मित्रांनो, आपल्याला ब-याच वेळा गुंतवणूक करून जास्त परतावा मिळावा, अशी इच्छा असते, परंतु, गुंतवणूक साधने, त्यांची जोखीम यांचा पुरेसा अभ्यास नसणे आणि वेळेचा अभाव यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक होतच नाही अशावेळी म्युच्युअल फंड (Mutual Fund) या पर्यायाकडे गुंतवणूकदार बघू शकतात.
म्युच्युअल फंड है अधिक परतावा देणारे, पण अधिक जोखमीचे किंवा कमी जोखमीचे, पण कमी परतावा देणारे पर्याय उपलब्ध करून देतात.
म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, (mutual funds are subject to market risk) असा सतत डिसक्लेमर देणारा हा पर्याय खरंच आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय असू शकतो का?
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.
शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते. अशा कंपनीला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) म्हटलं जातं.
म्युच्युअल फंड है गुंतवणुकीचे साधन आहे. म्युच्युअल फंड है विविध अॅसेट मैनेजमेंट कंपन्या ऑफर करतात आणि है फंड व्यावसायिक फंड मॅनेजर्सद्वारे मॅनेज केले जातात.
म्युच्युअल फंड लहान गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात.
जे वैयक्तिकरीत्या अशा लहान गुतवणूकदारांना शक्य नसते किंवा अधिक जोखमीचे असू शकते, म्युच्युअल फंड है युनिट स्वरूपात उपलब्ध असतात.
प्रत्येक युनिटची किंमत ही नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) स्वरूपात असते.
गुंतवणूकदार म्युच्युअल फंड एकाच वेळी विकत घेऊ शकतात किंवा दरमहा एका विशिष्ट रकमेला विकत घेऊ शकतात, याला एसआयपी (Systematic Investment Plan) असेही म्हणतात.
Systematic Investment Plan हा कोणत्याही गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय आहे.
म्युच्युअल फंड कधी खरेदी करावे?(Mutual Fund)
तज्ञांच्या मते, जेव्हा म्युच्युअल फंडांची NAV (नेट अॅसेट व्हॅल्यू) त्यांच्या युनिटच्या किमतीपेक्षा कमी असेल तेव्हा तुम्ही खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे.
हे तुम्हाला तुमचे रिटर्न्स वाढवण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त, जेव्हा बाजार त्यांच्या सर्वात खालच्या टप्प्यावर असतो तेव्हा तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे.
त्यानंतर तुम्ही कमी किमतीत शेअर्स खरेदी करू शकता.
म्युच्युअल फंडात रिडम्प्शन म्हणजे काय?(Mutual Fund)
म्युच्युअल फंड विमोचन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार त्याचे/तिचे म्युच्युअल फंड युनिट्स म्युच्युअल फंड कंपनीला (AMC) परत विकतो .
याचा अर्थ ते म्युच्युअल फंड योजनेतून परतावा/मुद्दल मिळविण्यासाठी युनिट्स (म्युच्युअल फंडाच्या भाषेत रिडेम्प्शन म्हणून ओळखले जाते) काढत आहेत.
गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे
फायदे (Mutual Fund)
सरकारी पर्यवेक्षण: म्युच्युअल फंड सरकारी संस्थाद्वारे नियंत्रित केले जातात.
पारदर्शकता आणि सुलभ तुलना सर्व गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांनी एक सारखा अवहाल देणे अपेक्षित आहे, ज्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते.
तरलता: काही अपवाद वगळता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधीही काढून घेता येते. यामध्ये गुंतवणूकदाराला त्या दिवशीच्या युनिटच्या दरानुसार रक्कम मिळते.
वैविध्यः म्युच्युअल फंडातील भांडवल विविध समभाग (equity shares)/कर्जरोख्यांमध्ये (bonds) गुंतवले जाते. यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम कमी होते.
गुंतवणुकीचे व्यावसायिक व्यवस्थापन: फंड व्यवस्थापकाकडे गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी खास टीम असते, त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारापेक्षा फंड व्यवस्थापक अधिक चांगल्या पद्धतीने भांडवल गुंतवू शकतो.
मोठ्या गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या गुंतवणूकी करण्याची संधी देखील सगळ्या गुंतवणूकदारांना मिळते. उदाहरणार्थ, वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रत्येक्ष विदेशी बाजारपेठेत थेट गुंतवणूक करणे कठीण जाते.
सेवा आणि सुविधा: फंड्स बऱ्याचदा धनादेश सारख्या सुविधा देते.
तोटे (Mutual Fund)
फी: म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेपैकी काही ठराविक रक्कम व्यवस्थापन कंपनी फी स्वरूपात कापून घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फक्त उरलेल्या रकमेवरच परतावा मिळतो.
परंतु फी सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागल्यामुळे मिळणाऱ्या सोईच्या तुलनेत कमी असते.
गुंतवणुकीवर कमी नियंत्रण: फंडातील रक्कम कोणत्या समभाग/कर्जरोख्यांमध्ये गुंतवली जावी यावर गुंतवणूकदाराचे थेट नियंत्रण नसते.(Mutual Fund)
अनिश्चित परतावा: म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा युनिटच्या बाजारभावावर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारभावानुसार त्यात जशी वाढ होऊ शकते तशीच घटही होऊ शकते.
म्युच्युअल फंडचे प्रकार
१) इक्चिटी फंड: हे म्युच्युअल फंड दीर्घकालीन वाढ आणि भांडवलाची वाढ या उद्देशाने प्रामुख्याने समभागामध्ये (Stocks) गुंतवणूक करतात.
२) बाँड / डेट फंड: बाँड फंडड प्रामुख्याने सरकारी आणि कॉर्पोरेट बॉड्ससारख्या निश्चित उत्पन्न सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात, नियमित उत्पन्न देतात आणि इक्विटी फंडाच्या तुलनेत तुलनेने कमी जोखमीचे असतात.
३) इंडेक्स फंड: इंडेक्स फंड्सचे उद्दिष्ट निफ्टी ५० सारख्या विशिष्ट मार्केट इंडेक्सच्या कार्यप्रदर्शनाची प्रतिकृती स्वरूपात काम करतात.
हे फंड व्यापक बाजार एक्सपोजर आणि मार्केट परफॉर्मन्सवर अवलंबून परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात
४) बॅलन्स्ड फंड्स: हायब्रीड फंड म्हणूनही ओळखले
जाणारे, हे म्युच्युअल फंड फंडाच्या गुंतवणुकीच्या उदिष्टावर आधारित, वाढ आणि उत्पन्न यांच्यात संतुलन साधण्यासाठी स्टॉक आणि बाँड्सच्या मिश्रणात गुंतवणूक करतात.
इक्विटी म्युच्युअल फंडचे प्रकार
1) लार्ज कैंप इक्चेिटी फंड :
हे large cap म्युच्युअल फंड प्रामुख्याने दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या मोठ्या, सुस्थापित कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करतात.
2) मिड-कैंप इक्विटी फंड:
हे मिड कॅप म्युच्युअल फंड प्रामुख्याने मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ज्या कंपन्या सातत्याने ग्रोथ रेकॉर्ड करत आहेत आणि भविष्यात मोठ्या कंपन्या बनण्याची क्षमता आहे.
3) स्मॉल कॅप इक्विटी फंड:
हे small cap म्युच्युअल फंड प्रामुख्याने लहान कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ज्यात उच्च वाढीची क्षमता असते; परंतु, उच्च अस्थिरता आणि जोखीमदेखील असते.
4) इंटरनॅशनल इक्विटी फंड :
हे इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या देशाबाहेर असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे जागतिक बाजारपेठा आणि विविधीकरणाचे फायदे मिळतात.
डेब्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय? (Debt Mutual Fund)
डेब्ट म्युच्युअल फंड्स अशी म्युच्युअल फंड स्किम असते जे फिक्स्ड इनकम इंस्ट्रूमेंटध्ये गुंतवणूक करतात, जसे कॉर्पोरेट आणि सरकारचे बाँड्स, कॉर्पोरेट डेब्ट सिक्युरिटीज आणि मनी मार्केट इंस्ट्रूमेंट इत्यादी ज्यामुळे भांडवल वाढण्याची शक्यता असते.
डेब्ट फंड्सना फिक्स्ड इन्कम फंड्स किंवा बाँड फंड्स सुद्धा म्हटले जाते.(Fixed income bonds)
(Debt fund) डेब्ट फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे काही मुख्य फायदे:
१) कमी खर्चाची आकारणी,
२) अपेक्षेनुसार स्थिर परतावा,
३) अपेक्षेनुसार अधिक लिक्विडिटी आणि वाजवी सुरक्षा.
(Debt Fund investment) डेब्ट फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य असतात ज्यांना नियमित उत्पन्न मिळवणे ज्यांचे उद्दीष्ट असते तसेच अधिक जोखीम पत्करायची नसते.
डेब्ट फंड्समध्ये चढ-उतार कमी असतात, आणि म्हणूनच त्यांत इक्विटी फंड्सपेक्षा कमी जोखीम असते.
जर आपण पारंपरिक स्थिर मिळकत उत्पादने जसे बँकेतील ठेवी मध्ये बचत करता आहात आणि आपल्याला कमी चढ-उतार आणि स्थिर परतावा पाहिजे असेल, तर त्यापेक्षा अधिक चांगला पर्याय डेब्ट फंड्सचा ठरु शकेल.
१) सरकारी बाँड फंड:
गव्हर्नमेंट बाँड फंड्स प्रामुख्याने सरकारने जारी केलेल्या बाँड्समध्ये गुंतवणूक करतात, कमी जोखीम आणि नियमित उत्पन्न देतात.
२) कॉर्पोरेट बाँड फंड : कॉर्पोरेट बाँड फंड सरकारी बाँडच्या तुलनेत उच्च पातळीवरील उत्पन्न प्रदान करण्याच्या उद्देशाने कंपन्यांद्वारे जारी केलेल्या बाँडमध्ये गुंतवणूक करतात.
३) अल्प-मुदतीचे बाँड फंड: अल्प मुदतीचे बाँड फंड कमी जोखीम आणि तुलनेने कमी अस्थिरतेसह नियमित उत्पन्न प्रदान करण्याच्या उद्देशाने, कमी मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात.(Mutual Fund)
५) डायनेमिक बाँड फंड : हे म्युच्युअल फंड बाजारातील बदलत्या परिस्थिती आणि व्याजदराच्या अपेक्षांवर आधारित अल्प-मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या बाँड्सच्या मिश्रणात गुंतवणूक करतात, ज्यामुळे उच्च परतावा मिळण्याची शक्यता असते; परंतु, जोखीमदेखील जास्त असू असते.