चिनी संत लाओत्से आपल्या गाढ प्रज्ञेसाठी प्रख्यात आहेत. अत्यंत मोजक्या शब्दांत ते अशी गूढ गोष्ट सांगत असत की, जी समजून घेण्यासाठी कितीतरी काळ लागत असे. त्यांनी सांगितले आहे की, जगातील मोठ्याहून मोठी समस्या त्याचवेळी सोडवायला हवी जेव्हा ती लघुरुपात असते.
हुशार माणसे समस्या मोठी होऊच देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही समस्या मोठी नसते.
सांगायचे तात्पर्य हे आहे की, कोणत्याही संकटाचा सामना तेव्हाच करा जेव्हा ते सोपे वाटत असते. सामान्यतः लोक असे करू शकत नाहीत.
कारण जेव्हा एखादी गोष्ट सोपी सामान्य वाटत असते तेव्हा ती समस्याच वाटत नसते. ही तर आपण सहजतेने सोडवून घेऊ असे वाटत असते.
प्रत्येक कठिण समस्येचा एक काळ असा असतो जेव्हा ती थोड्याशा प्रयत्नाने सोडवू शकत असतो. आपण जर सावध असाल तर आपल्याला ते कळून येईल.
ज्याप्रमाणे एक बीज नष्ट करणे सोपे असते पण मोठा वृक्ष नष्ट करणे अत्यंत कठिण असते. तसेच प्रत्येक समस्येचे एक बीजरूप असते.
उदा. राग प्रत्येकालाच कमी-जास्त प्रमाणात येत असतो. जेव्हा तो उत्पन्न होतो तेव्हा बीजासमान असतो, जर आपण त्याच क्षणी तो सोडला तर कोणतीही समस्या होत नाही.
पण जेव्हा आपण आपल्या मनात त्याची मुळे बाढू देतो, आपल्या अस्तित्वात चहुकडे पसरू देतो तेव्हा तो आपल्यावर कुरघोडी करतो. तो एक गंभीर रोग बनतो.
त्या स्थितीत तो राग नष्ट करणे खूपच कठिण असते. कारण क्रोधाने आपण तादात्म्य स्थापित करून घेतो व तो नष्ट केल्यास आपण स्वतःच नष्ट होत आहोत, असे वाटते.
कारण तो आपला स्वभावाचा खूप खोल भाग बनलेला असतो.
उदाहरण
आणखी एक उदाहरण पाहायचं झाले तर बऱ्या पैकी लोक दुचाकी गाडी चालवताना गॉगल्स किंवा चष्म्याचा किंवा हेल्मेट चा वापर करत नाहीत.
पण यामुळे होत काय आयुष्यभर डोळ्यांच्या नाजूक पडद्यावर हवेचे घर्षण वारंवार होऊन होऊन उतारवयात अश्या लोकांना मोतीबिंदू किंवा काचबिंदू सारखे आजार होतात, हे संशोधन मध्ये सिद्ध झालंय.
त्यामुळे सर्वांनी दुचाकी चालवताना नक्की गॉगल्स किंवा हेल्मेट चा वापर करा. आणि स्वतः आणि स्वतःला होणाऱ्या आजारापासून वाचवा.
समस्या लहान च आहे किंवा नेहमी असते फक्त आपण दुर्लक्ष करतो म्हणून ती समस्या वेळ असता सोडवू शकत नाहीत.
यशाचं म्हणा किंवा इतर कश्या चेही success हे याचं सिद्धांतावर अवलंबून आहे.
दृष्टिकोन बदला, दृश्य बदलेल
बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही निवडता. एखाद्या घटनेचा परिणाम तुमच्यावर काय व्हावा हे घटना ठरवत नाही, तुम्ही ठरवता.
एखाद्या घटनेमधे तुम्हाला खुश करण्याची किवा दुःखी करण्याची शक्ती नसते. कुठलीही घटना असो त्या घटनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हे ठरवतो की तुम्ही त्या घटनेमुळे खुश व्हाल की दुःखी की काहीच नाही.
कुठल्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्त्व किंवा किंमत तेवढीच प्राप्त होते जेवढी तुम्ही देता. एखाद्या घटनेचा तुम्ही कसा अर्थ लावता त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते.
लक्षात ठेवा स्वतःला शक्ती आपणच देतो, स्वतःची शक्ती आपणच काढून घेतो.
कशी का परिस्थिती असत नाही, तुम्ही त्याला असं रूप देऊ शकता की त्याच्यामुळे तुम्हाला शक्तीच मिळेल.
प्रश्न: अपयश, अडचणी, अडथळे, कठीण परिस्थिती काय करू शकतात?
उत्तर : तुमची शक्ती काढून घेऊ शकतात. किंवा तुम्हाला शक्ती देऊ शकतात.
पण आधी त्या तुम्हाला विचारतात काय करायचं. तुमची निवड अंतिम असते.
3 thoughts on “समस्या ही लहान असतानाच सोडविणे चांगले”