Motivational Quotes in Marathi : 60 जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

Motivational Quotes in Marathi

  1. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं , ते साध्य करून दाखवणे.
  2. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागतो.
  3. गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो.
  4. कोणालाही आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहीजे.
  5. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही. फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला, तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.
  6. परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्त्व होय.
  7. सगळेच रस्ते हे शेवटला जात असतात पण शेवटला जाणारे सगळेच, स्वप्न असते असे नाही. म्हणून शेवटला जाण्याचा नाही तर स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास धरा.
  8. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते.
  9. चांगला विचार केल्यानेच नवीन पर्वाला सुरुवात होते, नाहीतर फक्त तारीख बदलते वेळ नाही.
  10. किती कमावून ठेवलं तरी बाकी फक्त शून्य राहते शेवटी आपल्या कर्माने साठवलेले पुण्यचं संकटाच्या वेळी कामाला येते.
  11. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चाललात ते कायम रुबाबात राहतात.
  12. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
  13. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्हीही पाठीवरच मिळतात.
  14. शिंपल्यासारखी खूप कमी लोक या जगात असतात ते दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नाहीत.
  15. जी व्यक्ती मनापासून तुमाची आहे तिला ओळखायला शिका कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात.
  16. नातं जपण्यासाठी कधी कधी आपण आपले शब्दही जपून वापरावे लागतात.
  17. जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील.
  18. नुसतं मन समुद्राएवढे असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी, वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते. आणि तेही हसत-हसत. Motivational Quotes in Marathi
  19. खेळ पत्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा, जेव्हा समोर बादशाह असेल.
  20. मी आहे म्हणुन सगळे आहेत या ऐवजी सगळे आहेत म्हणुन मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
  21. जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा- सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.
  22. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं.
  23. आयुष्यात सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर पहिलं स्वतःला राजा समजणं आवश्यक आहे, कारण गुलामगिरीच्या विचारसरणीतून फक्त गुलामच तयार होतात राजा नाही. Motivational Quotes in Marathi
  24. दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवावं.
  25. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भिती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते.
  26. जीवन जगायचं तर पावलांच्या जोडी‌ सारखं जगा. प्रथम पुढे पडणाऱ्या पावलाला गर्व नसतो तर, मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो, कारण दोघांनाही माहिती असत, आपली स्थिती बदलत राहणारी आहे.
  27. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य.
  28. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात, आणि वाचली तर अधिक समजतात.
  29. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा पण जवळची माणसं तोडू नका, कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत.Motivational Quotes in Marathi
  30. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
  31. आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो.
  32. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत.
  33. तुमची मेहनत प्रामाणिक असली की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रमाण देण्याची गरज भासत नाही.
  34. व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला न शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रीत चित्रपट म्हणजे आयुष्य.
  35. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरीही आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते.Motivational Quotes in Marathi
  36. सगळं काही विकत घेता येतं पण कुणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही.
  37. क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.
  38. आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो.
  39. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरवात ‘कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरवात अशक्य’ गोष्टीने होते.
  40. संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं
    तुम्ही गरिब म्हणुन जन्माला आलात हा तुमचा दोष नाही परंतु तुम्ही गरिब म्हणुन मेलात तर हा तुमचाच दोष आहे.
  41. नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात रहा, कारण सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.
  42. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात. पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही.
  43. अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं.
  44. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते.
  45. यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे, जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे.
  46. स्पर्धा कुणाशीही असो तयारी फक्त मोठ्या नियोजनाने आणि मनापासून केली पाहिजे.
  47. टीकाकारांचा नेहमी आदर करा कारण ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात.
  48. आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच केला पाहीजे की, स्वतः च्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागणार नाही.
  49. तुमची अर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुध्दा महत्वाची आहे.
  50. जिवन जगतांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोर जाऊन त्यावर मात करणं म्हणजेच जिवनाचा आस्वाद घेणं.
  51. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल तर मनुष्य बरचं काही शिकू शकतो.
  52. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो.
  53. जिवनातील कोणत्याही दिवसाला, दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस, आपल्याला शिकवण देतात.
  54. भविष्याची जराही कल्पना नसतांना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो, तोच खरा आत्मविश्वास, जिवनात जे मिळवायचे ते मिळवा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्या धेयाकडे जाणारा रस्ता लोकांची मने तोडुन जाणारा नसावा. Motivational Quotes in Marathi
  55. माणसाला आयुष्याभर, ऊन सावली प्रमाणे, सुख दुःखाचा अनुभव येत असतो. प्रत्येक क्षण सुखाचाचं येईल, असे नसते. पण माणसाने कुठे तरी थोडे समाधानी असणे जरुरीचे असते.
  56. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात.
  57. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी वाईट विचारांचे रूपांतर चांगल्या विचारांमध्ये करु शकते.
  58. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो.
  59. आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे.
  60. प्रारंभ करतांना मनात भिती किंवा शंका नको, पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासाने टाका.

Leave a Comment