आई होणे ही जगातील सर्वात सुंदर अनुभूती आहे , पण आई होणे तितके सोपेही नाही.गरोदरपणात पाय सुजणे ही एक खूपदा दिसणारी समस्या आहे. गरोदरपणात (pregnancy) महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारच्या हार्मोनल बदलांमुळे (hormonal changes) शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, याशिवाय शरीरात अनेक बदल होतात. लठ्ठपणा वाढला की पायांना सूज (swollen feet) आल्याने या समस्यांना सामोरे जावे लागते.
गरोदरपणा दरम्यान पाय सुजणे खूप सामान्य आहे. बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शरीरात तयार होणारे अतिरिक्त रक्त आणि द्रव यामुळे ही समस्या उद्बवते होते. याला एडेमा (Edema) म्हणतात. त्यामुळे केवळ पायांनाच नव्हे तर हात, चेहऱ्यासह शरीराच्या इतर भागांनाही सूज येऊ शकते.
पायाला सूज आल्याने चालायला त्रास होतो. पाय जास्त वेळ लटकत राहिल्याने सूज वाढते. प्रसूतीनंतर काही दिवसांनी ही समस्या बरी होत असली, तरी जोपर्यंत पायांना सूज असते तोपर्यंत त्रास तर होतच राहतो.
FIRST Trimester (गरोपणातील मधील सुरुवातीचे तीन महिने)
पहिल्या सत्रात शरीरात जलद हार्मोनल बदल होतात. या दरम्यान महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी झपाट्याने वाढते. प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे तुमची पचनक्रिया मंदावते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आपण अनेकदा पोट फुगणे आणि पचनामध्ये समस्या पाहतो. तुम्हाला असे वाटते की तुमचे पाय, हात आणि चेहऱ्यावर सूज आहे. पण ते इतर लोकांना स्पष्टपणे दिसेल इतकी नसते.
SECOND TRIMESTER (गरोपणातील मधील तीन महिने)
दुसरा त्रैमासिक गर्भावस्थेच्या 13 व्या आठवड्यापासून सुरू होतो. या काळात पाय सुजल्यासारखे वाटणे ही काही मोठी गोष्ट नाही. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात महिलांना अनेकदा पायांवर सूज येण्यास सुरुवात होते.
जेव्हा तुम्ही दिवसभर तुमच्या पायांवर सक्रिय असता किंवा हवामान खूप गरम असते तेव्हा हे जास्त होते.
तुमच्या शरीरातील जास्त प्रमाणात रक्त आणि इतर द्रवपदार्थांमुळे सूज येते. दुस-या तिमाहीत, महिलांच्या रक्ताचे प्रमाण 50% पर्यंत वाढू शकते.
याशिवाय शरीरात तयार होणाऱ्या हार्मोनल द्रवपदार्थामुळेही पायाला सूज येऊ शकते. जरी तुमच्या पायाच्या नखांना सूज आल्यासारखे वाटत असले तरी हे अतिरिक्त द्रव तुमचे शरीर मऊ करण्यासाठी आणि बाळाला जन्म देण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
याशिवाय, बाळाचा जन्म होताच, काही दिवसांत हे सर्व अतिरिक्त द्रव तुमच्या शरीरातून बाहेर पडते.
THIRD TRIMESTER (गरोपणातील शेवटचे तीन महिने)
तिसरा तिमाही 28 आठवड्यांपासून सुरू होतो. या दरम्यान, पायांना सूज येणे सामान्य आहे. जेव्हा ते 40 व्या आठवड्यात पोहोचतात, बऱ्याच वेळा स्त्रियांच्या पायाची बोटे त्यांचा आकार दुप्पट करतात.
या दरम्यान, तुमचे शरीर स्वतःमध्ये रक्त आणि द्रव गोळा करत आहे, ज्यामुळे तुम्हाला शरीराच्या अनेक भागांमध्ये सूज दिसू शकते. यासोबतच तुमच्या गर्भाशयाचा आकारही वाढत आहे, त्यामुळे तुमच्या शरीराचा भार तुमच्या पायावर अधिक पडतो.
बाळाचे वजन जसजसे वाढत जाते तसतसे तुमच्या पायांपासून हृदयापर्यंत रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. यात कोणताही धोका नाही. पण खूप अस्वस्थ वाटू शकते.
डॉक्टरंणा कंसल्ट करने आवश्यक ?
इतरही अनेक कारणे आहेत जी तुमच्या पायांच्या आणि हातांच्या बोटांना सूज येण्यास कारणीभूत आहेत.जसे की रक्तदाब वाढने
Pregnancy induced hypertension हा एक गरोधरपणातला Complication असे समझले जाते .
हे कदाचित तिमाहीत उद्भवल्यास प्रीक्लेम्पसिया सूचित करू शकते. तथापि, प्रीक्लेम्पसिया सहसा हाय बीपी, जास्त वजन आणि डोकेदुखीसह असतो
जर सूज फक्त एका पायात असेल तर ती रक्तवाहिनीत रक्त गोठण्यास सूचित करते.
उपाय काय करू शकतो? (गरोदरपणात पाय सुजणे काय करावे आणि काय करू नये.)
1.पायाखाली घ्या उशी
गरोदरपणात जास्त वेळ बसल्याने किंवा उभे राहिल्याने पाय सु
जतात. अशावेळी पायांना विश्रांती देण्यासाठी पायांखाली उशी ठेवा व नंतर त्यावर पाय ठेवा. सुमारे 20 मिनिटे या उशीवर पाय ठेवून झोपा. दिवसातून थोड्या वेळाने असे केल्याने पायांची सूज कमी होईल.
2.एप्सम मिठाच्या पाण्याने पाय शेका
जर तुम्हालाही पायांना सूज येण्याची तक्रार असेल तर तुम्ही एप्सम मीठ वापरू शकता. त्याच्या गुणधर्मांमुळे पायांच्या स्नायूंना शेक मिळतो. तसेच, वेदना कमी करत
पाण्यात तुमचे पाय 20 ते 25 मिनिटे भिजवा.
3.पोटॅशिअमयुक्त आहार घ्या
गरोदरपणात पोटॅशिअमच्या कमतरतेमुळे पायांवर सूज येण्याची समस्या देखील दिसुन येते.
अशावेळी तुम्हाला उच्च रक्तदाब आणि वॉटर रिटेंशनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. यासाठी पोटॅशिअम युक्त अन्नाचा आहारात समावेश करा. सालीसह बटाटे, केळी, डाळिंब ,पिस्ता, सालीसह रताळे
पालक,बीन्स,डाळिंब, संत्री, गाजर,दही,डाळी यांसारख्या गोष्टींचे सेवन करा.
4.आहारात मॅग्नेशियम चा समावेश करा
मॅग्नेशियमची कमतरता आपल्या शरीरातील पाणी टिकवून ठेवते. तर बदाम, काजू, टोफू, डार्क चॉकलेट, ब्रोकोली इत्यादी पदार्थांसह मॅग्नेशियमचे सेवन सुरू ठेवा.
5.धणे चा फाण्ट सेवन करा
एक ग्लास पाण्यात कोथिंबीर (२ टेस्पून) भिजवा. हे पाणी उकळवा, बिया काढून टाका आणि दिवसातून एकदा प्या. (सकाळी रिकाम्या पोटी घेणे चांगले)
6.कॅफिनचे सेवन कमी करा (गरोदरपणात पाय सुजणे काय करावे आणि काय करू नये.)
कॅफिन एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. ( diuretic) ज्यामुळे तुम्हाला वारंवार लघवी होते. जेव्हा तुमचे शरीर वारंवार लघवीच्या स्वरूपात द्रव बाहेर टाकते, तेव्हा तुमच्या शरीराची पाणी साठवण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणूनच ब्लॅक कॉफी ऐवजी दुधाची कॉफी किंवा हर्बल चहाचे सेवन पाय सुज कमी होण्या साठी फायदेशीर ठरेल.
7.हायड्रेटेड रहा
पायाची सूज कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवावे. गरोदर महिलेने जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे. किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे जळजळ कमी होण्यासही मदत होते. शरीरात द्रव तेव्हाच जमा होतो जेव्हा शरीराला पाण्याची कमतरता भासते. म्हणूनच जेव्हा तुम्ही भरपूर साधे पाणी प्याल तेव्हा तुम्हाला निर्जलीकरण होणार नाही . यामुळे शरीरातील साचलेले पदार्थ हळूहळू बाहेर पडतात आणि सुज कमी होते.
8.पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा
पॅकेज केलेल्या उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. गरोदरपणात पायांवर आलेली सूज मिठामुळे वाढते.
MSG हा पदार्थ पॅकेज फूड्स मधे आढळतो. ह्या पदार्थने सुद्धा वॉटर रिटेंशन शरीरात वाढते.
9.डाव्या कुशीवर झोपा
झोपताना डाव्या कुशीवर झोपा. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि तुमच्या पायांवरील सूज कमी होते.
10.जास्त काळ एकाच जागी स्थिर राहू नका
तुमचे शरीर एकाच स्थितीत अनेक तास ठेवल्याने तुम्हाला सूज येण्याचा त्रास होऊ शकतो.
- जास्तीत जास्त प्रोटीन्सचे करा सेवन
- थोड्या थोड्या वेळाने फेऱ्या मारा, चालत रहा.
- दररोज 20 मिनिटे व्यायाम करने.
- जेव्हा तुम्ही बसता तेव्हा पाय समोर पसरा.
Dr.Twinkle Harge
(लेखिका या प्रसुती-शास्त्रच्या अभ्यासक आहेत)
https://youtube.com/shorts/NzCxMgldt68?si=URnBDcq8jwhb-hU6