Dengue डेंग्यू: लक्षणे निदान उपचार याविषयी माहिती

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात (Dengue) डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. 

गत वर्षांमध्ये क्वचित डेंग्यूचे रुग्ण दगावलेही असल्यामुळे दहशतीचे वातावरण दिसते. या विषयी माहितीच्या अभावामुळे भीती जास्त असल्याचे जाणवते. 

भारतामध्ये १९६३ साली कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) डेंगूची पहिली मोठी साथ आली. डेंगू हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल प्रकारचा आजार आहे (Dengue is a viral infection).

१९४० पासून डेंग्यू संक्रमणाचे संक्रामक प्रमाण वाढले आहे. 

डेंगू आजारालाच डेंगी अथवा डेंग्यू चा ताप (Dengue Fever) असे सुद्धा संबोधतात. डेंग्यूचा विषाणू म्हणजेच व्हायरस हा एडिस इजिप्ती ह्या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो.

म्हणजे डेंगू असलेल्या रुग्णाला चावलेला डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा डेंगूची लागण होते. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘इडिस इजिप्‍ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. 

अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात. 

डेंगू आणि त्याविषयीचे समज – गैरसमज जाणून घेऊ. 

इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप DENGUE FEVER आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप DHF (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.

संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे डेंग्यू विषाणू मनुष्याला संक्रमित होतो. केवळ काही मच्छर प्रजाती ही डेंग्यूच्या विषाणूसाठी संक्रामक ठरतात. 

AEDES EGYPTI (इडिस इजिप्‍ती डास) 

हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. 

इडिस इजिप्‍ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. 

हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. 

साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. 

जेव्हा एखादा डास संक्रमित रक्ताचे शोषण करतो तेव्हा डेंग्यूचा व्हायरसचा संसर्ग होतो. संसर्गग्रस्त डास नंतर त्या विषाणूंना निरोगी लोकांमध्ये पाठवू शकतो. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीवर थेट पसरत नाही आणि डेंग्यूचा प्रसार करण्यासाठी डास आवश्यक आहेत 

डेंग्यू हा मादी डासांच्या चाव्याद्वारे पसरतो (एडीस इजिप्ती). मच्छर हा व्हायरसच्या संक्रमित व्यक्तीचा रक्त घेताना संक्रमित होतो. सुमारे एका आठवड्यानंतर, एका निरोगी व्यक्तीला चावा घेताना मच्छर हे विषाणू संक्रमित करु शकतात. डेंग्यू थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. 

दक्षिणपूर्व आशिया, पॅसिफिक बेट देश आणि मध्य-पूर्व इडिस इजिप्‍ती डासाच्या माध्यमातून डेंग्यू पसरला आहे. आज, सुमारे ४०% लोक जगाच्या क्षेत्रात राहतात जेथे डेंग्यूचा धोका संभावतो.

डेंग्यू हा स्थानिक रोग आहे, याचा अर्थ जगाच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये नियमितपणे उद्भवते. आफ्रिका, अमेरिका, आशिया, कॅरिबियन आणि पॅसिफिकमधील या देशांमधे हा रोग स्थानिक आहे. 

डेंग्यू म्हणजे नेमकं काय?

What is meaning of Dengue ? 

डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते.

डेंग्यू किंवा डेंगी – हा शब्द आलाय स्वाहिली भाषेतल्या ‘Ka-dinga pepo’ या शब्दांवरून. याचा अर्थच होतो cramp-like seizure म्हणजे पिळवटून दुखणं.

अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते डेंग्यूला Bonebreak Fever अर्थात हाडं मोडून काढणारा ताप असंही म्हटलं जातं. या तापामुळं काही जणांना हाडं आणि स्नायूत खूप दुखतं. 

डेंग्यूचं निदान (diagnosis of dengue)

NS1,IgM आणि IgG या रक्ताच्या तीन चाचण्या करून होतं. 

डेंग्यूचे निदान सामान्यतः रुग्णाची लक्षणे आणि शारीरिक तपासणीच्या आधारे केले जाते. 

तुमच्या लक्षणांचे मूल्यांकन केल्यानंतर तुमचे डॉक्टर खालील चाचण्या सुचवू शकतात:

संपूर्ण रक्त गणना Complete Blood count (CBC):

ही चाचणी शरीरातील प्लेटलेटची संख्या मोजते. या पेशींची संख्या कमी झाल्याने डेंग्यू किती गंभीर झाला आहे हे दर्शवते. 

डेंग्यू NS1 Ag साठी ELISA चाचणी:

ही एक रक्त चाचणी आहे ज्याद्वारे डेंग्यू विषाणू प्रतिजन शोधला जातो. तथापि, संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात ते नकारात्मक परिणाम दर्शवू शकतात. अशा परिस्थितीत एखाद्यामध्ये डेंग्यूची लक्षणे कायम राहिल्यास ही चाचणी पुन्हा करावी. 

पीसीआर चाचणी (व्हायरल डीएनए शोधण्यासाठी पीसीआर) PCR: ही चाचणी संसर्गाच्या पहिल्या 7 दिवसात अधिक प्रभावी असू शकते, जेव्हा संसर्ग असूनही NS1 एजी चाचणीचा निकाल नकारात्मक असतो. 

सीरम IgG आणि IgM चाचणी:
सहसा ही चाचणी नंतरची अवस्था आणि स्थिती जाणून घेण्यासाठी केली जाते. एकदा विषाणू शरीरात गेल्यावर, रोगप्रतिकारक पेशी डेंग्यू विषाणूविरूद्ध IgG आणि IgM प्रतिपिंडे तयार करू लागतात. या प्रतिपिंडांची पातळी हळूहळू वाढते.

लांब पल्ल्याच्या प्रवासी, लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण, स्वच्छतेचा अभाव, अकार्यक्षम डास नियंत्रण, हे डेंग्यू  वाढीचे कारण आहेत. 

डेंग्यूची प्रमुख लक्षणं काय आहेत ? 

डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत – Dengue Fever DF आणि Dengue Hemorrhagic Fever DHF. 

Dengue Fever (डेंग्यू ताप) : 

पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. 

याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणं दिसू शकतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत असतात. 

लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो. 

  • सोबत डोके-डोळे दुखणे, (डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते).
  • अंगदुखी, अशक्तपणा, 
  • अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.
  • त्वचेवर व्रण उठणे.
  • एकदम जोराचा ताप चढणे, 
  • चव आणि भूक नष्ट होणे
  • छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
  • मळमळणे आणि उलट्या
  • डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) 
  • हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव – चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, 
  • अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्‌सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, 
  • पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
  • दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे अर्थात DHF मुळे तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा, अशी लक्षणं दिसू शकतात.

अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असते.

डेंग्यू अतिगंभीर आजार 

ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.

-लक्षणांमध्ये

• उच्च ताप

• डोकेदुखी, पुरळ

• स्नायू आणि संयुक्त वेदना यांचा समावेश आहे. 

हे डास दिवसा चावणारे असतात. ह्या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. 

विषाणू बाधित डासानी चावा घेतल्यानंतर डेंग्यूची लक्षणे साधारणतः पाच ते सात दिवसांमध्ये दिसू लागतात. डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप (हाय ग्रेड फिवर), डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे.

ह्याव्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं, जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी दिसून येऊ शकतात. 

डेंगूची गंभीर स्वरूपाची लक्षणे पुढील प्रमाणे असतात: 

हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होणे व तो काळ्या विष्टेच्या स्वरूपात बाहेर पडणे, प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे. 

डेंगूच्या आजारात रक्तातील प्लेटलेट पेशी platelets (रक्त गोठवण्यात मदत करणाऱ्या रक्त कणिका) कमी होत असतात हे सर्वज्ञात आहे. विशेषतः ताप गेल्यानंतर प्लेटलेट पेशी कमी होण्यास सुरुवात होते. 

साधारणतः चार ते पाच दिवसात पेशी वाढायला सुरुवात होते. प्लेटलेट कमी होणे हेच एक डेंगू च्या तीव्रतेचे लक्षण नाही. बीपी कमी होणे, हात-पाय थंड पडणे, लघवी कमी होणे, किंवा पोटात दुखणे ही गंभीरतेची लक्षणे असतात. 

गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक आहे, जे जीवघेणा धोकादायक असू शकते. ताप आणि वेदनादायक डोकेदुखी अचानक सुरू झाल्यामुळे ही फ्लूसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. 

इतर लक्षणामध्ये त्वचेवर पुरळ, स्नायू आणि संयुक्त वेदना, मळमळ आणि उलट्या समाविष्ट होतात. अत्यंत प्रकरणांमध्ये, अत्याधिक रक्तस्राव (रक्तस्राव) आणि मृत्यू होऊ शकतो. 

तीव्र, सतत पोटदुखी

त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे

नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे.

रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे

झोप येणे आणि अस्वस्थता

रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते

नाडी कमकुवतपणे जलद चालते.

श्वास घेताना त्रास होणे. 

डेंग्यू होऊ नये म्हणून काय करावं?

डेंग्यूचा प्रतिबंध (Prevention of Dengue): 

डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे विशेष लक्ष ठेवा. तिथे खूप दिवस पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्या. 

घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळणं सर्वांत महत्त्वाचं. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावच. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

डेंग्यूच्या विषाणूचे 1, 2, 3, 4 असे चार प्रकार आहेत. त्यामुळं तुम्हाला एकदा डेंग्यू होऊन गेला तरीही तो पुन्हा होऊच शकतो.

डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. 

संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. 

घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वास्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत.

खिडक्यांना जाळ्या बसवून (स्क्रीनिंग करून) घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. 

आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

डेंग्यूवर उपचार काय? 

डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. 

रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार म्हणजे ताप किंवा अंगदुखी पाहून तशी औषधं दिली जातात. 

ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. 

निर्जलीकरण Body dehydration होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. पपयाचा (Papaya) वापर हा डेंगू बरा करण्यासाठी केला जातो . 

जर प्रकृती गंभीर असेल तर रुग्णालयात भरती करावं लागू शकतं.

डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांतीची सर्वांत जास्त गरज असते. तसंच भरपूर पाणी पिण्याचीही, म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लीटर पाणी प्यायला हवं. तसंच रुग्णानं साधा आहार घ्यावा.

डेंग्यू तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते. साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तात 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स असणं गरजेचं असतं. पण डेंग्यूमध्ये या प्रमाणावर सतत लक्ष ठेवावं लागतं.

जर प्लेटलेट्सचं प्रमाण 10 हजारांच्या खाली गेलं तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात, साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण 3 ते 8 दिवसांत बरा होतो.

WHO च्या आकडेवारीनुसार दरवर्षी 39 कोटी लोकांना डेंग्यूची (Dengue) लागण होत असावी असा अंदाज आहे. जगभरात डेंग्यूमुळे दरवर्षी सुमारे 25 हजार मृत्यू होतात. आणि यापैकी 70 टक्के रुग्ण आशियातले असतात.

हे प्रमाण मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कमी असलं, तरीही हे आजारपणाचं एक मोठं कारण आहे, एक मोठी समस्या आहे, असं जागतिक डास कार्यक्रमाचे प्राध्यापक  सांगतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी घ्या. 

प्लेटलेट वाढणे हे मुख्यत्वे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. 

प्लेटलेट पेशी वीस हजारापेक्षा कमी होत असल्यास ट्रान्सफ्यूस म्हणजे ब्लड बँकेतून मागवून रुग्णास चढवाव्या लागतात. प्लेटलेट पेशींची संख्या जास्त असूनही रक्त स्रावाची लक्षणे असल्यास डॉक्टर प्लेटलेट ट्रान्सफ्यूस (Platelet transfusion) करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्लेटलेट ट्रान्सफ्यूस करणे हा रक्तस्त्रावाचा धोका टाळण्याचा तात्पुरता उपाय आहे.

ट्रान्सफ्यूस केलेल्या पेशी देखील शरीरात नष्ट होत असतात त्यामुळे वारंवार प्लेटलेट चढवण्याची गरज सुद्धा भासू शकते. आजाराचा प्रभाव कमी होत जाऊन शरीर प्रकृतीत सुधारणा सुरु झाल्यावर प्लेटलेट आपोआप वाढतात.

पपईच्या पानांचा रस, किवीचे फळ किंवा इतर कुठलेही औषध दिल्याने फायदा होऊन प्लेटलेट वाढतीलच असे कुठलेही संशोधन झालेले नाही. 

पण पपई च्या पानांचा रस पिल्याने खूप जणांमध्ये प्लेटलेट्स वाढलेल्या निदर्शनास आले आहे , असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे.

डेंग्यूचा Dengue आजार शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतो. त्यातूनच गुंतागुंत होऊन तो गंभीर रूप घेऊ शकतो. 

अनियंत्रित प्रकारचा मधुमेह, हृदयविकार (heart disease), मूत्रपिंड अथवा यकृताचा आजार इत्यादींमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे किंवा पोषक तत्वांचा (उदा: जीवनसत्वे, प्रथिने इत्यादी) मुळातच अभाव असणे अशा रुग्णांमध्ये गुंतागुंत जास्त प्रमाणात दिसून येते. 

अशी गुंतागुंत होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे त्यामुळे डेंगू आजाराला घाबरु नये.

डेंगू संबंधीची तपासणी पॉसिटीव्ह आल्यावर देखील फक्त ताप आणि अंगदुखी असल्यास त्यासंबंधीची औषधे देऊन तुमचे डॉक्टर तुम्हाला घरी आराम करण्याचा सल्ला देऊ शकतात. 

डेंगूच्या सर्वच रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज भासत नाही. 

जे रुग्ण पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ (शुद्ध पाणी, स्वच्छ फळांचा जूस इत्यादी) उलट्या न होता घेऊ शकतात आणि ज्यांना चार- पाच तासांनी पुरेशा प्रमाणात लघवी होत असते, त्यांना ऍडमिट करावं लागत नाही. 

अशा वेळी मात्र घरी आराम करणे आणि सांगितलेल्या दिवशी तुमच्या डॉक्टरांना फॉलोअप ला भेटणे हे नितांत गरजेचे ठरते.

या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. 

तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. डेंगू हा व्हायरल आजार असल्याने त्यावर औषध उपलब्ध नाही. 

परंतु डेंगू मध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते व ते पोटात तसेच छातीत जमा होण्यास सुरुवात होत असते त्यामुळे रुग्णाला सलाईन लावण्यात येत असतात. शरीरातील प्लेटलेट जास्त प्रमाणात कमी झाल्यास रुग्णाला प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट platelet transfusion लावाव्या लागतात. 

ही माहिती जरूर शेअर करा जेणेकरून इतरांनाही ही महत्त्वाची माहिती कळेल.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Leave a Comment