पुढे ढकलू नका मासिक पाळी; शारीरिक आरोग्य सांभाळा
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचा धार्मिक व सामाजिक कारणांसाठी महिलांत सर्रास वापर केला जातो, मोठया कार्यांमध्ये पाळी आल्यास त्या परिवाराच्या टोमण्यांना वाचण्यासाठी महिलांवर यांचे वापर वाढलेला आहे. मात्र, या गोळ्या घेतल्याने अनेक स्त्रीरोग विशेषज्ञांच्या मते, हार्मोनल असंतुलन, वजन वाढणे, त्वचेवर पुरळ, मूड स्विंग्स, हाय ब्लड प्रेशर सारखे दुष्परिणाम होऊ शकतात.