आरोग्यविषयक काही महत्वपूर्ण संशोधन नक्की वाचा

● मीठ, साखरेमुळे मुलांमध्ये किडनीचे आजार

काही महत्वपूर्ण संशोधन नक्की वाचा

प्रमाणापेक्षा जास्त मिठाचे सेवन आणि साखर खाल्ल्यामुळे मुलांमध्ये किडनीचे आजार वाढत आहेत, असा दावा संशोधकांनी केला आहे.

अयोग्य आहारामुळे मुलांमध्ये किडनीचे आजार होत आहेत. जास्त मीठ आणि साखर खाल्ल्याने मुलांच्या किडनी खराब होत असल्याचे अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जास्त फास्ट फूड खाल्ल्याने किडनीचे आजार होतात. तर जास्त फास्ट फूड खाणे, व्यायाम न करणे इत्यादी अनारोग्यकारक सवयी देखील किडनीच्या आजारास कारणीभूत ठरत आहेत.

या सवयींमुळे उच्च रक्तदाब आणि साखरेसारखे आजारही होतात, ज्यामुळे किडनी आणखी खराब होतात, असे अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी म्हटले आहे.

मुलांमध्ये किडनीचे आजार वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हे आजार वाढण्याचे कारण म्हणजे त्यांच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी, ज्यामध्ये कॅन केलेले अन्न, जंक फूड, जास्त मीठ आणि साखर असलेले पदार्थ यांचा समावेश होतो.

या सवयी मुलांचे एकंदर आरोग्य बिघडवतात, ज्यामुळे लठ्ठपणा आणि साखरेसारखे आजार होऊ शकतात, ज्यामुळे किडनीला हानी पोहोचते.

धूम्रपान आणि मद्यपान केल्याने देखील किडनीच्या आजाराचा धोका वाढतो.

तर गंभीर प्रकरणांमध्ये, मुलांमध्ये क्रॉनिक किडनी आजारदेखील होऊ शकतो.

हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये किडनी हळूहळू खराब होत जाते.

तसेच संशोधनात सुमारे ६० टक्के प्रकरणांमध्ये, जन्मापूर्वी आईच्या अल्ट्रासाऊंडमध्येच मुलाला किडनीचा त्रास असल्याचे दिसून आले आहे.

● मुलांमधील कमजोर रोगप्रतिकार शक्ती चिंताजनक ! (संशोधन)

पाच वर्षांखालील मुलांमध्ये एका गंभीर आजाराची भर पडत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता वाढत आहे. तसेच मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे, असे अभ्यासात समोर आले आहे.

दरवर्षी २२ ते २९ एप्रिल दरम्यान ‘जागतिक प्राथमिक इम्युनोडेफिशियन्सी सप्ताह’ साजरा केला जातो.

लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे, हा त्याचा उद्देश आहे. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि मुले पुन्हा पुन्हा आजारी पडतात.

जनजागृती आणि उपचाराच्या सुविधा नसल्याने हा आजार झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तसेच, हा रोग एकसंध (नात्यात) विवाह करणाऱ्या समुदायांमध्ये अधिक सामान्य आहे.

जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याला वारंवार प्रतिजैविकांची (Antibiotics) गरज भासत असेल तर ते या आजाराचे लक्षण असू शकते.

अशा परिस्थितीत, नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

लवकर हा आजार ओळखल्यास त्यावर उपचार करता येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

२००४ पूर्वी, राष्ट्रीय स्तरावर रोगप्रतिकारक कमतरतेचे ५० पेक्षा कमी रुग्ण आढळले होते.

२०१४ मध्ये सुमारे ३०० ते ५०० रुग्णांचे निदान झाले, तर २०२४ मध्ये २,५०० ते ३,००० इतक्या रुग्णांची वाढ झाली.

विशेषतः ग्रामीण भागात, सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे इम्युनोडेफिशियन्सीच्या अनेक प्रकरणांचे निदान होत नाही. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

● तुम्ही टॅटू गोंदवत आहात का ? सावधान (संशोधन)

असाल तर आताच सावध व्हा. टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी शाई आणि सुया यामुळे हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही आणि यकृताचा कर्करोग तसेच ब्लड कॅन्सरचा धोका संभवतो, असा दावा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी केला आहे.

सध्या तरुण-तरुणींमध्ये टॅटू बनवण्याचा ट्रेंड आहे. मात्र, टॅटू एखाद्या तज्ज्ञाद्वारे काढले जात नाहीत, त्यावेळी आरोग्यास धोका निर्माण होतो.

अनेक वेळा टॅटू काढणारे संक्रमित सुया वापरतात, ज्यामुळे हिपॅटायटीस बी, सी किंवा एचआयव्हीसारख्या संसर्गाचा धोका वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

स्वीडनमधील लुंड्स विद्यापीठातील संशोधकांनी ११,९०५ व्यक्तींवर अभ्यास केला. या संशोधनात, टॅटू काढलेल्या लोकांना लिम्फोमा (रक्त कर्करोगाचा एक प्रकार) होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले.

टॅटू शाईमध्ये पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स असू शकतात. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने टॅटू शाईच्या रचनेचे सर्वेक्षण केले आणि लेबलिंग आणि

घटकांमधील तफावत आढळली. त्यांना चाचणी केलेल्या २० टक्के नमुन्यांमध्ये पीएएच आणि ८३ टक्के काळी शाई आढळली. शाईमध्ये सापडलेल्या इतर घातक घटकांमध्ये पारा, बेरियम, तांबे आणि अमाईन यांसारखे जड धातू आणि विविध रंगद्रव्ये यांचा समावेश होता.

या घातक रसायनांमुळे त्वचेच्या समस्यांपासून ते त्वचेच्या कर्करोगापर्यंतचे आजार होऊ शकतात. शाई त्वचेतून शोषली जाते आणि शरीराच्या लिम्फॅटिक प्रणालीमध्ये प्रवेश करते आणि यामुळे यकृत, मूत्राशय तसेच लिम्फोमा आणि ल्युकेमियासारख्या रक्त कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

लेख आवडला तर नक्की शेयर करा.

Leave a Comment