मित्रांनो आयुष्य सुंदर आहे, पण गरज आहे त्याला आणखी छान बनवण्याची. यासाठी जाणून घ्या काही गोष्टी
आत्मविश्वास शोधा :
आपल्या प्रत्येक उणिवेजागी आपला आत्मविश्वास ठेवून पाहा. ज्या कामांची आपल्याला भीती वाटते, त्यात सुधारणा करण्यासाठी या वर्षी काही करा. संशयाच्या सवयीला व स्वतःला कमी लेखण्याच्या विचारालाकायमचा गुड बाय करा.
विनाकारण बलिदान करणे सोडा :(Don’t sacrifice unnecessarily) (आयुष्य)
आपल्यावरील जबाबदाऱ्या, भविष्याच्या योजना आणि गरजांपायी आपला आजचा आनंद, आपले या क्षणाचे सुख व समाधान गमावू नका.
सबबींमागे दडणे बंद करा: (Don’t Say any excuse)
आपण काही नेटके करू शकत नसाल, तर सबब सांगत बसू नका. सबब मिळेल; पण तिला जवळ फिरकू देऊ नका. आपल्या चुकांची, करू न शकण्याची व नकळत काही करून गेल्याची जबाबदारी स्वतः घेण्यास सुरुवात करा. सबबींमुळे आपल्या डोक्यात आपल्याच खोटेपणाचा ढीग साचतो. त्यापेक्षा जबाबदारी घेऊन पाहाल, तर खूप चांगले वाटेल.
प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेऊ नका 🙁 Don’t take everything personally) (आयुष्य)
कोणीही बोललेली गोष्ट दरवेळी स्वतःशी जोडून पाहणे फक्त त्रास आणि डोकेदुखीच निर्माण करते. अशा गोष्टी सुरुवातीलाच दुर्लक्षिणे सर्वोत्तम असते.
व्यायामात तडजोड नको 🙁 Don’t take exercise lightly)
जेव्हा कधी आपल्याला जास्त ताण वा जास्त आनंद असेल, तरीही आपण व्यायाम, योग वा वॉकिंगची मदत घेऊ शकता. स्वतःच्या चिंता व नैराश्यावर नियंत्रण मिळवू शकत नसाल, तर व्यायाम वा योग करा.
बोअर राहू नका : (Don’t get bored) (आयुष्य)
बहुतेकवेळा आपल्याला एक वाईट सवय जडते. काम सुरू करणे व न संपवताच सोडून देणे. जे सुरू कराल ते पूर्ण करा
वा नका करू; पण अवश्य संपवा. उबग आल्यास स्वतःला थोडा वेळ दूर करा पण काम मध्येच सोडू नका.
स्वतःला दुःखी वा त्रस्त बनवू नका : (Don’t hurt yourself)
आपण कोणती परिस्थिती कशी हाताळता, हे सर्वस्वी आपल्या हाती असते. आपण आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेऊ लागाल. इतरांना दोष देणे बंद कराल, तेव्हा आपल्याला कळेल की आपण त्रस्त नसून, स्वतःला कोणत्याही त्रास वा दुःखातून मुक्त करण्याची हिंमत आणि क्षमता बाळगता.
स्वतःच्या भीतीचा सामना करा 🙁 Fight for your inner fear) (आयुष्य)
आपल्या भीतीला सामोरे
जाण्यास सुरुवात करा. आपण फेल झालो तर काय होईल, या भीतीपायी आपली स्वप्ने व इच्छा रोखू नका. नेहमी आपल्या मनाचे ऐका आणि आपले काम करीत राहा.
बदल स्वीकारा : ( Accept change)
जीवनात होणाऱ्या बदलांमुळे आपण
अस्वस्थ होत असतो. त्यामुळे अनेक त्रास उभे राहतात आणि एक साधा बदलही मोठी समस्या बनते. जेव्हा असा एखादा बदल समोर येईल, तेव्हा तो मोकळेपणाने स्वीकारा. त्याचे सारे पैलू पाहून तो स्वीकारण्याच्या ऊर्जेने स्वतःला भरून टाका.
प्रश्न विचारण्यात मागे हटू नका : काही आपल्याला कळत नसेल, समजले नसेल, काही जाणू इच्छित असाल तर ते आपल्या मनात ठेवू नका. प्रश्न विचारा.
नेहमी सकारात्मक राहा : (Stay positive)
कित्येकदा नकारात्मक
स्थितीपुढे पॉझिटिव्ह राहणे एक आव्हान असते. आपण त्या आव्हानाचा सामना करायला हवा. आपण कोणत्याही स्थितीत सकारात्मक विचारच करावा. कारण सकारात्मकतेत शक्ती असते.
सोशल मीडियासाठी मर्यादित वेळ : सोशल मीडिया व वेगवेगळी गॅझेट्स आपल्याला आपल्या ध्येयापासून भरकटवण्यात सर्वांत पुढे असतात. जरी ते आपल्यासाठी आवश्यक असले, तरी त्याची वेळ मर्यादित करा.
शिकणे चालू ठेवा : ( Study continuously )
वाचनाची आवड असेल, तर वाचत राहा. टीव्ही प्रोग्राम्स चांगले वाटत असतील तर ते पाहा. जरी ते कोणत्याही कामाचे नसले, तरी आपला आत्मविश्वास वाढेल. कुठेही, कधीही, कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी
आपण तयार राहाल. रोज आपण नवे काय शिकलो वा जाणले याकडे लक्ष द्या.(आयुष्य)
जीवनाचे संतुलन साधा : ( Stay harmony with life)
आपल्या प्राथमिकता दुर्लक्षू नका.
त्यांची यादी बनवा. सर्वांत महत्त्वाचे काम प्रथम करा; तसेच त्यातून एखादे अनावश्यक काम राहिले, तर त्यासाठी स्वतःवर प्रेशर टाकू नका. हे संतुलन राखणे आपल्याच हाती असते.
बजेट दुर्लक्षू नका : ( Don’t forget your budget)
आपण आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण
करू शकता; पण डोळे झाकून असे काहीही करू नका, जेणेकरून आपल्याला पश्चाताप होईल. जेव्हा एखादा खर्च करावयाचा असेल तेव्हा प्रथम बजेट व भावी गरजा लक्षात घ्या.
लहानसहान आनंद घ्या : जीवनाचा प्रत्येक क्षण छोट्या
छोट्या आनंदाने भरलेला आहे. गरज आहे या आनंदी क्षणांचा उत्सव साजरा करण्याची.
दान करण्याचा आनंद : कोणत्या ना कोणत्या रूपात
गरजूंना मदत करीत राहा. भले एखाद्या त्रस्त मित्राला वेळ देणे असो वा गरीब व्यक्तीला कपडे, पैसे वा खाणे द्यायचे असो.
एक तास स्वतःला द्या : दिवसाच्या २४ तासांपैकी एक तास फक्त स्वतःचा असेल असे ठरवा. तो वाया घालवू नका. जास्त त्रस्त असाल, तर आठवड्यातील काही तास स्वतःला द्या; पण स्वतःसाठी वेळ काढायला विसरू नका.
कुटुंबालाही वेळ द्या : जेवढे स्वतःसोबत वेळ घालवणे आवश्यक असते तेवढेच कुटुंब व मित्रांसोबतही.
फॅमिली गेट- टुगेदर होत असेल, तर ते लक्षात ठेवा. आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवणे काही संस्मरणीय वेळ देऊन आयुष्यभरासाठी सकारात्मकतेचे काम करतात.
आभार माना : आपल्याला जीवनात जे मिळाले आहे त्याबद्दल आभारी राहा. ही सवय लावून घेण्यासाठी आपल्यासोबत राहणारी कोणतीही चांगली गोष्ट वा घटना रोज कागदावर लिहून एका डब्यात ठेवा. आपल्याला जाणवेल की सारे काही चांगले आहे आणि जे नाही तेही चांगल्यासाठीच आहे.