फळे आणि फळांचे आरोग्यासाठी महत्त्व

फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते पण ते योग्य वेळी खाणेही महत्त्वाचे असते. फळे खाणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण ते चुकीच्या वेळी खाल्ले तर आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.  

जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पपई, पॅशन फ्रूट, अननस, प्लम्स, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, पीच, सफरचंद खाऊ शकता. डाळिंब, आंबा, द्राक्षे, अंजीर, लीची, टरबूज खाणे टाळा. 

फळांमधून आपल्या शरीराला आवश्यक असणारी बहुतेक सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, क्षार, प्रथिने, खनिज, आम्ल इत्यादी घटक मिळण्यास मदत होते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फळांमध्ये ८५ ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे फळे पौष्टिक आहाराला पूरकच असतात. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात.

तज्ज्ञांच्या मते, एखादे फळ सकाळी लवकर रिकाम्या पोटी खावे. मात्र पोटाचा त्रास असणाऱ्यांनी ते टाळावे. कारण लिंबूवर्गीय फळे, अननस, क्रॅनबेरी, ग्रेपफ्रूट इत्यादी काही फळांमध्ये ऍसिटिक ऍसिड असते. हे गॅस्ट्रिक ऍसिडचे उत्पादन वाढवते.

सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले जे खावे ते म्हणजे फळ. रिकाम्या पोटी खाल्लेली फळे आपल्या शरीराद्वारे सहज पचतात. हे पोषक तत्वांचे शोषण करण्यास देखील मदत करते.

द्राक्षे खाल्ल्यामुळे रक्तदाब तसेच शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्षे फायदेशीर ठरतात.

हृदयरोग आणि स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे. मायग्रेनची समस्या असल्यास द्राक्षे, द्राक्षाचा रस पिणे फायदेशीर ठरेल. 

औषधी संत्री

संत्र्याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते. त्वचा उजळते तसेच सौंदर्यात वृद्धी होते. यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर असते. याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन बी, ए, फोलिक अम्ल, कॅल्शियम, लोह, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच गंधक इत्यादीही भरपूर मात्रेत आढळते.

संत्र्याचे काही उपयोग:
  • संत्र्याच्या मौसमामध्ये याचे नियमित सेवन करण्याने लठ्ठपणा कमी होतो. विनाडाएटिंग संत्र्याच्या मदतीने वजन कमी केले जाऊ शकते.

संत्र्याचे नियमित सेवन करण्याने मूळव्याधीमध्ये लाभ होतो. यामध्ये रक्तस्त्राव रोखण्याची अद्भुत क्षमता असते.

  • हृदयाच्या रोग्याला संत्र्याचा रस, मधामध्ये मिसळून देण्याने आश्चर्यजनक लाभ मिळतो.
  • संत्र्याचा एक ग्लास रस तन-मनाला शीतलता प्रदान करतो व थकवा आणि तणाव दूर करतो.

● अपचन आणि मळमळणे या तक्रारीमध्ये संत्री खाल्ल्याने वारंवार तहान लागणे बंद होते.

● संत्र्याची साल चेहऱ्यावर रगडण्याने सौंदर्यामध्ये वृद्धी होते. त्वचा उजळते. मुरमे, सुरकुत्या दूर होतात,

● संत्र्याची साल पाण्यामध्ये उकळून साखर मिसळून पिण्याने भूक चांगली लागते. तसेच अपचनात आश्चर्यजनक लाभ होतो.

उपयुक्त टिप्स :

जेवण घेतल्यानंतर दोन तासांनी तुम्ही फळे खाऊ शकता. हे चयापचय दर वाढवते, रक्तातील साखरेची पातळी राखते.

नारळ :- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदानच आहे. नारळ म्हणजे सर्व प्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे.

सफरचंद:- सफरचंद संधिवातावर उत्तम आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी कमी होते. नैराश्य आले असल्यास तेही कमी होते.

सफरचंद शरीराची ताकद व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात व पचनशक्ती सुधारते.

केळी:

केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकलेल्या शरीराला चटकन शक्ती प्राप्त होऊन उत्साह वाढतो.

पचनसंस्थेचे आरोग्य टिकविण्यासाठी, मलविसर्जनची क्रिया सुलभ होण्यासाठी केळी फारच मोलाची ठरतात.

केळी शक्तिवर्धक असल्यामुळे बालकांना शक्ती वाढविण्यासाठी ती टॉनिकच्या स्वरूपात उपयोगी पडतात. अधिक वाढलेले पित्त केळाने कमी होते.

मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, डायरिया, संधिवात इ. अनेक रोगांवर केळ्याचा आहार फायद्याचा ठरतो. केळात लोह असते.

जांभूळ कफ व पित्तनाशक आहे. हे फळ विशेष करून मधुमेही व्यक्तिंना अधिक पथ्यकारक आहे.

कलिंगड, टरबूज,खरबूज, काकडी ही उन्हाळ्यात उत्पादित होणारी फळे आहेत. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम ही फळे करतात.

या फळातील पाणी शुद्ध असून रक्त शुद्धीकरणाचे काम ती चांगल्या प्रकारे करतात.

कफ प्रकृतीच्या आणि ज्यांना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होतो, त्यांनी शक्यतो ही फळी खाऊ नयेत.

बदाम

बदाम हा फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम, जस्त यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. 

वजन कमी करणे, हाडांचे आरोग्य चांगले राखणे, तुमचा मूड सुधारणे, उच्च रक्तदाब नियंत्रित करणे, तसेच चयापचय क्रिया सुधारण्यासाठी बदाम उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

बदामामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो, असाही दावा केला जातो. शिवाय दिवसातून दोनदा बदाम खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते. 

बहुतेक लोक बदाम भाजलेले किंवा कच्च्या स्वरूपात खातात; पण भिजवलेल्या स्वरूपात बदामांचे सेवन करणे अधिक फायदेशीर आहे.
तज्ज्ञांच्या मते, बदाम रात्री भिजत ठेवून सकाळी नाश्त्यानंतर दोन खावेत. तर संध्याकाळी तीन भिजवलेले बदाम खावेत.

बदाम कायम भिजवलेले का खावे ?

बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. टॅनिनमुळे बदामात असणारे उपयुक्त पोषकघटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो. त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असते. त्यामुळे बदाम कायम भिजवलेले खावे.
बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपे जाते.
रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने यातील फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्या शरीरात कॅल्शियम, झिंक आणि मँगेनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच कायम भिजवलेल्या बदामांचे सेवन करावे. 

भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, जे ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या लोकांसाठीही खूप उपयुक्त आहे.

योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्समुळे भिजवलेले बदाम पचनसंस्थेच्या समस्यांपासून कर्करोगास कारणीभूत घटकांशी लढा देण्यापर्यंत फायदेशीर ठरतात.

बदाम केसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. गर्भवतींसाठी। बदाम हे फॉलेट्सचा एक उत्तम स्रोत आहे.

बदाम प्रथिनयुक्त असून बुद्धिवर्धक आहे. बदामामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.

बदामातील ‘ई’ जीवनसत्वामुळे त्वचा मऊ आणि कोमल बनण्यास मदत होते. त्वचेसाठी बदामाचे तेल वापरणे फायदेशीर आहे. 

मात्र, एका दिवसात सहा ते आठपेक्षा अधिक बदामांचे सेवन करू नये. यामुळे वजन आणि शरीरातील उष्णतादेखील वाढू शकते. 

थंडी हा ऋतू शरीर कमविण्यासाठी उत्तम मानला जातो. त्यादृष्टिने नट्स आरोग्यदायी आहेत.

अनेक विकारांपासून संरक्षण देणारे व अनेक पोषक घटकांनी ठासून भरलेले आहारीय द्रव्य म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.

नट्सचे आरोग्यदायक फायदे नक्की कोणते;

● वाढीच्या वयातील मुले, बारीक अंगकाठी असलेले लोक; तसेच, खेळाडूंसाठी नट्स हे उत्तम स्नॅक फूड्स आहे.

● ज्यांना आरोग्यपूर्ण मार्गाने वजन वाढवायचे आहे, अशांसाठी नट्स हे उत्तम पोषक अन्न आहे.

● प्रोटिन्स व चांगल्या प्रकारचे फॅट्स मोठ्या प्रमाणात असल्याने यामधून पोषक कॅलरी मिळतात.

● नट्समध्ये प्रामुख्याने ब समूहातील जीवनसत्त्वे व ई हे महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ई हे जीवनसत्त्व त्वचेचे आरोग्य व प्रतिकारक्षमता शाबूत ठेवण्यास मदत करते.

● नट्स हे एल-आरगिनिन या प्रकारच्या प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत आहेत.

● रक्तवाहिन्यांच्या भिंती ताणरहित व रक्तदाबयोग्य राखण्याचे काम हा घटक करत असतो.

● नट्समधील विद्राव्य तंतू हे शरीरातील कोलेस्टेरॉल व साखरेची पातळी खाली आणतात.

यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींनी आपल्या आहारात नट्सचा जरूर समावेश करावा.

नट्समध्ये फ्री रॅडिकल्सवर नियंत्रण आणणारे अनेक ऑक्सिडंट्स आढळले आहेत.

अक्रोडमध्ये ओमेगा ३ हा अत्यंत महत्त्वाचा फॅटचा प्रकार आढळतो; जो खूप कमी आहारीय पदार्थांमध्ये असतो. हा ओमेगा ३- मेंदू, त्वचा, हृदय, सांधे यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

डाळिंब

डाळिंब आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. हे सगळेजणच जाणतात; पण आयुर्वेदिकदृष्ट्या ते कोणत्या आजारावर किती परिणामकारक आहे, हे मात्र आपल्याला माहीत नाही.

डाळिंब शंभर आजारांवर औषधी आहे, असं म्हणतात. डाळिंब संपूर्ण वर्षभर उपलब्ध असतं.

अनेक जण पौष्टिक फळांमध्ये डाळिंबाचा समावेश करत नाहीत; पण डाळिंबाचं नियमित सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम राहाते.

डाळिंबाचे अनेक छोटेमोठे फायदे आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात…

डाळींब :- डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढविण्यासाठी उपयोग होतो. डाळींबाच्या सेवनाने हगवण आमांश, मूळव्याध,जठर विकार बरे होतात. डाळिंब जठराग्नी प्रदिप्त करते. त्यामुळे भूक चांगली लागते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
पपई :-  पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते. जठराला आलेली सूज कमी होते. पपई मूळव्याधीवर गुणकारी सिद्ध झाली आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या सेवनाने अन्नपचन सुलभ होते. पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते.

दातदुखी

जर तुमचा दात दुखत असेल तर डाळिंबाच्या चुर्णात हळद, मीठ आणि सरसोचं तेल घालून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टचा वापर टूथपेस्टसारखा करू शकता. यामुळे वेदनेपासून तुम्हाला आराम तर मिळेलच शिवाय टूथ गम्ससारख्या समस्याही दूर राहतील.

गर्भवती महिलांसाठी (for pregnant women)

जर तुमच्या घरात कोणी गर्भवती महिला असेल तर तिला रोज एक ग्लास डाळिंबाचा रस द्या. यामुळे बाळ निरोगी व बाळसेदार होण्यास मदत होईल.

अॅथेरॉक्लेरॉसिसला थांबवतो (stop atherosclerosis)

वाढतं वय आणि अयोग्य जीवनशैली मुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती कोलेस्टेरॉल आणि अन्य गोष्टींनी कडक होतात. ज्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो.

डाळिंबातील अँटीऑक्सिडंटचे गुण कमी घनत्त्वाचे लिपोप्रोटीन आणि कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीडाइजिंग थांबवतं.

म्हणजेच डाळिंब रक्तवाहिन्यांच्या भिंतीना कोलेस्टेरॉलमुळे कठीण होण्यापासून थांबवत.

अँटीऑस्किडंटचे गुण (Antioxidant property)

रक्त दोन प्रकारे थांबतं. एक कापणं वा जळणं, या स्थितीत रक्त एका ठिकाणी थांबून त्याचा प्रवाह थांबतो.

दुसऱ्या प्रकारे रक्त आंतरिकरित्या थांबतं. हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमणं प्राणघातकही ठरू शकतं. डाळिंबामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट रक्तासाठी काम करतात. हे शरीरात रक्त प्रवाहास मदत करतात.

ऑक्सिजन मास्क

साध्या शब्दात सांगायचं तर डाळिंबाचा रस रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवितो. यातील अँटीऑक्सिडंट कोलेस्टेरॉलला कमी करतं. फ्री रॅडिकल्सपासून शरीराला वाचवतं. रक्ताच्या गुठळ्या रोखण्याचं कामही करतं.

म्हातारपणाला दूर ठेवते (Antiageing)

खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, डाळिंब अँटीऑक्सिडंटचा खूप चांगला स्त्रोत आहे.

यामुळे हा शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतो. यामुळे वेळेआधीच वृद्धत्त्व येत नाही.

फ्री रॅडिकल्सची निर्मिती सूर्याच्या प्रकाशापासून आणि वातावरणात असणाऱ्या विषारी घटकांपासून आपलं रक्षण करते.

आणखी काही विशेष फळे

पेरू कफवर्धक परंतु मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त.
अंजीर पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते.

आंबा वीर्यवर्धक असून शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे.
लिंबे, संत्री, मोसंबी या फळात’क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. ‘क’ जीवनसत्व अन्नपचन कार्यास प्रभावी ठरते.

आपल्याला हे वाचून नवल वाटेल की, भारतीय जेवणात ज्या जिनसांचा समावेश केला गेला आहे, त्या अनेक रोगांना रोखण्यात सक्षम आहेत. ही औषधे सर्व भारतीय किचनमध्ये उपलब्ध आहेत.

यांचा योग्य प्रमाणात वापर उत्तम आरोग्याची किल्ली आहे

हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ या. आंध्र प्रदेशात शेंगभाजी चिंचेसोबत बनवली जाते. ज्यामुळे तिचे पचन सहजतेने होईल. सुमारे चारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी टोमॅटो भारतात आणला.

तेव्हापासून भारतीय पारंपरिक आंबटपणा सोडून टोमॅटोचा वापर लोक करू लागले. कारण टोमॅटोची चव चांगली असून ते जास्त मॉडर्नही आहेत.

आंध्र प्रदेशात अनेक गावांमध्ये एक आजार पसरलेला होता. ज्याला फ्लोरोसिस म्हणतात. या आजारात हाडांमध्ये फ्लोराइड घुसते व अनेक विकारांना जन्म देते.

संशोधनातून असे आढळून आले आहे की, येथील पाण्यात फ्लोराइडचे प्रमाण जास्त आहे. चिंच फ्लोराइडमध्ये मिसळून त्याचे शरीरातील अवशोषण रोखते.

तसे टोमॅटो करीत नाही. जे लोक चिंचेऐवजी टोमॅटोचा वापर करीत होते ते या रोगाने ग्रस्त झाले. हे उदाहरण पाहता आपण म्हणू शकतो की, या स्थानाचे आरोग्यरक्षण चिंच परंपरेतच दडले आहे.

आजच्या व्यस्त दिनचर्येच्या कारणाने लोक आपल्या स्वास्थ्यकारक आहारावर योग्य ध्यान देऊ शकत नाही.

ते पोट भरण्यासाठी घाईमध्ये सामान्यतः जे काही खातात, त्यांस स्वास्थ्यकारक पदार्थ मानले जाऊ शकत नाही. जसे सामोसा, चाट, पकौडे आणि फ्रेंच फ्राइज इत्यादी.

हे स्नॅक्स स्वादिष्ट असले तरी दररोज हे खाण्यामध्ये घेतल्यास यांचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

फॅट्स आणि कॅलरी यांनी भरपूर असलेले हे स्नॅक्स लठ्ठपणा वाढविण्यात सहाय्यक आहेत. हे लठ्ठपणा, मधुमेह, हाय ब्लडप्रेशर, आणि सांधेदुखी इत्यादी कित्येक रोगांचे मूळ आहे.

यासाठी फळे हा फार चांगला पर्याय आहेत. बाजारामध्ये स्वास्थ्यकारक पर्याय जसे धान्ये आणि पोषणयुक्त तत्वांनी निर्मित न्यूट्रीशनबारही उपलब्ध आहेत.

भूक लागल्यास अखंड धान्ये जसे चना, गहू, मूग, मटार, आणि सोयाबीन इत्यादींनी निर्मित खाद्यपदार्थ ग्रहण करावेत.

काही न्यूट्रीशनबार असे आहेत. जे मेव्यांनी युक्त आहेत. मेव्यांचे फायदे सर्वांना परिचित आहेत.

फळांप्रमाणे धान्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ जसे भाजलेले चणे आणि भाजलेली भेळपूरी हे नैसर्गिक फायबर प्रदान करतात.

यांमध्ये फॅट्सही कमी असतात आणि तळलेल्या स्नॅक्सच्या तुलनेत हे चांगले असतात.

रात्री झोपण्यापूर्वी काही स्नॅक्स घ्यायचा असेल तर योग्य प्रकारची फळे निवडा. तुम्ही झोपण्यापूर्वी सफरचंद, केळी, किवी, चेरी खाऊ शकता.

त्यात नैसर्गिक सेरोटोनिन, मेलाटोनिन आणि ट्रिप्टोफॅन असतात, जे आपल्याला शांत करतात आणि रात्री चांगली झोप घेण्यास मदत करतात.

शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात.

तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन – प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते.

महागडा आहार म्हणजे ‘सत्वयुक्त’ आहार किंवा सफरचंदसारख्या महागड्या फळांचे सेवन म्हणजेच अधिक सत्वयुक्त आहार हा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे.

खरे पाहता सफरचंद,बदाम, आक्रोड हे फळांचे प्रकार सकृतदर्शनी महागडे वाटत असले, तरी त्यांच्यातील पोषण मूल्यांचा विचार केला आणि त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या शक्तीचा विचार केल्यास ती खऱ्या अर्थाने महागडी नाहीत.

दुसरा मुद्दा हा की केळी, पेरू, पपई, चिकू, बोरे, संत्री, मोसंबी, सीताफळ, करवंदे, जांभळे ही उच्च दर्जाची पोषणमूल्ये असणारी, अत्यंत स्वस्त अशी फळे आहेत. नित्यनियमाने त्यांचे सेवन करण्यास काय हरकत आहे ?

अनेक लोक ही चूक करतात. जेवणासोबत फळे खाल्ल्याने आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. आयुर्वेदात काही गोष्टींना ‘अम’ म्हणजेच विष म्हणून ओळखले जाते.

अन्नासोबत फळांचे सेवन केल्याने अपचन होऊ शकते. याशिवाय त्वचेच्या अनेक समस्या आणि जळजळ होण्याचाही धोका असतो.

सत्य : फळांचा रस खाण्याइतका फायदेशीर नसतो. फळांपासून अधिक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी आपण संपूर्ण फळे खावीत, ज्यूस नाही. ज्यूस प्यायल्याने तुम्हाला फायबर आणि इतर अनेक घटक मिळत नाहीत.

दुधासोबत फळे खाणे विरुध्द आहार आहे असे आयुर्वेद सुचवतो. उदाहरणार्थ, आपण दुधासह बेरी खाऊ नये. केळी गोड असली तरी तती दुधात मिसळू नये कारण ते आतड्याला पचनासाठी जड जाते.

जेव्हा आपण संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणात फळे खातो, तो काळ आयुर्वेदानुसार कफ कालावधी असतो, या काळात फळे पचायला जड असतात आणि त्यामुळे दोषाचे असंतुलन होते.

तुम्हालाहा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि आवडला असेल तर नक्की शेयर करा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

2 thoughts on “फळे आणि फळांचे आरोग्यासाठी महत्त्व”

Leave a Comment