प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असा विचार सुरू होतो. (नवीन वर्ष)
काहींच्या मनात सुरू असलेले विचार ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्रीच विरून जातात. परंतु, काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात.
हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प एक- दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष पाळले जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही.
नवीन वर्षाच्या स्वागताची जशी तयारी केली जाते ना तशीच नवीन वर्षात अमुक एक गोष्टी आपण करू असेही ठरवेल जाते. यालाच रिझोल्यूशन घेणे किंवा संकल्प करणे असे म्हणतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असा संकल्प का केला जातो. किंवा असं नवीन वर्षात संकल्प का करावे. याचा तुम्ही कधी विचार केला नसेल किंवा तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर आम्ही त्याच उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो.
त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो, की त्याचा आपल्याला तर मन:स्ताप तर होतोच. परंतु, त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो.
आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो.
परंतु, त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे.
आपल्या सर्वांना माहित आहे की आपण आपले संकल्प पूर्ण करण्याच्या चांगल्या हेतूने सुरुवात करतो, परंतु काही लोक वर्षाच्या पहिल्याच दिवशी किंवा मग काही कालावधीतच आपले लक्ष गमावतो.
पुन्हा एकदा आपण आपल्या जुन्या सवयींमध्ये अडकतो. अभ्यास दर्शवितो की ४१% अमेरिकन लोक जे नवीन वर्षाचे संकल्प करतात, त्यापैकी फक्त ९% ते पाळण्यात यशस्वी होतात.
असे असूनही, नवीन वर्षाचे संकल्प करणे चांगली कल्पना आहे कारण ते तुम्हाला भविष्याकडे अधिक आशावादीपणे पाहण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्ही एखादी चांगली कृती करण्यास प्रवृत्त होता.
यामागची अजून काही करणे जाणून घेऊयात.
■ लिस्ट बनवली तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक दिशा मिळते
नवीन वर्षात कोणते टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे आहे याची लिस्ट बनवली तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून काम करायला एक दिशा मिळते. यामुळे भविष्यासाठी लागणाऱ्या तरतुदी करायलाही परवानगी मिळते. याशिवाय तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि शक्ती वाया घालवू शकणार नाही. या गोष्टी योग्य त्या ठिकाणी सत्कारणी लागतील.
आर्थिक संकल्प : आपले आर्थिक ध्येय साध्य करण्यावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.
■ संकल्पामुळे छान फिलिंग येते
तुम्ही कधीही असे काही साध्य केले आहे जे पूर्वी अशक्य वाटत होते? जेव्हा तुम्ही स्वतःला वचन देता आणि ते पाळता तेव्हा एक वेगळीच फिलिंग येते. तुमचे जीवन सुधारण्याचे स्वतःकडून प्रॉमिस घेणे आणि ते टार्गेट साध्य करणे ही एक उत्तम भावना आहे. ही फिलिंग ही भावना तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. ते काहीही असो, तुम्ही तुमचं मन ठरवून काहीही करू शकता हे स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा अजून काही उत्तम नाही.(रिझोल्यूशन)
छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात.
स्वतःची प्रगती करण्याची आणि पुन्हा फोकस राहणायसाठी मदत करतात.
नवीन वर्ष, नवीन तुम्ही. याचमुळे नवीन वर्षाचे संकल्प करणे हा नवीन वर्ष सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जवळजवळ नवीन वर्ष हे एखादं रीसेट बटण दाबण्यासारखे आहे. तुम्हाला नवीन टार्गेट सेट करु शकता आणि ती कशी पूर्ण करायची याचा मार्गही सेट करू शकता. नवीन वर्षाचे रिझोल्यूशन तुम्हाला स्वतःची प्रगती करण्याची आणि पुन्हा फोकस राहणायसाठी मदत करतात.
आरोग्य संकल्प : फिट है तो हिट है
■ कोणते संकल्प करता येतील
■ अनेक जणांना वर्षातून अनेक वेळा रुग्णालयात जावे लागते. पण जर तुम्ही या वर्षात आजारीच पडणार नाही असा संकल्प करत असाल तर खूपच छान.
कारण या वर्षात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला ड़ॉक्टरकडे जाण्याची वेळच येणार नाही. आपला आहार आणि आपली जीवनशैली यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.
1. व्यायाम करणे
2. वेळोवेळी हेल्थ चेकअप करणे
3. योग्य सवयी जोपासणे.
■ नवीन वर्षात तुम्ही मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा संकल्प करा. कारण मोबाईलने आपल्या आयुष्यात इतके मोठे घर केले आहे की त्याच्यापासून आपण राहूच शकत नाही.
ज्यामुळे आपण इतर वेळेत देखील मोबाईलवर काहीना काही करण्यात गुंतलेले असतो. लहान मुले देखील मोबाईलच्या अतिवापरामुळे आजारी पडू लागले आहेत. रील बघण्यात तासनतास निघून जातात.
इतरांच्या आयुष्यतील खोटे देखावे पाहून आपण आपलं खरं आयुष्य वाया घालवतोय. यामुळे इतर कामांसाठी आपल्याला वेळच मिळत नाही.
मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने लोकं नाती देखील विसरले आहेत. अशा परिस्थितीत २०२४ या नवीन वर्षात आपण हा संकल्प केला पाहिजे.
वाचन संकल्प : मी रोज काहींना काहीतरी वाचनारच
■ मोबाईल अतिवापर मुळे होणारे दुष्परिणाम
1) चिंता आणि नैराश्य येणे
अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक स्मार्टफोनचा जास्त वापर करतात त्यांना चिंता आणि नैराश्याची समस्या जास्त असते. कारण तो इतका मोबाईलमध्ये गुंतलेला असतो की त्याला इतरांकडे व्यक्त व्हायला ही वेळ नसतो.
2) जी लोकं मोबाईलवर तासनतास बोलतात, तासनतास गेम खेळतात किंवा सोशल मीडियावर वेळ घालवता. त्यांना शरीराच्या पोश्चरची समस्या येते. अशा लोकांना हात आणि खांदेदुखीची समस्या उद्भवते. मोबाईलच्या वापरामुळे अस्वस्थता निर्माण होते.
3) जास्त राग येणे
जी लोकं स्मार्टफोनचा अतिवापर करतात त्या लोकांचा स्वभाव चिडचिडा होत जातो. त्यांना लहान लहान गोष्टीत ही चिड येते.
यामुळे नातेसंबंधावर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते.
4)लक्ष केंद्रित करू (फोकस) न शकणे
जी लोकं मोबाईलचा जास्त वापर करतात ते कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. फोनवर पुन्हा पुन्हा पाहण्याची सवय असते.
सूचना (notification) तपासणे ही एक सवय बनते. यामुळे झोप खराब होते. काही लोक रात्री फोन वापरतात त्यामुळे झोप न येण्याची समस्या निर्माण होते.
5) मुलांच्या मेंदूवर होणारे दुष्परिणाम
जी मुले लहान वयापासून मोबाइल पाहतात, त्यांच्या मेंदूच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो. मोबाईल वापरणारी मुले आळशी, चिडचिडी आणि कमी शारीरिक क्रियाशील असतात. त्यांच्या मनावर देखील याचा परिणाम होतो. मुलांच्या मेंदूची वाढ लहान पूर्ण झालेली नसते आणि यातच आपण त्यांना मोबाईल सारख्या घातक वस्तू त्यांना वापरायला देतो. एक लक्षात घ्या आपण संपूर्ण पिढी बरबाद करत आहोत.
खालील व्हिडिओ नक्की पहा:
■ नवीन गोष्टी शिकणे
दर आठवड्याला किमान एक नवीन गोष्ट शिका. यामुळे तुमची जिज्ञासा आणि ज्ञान वाढेल. यामुळे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. तुम्ही नेहमी नवीन गोष्टींबद्दल उत्सुक असाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
शिक्षण संकल्प : मी दररोज काहीतरी नवीन शिकणार च.
■ स्वत:साठी वेळ काढा-
घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात ‘सॅंडविच’ होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वत:साठी काढून ठेवली पाहिजे. या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता. व्यायाम करून फिट राहू शकता.
■ स्वत:ची कामे स्वत: करा-
आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.
■ कामाचे प्राधान्य
या वर्षी मी माझ्या सर्व कामांना आणि जबाबदाऱ्यांना अधिक प्राधान्य देईन, असा संकल्प करा. तुमच्या वेळेचा सदुपयोग करून काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
■ सकारात्मक विचार करायला शिका-
एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे, हा आपला स्वभाव बनून जातो.
त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे.
आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरविले पाहिजे.
अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात.
योजनाबद्ध रितीने काम करायचे ठरवले आणि काही गोष्टींकडे लक्ष पुरवल्यास तुमचाही संकल्प सिद्धीस जाईल.
स्वत:च्या सर्वांगीण उत्कर्षासाठी नवीन वर्षाचे आगमन ही चांगली संधी आहे. (नवीन वर्ष)
हा आशावादी काळ असल्याने नवीन वर्षांपासुनच नवे विचारही मनात रुजतात मग तो निश्चय सिगरेट सोडायचा असो किंवा व्यायाम करायचा, वजन कमी करायचा किंवा परिक्षेत चांगले मार्क मिळवण्याचा.
वेळेचा संकल्प : मी माझा वेळ timepass किंवा मोबाईल reels साठी देणार नाही म्हणजे नाही.
पण योग्य विचारांना नियोजनांची साथ नसल्यास सगळे संकल्पाचे इमले कोसळायला वेल लागत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संकल्पच करु नये हेच चांगले.
संकल्प पूर्ती साठी काही टिप्स :-
संकल्प एखादाच असावा :-
बरेच जण नववर्षाच्या तोंडवर खूप संकल्प करतात. उदा. सिगरेट सोडणे, वजन कमी करणे, अभ्यासात लक्ष घालणे, आई वडिलांशी योग्य संवाद राखणे इत्यादी.
एवढे सगळे संकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे एखादाच संकल्प पूर्ण सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा.
आपला निश्चय जगजाहीर करा. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये या संकल्पाची माहिती द्या. काही लोक मी असा निर्णय घेतला होता हे नंतर सांगतात त्यापेक्षा आपला संकल्प आधीच जाहीर करा आणि आपल्या जवळच्यांना ते कशा प्रकारे मदत करू शकतात तेही सांगा.
एका व्यक्तीने आठवड्यात तीन वेळा व्यायाम करण्याचा निश्चय केला व त्याने पत्नीला सांगितले की आठवड्याच्या ह्या तीन संध्याकाळी कोणताही कार्यक्रम ठरवू नकोस त्यामुळे त्याचे काम सोपे झाले व तो आपला निश्चय पूर्ण करू शकला.
त्याचबरोबर इतरांना सांगितल्याने ते पूर्ण न केल्यास आपले हसे होईल या भावनेपोटीही संकल्पपूर्तीकडे लक्ष दिले जाते.
विविध पर्याय निवडा :-
एक वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय पूर्ण करणे अवघड आहे. पण त्या तुलनेत चांगले काम करण्याचा निश्चय पाळणे सोपे आहे. त्यासाठी संकल्पांमध्येही ताळमेळ हवा.
ते संकल्प जास्त यशस्वी होतात. संध्याकाळी ऑफीसहून लवकर घरी जाणे आणि गप्पा न मारता वाचलेला वेळ चांगल्या कामासाठी उपयोगात आणणे, असे संकल्प सिद्धीस जाऊ शकतात.
प्रमोदने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा निर्णय रात्रीच्या जेवण्यापूर्वी काही न खाण्याचा घेतला.
तो ऑफिसपासून घरी 2 किमी पायी जाऊ लागला. त्यामुळे त्याचा व्यायामही झाला व तो घरी अशा वेळेला पोहोचू लागला की जेवण्यापूर्वी काही खाण्यासाठी वेळच नाही.
पळवाटा शोधू नका :-
तसा प्रत्येक दिवस नवाच असतो. 2 जानेवारी पासून तुमचा जेवण कमी करण्याचा संकल्प पाळला गेला नाही तर 3 जानेवारी पासून तो परत सुरू करा.
वाटेतच सोडून देऊ नका. उद्यावर ढकलण्याचे कामही करू नका. वेळ हातात पकडता येत नाही. त्यामुळे नववर्षाचे आगमन नवीन संकल्पांसाठी चांगली संधी आहे. (नवीन वर्ष)
त्यामुळे कुणालाही नववर्षाच्या शुभेच्चा द्यायच्या असतील, तर आपल्य संकल्पाची माहितीही त्यांना द्या. आणि आता तो कसा पार पाडायचा तेही तुम्हाला माहीती झाले आहेच.
जागरूक रहा :-
आपण रात्री उशिरा खाण्यावर बंधन घालू इच्छित असाल तर तो निश्चय कागदावर लिहून तो कागद फ्रिजवर चिकटावा.
जर आपण एका आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा निश्चय केला असेल तर तो कागदावर लिहून काचेवर चिकटावा.
जर वजन कमी करण्याचा पण केला असेल तर आपल्या डायनिंग टेबलाजवळ आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो लावा त्यामुळे तो फोटोच तुमच्यावर अंकुश ठेवायचे काम करेल. या प्रकारे तुम्ही तुमच्या संकल्पाबद्दल जागरुक राहू शकता.
जीवन संकल्प : आजपासून नेहमी शुद्ध, चांगल्या भावनेनं सर्वांशी वागेन आणि चांगल्या भावनेनं च सर्व कामे करेन.
नकारात्मक निश्चय नको :-
जुने कर्ज फेडू शकत नसल्याने नवीन कपडे घेणार नाही हा निश्चय टिकणारच नाही. कारण जेव्हा तुम्हाला एखादा छान ड्रेस किंवा 25% डिस्काउंट असणारा कपडा दिसेल तेव्हा तो घेतलाच जाईल. (नवीन वर्ष)
त्यापेक्षा असे बजेट बनवा ज्यात कधी अशी खरेदीही करता येईल. नकारात्मक निश्चय टाळण्याकडेच कल वाढतो. त्यामुळे एकदम अवघड गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.
स्वत:ला वचन द्या :-
स्वत:च्या मनाशी जो निश्चय करतो तोच सफल होतो. ही गोष्ट जवळपास सगळ्या निर्णयांना लागू होते. दुसरे तुमचा आयडॉल बनू शकता. पण निर्णय पूर्ण करण्याचा पण तुम्हालाच पूर्ण करायचा आहे. (नवीन वर्ष)
उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे:-
नेहमी फार मोठे टारगेट ठेवले जाते.उदा. मी परीक्षेत पहिला नंबर मिळवीन. त्यापेक्षा मी अभ्यास नियमित करून माझे मार्क वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करीन हा निश्चय जास्त योग्य आहे. असे केल्यामुळेच आपण आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो.
संकल्प आधीच करा :-
नेहमी लोक वेळेवर संकल्प ठरवतात. पण हा विचार करत नाहीत की आपण हे कसे साध्य करू. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या चुकीच्या सवयी कोणत्या, त्या ओळखा.
ज्या तुम्ही बदलू इच्छिता त्यापासून होणारे नुकसान, त्याचे फायदे, तोटे, दोन्ही बाजूंचा विचार करा. ठरवलेली गोष्ट कागदावर उतरवा. मनात दृढ निश्चय करून तुम्ही जे करू पाहता ते कसे करणार ते मनात ठरवा.
संयम संकल्प : परिस्थिती कितीही विपरीत झाली तरी मी माझा संयम ढळू देणार नाही.
या नवीन वर्षात जमलं च तर या गोष्टी चा त्याग करा :-
विशेषतः जेव्हा एखादी नकारात्मक गोष्ट आपल्या आजुबाजूला घडते, तेव्हा तर ती कितपत स्वीकारायची किंवा त्यातून कोणता धडा घेऊन पुढे जायचं, याचा निर्णय आपल्या त्याच अंतःप्रेरणेतून घ्यायचा असतो किंवा होत असतो.
पहाटे लवकर जाग आली, मनासारखा चहा मिळाला नाही, पेपर पहिल्यांदा आपल्या हाती पडला नाही, वेळेत आवरून ऑफिसला जाता आले नाही.. इ. इ. सारख्या अगदी क्षुल्लक गोष्टींनीही नाराज होणारी किंवा निराश होणारी अनेक मंडळी असतात. (नवीन वर्ष)
अशा काही नकारात्मक गोष्टी अगदी सकाळीच झाल्या तर दिवसभर त्याचा परिणाम राहतो.
तो अर्थातच चांगला असत नाही. त्यामुळे याच काळात स्वतःला सूचना देत राहणे आवश्यक असते.
आपल्या आजूबाजूला कितीही वाईट गोष्टी घडल्या तरी आपण विचलीत होणार नाही किंवा त्याला बळीही पडणार नाही, हा एकदा स्वतःशी निर्णय घेतला की मग त्याच प्रकारच्या सूचना दिल्या जाऊ लागतात. याला स्वयंसूचना असंही म्हणता येईल. (नवीन वर्ष)
त्यामुळे आपण अशा नकारात्मक विचारांमधून बाहेर पडू लागतो.
या सूचनांमध्ये प्रामुख्याने आजचा दिवस माझा आहे. तो कसा घालवायचा हे मीच ठरवणार असा एकदा निर्धार केला की, मग त्या सूचनांनाही सकारात्मकता प्राप्त होते. आजूबाजूला काहीही घडलं;
तरी मी निराश होणार नाही, मी आनंदी राहण्यासाठीच प्रयत्न करणार आणि तसंच वागणार, ही सूचना स्वतःला देऊन तशी कृती केली की त्यातून होणारा त्रासही कमी होऊ शकतो. फक्त स्वतःच्याच अशा सूचना ऐकण्याची आणि मान्य करण्याची सवय असायला हवी.
माझ्या आयुष्यावर परिणाम करण्याचा किंवा माझ्या दिवसावर विपरीत परिणाम करण्याचा अधिकार दुसऱ्या कुणालाही नाही, हे एकदा स्वतः लाच बजावलं, की गोष्टी सोप्या होतात.
लोभ, क्रोध, असूया, दुष्टपणा, मोह, ईर्ष्या, कठोर बोलणे आणि निर्लज्जपणा हे माणसातील आठ प्रमुख दोष होत. ते व्यक्तीच्या विनाशाला आणि मृत्यूला कारणीभूत ठरतात. हे दोष दूर केल्यास आनंदाने जगणे शक्य होते.
जर शांत विचार कराल तर आपण या आठ दोषांची चाहूल ऐकू शकतो. हे आठ दोष म्हणजे, एक प्रकारच्या ऊर्जाही आहेत. जी संपवायची नाही, तर वळवायची आहे.
जर संपवाल तर ती मोठा आजार होईल. चला, तर या ऊर्जेला वळवू या. जेणेकरून ती नवे रूप घेऊन जीवनात आनंद मिसळेल. (नवीन वर्ष)
■ निर्लज्जपणा : काही जण आपल्या अधिकाराचे, व्यक्तिमत्त्वाचे प्रदर्शन करण्यासाठी बेशरम होतात. कधी कधी तर न सत्यही लोकांना निर्लज्ज बनवते आणि ते म्हणतात, आम्ही जे बोलतो ते खरेच बोलतो.
निर्लज्जपणा माणसाला पशुत्वाकडे नेतो. या वर्षी हा दोष शिस्त बनवून घ्या. जर आपल्यात बेशरमपणाचा थोडासा जरी अंश असेल तर त्याला त्वरित शिस्तीचे खतपाणी घाला. समाजात-देशात आपले शिस्तबद्ध जीवन लोकांसाठी आदर्श व्हायला हवे.
■ मोह : मोह म्हणजे भ्रम, याला मायाही म्हणतात. आपण मोहमायेत अडकतो आणि काय करायला हवे ते कळत नाही. थोडक्यात संशय, कन्फ्यूजन.
या वर्षी मोह स्पष्टपणात बदला. जे कराल ते विचारपूर्वक करा. कोणतेही कन्फ्यूजन राहणार नाही त्यासाठी थॉट प्रोसेसवर कंट्रोल करा. यासाठी ध्यानधारणा- मेडिटेशन अवश्य करावे. कारण ते भ्रमाला पिटाळते.
■ दुष्टपणा : नियम-कायदे मोडणे, त्रास देणे हे सारे दुष्टपणाच आहे आणि आपण हे कळत-नकळत करत असतो. नेहमी चांगला विचार करावा. परिचित-अपरिचित सर्वांसाठी त्यांचे भले व्हावे हाच विचार असावा.
जर त्यांच्यासाठी काही चांगले करता येत असेल, तर त्वरित करावे. आपले मन, मेंदू व व्यक्तिमत्त्व सारे प्रफुल्लित होईल.
■ असूया: याचा अर्थ इतरांच्या गुणांमध्ये दोष शोधणे.
चांगल्यात वाईट शोधणे आपला स्वभाव बनत जातो. नव्या वर्षात ही असूयेची सवय इतरांची प्रशंसा करण्याच्या सवयीत बदला.
पण चांगल्या कामाची स्तुती करताना ती चापलुसी होणार नाही याची दक्षता घ्या. दुसऱ्यांचे गुण पाहून त्याची प्रशंसा करून ते आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करा.
■ ईर्ष्या : माणसाची मन:स्थिती मत्सर करण्याची असते. कोणाला काही मिळाले व त्याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नसले, तरी ईर्ष्या जागी होते.
ते आपल्याला का मिळाले नाही याचे दुःख होते. आजचे युग तर स्पर्धेचेच आहे. प्रत्येक जण काही ना काही मिळवण्यासाठी धावत असतो. त्यात सर्वांनाच सर्व काही मिळतेच असे नाही.
अशा वेळी ती स्पर्धा तुलना करायला लावते. मत्सरी व्यक्तीच्या आजूबाजूला एवढी नकारात्मकता असते, की असे लोक पटकन ओळखता येतात. ही स्थिती चांगली नाही. यासाठी नव्या वर्षात प्रेमळ व्हा. (नवीन वर्ष)
■ क्रोध : राग येणे सहज क्रिया आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या नाकावर राग असतो. इतरांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देण्याचे नावच राग आहे.
रागामुळे आपल्या शरीराचे नुकसान होते. तो रोखता येत नाही. अशावेळी त्याचे रूपांतर ऊर्जेत का करू नये. यामुळे आपण उत्साहीही दिसाल आणि आक्रमकही.
लोक आपल्याला पाहून म्हणतील, हा कठीणाहून कठीण कामही करू शकतो. कारण आपण क्रोधाचे ऊर्जेत रूपांतर केलेले असेल.
■ लोभ : याचे नवे रूप असेल संकल्प. लोभ म्हणतो
जे मला हवे ते भले दुसऱ्याकडून हिरावलेले का असेना. इथेच गडबड सुरू होते. यासाठी लोभाची ऊर्जा संकल्पात बदला.
ती संकल्पात बदलताच आपण मिळवण्यासाठी निघाल, पण यामागे एखाद्याकडून हिरावण्याची इच्छा नसेल.
ध्येय संकल्प : ध्येय गाठल्याशिवाय शांत बसणार नाही. कष्ट करत राहीन. एक दिवस माझाच असेल.
■ कठोर बोलणे : कठोर-कर्कश बोलण्याला लोकांनी
शस्त्र बनवले आहे. मृत्यूकडे नेणारा व त्याला आपल्याकडे बोलावणारा हा जो अंतिम दोष आहे, तो किमान आपल्या कौटुंबिक जीवनात नियंत्रित करून घ्या. याला बंदी घाला.
कारण हा उत्तम कुटुंबासाठीही त्रास आणि समस्या वाढवतो. नव्या वर्षापासून कमी बोला, पण चांगले आणि गोड बोला.
तुमचे सर्व संकल्प पूर्णत्वास जावे हीच प्रार्थना करतो
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा
आणि आवडला तर आपल्या मित्र मैत्रिणी ना नक्की शेयर करा.
1 thought on “नवीन वर्ष संकल्प काय व का करावा”