आरोग्य माहिती : 1
प्रमाणापेक्षा जास्त पिझ्झा खाणं पडू शकतं महागात, होतात अनेक गंभीर आरोग्य समस्या..
आजकाल पिझ्झा खाण्याची क्रेझ खूपच वाढली आहे. आजच्या सगळ्यात फेमस फूड्सपैकी एक म्हणजे पिझ्झा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं. याच्या सेवनाने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. त्या काय हे जाणून घेऊ…
पिझ्झा खाण्यानें होणारे नुकसान.
1) लठ्ठपणा.
पिझ्झामध्ये अनेकदा हाय कॅलरी, सॅच्युरेटेड आणि रिफाइंड कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. जर तुम्ही हे एका लिमिटपेक्षा जास्त खाल तर पोट आणि कंबरेची चरबी वाढणं फिक्स आहे. जर तुम्ही कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तर तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागेल.
2) हाय बीपी.
पिझ्झामध्ये प्रोसेस्ड मीट, पेपरोनी, सॉसेज आणि एक्ट्रा चीज सारखे अनेक असे इंग्रीडिएंट्स असतात ज्यात मीठ जास्त असतं. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, मिठात सोडिअम जास्त असतं. जर याचं सेवन जास्त केलं तर हाय ब्लड प्रेशरची समस्या होते.
3) डायबिटीस.
पिझ्झाच्या पिठात रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यात ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढण्याचा धोका होऊ शकतो. ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीसही होऊ शकतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी तर पिझ्झा विषासारखा आहे.
4) इनडायजेशन.
पिझ्झाची टेस्ट बऱ्याच लोकांना आवडते. ज्यामुळे लोक याचं सेवन जास्त करू लागतात. तसेच यात फॅट जास्त असतं ज्याकारणाने डायजेशनमध्ये समस्या होतात. याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्या होते.
आरोग्य माहिती : 2
नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक
1) नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळामधील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्येही केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात.
2) जेवणाला पर्याय म्हणूनही तुम्ही खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्याप्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो.
3) अनियमित मासिक पाळीचा त्रास असणार्या महिलांनी रोज 10 ग्रॅम ओल्या नारळाचा गर खावा. तसेच गायीचे दूधही प्यावे. मासिक पाळी संबंधी सर्व समस्या सुटतील. शीघ्रपतनाचा त्रास असणार्या पुरूषांनी रोज सुखे खोबरे आणि गायीच्या दूध प्यायल्याने विशेष लाभ होतो
4) नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्याचे काम करते. अल्सरसारखा आजार बरा होतो. किडनी, थायरॉइड, डायबिटीज व मुत्राशयाचा विकार असलेल्या लोकांनी नारळ पाणी मोठ्याप्रमाणात सेवन करावे. नारळात अनेक व्हिटामीन असतात ते पचनास फार लाभदायी असतात. पोट दूखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याने उलटीही थांबते.
5) नारळ खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे. नारळाच्या दूधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने फायदा होतो. (आरोग्य)
6) तोंडात फोड असल्यास ओले नारळाच गर खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्या.
7) नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते.
8) आंबट दही, मुलतानी माती आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्यास केस चमकदार होतात.
दररोज दोन-तीन नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळतो.
9) हिवाळ्यात रोज रात्री सुखे खोबरे खावे. रात्री झोपताना चेहरा, मान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील. नारळाचा गर चेहर्यावर लावल्याने, चेह-यावरील व्रण नाहिसे होतात.
10) गर्भवती महिलांनी रोज नारळाचा गर खाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत राहते. तसेज सुदृढ बाळ जन्माला येते. खोबरेल तेलात बदाम बारिक करून टाकावे. डोके दुखीवर हे तेल रामबाण औषणीचे काम करते.
पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा..