Mobile Addiction सोडवण्यासाठी काही खास टिप्स

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने वाढत्या मोबाईल व्यसनांबाबत (Mobile Addiction) जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

मोबाईलच्या नादान मन भरकटले आवर कसं घालावं. आपल्या सर्वांना माहित आहे की, आजकाल मोबाईल मानवाचा अविभाज्य घटक बनला आहे.

मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय.

लहानांना (Mobile Addiction) त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहे.

लोकांसाठी प्रत्येक गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचा मोबाईल बनला आहे.

मोठी व लहान मुले मोबाइल फोनशिवाय जगू शकत नाहीत. मोबाईल फोन कोणाच्याही हातातून काढून काही काळ दूर ठेवल्यास ते निराश आणि अस्वस्थ होतात.

घर सोडताना माणूस काहीही विसरू शकतो. परंतु मोबाइल फोन विसरत नाही.

एका दिवसासाठी मोबाईल जवळ नसल्यास खूप मोठे आभाळ कोसळल्यासारखे वाटते.

दररोज सकाळी मोबाइलवर एक गजर घंटा वाजत असते.

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल तपासण्यासाठी तो प्रथम उठतो.

आजकाल लोक मोबाईल शिवाय काही मिनिटेसुद्धा जगू शकत नाहीत. पूर्वी लोक एकटे राहत नव्हते. त्यांना सोबत कोणी ना कोणी व्यक्ती पाहिजे असायचे, तेव्हा ती राहत होती.

पण आत्ता सोबतीला व्यक्तीपेक्षा मोबाईल दिला तर तो बंद खोलीत दहा दिवस पण राहू शकतो, हे सत्य आहे.

रात्री झोपेच्या अगोदरच ते मोबाइलवर मेसेज तपासणे, मेल करणे, व्हिडिओ पाहणे (रील्स), सोशल मीडियावर चॅट करणे यासारख्या कामांमध्ये व्यस्त आणि आनंदित होतात. बरीच हानिकारक किरणे मोबाईलमधून निघतात, ज्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.

लोक झोपेच्या वेळीही मोबाईल त्यांच्याजवळ ठेवतात.

प्रत्येक माणसाला मोबाईलची सवय झाली आहे. लहानपणापासूनच मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे.

तो खेळायला बाहेर पडत नाही तर गेम्स खेळतो किंवा मोबाईलवर चित्रपट पाहतो.

पूर्वी मोबाईल नसताना मुले खेळाकडे लक्ष देत असत. खेळ न केल्यामुळे आरोग्यास त्रास होतो. मोबाइलचे बरेच फायदे आहेत.

मोबाइलने सर्व काही सोपे केले आहे. आम्ही मोबाइलवरून गाणी ऐकू शकतो.

मोबाईलमध्ये रेडिओ आणि मीडिया प्लेअर सारखी वैशिष्टये आहेत जेणेकरून मनाला पाहिजे तेव्हा ते ऐकावे.

तसेच व्यक्ती मोबाईलद्वारे बातम्या, मेसेज, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग, पे बिले इत्यादी करू शकते.

मोबाईलच्या आगमनाने लोकांना आता बिले भरण्याची आणि बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.

अभ्यास करिता जे विषय आपला समजत नाहीत तो विषय आपण मोबाईलद्वारे समजावून घेऊ शकतो.

तसेच जेवणाच्या नवनवीन पदार्थ कसे बनवायचे, गावाचे रस्ते, जवळचे हॉटेल, एटीएम, हॉस्पिटल, संबंधित व्यक्तींशी संपर्कात राहणं, नेट बँकिंग, कॅब बुकिंग, सिलेंडर बुकिंग, रेल्वे अपडेट आज कालच्या युगात सगळेच जण नोकरी करत असताना आपल्याला दिसून येतात.

कोणाला बोलायला वेळच नाही म्हणून एकटे बोलायला कोणीच नाहीत. त्यासाठी महिला ह्या मोबाईलचा आधार घेतात.

अनेक गोष्टीबाबत एक क्लीक वर माहिती मिळते ते ही घर बसल्या अशी अनेक महत्त्वाची कामं मोबाइलमार्फत होतात. मोबाइलचे बरेच फायदे आहेत.

हे आपल्याला माहीतच आहेत पण अतिरेकामुळे त्याचा मानसिकतेवर होणारा बदल हेही तेवढेच घातक आहेत.

मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात (Mobile Addiction) कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय.

लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतल्यामुळे हरियाणातील चौथीतल्या मुलाचा हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.

अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही बातमी. या प्रकरणात तो मुलगा वाचला पण इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे इतक्या टोकाला जाण्याचा विचार चौथीतल्या म्हणजे साधारण नऊ-दहा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात येतो कसा ?

मोबाइलच्या अतिवापराचं हे टोकाच उदाहरण अर्थात एकमेव उदाहरण नाही. नुकतंच नागपूर मध्ये घडलेलं एक दुर्दैवी प्रकरणं.

अगदी ताजं वेणा तलावात नौकाविहार करायला गेलेल्या तरुणाची बोट फेसबुक लाइव्ह करायच्या नादात उलटली आणि त्यांच्यातल्या आठ जणांना जलसमाधी मिळाली.

त्याआधीच आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह इथं पावसाचा आनंद घ्यायला गेलेली एक तरुण मुलगी सेल्फी काढायच्या नादात असताना समुद्रात पडली आणि जीवाला मुकली.


दहावीत शिकणारा मुलगा त्याने खूप हट्ट केल्यामुळे त्याला आयफोन दिला होता.

तो दहावीत नापास झाला, नंतर त्याच्या पालकांना असं लक्षात आलं की तो अभ्यास न करता मोबाइल आणि लॅपटॉपवर गेम्स खेळायचा, आणखी चौकशी केल्यावर डॉक्टरांना माहिती मिळाली की तो आठवी आणि नववीत असतानासुद्धा मित्रांच्या फोनमधून असे गेम्स खेळायचा.

त्याला गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय खूप कठीण जात होते. या विषयांचा मुद्दा आला की तो गेम्स खेळायला लागायचा त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की धड बोलायचा नाही, हिंसक व्हायचा.

त्यामुळे त्याला तीन आठवड्यांसाठी दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर तीन महिने तो सुधारगृहात होता.
आणखी एक २१ वर्षीय मुलगा एका फायनान्स कंपनीत इंटर्नशिप करत होता.

तिथे त्याला काहीच काम नसायचं तो इतका कंटाळायचा की वेळ घालवण्यासाठी तो दिवसभर चॅटिंग करायचा. हळूहळू तो डेटिंग साइटकडे वळला.

त्यानंतर तासन्तास फोनवर बोलणं, चॅटिंग करणं असं सुरू झालं. रात्रभर तो बोलत बसायचा, अजिबात झोपायचा नाही..आपल्या आसपास मोबाइलच्या अतिवापराची अशीच उदाहरणं आपण बघत असतो.

मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं.

अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक अशा महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या.

असं एकेक करत काळानुरूप मोबाइलमधल्या सुविधा वाढत गेल्या. वय, काम, आवडनिवड, प्राधान्यक्रम यानुसार मोबाइलमध्ये आकर्षक सुविधा आणल्या गेल्या.

या सगळ्यात फक्त मोबाइल आकर्षक वाटून चालणार नव्हते, मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांचीही इथे महत्त्वाची भूमिका होती.

हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही आकर्षक सुविधांचा सपाटाच लावला.

तरुण अशा रीतीने मोबाइलच्या आहारी (Mobile Addiction) जाण्यामागे मोबाइल बनवणाऱ्या कंपन्या आणि मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या या दोघांचाही मोठा हातभार आहे.

मोबाइल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांच्या चुकीच्या जाहिरातींपासून सगळी सुरुवात होते. एका नेटवर्कची फोरजीची जाहिरात होती.

आमचं नेटवर्क रात्री वापरलं तर ५० टक्के कॅशबॅक असं त्यात सांगितलं होतं. यामागे नेटवर्कचं गिमिक होतं. रात्रीसुद्धा दिवसाइतकंच त्यांचं चांगले नेटवर्क वापरलं जाऊन त्यांना पैसे मिळावे यासाठी ती जाहिरात केली होती.

अशा इतरही नेटवर्कच्या जाहिराती आहेत, अशा जाहिरातींना बळी पडणारा तरुण वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या तरुणांमुळे त्यांचे पालकही यात अडकत जातात पर्यायाने मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे.

यामध्ये मोबाइलवर बोलणाऱ्यांची आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही वाढतेय.

भारतात मोबाइलवर बरेच लोक बराच वेळ बोलत असतात. त्यामुळे मोबाइल नेटवर्कचे टॉवरसुद्धा जास्त फ्रीक्वेन्सी प्रसारित करतात.

पण यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित होत आहे. या टॉवरमधून प्रसारित होणाऱ्या या फ्रीक्वेन्सीचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे.

परिणामी त्यांना काही ना काही शारीरिक त्रास आहे. मोबाइल नेटवर्कच्या जाहिराती, ग्राहकांची वाढती संख्या, टॉवरमधून प्रसारित होणारी जास्त फ्रीक्वेन्सी या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत.

मोबाइलचे अनेक फायदे आहेत म्हणूनच जगभरात मोबाइल इतक्या मोठय़ा संख्येने वापरला जातो.

जेव्हा एखाद्या गोष्टीशिवाय एखादी व्यक्ती राहूच शकत नाही किंवा त्या गोष्टीचा वियोग त्या व्यक्तीला सहन होत नाही. तेव्हा ती व्यक्ती त्या गोष्टीच्या व्यसनाधीन (Mobile Addiction) झाली आहे असं म्हटलं जातं.

मोबाइल वापरण्याचं सर्वाधिक प्रमाण तरुणांचं आहे. तरुण वर्ग दिवसातले कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ तास मोबाइलवर असतो.

पण खरं तर तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण २० मिनिटं इतकंच असायला हवं. म्हणजेच मोबाइलचा वापर कित्येक पटींने जास्त वेळ होत आहे.

एखादा मुलगा आठ तास मोबाइलवरच असेल तर उरलेल्या १६ तासांमध्ये तो काय-काय करेल? काम, विश्रांती, झोप, कुटुंबासमवेत वेळ, मित्रपरिवारासोबत गप्पा, वाचन, सिनेमा बघणं अशा अनेक गोष्टी १६ तासांमध्ये होणं शक्य नाही.

शिवाय यात पुरेशी झोप झाली नाही तर त्या व्यक्तीचं दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक बदलंल म्हणून समजा.

म्हणूनच तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा.


माणसाच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सोयीच्या व्हाव्यात यासाठी तंत्रज्ञान विकसित होत गेलं आहे.

त्यात नवनवीन शोध, प्रयोग होत ते आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलं आहे. तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं केलं.

पण त्याचा (Mobile addiction) अतिवापर, अतिरेक माणूस करत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. याच तंत्रज्ञानातला मोबाइल हा महत्त्वपूर्ण घटक आहे.

भारतात मोबाइल इंटरेनट वापरकर्त्यांचा आकडा वाढतच आहे, असं इंटरनेटचा वापर हाच मोबाइल अॅडिक्शनला जास्त कारणीभूत असल्यामुळे ही वाढ महत्त्वाची ठरते.

मोबाइल वापरण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. फोन करणे, फोटो काढणे, गाणी ऐकणे, इंटरनेट सर्फिंग, चॅटिंग करणे, गेम्स खेळणे, व्हिडीओ बघणे (रील्स) अशी मोबाइल वापरण्याची विविध कारणं आहेत.

पण हीच कारणं मोबाइलच्या अतिवापराची निमित्तंही ठरताहेत.

पूर्वी घरातल्या लॅण्डलाइनवर फोन आला की तो कोणाचा आहे ते कळायचं आता मोबाइलमुळे तसं राहिलं नाही. स्वतःचं एक जग तयार झालं आहे.

त्यात एकांत मिळाला तर पण त्याबरोबरच एकटेपणाही आला. असुरक्षितेची भावनाही आली.

पण फक्त बाजारपेठेचा विचार करणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि मोबाइल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यातच सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसायला लागली. त्यातच मोबाइलवर इंटरनेटची सुविधा सुरू झाली.

मोबाइलने हळूहळू आपल्याला त्यात बांधलं आणि आता आपण त्यांला बांधून राहिलो आहोत. ज्यांना त्यात अडकायचंच नव्हतं त्यांनी आधीच वाटा शोधल्या होत्या.

मोबाइलच्या या चक्रात अडकल्यामुळे येणारा एकाकीपणा आणि सुसंवादाची कमतरता पूर्वीच्या काळी मनुष्य प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्यातली मजा आता हरवत चालली आहे. आताच्या धावपळीत कोणाकडे त्यासाठी वेळच नाही.

जागतिकीकरणात लोक चालत नाहीत तर सुसाट पळताहेत. मग १०० वर्षांचं जगणं त्यांना दहा वर्षांत जगायचंय.

लोकांशी व्यक्तिगत पातळीवर असलेला संपर्क मोबाइलमुळे तुटतो. वैयक्तिक संवाद होत नाही, शेजारी बसलेल्या माणसाशी पाच मिनिटं बोलणं एखाद्याला कंटाळवाणं वाटतं.

पण तीच व्यक्ती फोनवर किंवा चॅटिंग करत एखाद्याशी बराच वेळ बोलू शकते. स्माइलपेक्षा आता स्माइली महत्त्वाची झाली आहे.

मग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइलमध्ये सतत नवनवीन प्रयोग केले जातात, त्यामुळे त्याकडे वळणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते.

Mobile addiction सोशल मीडिया व्यसनाधीन
Mobile addiction सोशल मीडिया व्यसनाधीन


तुमचं मुल इंटरनेट व्यसनी आहे कसं ओळखाल? (Mobile Addiction)

  • तुमचं मुल त्याच्या वास्तवातल्या मित्रांपेक्षा ऑनलाइन मित्रांसोबत जास्त मिसळत असेल. तर ते ऑनलाइन असताना अडथळे आल्यास त्याची चिडचिड होत असेल तर.
  • पूर्वी त्याला रस असलेल्या गोष्टींमध्ये आता अजिबात रस वाटत नसेल तर. त्याच्या इंटरनेट वापराबद्दल तो अतिशय गुप्तता पाळत असेल. कुटुंब, मित्र परिवारासोबत फार वेळ घालवत नसेल तर लहान मुलांचा मोबाइलचा वाढता वापर, तो त्यांना हवा तेव्हा न मिळाल्यामुळे त्यांची होणारी चिडचिड.
  • त्यांची चिडचिड कमी होण्यासाठी पालकांनी त्यांच्या हातात दिलेला मोबाइल या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने जात आहेत. लहान मुलं नीट जेवावीत म्हणून त्यांना मोबाइल दिला जातो. ते पालकांसोबत बाहेर असताना त्यांनी गोंधळ घालू नये म्हणून त्या मुलाला नर्सरी हाइम्स लावून दिल्या जातात.
  • ते हट्टीपणा करत असतील तर त्यांना मोबाइलमधले फोटो, व्हिडीओ दाखवले जातात. पण हे अतिशय चुकीचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुलांच्या रडण्याचा आवाज होतो, ते त्रास देतात म्हणून पालक त्यांच्या हातात मोबाइल देतात. पण हे चुकीचं आहे, त्यांना त्याबाबत विचारलं की आम्ही नर्सरी हाइम्स दाखवतोय फ असं उत्तर मिळतं पण ते दाखवणंही चुकीचंच आहे.
  • लहान मुलं मोबाइलमधून बरोबर चित्र शोधून फोन लावत असतील, गेम खेळत असतील तर त्यांचं याबद्दल कौतुक केलं जातं. हे ही चुकीचंच आहे. पालकांनी त्यात भुलून जाऊ नये, असं केल्याने मुलांना प्रोत्साहन मिळतं, त्यांचं मोबाइल हाताळण्याचं प्रमाण वाढतं आणि ते वाढलं की धोका असतो मूल दोन वर्षांचं असल्यापासून त्याच्या हातात मोबाइल दिला तर त्यांच्या मेंदूला त्याची सवय होते आणि ते पुढे त्रासदायक ठरतं.
  • मुलांच्या मोबाइल वापराकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवं. मुलं जेवताना पालकांनी त्याच्या हातात मोबाइल देऊच नये, असं केल्याने जेवण आणि मोबाइल असं समीकरण त्याच्या डोक्यात पक्कं होईल. दुसरं म्हणजे, ते मूल रडायला लागलं की शांत करण्यासाठी मोबाइलचा वापर सर्रास होतो. अत्यंत चुकीचं आहे.
  • जरा वेळ त्याला त्रास होऊ द्या. रडून रडून कंटाळून तो शांत होईल. मुलांना अशा प्रकारे थोडा त्रास झाला तर काही बिघडत नाही. त्याला करणंही मोबाइलच्या अधीन होणाऱ्या लहान मुलांमध्येही वेगवेगळे लक्षणे दिसून येतात.
  • त्यातही विविध वयोगटांतील लक्षणं, वागणं वेगवेगळं असतं. त्यांचं वय, मानसिकता, विचार करण्याची पद्धत या घटकांवरून त्यांचं मोबाइलशी असलेलं नातं वेगवेगळं असतं. तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना फोटो, आवाज यांचं आकर्षण असतं. पण मोबाइलची सवय लागल्याने चंचल नसलेली मुलं चंचल होतात. पण त्यांच्यातला हट्टीपणा वाढतो, कोणतीही गोष्ट ते साध्या पद्धतीने न विचारता हट्ट करूनच विचारतात.
  • त्यांचा मोबाइलचा वापर (Mobile Addiction) वाढल्यामुळे त्यांना झोपेचे आजार होतात. मोबाइलमध्ये असलेल्या फ्लिकरमुळे लाइट कमी-जास्त होतो. यावर झोपेचं वेळापत्रक मेंदूमध्ये मांडलेलं असतं. परिणामी त्यांना झोपेचा आजार होतो. तीन ते सहा वर्षांमध्ये हे त्रास आणखी वाढत जातात. याचा परिणाम शिक्षणावर आणि सभोवतालच्या इतर मुलांसोबतच्या संवादावर शिकण्याचा वेग मंदावतो. ही मुलं अभ्यासातही मागे पडतात, कोणाशीही सुसंवाद करत नाहीत आणि खेळीमेळीने राहत नाही. सहा ते अकरा वर्षांच्या मुलांना गेम्स खेळायची सवय लागते. इथेही अभ्यासाकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होतं.
  • आठ-नऊ वर्षांच्या मुलांना इंटरनेट सर्चिंग कसं करायचं, फोटो कसा काढायचा हे कळू लागतं. त्यांना गेम डाऊनलोड करता येते. ते इंटरनेटवरच्या चुकीच्या घातक गोष्टींचे बळी ठरण्याची शक्यता निर्माण होते. मुलं डाऊनलोड करत असलेले काही गेम्स फ्री नसतात. ते जेव्हा डाऊनलोड करतात तेव्हा त्यांच्या पालकांना ते माहीत त्यांचे पैसे बिलामध्ये बघितल्यावर पालकांना त्याबद्दल कळते.
  • अनेकांमध्ये फॅन्ट्म फोन हा प्रकार दिसून येतो. म्हणजे त्यांना मोबाइल वाजल्याचा सतत भास होतो. मोबाइल त्यांच्या जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येतो. ऑनलाइन मोबाइल गेम खेळताना ऑनलाइन कोणी असेल तर ते बघून तिथे त्यांच्यासोबत खेळतात. ते त्यात इतके गुंतले जातात की त्यांचं इतर गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. या सगळ्यातून अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यात त्यांना अपयश येतं.
  • मोबाईलचा सतत वापर केल्यास असंख्य आजार उद्भवू शकतात. लोक व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात आपला अनमोल वेळ घालवतात. याचा परिणाम ताणतणाव, निद्रानाश आणि एखाद्याची विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. लोक वाहन चालवितानाही मोबाईलवर मेसेज करतात किंवा चॅट करतात, यामुळे भीषण अपघात होऊ शकतो.
  • मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम (Mobile Addiction)
  • १. शारीरिक – शारीरिक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कमी झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह असे शारीरिक आजार उद्भवतात, अपघातामुळे अपंगत्व येऊ शकतात, डोळ्याचे आजार इत्यादी
  • २. मानसिक – ताणतणाव, निद्रानाश, चिडचिडपणा, हट्टीपणा, राग येणे, आक्रमक बनणे, हिंसक बनणे, आत्महत्या करणे, अस्वस्थ वाटणे इ.
  • ३. आर्थिक – मोबाईलचे व्यसन जडण्याच्या फार गोष्टी आहेत. महागडे फोन खरेदी करणे, त्याचप्रमाणे रिचार्ज करणे तसेच गेम्समुळे पैसे खर्च होणे इत्यादी या कारणामुळे व्यसन जडते.
  • याआधी जेव्हा स्मार्टफोन आणि इंटरनेट अस्तित्वात नव्हते, तेव्हा सर्वसामान्य लोक व्यस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायचे किंवा गॉसिपिंग करायचे. या व्यतिरिक्त काही जण वाचन करणे, लेख लिहिणे, रंगरंगोटी करणे, गाणी गाणे, नृत्य करणे, वृक्षारोपण करणे यांसारखे छंद जोपासण्यास वेळ द्यायचे, यामुळे त्यांचा मेंदू कोणत्या ना कोणत्या कामात सतत व्यस्त राहायचा. मात्र आता स्मार्टफोनच्या युगात आपण व्हॉट्सअप किंवा इतर मेसिजिंग अॅपवर चॅटिंग करण्यात आपला वेळ घालवतो, तसेच अनेकदा तासंतास रील्स व्हिडीओ किंवा फोटो स्क्रोल करत सतत पाहत असतो. यामुळे आपल्याला त्याची सवय लागते आणि नकळत आपल्याला मोबाईलचे व्यसन जडते.

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बराच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का ? मोबाइलची बॅटरी कमी असली किंवा संपत आली तर तुम्ही अस्वस्थ होता का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हे नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे. आता तुम्ही म्हणाल यात काळजी करण्यासारखं काय ? मोबाइलची सवय झाली असेल म्हणून असं होत असावं पण नाही तुमच्या याच सवयी एका आजाराचं कारण ठरू शकतात.


स्मार्टफोनची सवय सोडवण्यासाठी काही खास टिप्स :

  • झोपण्यापूर्वी एक तासभर आधी तरी तुमचा फोन वापरणे बंद करा. व्हायब्रेशन्स, ब्लिंक होणारे लाइट्स आणि आवाज तुम्हाला झोप येऊ देत नाही. दिवसभराचे काम संपले आहे. याची जाणिव मेंदूला होण्यासाठी फोन बंद करणे गरजेचे आहे. अन्यथा मेंदूला विश्रांतीची संधीच मिळणार नाही.
  • गरज नसेल तर रात्रभर फोन बंद करणे कधीही चांगलेच. फोन बंद केला आणि काहीतरी चांगले-वाईट जगात घडले तर ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे. कोणतीही बातमी पोहचण्यात आता अडथळा येत नाही. प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, किंवा तुमच्या मित्रांच्या फेसबूक किंवा ट्वीटरवर आपण रिअॅक्ट झालो नाही तर आकाश कोसळेल अशी भीती मनातून काढून टाका. मोबाइल फोन नसताना आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ फिरायला जाण्यास, खेळायला, व्यायामाला, जेवायला, वाचायला मिळणारा वेळ आठवून पाहा.
  • आठवड्यातून एखादा दिवस सोशल मीडियापासून दूर राहा, घरातून बाहेर असतानाच मोबाइलचा वापर करा, घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा. वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरायचा नाही, लहान मुलांपासून फोन दूर ठेवा. नवे छंद किंवा नवी आवड जोपासण्याचा प्रयत्न करा, वाचन, बागकाम, घरकाम तुम्हाला फोनपासून दूर ठेवेल. घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वतः तेथे जाऊन बोला, तेथे चॅटिंगचा वापर टाळा, जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका, रील्सवर जास्त वेळ व्हिडिओ पाहू नका.
  • तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य जपण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, मॉडरेशन याचाच अर्थ तंत्रज्ञानाचा समजुतदारपणाने उपयोग करणं.
  • सर्वात प्रथम स्वत:वर संयम ठेवायला शिका, स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून स्वत:ला थोडे दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत घालवा. यामुळे तुम्ही काही काळ मोबाईलपासून दूर राहाल गरज पडल्यास फोनचा वापर करा अन्यथा फोनचा वापर शक्य तितका टाळा, दिवसभर ऑनलाईन राहण्यापेक्षा कामापुरती गरज असतानाच ऑनलाईन रहा. स्वतःला रिलॅक्स ठेवण्यासाठी काही काळ वॉकला जा किंवा तुम्ही ज्या गोष्टीत रमता ती गोष्ट करा. व्यायाम करा व वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास नक्कीच याचा फायदा होईल. या पद्धतीने नक्कीच आपलं भरकटलेले मन ताब्यात आणू शकतो हे नक्की.

चला तर मग करून बघूया जमतंय का ते?

Leave a Comment