Steve Jobs व्यवसायात यशस्वी होयचं असेल तर आयफोनचे स्टीव्ह जॉब्स यांचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही.

महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात.

हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात.

हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात.

मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी कल्पकता, संस्कृती, बुद्धिमत्ता, संघटन आणि विश्वास या गोष्टींसाठी हेच ‘Thumb Rules’ अनुसरले जातात.

व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम व त्यांनी त्यातून घेतलेले धडे आपण पाहणार आहोत.

नियम १ : गुणवत्तेचा मापदंड निर्माण करा. काही लोकांना अशा वातावरणाची सवयच नसते, जिथे सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते. (Steve Jobs)

जर तुम्ही अशाच वातावरणात राहिलात तर तुम्हाला उत्कृष्ट काम करायची सवयच राहणार नाही.

त्यामुळे तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते लोक खरंच तुम्हाला वर नेतायेत का याचा विचार करा.

नियम २ : ‘डिजाईन’ हा शब्द म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो एखाद्या गोष्टीचा appearance.

पण ‘डिजाईन’ म्हणजे केवळ वस्तू कशी आहे किंवा ती कशी दिसते एवढेच नसून, ती वस्तू कशी काम करते हे सुद्धा आहे.(Steve Jobs)

नियम ३ : तुम्ही कोणतेही काम करत असा ते काम सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी गरजेची असते ती एकाग्रता आणि साधेपणा. साध्या सरळ गोष्टीसुद्धा अवघड असू शकतात.

तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण त्याची गरज असते. एकदा का तुम्ही हे साध्य केलं की, तुम्ही मोठे पर्वतसुद्धा हलवू शकता.

नियम ४ : जीवनात कुठल्याही टप्प्यावर महत्वाचे असते ते म्हणजे एकीचे बळ. जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती सगळे सोबत असल्यावर चटकन होते. (Steve Jobs)

हेच तत्त्व जर आपण व्यवसायात वापरल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला फक्त काही चांगल्या सहकाऱ्यांची गरज असते.

नियम ५ : काहीतरी नवीन शोधताना तुमच्या हातून चुका होऊ शकतात. चुका झाल्यातर होऊ द्या. चुका होतायेत म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय.

झालेल्या चुकांचा स्वीकार करा त्यात कशी सुधारणा करता येईल याचा विचार करा.

नियम ६ : तुम्ही जे काम करताय त्यावर तुमचं प्रेम आहे की नाही यावर अवलंबून असत की तुम्हाला त्या कामात यश मिळेल की नाही. आणि जर अजूनही तुम्हाला अशी गोष्ट मिळाली नसेल, तर खोज जारी रखें।

नियम ७ : जॉब्स म्हणतात मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशासमोर उभा राहून स्वतःला विचारतो, ‘जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल,

तर आज मी जे करतो आहे, तेच करायला मला आवडेल का?’ जेव्हा बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतं, मी समजून जातो, काहीतरी बदलायची गरज आहे.

नियम ८ : तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा दुसऱ्या कोणाचेतरी आयुष्य जगणे सोडून द्या.

तुम्हाला हा नियम छोटा वाटला असेल पण हा नियम परत एकदा ऐका मग तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ किती मोठा आहे.(Steve Jobs)

नियम ९ : लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत असत की तुमच यश हे तुम्हाला एका रात्रीत मिळालं आहे.

पण जर तुम्ही नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की; एका रात्रीत मिळालेलं यश हे खरतर एका रात्रीत मिळालेलंचं नसतं.

त्या यशासाठी अनेक रात्री या जागून काढाव्या लागलेल्या असतात.

नियम १० : (Steve Jobs) जॉब्स यांचा सर्वात famous quote म्हणजे ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ – भुकेलेले राहा, वेडे रहा!

जेव्हा तुम्ही कोणत्याही जटील नियमांचं पुस्तक बाजूला टाकून असे स्वतःचे नियम लिहिता,

तेव्हा तुम्ही तुमची मार्गदर्शक तत्व लिहित असता आणि हीच तत्व तुमच्यासाठी एखाद्या होकायंत्रासारखी दिशादर्शकाचं काम करतात.

तुम्ही इतरांसाठी संधी निर्माण करा, पैसे आपोआप येऊ लागतील…. 

पहिला धडा: मी माझ्या वडिलांकडून शिकलो, धैर्य ही एक अशी शक्ती आहे, ज्यामुळे भीतीलाही भीती वाटते.

स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा, त्यामुळे धैर्य मिळते. (Steve Jobs)

दुसरा धडा: मानवता (काळजी घेणे, सामायिक करणे). मानवी पैलू ही हृदयाची संपत्ती. जितके जास्त खर्च कराल तितके तुम्ही श्रीमंत व्हाल.

तिसरा धडा: मेहनतीला पर्याय नाही. आपण यातून सर्वकाही मिळवू शकता.

चौथा धडा: हृदयाचे नाते. यातूनच निष्ठा निर्माण होते. मग ते कर्मचारी असो वा ग्राहक. (Steve Jobs)

पाचवा घडा: तंत्रज्ञान आणि प्रतिभेवर अवलंबून राहून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. 

सहावा धडा: तुम्ही इतरांसाठी जितक्या जास्त संधी निर्माण कराल तितके तुम्ही श्रीमंत व्हाल. मोठे स्वप्न पाहा, त्यापेक्षा मोठी गोष्ट मिळवा.

1 thought on “Steve Jobs व्यवसायात यशस्वी होयचं असेल तर आयफोनचे स्टीव्ह जॉब्स यांचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या”

Leave a Comment