतो. काम करण्याचा कंटाळा आल्यास तोंडात तिळाचा लाडू अवश्य टाकावा, यामुळे काम करण्याची ताकद मिळते.

त्वचा आणि केसांसाठी सौंदर्यासाठी तीळ उपयुक्त असते
त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

तिळाचे तेल जर त्वचेला किंवा चेहऱ्याला लावले तर त्वचा मुलायम बनते तसेच उजळपणा येतो. केस दाट आणि लांब होण्यासाठी तिळाच्या तेलाचा फायदा होतो. तीळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत.

तिळामधे तेलाचा अंश मोठ्या प्रमाणात असतो. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी हे तेलधर्मीय तीळ फायदेशीर ठरतात. केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी तिळाचा लाडू खाल्ल्याने तिळातील गुणधर्माचा फायदा मिळतो.

तिळाचे तेल जसे केसांसाठी उपयुक्त आहे तसेच ते त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. यामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व आढळून येतात.

शरीरावर एखाद्या ठिकाणी भाजल्यावर तीळ बारिक करून त्यात तूप आणि कापूर एकत्र करून त्याची पेस्ट लावल्याने आराम मिळतो. तसेच जखम लगेच बरी होण्यास मदत होते.

याशिवाय दाट केसांसाठी, केस गळती थांबण्यासाठी, नॅचरल काळ्या केसांसाठी सुद्धा तिळाचे तेल फायदेशीर आहे.

मानसिक आरोग्य सुधारते

केवळ शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर मनाच्या आरोग्यासाठीही तिळ लाडू खाण्याचा फायदा होतो. तिळामधे टाइरोसिन (tyrosine) नावाचं अमिनो ॲसिड असतं.

या घटकाचा संबंध सेरोटोनिन (serotonin) या हार्मोन्सशी असतो. हा घटक जर शरीरात पुरेशा प्रमाणात असला तर शरीरात सेरोटोनिन अर्थात हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. 

म्हणूनच तिळाचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या मूडकडे लक्ष ठेवावं. तिळाच्या लाडूनं मूड चांगला, उत्साही आणि आनंदी झाल्याचं लक्षात येईल.

तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर

तिळाच्या तेलाने मसाज केल्यास मांस पेशी आणि हाडे मजबूत बनतात. तसेच रिलॅक्स वाटते. तणाव दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाने दहा ते पंधरा मिनिट मसाज केल्यास आराम मिळतो.

किडनी च्या आरोग्यासाठी गुणकारी

ज्यांना सतत लघवीला येते किंवा इतर लघवी संबंधित समस्या असल्यास तिळाचे लाडू त्यावर खूप गुणकारी आहेत. तीळ खाल्ल्याने लघवी संबंधित समस्या दूर होतात. किडनी निरोगी राहण्यासाठी तीळ फायदेशीर ठरतात.

संधिवातावर उपयुक्त

ज्यांना संधिवात आहे त्यांच्यासाठी तर तीळ एकूण गुणकारी औषधासारखे काम करते. तिळातील घटक संधीवातावर परिणामकारक आहे. तीळ हे वेदनाशामक आहेत. तसेच तिळाच्या तेलाने मसाज केल्यास संधिवातावर आराम मिळतो. हाडे मजबूत बनतात.

आहारात पाॅलिश तीळ न वापरता अनपाॅलिश्ड कमी पांढरे असणारे तीळ आणि काळे तीळ वापरणं फायद्याचं ठरतं. या दोन प्र्कारच्या तिळामधे कॅल्शियमचं  प्रमाण भरपूर असतं.

त्यामुळेच तिळाचे लाडू खाण्याचा फायदा हाडांना कॅल्शियम हा महत्त्वा घटक मिळण्यात होतो.तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही.

रक्तदाब व मधुमेह वर गुणकारी ठरते


उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी देखील तिळाचे लाडू उपयुक्त आहे.
तिळामधे असलेलं मॅग्नेशियम इन्शुलिन निर्मिती आणि रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करतं. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही तिळाचा उपयोग होतो.

रक्तदाब आणि मधुमेहाशी निगडित समस्यांचा धोका टाळण्यासाठी रोज एक किंवा दोन तिळाचे लाडू खाणं फायदेशीर ठरतं. तीळाचे सेवन केल्याने मधुमेहापासून बचाव होतो.

आपल्या लहान मुलांना वेळीच नक्की चांगल्या गोष्टी शिकवा

तिळाचा लाडू खाल्ल्यास रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात. त्याचा फायदा म्हणजे लहान मोठ्या संसर्गजन्य रोगांपासून आपलं संरक्षण होतं.

दातांच्या बकळटीसाठी तिळाचे लाडू खूप प्रभावी ठरतात


दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तिळाचे लाडू खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील.
संक्रातीनिमित्त आणलेले तीळ नंतर घरात तसेच पडून राहातात. ते खराब होतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही.

आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असलेले तीळ असे वाया न घालवता त्याचे लाडू करुन ठेवावेत. मोठ्यांच्या आरोग्यापासून लहानांच्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेणारे हे तिळाचे लाडू खाणं खूप महत्त्वाचे आहे.
 
तीळ बारिक करून खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. तीळामुळे पचन क्रीया सुधारते.
पोट दुखत असेल किंला फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून मालिश केल्याने आराम मिळतो.

बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो.

तिळाचे तेल लसणासोबत कोमट गरम करुन कानामध्ये टाकल्यास कानाच्या वेदनांपासून सुटका होते.

लूज मोशनचा त्रास होत असेल तर एक चमचा भिजलेल्या तिळाची पूड, एक चमचा गायीचं तूप आणि सहा चमचे शेळीचं दूध एकत्र करून दिवसातून तीन वेळा घेतल्यास आराम पडेल.

ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.

याबरोबरच आपण भाजीला दाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तीळाच्या शेंगदाण्याच्या कूटाचा वापर केल्यास तोही फायदेशीर ठरतो. यामुळे भाजीला एक वेगळी चव येते.

गोडाधोडाचे पदार्थ किंवा डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो.

(Eating sesame seeds is extremely beneficial for health)

मूळव्याधाचा त्रास असेल तर तीळ, हिंग वाटून लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो.

थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘आपलं सरकार. कॉम ही website याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Leave a Comment