पपई चे आरोग्यासाठी चे फायदे

आज जाणून घेऊया : आहारात पपई चे महत्त्व व लहान मुलांना पाय दुमडून कधीही बसवू नये?

आरोग्य हे पूर्णतः आपल्या आहार-विहारावर अवलंबून असतं. म्हणजे आपलं आरोग्य हे आरोग्यदायी सवयींवर शंभर टाके अवलंबून आहे.

म्हणूनच अधिकाधिक आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी आपली दिनचर्या व्यवस्थित ठरवणं व तिचा अवलंब करणं गरजेचं आहे.

आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

जितक्या जास्त पोषक घटकांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश कराल तेवढ़ तुमच नारोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि परिणामी सौंदर्य वृद्धिंगत होण्याम मदत होईल.

खाली दिलेले पाच पदार्थ म्हणजे आरोग्यासाठी संजीवनी आहेत म्हणून या पदार्थाचा आहारात आवर्जुन समावेश करा…

१) बदाम

सर्व सुकामेव्यात बदाम सर्वश्रेष्त आहेत. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामापेक्षा पाण्यात भिजवून खालेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. 

बदामाने काही काळ भूक भागवली जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्याने त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.

बदामाची साल कोरडी असल्याने सहसा लोक ती काढून टाकतार, पण ही साल शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करते.

म्हणून बदाम हे सालासकट खाते पाहीजेत बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.

२) पालक

अ आणि क जीवनसत्त्व, फोलेट, मॅग्नेशियम पालक या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात असते. तसंच पालक कॅरोटिनाईड्स आणि बीटा कैरोटीन यांचा स्रोत आहे

रातांधळेपणा आणि हृदयविकार याची शक्यता पालकाच्या सेवनाने कमी होते.

ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

लो ब्लडप्रेशाच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे, यामुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.

एनिमिया किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल्यास दररोज पालकाचा एक ग्लास रस अवश्य घ्यावा.

हृदयाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज एक कप पालकाच्या रसाचे २ चमचे मध टाकून सेवन करावे.

३) गव्हांकुर

गव्हांकूरामध्ये थियामीन, फोलेट, मॅग्निशियम, फॉस्फरस, झिंकचे प्रमाण चांगले असते. प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि काही प्रमाणात स्निग्ध पदार्थ यांचाही पुरवठा ते करते.

मोड आलेले गहू कोणतीही डिश खाताना वर थोडे शिंपडले तरी ते आरोग्याला फायदेशीर ठरतील.

जखमा भरून येणं, हाडं जुळून येणं, यासाठी गव्हांकुरातील क्लोरिफिल आणि कॅल्शियमचा उपयोग होतो.

२३ किलो ताज्या भाज्यांमधून माणसाला जेवढे पोषक घटक मिळतात, तेवढे पोषक घटक एक किलो गव्हांकुरातून मिळतात. म्हणून गव्हांकुराला पृथ्वीवरील संजीवनी म्हणतात.

२३ किलो ताज्या भाज्यांमधून माणसाला जेवढे पोषक घटक मिळतात, तेवढे पोषक घटक एक किलो गव्हाकुरातून मिळतात माणून गव्हांकुराला पृथ्वीवरील संजीवनी महणतात. 

ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते. यात आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

रातांधळेपणा आणि हृदयविकार यांची शक्यता पालकाच्या सेवनाने कमी होते.

४) रताळ

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि काही कर्करोग प्रतिबंधक द्रव्ये असतात. शरीराची वृध्दत्त्वाकडे होणारी वाटचाल रताळी खाण्याने रोखली जाऊ शकते. रताळ्यात अ आणि क जीवनसत्त्व मिळते.

फायबर, व्हिटॅमीन बी ६ आणि पोटॅशियम यांचाही पुरवठा रताळ्यामधून चांगला होतो. रताळ्यात कॅलरीज प्रमाणही अत्यल्प असतं. म्हणून केवळ उपवासाच्याच दिवशी न खाता इतर वेळेसही रताळ खाल्ल पाहिजे.

आरोग्याबरोबरच सौंदर्यवर्धनातही रताळ फायदेशीर आहे. रताळे हे अँटीऑक्सीडेंट तत्त्वांनी भरपुर असते. जे त्वचेला तरुण आणि सुंदर ठेवण्यास मदत करते.

याव्यतिरिक्त हे त्वचेला कॅन्सर आणि सुर्याच्या हानिकारक किरणांपासुन वाचवते.

जर तुमचे केस वाढत नसतील तर तुम्ही रताळ्याचा वापर करुन फायदा मिळवू शकता. यामधील बीटा केरोटीन केस वाढवण्यास मदत करते.

यासोबतच कोंडा दूर करण्यात हे फायदेशीर असते.

५) बीन्स

वालाच्या अनेक प्रकारच्या शेंगामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असत. फॉस्फरस आणि पोटेशियमचे प्रमाणही मुबलक असते.

रेड बीन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजीपुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

मधुमेह, हृदयरुग्ण यांच्या रुग्णासाठी बीन्सचं सेवन करणं फायदेशीर ठरतं शिवाय गवार, फरसबी बांसारख्या भाज्यामध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असत. 

म्हणून या भाज्या पचनासाठी फायदेशीर ठरतातच तसंच सर्व वयोगटातील व्यक्तीसाठीही त्या अत्यंत आरोग्यदायी व लाभदायी आहेत.

पपई चे आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून घ्या: 

हृदयविकारापासून हृदयाचं संरक्षण करण्याचा गुण पपईमध्ये आहे.

क जीवनसत्त्व व फायबरचा उत्तम खजिना पपईमध्ये असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून ती शरीराचं संरक्षण करते. परिणामी हृदयरोगापासून संरक्षण होतं.

एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये १२० कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणा-यांनी पपईचा आहारात जरूर समावेश करावा.

तसंच पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवता येते.

ही पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

कपभर पपईच्या तुकड्यांमध्ये केवळ ८.३ ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेहापासूनही संरक्षण होते.

• अ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत पपईमध्ये आहे. परिणामी डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पपईचं सेवन उपयुक्त ठरतं.

वृद्धापकाळीही डोळ्यांचे आरोग्य टिकण्यासाठी पपईचं सेवन आरोग्यदायी ठरतं.

• वेदनाशमनाचे कामही पपई करते. म्हणूनच सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे.

पपईतील क जीवनसत्त्व सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करते.

अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

पपईमधील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्स पासून बचाव करते.

तसेच पपईतील बीटा- कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.

व्हिटॅमिन ‘ए’चे भांडार असलेल्या पपईचे सेवन थंडीमध्ये हितकारक

पपई ही उष्ण गुणाची असून क जीवनसत्त्वाचा उत्तम खोत आहे. शिवाय पपईतील अनेक आरोग्यदायी गुणांमुळे ती अनेक आजारांवरही औषधी आहेच.

म्हणूनच पपईचं आरोग्यदायी महत्व जाणून घ्या…

लहान मुलांना पाय दुमडून कधीही बसवू नये?

मुलांची योग्य बसण्याची स्थिती कोणती हे तुम्हांला ठाऊक आहे का? अनेकदा जाणकार बालरोगतज्ज्ञ याविषयी पालकांना सांगतातही.

पण सर्वच डॉक्टरांकडे अशा लहान सहान गोष्टींचं महत्त्व पालकांना पटवून देण्याबद्दल बेळ असेलच असे नाही.

म्हणूनच ज्या पालकांचे मूल लहान आहे, अशांनी हे नक्की वाचा…

लहान मुलांचं बारकाईने निरीक्षण केलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की, मुलं जेव्हा बसायला लागतात तेव्हा ती पाय दुमडून, डब्ल्यू या आकारात बसतात.

तसं बसण अधिक सोप्पं असल्याने सामान्यतः मुलं तशीच बसतात.

ही लहान मुलांची बसण्याची अत्यंत चुकीची स्थिती आहे. या स्थितीत मुलांचे दोन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले आणि पसरलेले असतात. मु

लांना ही डब्ल्यू आकारातील बसण्याची स्थिती कम्फर्टेबल वाटते.

तसेच दोन्ही हात मोकळे राहिल्याने खेळणे देखील सहजसोपे होते. परंतु फार वेळ याच स्थितीमध्ये बसणे हे भविष्यात त्रासदायक ठरू शकते.

दुष्परिणाम काय होतात ?

● डब्ल्यू आकारातील स्थितीत बसल्याने स्नायूंचा टाईसनेस वाढतो, आजूबाजूला वळताना लहान मुलांना त्रास होऊ शकतो.

● ‘W’ डब्ल्यू आकारातील स्थिती मांड्या, हिप्स यांच्या स्नायूंवर परिणाम करू शकते. यामुळे शरीराचा भार सांभाळण्यात त्रास होऊ शकतो, 

● चालणे, धावणे यासारख्या लहान सहान अॅक्टीव्हीटींवरदेखील परिणाम होऊ शकतो.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Leave a Comment