मित्रांनो, आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्ती जवळ काही विचार असतात त्या विचारांच्या अनुषंगाने तो निर्णय घेऊन जगत असतो.
हे विचार जर खूप उदात्त आणि छान असतील तर नक्कीच कोणाचेही आयुष्य सुंदर होऊ शकते.
अश्याच काही विचारांची पर्वणी आपल्या ला इथे देत आहोत,
इथे दिलेले विचार तुम्ही व्हाट्सप्प स्टेटस किंवा social मीडिया वर copy paste करून ठेवू शकता.
चांगले विचार नेहमी पसरवत राहा, कोण जाणे तुमच्या एका विचाराने कोणाचे तरी आयुष्य बदलून जाईल.
चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाचे विचार :
- कमकुवत लोक तेव्हा थांबतात जेव्हा ते थकतात विजेता तेव्हा थांबतात जेव्हा ते जिंकतात.
जीवन त्याचीच परीक्षा घेतं जो प्रत्येक वळणावर चालणं जाणतो काही मिळवून तर प्रत्येकजण हसतो जीवन बहुधा त्यांचंच असतं जो सर्व काही गमावूनही हसणं जाणतो.
पावसाचे थेंब कितीही लहान असू देत, परंतु त्याच्या सतत बरसण्याने मोठ्यामोठ्या नद्यांना पूर येतो. त्याचप्रमाणे तुमचे लहान लहान प्रयत्न जीवनात क्रांती घडवण्यासाठी सक्षम ठरतात.
परिस्थिती जेव्हा विपरीत असते तेव्हा प्रभाव आणि पैसा नाही, स्वभाव आणि संबंध कामी येतात.
समस्या इतकी ताकदवान होऊ शकत नाही जितकी आपण तिला मानतो, कधी ऐकलं आहे का ?/ की अंधाराने सकाळ होऊच दिली नाही.
आपल्यातली कमतरता ओळखून ती दूर करण्याचा प्रयत्न करावा, कारण, मोठ्यात मोठे जहाज बुडायला, एक लहान छिद्र पुरे असते.
जे लोक सतत काहीतरी पोस्ट पाठवत असतात, ते यासाठी नाही, की त्यांना खूप फुरसत असते. ते यासाठी, की त्यांना सतत तुमच्या संपर्कात राहायचं असतं.
- विजेते वेगळ्या गोष्टी नाही करत, ते त्याच गोष्ट करतात जे सर्व करतात फरक एवढाच की ते प्रत्येक गोष्ट वेगळ्याप्रकारे करतात.
जीवनात एकदा निर्णय घेतला की, मग वळून बघू नये कारण वळून बघणारे इतिहास रचत नाहीत…
कोणीही मागे जाऊन नवी सुरुवात करू शकत नाही परंतु कोणीही आजपासून सुरू करून एक नवीन शेवट नक्की करू शकतो.
वेळ, संपत्ती, सत्ता आणि शरीर आयुष्यभर साथ देतातच असं नाही, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा. आणि चांगले संबंध जीवनभर साथ देतात.
माणूस घरं बदलतो. माणूस मित्र बदलतो माणूस नोकरी बदलतो कपडे बदलतो, जेवण बदलतो तरी तो दुःखी का असतो. कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.
डोळे जगातली प्रत्येक गोष्ट बघू शकतात, परंतु डोळ्यात काही गेलं, तर ते काहीच बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्यांचे दोष तर बघतो, परंतु तो स्वत मधले दोष बघू शकत नाही.
काळ आणि परिस्थिती माणसाच्या आयुष्यात कधी समान नसते काळ माणसाचे आयुष्य बदलवतो आणि परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत.
- सर्वांत मोठा मुर्ख तो आहे जो एका दगडाला दोनवेळा ठेचाळलो.
जेव्हा तुम्ही चूक स्वीकारत नाही तेव्हा तुम्ही आणखी एक चूक करून बसता, तुम्ही तुमच्या चुकांमधून तेव्हाच शिकू शकता जेव्हा तुम्ही तुमची चूक स्वीकारता.
चूक कबूल करण्यात आणि अपराध सोडण्यात कधी वेळ लावू नका कारण प्रवास जेवढा लांबचा असतो, परतणे तेवढेच अवघड असते.
आपल्याला नेहमी अस वाटतं, की आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्याचं आयुष्य बाग आहे परंतु आम्ही है विसरतो, की दुसऱ्यासाठी आपणही दुसरेच असतो.
तुमच्या आनंदात तर ते लोकच सामील होतात जे तुम्हाला पसंत करतात परतु तुमच्या दुःखात ते लोक सामील होतात जे तुम्हाला मनापासून पसंत करतात.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
- फुलं कितीही सुंदर असोत, स्तुती सुगंधाने होते, माणूस कितीही मोठा असला तरी त्याची पारख त्याच्या गुणांनी होते.
मनात आहे ते अगदी स्पष्ट बोलायला हवे. कारण खरे बोलण्याने निर्णय होतात आणि खोटं बोलण्याने अंतर वाढत.
नात्यांच्या गोष्टी फक्त हृदयापर्यंतच ठेवा. डोकं चालाख असत, हिशेब ठेवेल.
उदास राहण्याची कारणे तर खूप आहेत जीवनात, परंतु विनाकारण आनंदी राहण्यात मजाच काही और आहे.
मैदानात हरलेला पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला कधीच जिंकू शकत नाही तुमचा आत्मविश्वास तुमच्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे.
जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट कोणाच्या मनात आहे, ती समजून घेण्याची समज ठेवा.
कधी नका म्हणू की, दिवस तुमचे वाईट आहेत अस समजा की तुम्ही काट्यांनी वेढलेला गुलाब आहात.
जीवन फार जटिल आहे, इथे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नका कारण जेव्हा तुम्ही उत्तर शोधू लागता, तेव्हा जीवनाचे प्रश्न बदलू लागतात.
- कठीणचा अर्थ असंभव होत नाही, तर तुम्हाला कठीण परिश्रम करायचे आहेत, असा होतो.
जर गमावण्याची भीती आणि मिळवण्याची इच्छा नसती, तर देवही नसता आणि प्रार्थनाही नसती.
जेव्हा वेदना आणि कटू बोलणं दोन्ही गोड वाटू लागेल, तेव्हा समजावं की, जीवन जगता येणं आलं.
तुम्हाला तुमच्या आत ती जागा शोधायची आहे जिथे काहीच अशक्य नाही.
त्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही, जे समाजासाठी कामाचं नसेल
चुका वेदना देणाऱ्याच असतात; परंतु त्याच आपल्याला काही वेळानंतर यशाचा योग्य रस्ता दाखवतात.
तुमच्या आयुष्यातील चढ-उतारानंतरही कोणी तुमची साथ सोडत नसेल, तर त्या व्यक्तीची किंमत नेहमी करा.
निरोगी आरोग्याशिवाय जगातील सर्व सुखं व्यर्थ आहेत.
जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली आहे, तो कधीही विसरत नाही.
वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या नाहीत, तर त्या तुमची वेळ बदलून टाकतात.
त्या कामाला कधीच उद्यासाठी सोडू नका, जे काम तुम्ही आज करू शकता.
कोणाकडून अपेक्षा न करता त्यांच्याविषयी चांगला विचार करा. कारण कोणी तरी म्हटलं आहे की, जे लोक फुले विकतात, त्यांच्या हातात सुगंध नेहमी राहतो.
- व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. आवडतं तेच करू नका, जे आवडत नाही, त्यात आवड निर्माण करा तुम्ही किती जगलात यापेक्षा, कसं जगलात ? याला महत्त्व आहे.
जीवन एक दिवसांचं असो वा चार दिवसांचं, ते असं जगा, की जीवन तुम्हाला मिळालं नाही, तर तुम्ही जीवनाला मिळालात.
चुकीचे मार्ग स्वीकारून यश मिळवण्यापेक्षा चांगलं आहे, योग्य मार्ग स्वीकारून अपयशी होणे.
देवाने आपली काही अशा प्रकारे रचना केली आहे की, ना आपण स्वतःची पाठ थोपटू शकत, ना स्वत ला लाथ मारू शकत ! म्हणून जीवनात मित्र व निदा करणारे आवश्यक आहेत!
जर मन कमकुवत असेल, तर परिस्थिती समस्या बनते, जर मन संतुलित असेल, तर परिस्थिती आव्हान बनते, परंतु जर तुमचं मन मजबूत असेल तर तीच परिस्थिती संधी बनते.
- स्वतः बदला, जग बदलेल….
तुम्ही दुखावर लक्ष केंद्रित कराल, तर नेहमी दुखी राहाल आणि सुखावर लक्ष केंद्रित कराल, तर नेहमी सुखी राहाल कारण तुम्ही ज्याच्यावर लक्ष केंद्रित करता तीच गोष्ट सक्रिय होते. कारण लक्ष जीवनाची सर्वांत मोठी किल्ली आहे.
विश्वास कधी चमत्कारांची अपेक्षा ठेवत नाही, परंतु कित्येकदा विश्वासामुळेच चमत्कार घडतात. (आयुष्य)
पसंत त्याला करा जो तुमच्यात परिवर्तन आणतो, नाहीतर प्रभावित तर डोंबारीही करतो
जे काम करून दाखवण्याची भीती वाटते ते करून दाखवणे यालाच म्हणतात धाडस.
- आपल्या शब्दात ताकद आणा आवाजात नाही, कारण फुलं पावसात उमलतात, वादळात नाही.
या जगात चुकलेल्या व्यक्तींना क्षमा करण्याची क्षमता तीन लोकांमध्ये आहे, आई, महात्मा आणि परमात्मा.
पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रात असतो, तेव्हा त्याच काहीच अस्तित्व नसतं, परंतु जेव्हा तो थेंब पानांवर असतो तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो तुम्हाला सुद्धा जीवनात अशा ठिकाणी पोहोचायच आहे, जिथे मोत्यासारखे चमकाल. कारण गर्दीत ओळख दबून जाते.
माणसाच्या दुखी होण्याची दोन कारणे आहेत त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि वेळेच्या आधी हवं असतं
कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सर्वांपासून जेवढं दूर राहाल तुम्ही तेवढेच आनंदी राहाल
जिथे प्रयत्नांची उंची खूप असते तिथे नशिबाला वाकावं लागतं…
एका गरिबाच्या झोळीत जेव्हा मी एक नाणं टाकल, तेव्हा कळल की, महागाईच्या या काळात आशीर्वाद किती स्वस्त आहेत.
वर्तमानाकडून सुख मिळविण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार कपटी असतं, ते आश्वासन देतं, खात्री नाही.
- जे आपल्या पावलांवर विश्वास ठेवतात तेच ध्येयपर्यंत पोहोचतात.
गैरसमज हे मॅगीसारखे असतात लगेच होतात… तेही दोन मिनिटात…! यावर एक उत्तम रिप्लाय गरम असतानाच संपवावे. नाहीतर चिकटून बसतात आणि चिवट होतात.
सर्वांत सुंदर फूल हे हळूवार उमलत असते परंतु गवत झपाट्याने उगवते, त्याचप्रमाणे आयुष्यात चांगल्या गोष्टी या हळूहळू घडतात. (आयुष्य)
चांगल्या लोकांची देव परीक्षा खूप घेतो, परंतु सोबत सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, परंतु सोबत करत नाही.
नात्यात आणि मैत्रीत कसला मान-अपमान फक्त आपल्या माणसाच्या मनात राहता यायला हवं!
सत्य बोलण्याचं धाडस करा, परिणाम भोगण्याची शक्ती देव देईल.
ज्या माणसाचे कर्म चागली असतात. त्याच्या जीवनात कधीच अंधार नाही होत.
दोन क्षणांचं जीवन आहे जगण्याचं एक तत्त्व बनवा राहायच तर फुलांसारख आणि पसरायचं तर सुगंधासारख.
- एका अटीवर जगलो मी जीवन, ज्याला आपलं समजलं त्याला कधी पारखलं नाही.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य कधीही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात तर समाधानाची आपण स्वतः.
जे झालं त्याचा विचार करायचा नसतो, जे मिळालं ते गमवायचं नसतं, यश त्यांना मिळतं जे वेळ आणि परिस्थितीवर रडत बसत नाहीत.
अज्ञानी असणं लाजिरवाणं नाही परंतु शिकण्याची इच्छा नसणे लाजिरवाणी गोष्ट आहे.
जर तुम्ही योग्य आहात. तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका.
प्रार्थना व ध्यान माणसासाठी खूप आवश्यक आहे प्रार्थनेने देव तुमचं ऐकतो आणि ध्यानाने तुम्ही देवाच ऐकता.
यश एक असा शिक्षक आहे, तो लोकांमध्ये असा विचार विकसित करतो, की ते अपयशी होऊ शकत नाहीत.
- ज्या व्यक्तीने कधी चूक केली नाही, तर समजावं, की त्याने कधी काही नवं करण्याचा प्रयत्नच केला नाही.
मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे.
सर्व म्हणतात, की माणसांत देव असतो कोणाला विचारू, की माणूस कुठे असतो ?
जर प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबतच इतरांच्या मान- सन्मानाचा विचार करत असेल, तर मैत्री असो वा नाते, कधी दुरावा येणार नाही.
तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी असते तेवढीच तुमची बदनामी जास्त असते त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा.
चांगल्या नात्याना वचन आणि अटींची गरज नसते, फक्त दोन माणसं हवी, एक निभावू शकेल आणि दुसरा त्याला समजू शकेल.
- केस पांढरे करायला पूर्ण आयुष्य लागतं, काळे तर अर्ध्या तासात होतात.
दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्याच दारात पडतात.
मूर्ती विकणाऱ्या गरीब कलाकारांसाठी कोणीतरी खूप छान लिहून ठेवल आहे- “गरिबाची मुलंही जेवण करू शकतील सणांमध्ये, म्हणून देव स्वत विकला जातो बाजारात “
- किती सुंदर लिहिलंय पारखाल तर कोणी आपल नाही समजाल तर कोणी परकं नाही.
विसरणं शिका. कारण एकदिवस जगही तेच करणार.
हरणारे अपयशाने मिळणाऱ्या शिक्षेची कल्पना करतात. आणि विजेते मात्र यशाने मिळणाऱ्या पुरस्काराची कल्पना करतात.
किती अवघड आहे जीवनात आपल्या लोकांमधून आपल्या लोकांना शोधणं.
तुला अखेर इथेच यायचं होतं, येता येता आयुष्य संपून गेलं, या जगापासून तुला काय मिळालं, तुझ्या लोकानीच तुला जाळून टाकलं, आयुष्यातला पहिला लंगोट त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे कफन त्यालाही खिसा नाही, मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशाला केलीस ?
- मी म्हणालो, अपराधी आहे मी
- देव म्हणाले माफ करेन.
- मी म्हणालो, अडचणीत आहे मी
- देव म्हणाले, सांभाळून घेईन.
- मी म्हणालो, एकटा आहे मी
- देव म्हणाले, सोबत राहीन मी.
- मी म्हणालो, आज खूप उदास आहे मी
- देव म्हणाले, नजर उचलून तर बघ, तुझ्या अवती भवतीच आहे मी.
- जो आनंद आपली लहान ओळख बनवण्यात आहे तो कोणाची मोठी सावली बनण्यात नाही.
- वाईट काळ सर्वांत मोठा जादूगार आहे कारण तो एका क्षणात आपल्या सर्व माणसांच्या चेहऱ्यांवरचा बुरखा बाजूला करतो.
साखळ्या साखळ्याच असतात त्या लोखंडाच्या असोत किंवा सोन्याच्या त्या आपल्याला बनवतात शेवटी गुलामच.
जगात कोणतीही गोष्ट कितीही किमती कितीही मूल्यवान असू देत देवाने जी सुंदर झोप, शांती आणि आनंद आपल्याला दिला आहे त्याच्यापेक्षा मूल्यवान आपल्या जीवनात काहीच नाही.
कदाचित सेल्फी या गोष्टीची पावती आहे, की आम्ही जीवनात इतके एकटे झालेलो, की आमच्या अवतीभवती आमचे फोटो काढणारेसुद्धा कुणी नाही उरलेत. (आयुष्य)
एक दोरी आहे जिचं एक टोक इच्छांनी पकडून ठेवलं आहे आणि दुसरं पात्रतेने, याच ओढाताणीचं नाव आहे जीवन.
जी व्यक्ती सर्वांत जास्त रागावते, ती तेवढंच प्रेमही करते. आणि तेवढ्याच जास्त स्वच्छ मनाचीही असते.
आधार बना निराधारांसाठी, किनारा बना किनारा नसणाऱ्यांसाठी, स्वत साठी जगणं ते काय जगणं, जगायचंय तर लाखोसाठी जगा.
त्यांनी धक्का दिला, मला बुडवण्यासाठी परिणाम हा झाला की मी चांगलं पोहणं शिकलो.
- जे लोक तुमची मदत करण्यासाठी पुढे येतात, ते यासाठी नाही, की तुमचं त्यांच्यावर काही कर्ज शिल्लक आहे उलट यासाठी, की ते तुम्हाला आपल मानतात.
सर्वात मोठा दानी तो असतो, जो आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला या योग्य बनवतो की त्याला आयुष्यात कधी दान मागायची गरज पडू नये.
रागीट आणि अहंकारी व्यक्तीला शत्रूची काहीच आवश्यकता नाही. कारण त्याला संपवण्यासाठी हे दोन दुर्गुणच पुरे आहेत. (आयुष्य)
चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो पुढच्याला त्याचा गर्व नसतो मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो, कारण क्षणभरातच स्थिती बदलणार असते, हे पायांना कळू शकतं, पण माणसाला का कळत नसतं.
- आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते.
कळत नाही जीवनाचा हा कोणता काळ आहे, माणूस शांत आहे, परंतु ऑनलाइन किती गोंधळ आहे.
तुम्ही तुमच्या जीवनात काही करता ते एकदिवस संपेल, परंतु सर्वात महत्त्वाचं हे आहे, की तुम्ही तुमच्या जीवनात काही करत आहात.
माणूस किती विचित्र आहे प्रार्थनेच्या वेळी विचार करतो की, देव किती जवळ आहे आणि अपराध करते वेळी विचार करतो की देव किती दूर आहे.
गैरसमजाचा एक क्षण इतका विषारी असतो की, तो प्रेमाचे शंभर क्षण एका क्षणात विसरतो.
लपवतो आहे आजकाल काही गुपित मी स्वतःपासून मी ऐकलंय लोक मला माझ्यापेक्षा जास्त जाणतात.
माणसाचा स्वभाव त्या दिव्यासारखा असतो. जो राजाच्या महालातसुद्धा तेवढाच प्रकाश देतो जेवढा कोण्या गरिबाच्या झोपडीत देतो.
- अनुभव आहे आपला, मातीची पकड मजबूत असते, संगमरवरावर तर आपण पाय घसरताना पाहिले आहे.
नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार करू नका. तुम्ही इतके समजदार व्हायचे आहात अजून की. विधात्याच्या योजना समजू शकाल.
हे जग यासाठी वाईट नाही, की इथे वाईट लोक जास्त आहेत. यासाठी वाईट आहे, की इथे चांगले लोक गप्प आहेत.
- आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्याच्या कपाळावर लावला, तरी आपली बोटं सुगंधित करून जातो.
प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख, कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका! कारण लोक सुखांना नजर लावतात, आणि दुःखावर मीठ चोळतात..!
तुम्ही काल काय करू शकला नाहीत, यावर पश्चात्ताप करीत बसू नका. उलट विचार करा की आज तुम्ही काय करू शकता? (आयुष्य)
जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो ना तेव्हा दुसरं कोणी आपल्याविषयी काय विचार करत यामुळे फरक पडत नाही.
एकदा कोणीतरी पैशाला म्हणाल, तू तर एक कागदाचा तुकडाच आहेस पैसा हसून म्हणाला, आहे खरा मी कागदाचा तुकडा, पण आजपर्यंत मी केराच्या टोपलीत कधी पडलेलो नाही.
हट्टाची एक गाठ सुटली तर गुंतलेल्या नात्याचे सर्व पेच सुटतील.
- कोण केव्हा, कोणाचा आणि किती आपला आहे हे तर काळच सांगेल.
अशाच एका लहानशा गोष्टीवर संबंध बिघडले. मुद्दा हा होता की, योग्य काय आहे? आणि ते योग्य कोण? यावर वाद घालत राहिले.
प्रत्येक दिवशी स्वतःला निघून गेलेल्या दिवसापेक्षा चांगलं करा.
व्यक्तीच्या जीवनातही संकटे येतात; पण पुण्यसंचयामुळे आणि केलेल्या मदतीची परतफेड म्हणून अनेक लोकही अशा व्यक्तीच्या मदतीला धावून येतात आणि संकटाचे निवारण होते.
सर्वांकडून कौतुकाची अपेक्षा करू नका त्यापेक्षा हे बघा की कोणी तुम्हाला वाईट म्हणू नये.
पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावं लागतं.
जर तुम्हाला शोधायचंच आहे तर तुमची पर्वा करणाऱ्यांना शोधा तुमचा उपयोग करणारे तर तुम्हाला शोधतीलच
मित्राला एक शब्द आहे, दोस्त! या शब्दाचा अर्थ खूप सुंदर होतो, आपल्या दोषांचा जो अस्त करतो, तो मित्र असतो.
कदाचित खूप कमी लोक जाणत असतील ‘प्रसाद’ चा अर्थ
- प्र : प्रभूचे
- सा : साक्षात
- द : दर्शन
जर मित्र मिळाले नाही तर विश्वास बसत नाही, की अनोळखी लोक सुद्धा आपल्या लोकांपेक्षा प्रिय होऊ शकतात.
- आपल्या पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण जर तुम्ही दुसऱ्यांदा अपयशी झालात, तर अनेक ओठ या म्हणण्याची वाट बघतील की, तुमचं पहिलं यश हा एक योगायोग होता.
आयुष्यात आपण एखाद्या गोष्टीत हरतो, ती भावना जितकी दुःखदायक असते, त्याहीपेक्षा भयंकर असतं, पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं, प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल.
कोणीतरी छान म्हटलंय, ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं, त्याला रुसण्याचा आणि तुटण्याचा हक्क नसतो.
आयुष्य स्वर्गात असूनही त्याला उद्ध्वस्त करण्यात घालवलं आणि इच्छा फक्त ही होती की, मेल्यानंतर स्वर्ग मिळावा
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल, तर तो आकाशाला विचारा.
शहरात देवांची कमतरता नाही, अडचणी तर माणूस शोधताना येतात.
- जेव्हा तुम्हाला एक ध्येय मिळतं, तेव्हा जगातली कोणतीच अडचण तुम्हाला अडचण वाटत नाही.
कोण जास्त सुखी असतं सुखसोयी भोगणारा की सुखाने झोपणारा.
मी आनंदी राहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, दुसऱ्यांवर नाही जेव्हा हा निर्णय निश्चित होईल, तेव्हा तुमच्या जीवनाचं नवं पर्व सुरू होईल.
देवाने मला विचारलं, या मित्रांची गरज तुला कुठपर्यंत आहे? मी माझ्या डोळ्यातून एक अश्रू समुद्रात टाकला आणि म्हणालो, हे अश्रू मिळणार नाही तिथपर्यंत.
कितीही प्रेमाने जपा तुम्ही नातं, परंतु बदलणारे बदलतातच.
जर तुम्ही तेच करत राहिलात जे आजपर्यंत केलं, तर तुम्हाला तोच परिणाम मिळेल, जो आजपर्यंत मिळत होता.
सुखी जीवनाचा सोपा रस्ता आहे, की सर्वांना हरवण्यापेक्षा सर्वांना जिंकण्याचा प्रयत्न करा. लोकांना हसण्यापेक्षा लोकांच्या सोबत हसा.
अर्ध्या रस्त्यातून परतणं काहीच फायद्याचं नाही. कारण परतताना तुम्हाला तेवढंच अंतर पार करावं लागेल, जेवढं अंतर तुम्हाला ध्येयापर्यंत पोहचवू शकत होतं.
आवडलं तर नक्की शेयर करा