प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते.
त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषण आहार मिळत नाही परिणामी गर्भवती माता कुपोषित राहून त्याच्यावर व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या त्यांच्या पोटात असलेल्या नवजात बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
तसेच प्रसूती नंतर शारीरिक क्षमता नसताना सुद्धा मजुरी करावी लागते त्यामुळे मातेचे शरीर पूर्णपणे बरे होण्यापासून रोखले जाते आणि पहिल्या 6 महिन्यांत त्यांच्या लहान बाळाला केवळ स्तनपान देण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो.
कमी पोषणाच्या आहारामुळे भारतातील बहुसंख्य महिलांवर याचा विपरित परिणाम होत असतो व कुपोषित आई कमी वजनाच्या बाळाला जन्म देते.
एका सर्वेनुसार भारतात प्रत्येक तिसरी स्त्री ही कुपोषित आहे आणि प्रत्येक दुसरी स्त्रीला रक्तक्षय आहे.
त्यामुळे गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे व स्तनदा मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्याना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेची सुरवात संपूर्ण देशात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.
या योजनेमध्ये महिलांना हफ्त्यांमध्ये मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त 1000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपये दिले जातात. जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभार्थीला ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात टाकली जाते.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य Pradhanmantri Matru Vandana Yojana Benefits
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत दिले जाणारे रक्कम खालीलप्रमाणे:
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीसमधील खात्यात एकूण रुपये 5000/- रुपयांची रक्कम तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे.
•प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पहिला हप्ता रुपये 1000/- हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
• प्रधानमंत्री मातृ वंदना योजना दुसरा हप्ता रुपये 2000/- हा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
• प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तिसरा हप्ता रुपये 2000/- हा प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्टचे 3 व ओपीव्हीच्या 3 मात्रा अथवा समतूल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
(लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 700/- (ग्रामीण भागात) व रुपये 600/- (शहरी भागात ) लाभ अनुज्ञेय राहील.)
आई जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजना अंतर्गत उर्वरित 1000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.
पात्र लाभार्थ्याला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत संस्थात्मक प्रसूतीसाठी दिले जाणारे प्रोत्साहन मिळेल आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळालेले प्रोत्साहन हे मातृत्व फायद्याकडे गणले जाईल जेणेकरून एका महिलेला सरासरी 6000/- रुपये मिळतील.
वाचकांना विनंती
आम्ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी अशा कोणी गर्भवती महिला असतील जे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना उद्देश Pradhanmantri Matru Vandana Yojana Purpose
नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे जेणेकरून बाळाच्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल.
महिलेच्या गर्भपणात आणि तिच्या प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करतेवेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर भर देणे.
गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे.
गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारणे
गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदर पणाच्या दिवसांत लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
गर्भवती महिलांचे आरोग्य अबाधित राखणे.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची वैशिष्टये Pradhanmantri Matru Vandana Yojana Features
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरवात राज्यात 1 जानेवारी 2017 पासून करण्यात आली.
मातृ वंदना योजना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी महिलांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती महिलांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण गर्भवती महिला ज्या हॉस्पिटल मध्ये तपासणी करण्यासाठी जातात तेथील आरोग्य सेविकांद्वारे गर्भवती महिलाचा अर्ज भरला जातो.
या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्या सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास व त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी PM Matritva Vandana Yojana Beneficiaries
1 जानेवारी 2017 नंतर राज्यातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ अनुज्ञेय राहील.
(जर एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्मल्यास अशा परिस्थितीत देखील त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.)
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.
केंद्र सरकार आणि राज्य शासनात नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक पात्रता Pradhanmantri Matru Vandana Yojana Eligibility
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अटी Pradhan Mantri Matritva Vandana Yojana Terms & Condition
फक्त भारतातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
भारताच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 19 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
1 जानेवारी 2017 किंवा त्या नंतर गर्भधारणा केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल.
राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.
लाभार्थी या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे.
पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिला भविष्यात कोणतीही गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल.
मातृ वंदना योजना फक्त पहिल्या अपत्यापुरतीच असून या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.
पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
फक्त गर्भवती महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Pradhan Mantri Matritva Vandana Yojana Documents
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी
लाभार्थी बँक खाते तपशील
MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)
महिला व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे.
महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड आवश्यक.
अर्जदार महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
पासपोर्ट आकाराचे फोटो
महिलेचा / पतीचा मोबाईल क्रमांक
अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
घरपट्टी पावती
वीजबिल रेशन कार्ड
ई-मेल आयडी
रहिवाशी दाखला
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना लाभ PM Matrutva Vandana Yojana Marathi Benefits
या योजनेच्या सहाय्याने गर्भवती महिलांना पोषक आहार मिळण्यास मदत होईल त्यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्माला येणार नाही.
या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारेल.
राज्यातील गर्भवती महिला सकस आहार मिळवण्यास सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
महिलांना त्यांच्या गरोदरपणात काम करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांना प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल,
गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
मातृ वंदना योजनेचा लाभ 3 टप्प्यात विभागला गेलेला आहे त्यामुळे लाभार्थ्यास 3 टप्याचा लाभ घेण्यासाठी त्या त्या टप्यानुसार लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल
1, 2 आणि 3 टप्यातील अर्ज अंगणवाडी केंद्र / मान्यताप्राप्त
आरोग्य सुविधेत सादर करणे आवश्यक आहे व भरलेल्या सादर अर्जाची पोचपावती घ्यावी.
पहिल्या टप्याचा लाभ मिळवण्यासाठी
अर्ज क्रमांक 1 भरून त्या अर्जा सोबत MCP कार्ड (माता व बालसंरक्षण प्रमाणपत्र) व बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.
दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी
पहिल्या टप्यासाठी भरलेला अर्ज व गर्भधारणा झाल्यापासून 6 महिन्यानंतर प्रसुतीपूर्व किमान 1 तपासणी (ANC) केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
तिसर्या हप्त्याचा दावा करण्यासाठी
लाभार्थ्याने रीतसर भरलेला फॉर्म 1 सादर करणे आवश्यक आहे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच बाळाला आवश्यक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद किंवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे
अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदार महिला गर्भवती नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
गर्भवती महिलेने दुसऱ्या प्रसूतीसाठी अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत Pradhanmantri Matru Vandana Yojana Offline Registration Process
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील / जिल्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा
या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 3 टप्यात दिला जातो त्यामुळे 3 अर्ज दिले जातात.हे 3 अर्ज त्या त्या वेळी विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करावा व भरलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत Pradhanmantri Matru Vandana Yojana Online Application Process
अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर Home Page वर गेल्यावर Login Form दिसेल.
Login Form मध्ये विचारलेले सर्व माहिती ( Email Id, Password, Captcha Code) भरून Login बटणावर क्लिक करावे.
Login केल्यावर अर्जदार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती भरुन अर्ज सबमिट करावा.
अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येतो.
मातृ वंदना योजनेसाठी संपर्क
ग्रामीण क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थींना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल व परिपूर्ण अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करेल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी एएनएमची राहील. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.
नगरपालिका क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरतील.
महानगरपालिका क्षेत्र : मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात एएनएम पात्र लाभार्थीं महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारतील. परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.
रक्कम मिळाली की नाही ते कसे तपासणार
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. तुम्ही खाली स्टेपद्वारे तपास करू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmmvy-cas.nic.in ला भेट द्यावी लागेल .
तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल.
तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.
तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल.
क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.
तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासू आणि डाऊनलोड करू शकता.
सारांश:
आशा करतो कि Matru Vandana Yojana अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले मातृ वंदना योजना संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.