कृषी यांत्रिकीकरण योजना

आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्राची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा अवजारांच्या खरेदीसाठी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

कृषी योजनेची वैशिष्ट्ये:

१.     या योजनेअंतर्गत खूप साऱ्या कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते आहे जेणेकरून शेतकरी शेतीसाठी उपयुक्त उपकरणे खरेदी करू शकतील व शेती 

        कार्य जलद गतीने करू शकतील व स्वतःच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करू शकतील.

२.     कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा (DBT)करण्यात येईल.

३.     राज्यातल्या सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

४.    कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.

५.    योजनेअंतर्गत अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही.

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:

•       कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी ८० टक्के अनुदान  उपलब्ध करून दिले जाते.

कृषी योजनेचा फायदा:

•        महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले आहेत. यामुळे शेतीच्या कामांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता लक्षणीयरीत्या 

         वाढली आहे. यामुळे शेतीचे खर्च कमी झाले आहेत आणि रोजगार निर्मितीही झाली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक आधुनिक आणि 

         स्पर्धात्मक बनली आहे.

•        कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.

•        या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीसंबंधित विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.

•        या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे.

•        महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे राज्यातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला मोठी गती मिळाली आहे.

•        या योजनेमुळे शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

•        या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कष्टांमध्ये मोठी घट झाली आहे.

आवश्यक पात्रता:

•        अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

कृषी योजनेच्या अटी व शर्ती:

•        फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

•        महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

•        अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.

•        अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.

•        शेतकरी अनुसूचित जाती, जमातीमधील असल्यास त्याच्याजवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

•        योजनेअंतर्गत मिळणारी अवजारे किमान ६ वर्षे हस्तांतर/पुनर्विक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.

•        शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८अ असणे गरजेचे आहे.

•        अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान दिले जाईल.

•        अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल परंतु 

          त्याला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

•        जर शेतकऱ्याने एखाद्या अवजाराचा लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुढील १० वर्षे लाभ घेता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज 

         करता येईल.

आवश्यक कागदपत्रे:

•        आधार कार्ड

•        रेशन कार्ड

•        रहिवासी दाखला

•        मोबाईल नंबर

•        ई-मेल आयडी

•        जातीचा दाखला

•        जमिनीचा ७/१२ व ८अ

•        बँक खाते पासबुक

•        यंत्र/अवजारांचे कोटेशन

•        परीक्षण अहवाल

•        पासपोर्ट आकाराचे फोटो

•        प्रतिज्ञा पत्र

लेख आवडला तर नक्की कळवा आणि शेयर करा….

Leave a Comment