१०० मराठी प्रेरणादायी विचार
1) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
2) खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो
3) बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
4) तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.
5) आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
6) हार मानणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे
7) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.(प्रेरणादायी)
8) जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाहीत
9) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
10) एकटा तोच पडतो जो खरा आणि प्रामाणिक असतो. खोट बोलणा-यांचे तर हजारो सोबती असतात..
11) कधी कधी आपली चाचणी घेतली जाते. आपल्यातली कमतरता दर्शवण्यासाठी नव्हे, तर आपल्यातली ताकद शोधून काढण्यासाठी !
12) किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश…..
13) गैरसमजाचं वारं वाहू लागल्यावर मित्रत्वाच्या नात्यालाही दुराव्याची जाळी धरू लागते…!
14) माणूस वाईट नसतो, त्याच्यावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्माने ती बदलता येते. वाईट परिस्थितीत माणसाला साथ देणारे नात्याची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसे असतात..
15) हाताच्या ओंजळीत असलेली फुलं दोन्ही हातांना सुगंधित करत असतात.. तसेच चांगल्या स्वभावाची माणसे कधीही भेदभाव करत नाहीत, सर्वांना एकत्र घेऊन चालतात…..!!
16) जसे मातीत पावलांचे ठसे उमटत जातात, तसेच आपले कर्म आपल्या आयुष्यात कर्तुत्वाची छाप निर्माण करत जातात.(प्रेरणादायी)
17) कधीच कोणाला दोष नका देऊ कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात. वाईट माणसं अनुभव देऊन जातात.
मतलबी माणसं धडा शिकवून जातात आणि आवडती माणसं आठवणी देऊन जातात.(प्रेरणादायी)
18) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
19) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
20) इतरांच्या चुकीतून शिका कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल.
21) शांतता हे प्रत्तेक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे. आणि सयंम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर..।
22) जगात तीच लोकं पुढे जातात जे सूर्याला जागे करतात
23) हार मानणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे.
24) अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात..!!
25) फळाची अपेक्षा सोडुन कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर अणि यशस्वी बनवित असतो.
26) जर एखादी गोष्ट मिळण्यासाठी आपणास खुप वाट पाहावी लागत असेल तर समजुन जावे की जितके आपण मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपणास प्राप्त होणार आहे.
27) प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास चुकू नये
28) एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते.(प्रेरणादायी)
29) नकारात्मक परिस्थितीही तुम्ही सकारात्मक राहिलात तर यश हे तुमचेच आहे
30) अडचणीत असतांना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
31) माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा- पु ल देशपांडे.
32) आदर हा आरशाप्रमाणे आहे, तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला मिळेल.
33) ” क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो.”
34) मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
35) यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. – चाणक्य
36) सुखी जीवनाचे तीन मंत्र… आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका.-चाणक्य
37) विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
38) क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.(प्रेरणादायी)
39) न हरता, न थकता, न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर नशीब सुध्दा हरते!
40) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन!
41) आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो.
42) “भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”
43) आपल्यामागे आपल्याला हसणारे कायम आपल्या मागेच राहतात.
44) दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो.
45) गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.
46) क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते.- आचार्य चाणक्य
47) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून, दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
48) “लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात, निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात.”
49) रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो
50) एकाग्रतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते.(प्रेरणादायी)
51) तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतीने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील.-आचार्य चाणक्य
52) आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.
53) विझलो जरी आज मी अंत माझा नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.
54) जर तुमचा जन्म पंखानिशी झाला आहे तर तुम्ही रांगत का आहात त्या पंखानी उडायला शिका.-ए पी जे अब्दुल कलाम
55) वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मनः संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
56) मनाची शक्ती हि सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते- स्वामी विवेकानंद
57) “किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते.”
58) कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते.
59) 100 लोकांच्या शर्यतीत पाहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळे करावं लागतं.
60) जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती असते.- स्वामी विवेकानंद
61) कुणिही तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात.
62) दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
63) “जर आपल्याला आपल्या पायावर उभे रहायचे आहे, आपल्या हक्कांसाठी लढायचे आहे, तर आपले बल आणि सामर्थ्य ओळखा. कारण शक्ती आणि प्रतिष्ठा केवळ संघर्षातूनच प्राप्त होते.”- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
64) खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो.
65) आपलं संपुर्ण जीवन बदलून टाकण्याची शक्ती सकाळच्या एका सकारात्मक विचारात आहे.
66) संघर्षाचा काळ हा आयुष्यातला सगळ्यांत बेस्ट असतो, तुमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्याची क्षमता फक्त याच काळात असते.
67) दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला. तसं केलं नाहीत तर जगातील एका चांगल्या माणसाबरोबर महत्त्वाची मिटिंग करणे राहून जाईल.
68) कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तोच तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल..!
69) जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल, तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका.. कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात…..!!
70) जीवनात असे काही दिवस येतात…. माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात पण जी माणसे दूर असूनही आठवण काढतात….. त्यांना तर खरे आपली माणसे म्हणतात.
71) स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा कि परिस्तिथी किती ही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.