समस्या ही लहान असतानाच सोडविणे चांगले

चिनी संत लाओत्से आपल्या गाढ प्रज्ञेसाठी प्रख्यात आहेत. अत्यंत मोजक्या शब्दांत ते अशी गूढ गोष्ट सांगत असत की, जी समजून घेण्यासाठी कितीतरी काळ लागत असे. त्यांनी सांगितले आहे की, जगातील मोठ्याहून मोठी समस्या त्याचवेळी सोडवायला हवी जेव्हा ती लघुरुपात असते. हुशार माणसे समस्या मोठी होऊच देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही समस्या मोठी नसते. सांगायचे तात्पर्य … Read more

पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा, पण त्याआधी आर्थिक साक्षर व्हा.

आयुष्यात पैशाचे योग्य (आर्थिक) नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. … Read more

mutual fund (म्युच्युअल फंड) मध्ये गुंतवणूक फायद्याची की तोट्याची

मित्रांनो, आपल्याला ब-याच वेळा गुंतवणूक करून जास्त परतावा मिळावा, अशी इच्छा असते, परंतु, गुंतवणूक साधने, त्यांची जोखीम यांचा पुरेसा अभ्यास नसणे आणि वेळेचा अभाव यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक होतच नाही अशावेळी म्युच्युअल फंड (Mutual Fund) या पर्यायाकडे गुंतवणूकदार बघू शकतात. म्युच्युअल फंड है अधिक परतावा देणारे, पण अधिक जोखमीचे किंवा कमी जोखमीचे, पण कमी परतावा देणारे … Read more

Steve Jobs व्यवसायात यशस्वी होयचं असेल तर आयफोनचे स्टीव्ह जॉब्स यांचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात. हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात. मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी … Read more

तुम्ही पैशाला जपा पैसा तुम्हाला जपेल.

सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून … Read more

१०० मराठी प्रेरणादायी विचार

१०० मराठी प्रेरणादायी विचार 1) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. 2) खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो 3) बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात. 4) तिरस्कार हा माणसाचा नाश करतो. 5) आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. 6) हार मानणे … Read more

आयुष्य सुंदर बनवणारे काही अनमोल नियम

आयुष्य जगत असताना या नियमाचे अवश्य पालन करा. १. क्रेडिट कार्ड ही एक तात्पुरती सोय असते. ही सोय गृहीत धरली आणि पैसे भरण्यात दिरंगाई झाली, तर व्याजाचा बोजा पार द.सा.द.शे. ४५% पर्यवही वाढू शकतो. आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे वेगळे; पण गरज नसताना क्रेडिट कार्ड वापरू नये. अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करणे चुकीचे … Read more

कायदेशीर इच्छापत्र म्हणजे काय आणि कसे बनवावे?

मुकेश आणि लता यांनी गायलेले एक गाणे आहे, मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियो…’ किती चपखल आहेत. या गीताचे बोल. आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्यामागे काय होते, हे कोणालाच ठाऊक नाही. (इच्छापत्र) आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना अतिशय दुःखद असते आणि अशा वेळेस कुटुंबीयांना सरकारी कागदपत्रे (इच्छापत्र) आणि … Read more

लक्ष्मीपूजन म्हणजे नेमके काय?

असे म्हणतात,” जो हाताने काम करतो त्याचे पोट भरते; पण जो डोक्याने काम करतो त्याची तिजोरी भरते.” लक्ष्मीपूजनाचा खरा गर्भित अर्थ वरील वाक्यात आहे. रंक असो वा राजा… शेतकरी असो वा उद्योगपती… कामगार असो वा कारखानदार… प्रत्येक वर्ग आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करतो. असे मानले जाते की, माता  लक्ष्मीच्या आशीर्वादानेच संपत्ती, समृद्धी घरात येते. पैसा, संपत्ती … Read more

अर्चना स्टॅलिन: कहाणी अखंड परिश्रमाने उभ्या केलेल्या एक कोटी turnover ची

अर्चना स्टॅलिन ही जन्मजातच संघर्ष करणारी आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांच्या पहिल्या उपक्रमात अपयशी ठरल्यानंतर अनेकांना त्यांची उद्योजकीय स्वप्ने व कारकीर्द संपली असे वाटले, परंतु अर्चनाला नाही, जिने अनुभवाला व्यावहारिक MBA म्हणून हाताळले, तिचे धडे घेतले आणि तिचा दुसरा उद्योग सुरू करण्यासाठी वेळ दिला.तिचा पहिला व्यवसाय बंद केल्यानंतर सुमारे सहा वर्षांनी तिने माय हार्वेस्ट … Read more