दोन दिवस मीडियामध्ये एक न्यूज झळकतेय दीपिका-रणवीरला मुलगी झाली…
त्या न्यूज मध्ये तुम्ही कुठे पाहिले किंवा ऐकले, अचानक बाळाची नाळ गळ्याभोवती आली म्हणून सिझेरियन केले?
बाळाचे डोके मोठे असल्याने सिझेरियन केले,
बाळ उलटे होते, बाळाने पोटात शी केली,
बाळाचा श्वास गुदमरला …….. आणि म्हणून अचानक सिझेरियन केले.
दीपिकाचे सोडा मागील दहा वर्षात ज्या काही सेलिब्रेटी, राजकारणी लोकांना मुलं झाली तेव्हा कुठे अशा न्यूज आल्या का?
त्यांना का हे सगळे प्रॉब्लेम्स आले नाहीत जे तुम्हा-आम्हाला रोजच्या रोज मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये येतात.
नैसर्गिक बाळंतपण…. एक-दोन-शंभर नाही तर लाखो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीचा हा सर्वात महत्वाचा टप्पा.
तुम्हाला माहित आहे बाळाचे दिवस संपताना नवव्या महिन्यात पहिल्यांदा जेव्हा आईच्या पोटात छोटीशी कळ येते ती म्हणजे आईचा आणि पोटातील बाळाचा पहिला सरळ-सरळ संपर्क असतो आणि तो बाळाच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यभर टिकतो. हे मी नाही तर अमेरिका, जपान, युरोप, चीन, या देशांतील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर येतेय.
आश्चर्य म्हणजे चीनमधील एका हॉस्पिटलमध्ये २० वर्षांचा क्लिनिकल अभ्यास केला त्यामधून एक वेगळेच सत्य समोर आले,
नैसर्गिक पद्धतीने जन्माला आलेल्या मुलांपेक्षा सिझेरियन च्या मुलांना इतरांचा सहवास, स्पर्श नकोसा वाटतो आहे.
सिझेरियनचा या जन्मजात बालकांच्या गंध, स्पर्श आणि दृष्टी या मानवी नैसर्गिक अतिमहत्वाच्या संवेदनांवर आणि त्यांच्या क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो आहे हे २००८ पासून केलेल्या अभ्यासात दिसून आले.
कॅनडा, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड, आणि ऑस्ट्रेलिया मधील अलीकडच्या अभ्यासातून दिसून आले कि सिझेरियनने जन्मलेल्या मुलांच्यात ऑटिझम (आत्मकेंद्रीपणा) हा रोग होण्याचे प्रमाण २०% ने वाढताना दिसून आले आहे.
दमा, मधुमेह, ऍलर्जी आणि लठ्ठपणा हे आजार आई बाळाला देतेय जेव्हा ती त्याला अलगद आपल्या शरीरातून बाहेर काढतेय हे मी नाही ऑस्ट्रेलियन डॉक्टर्स त्यांच्या मागच्या दहा वर्षांच्या क्लीनिकल निरीक्षणावरून म्हणतायत…..
पण असो आम्हाला काय त्याचे हे सगळे असले अभ्यास अमेरिकन, युरोपियन,जापनीज ऑस्ट्रेलियन लोक करणारा आणि आम्ही…..? आम्ही डॉक्टरांना नावे ठेवणार, हॉस्पिटलच्या नावाने बोंब ठोकणार नाहीतर सिझेरियन करणारे डॉक्टरच कसे योग्य होते हे इतरांना ठणकावून सांगणार…
एक उदाहरण सांगतो
माझ्या एका मित्राच्या बायकोचे हैद्राबादच्या चकचकीत हॉस्पिटलमध्ये सिझेरियन झाले होते. दोन वर्षानंतर त्यांनी भारत सोडला आणि आयर्लंडला आले. काही दिवसांनी दुसऱ्यांदा दिवस गेले, इथल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल. आमचे तर पहिले सिझेरियन झालेय…. हो का आम्हाला तुमचे पहिले सगळे मेडिकल रिपोर्ट्स द्या… होय नाही करत चार पाच महिने खेळवत हैद्राबादच्या हॉस्पिटलने रिपोर्ट्स दिले.
आर्लंडच्या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यावर एक नजर टाकत सांगितले ‘इथे सिझेरियन करण्यासारखी आणीबाणीची परिस्थिती नव्हती…. तुमच्या शरीराची गरज नसताना त्यांनी चिरफाड केली म्हणून तुम्ही त्यांच्यावर केस केली पाहिजे.
तुम्हाला आमच्या हॉस्पिटलमध्ये नाहीतर या देशातील कोणत्याही सरकारी हॉस्पिलमध्ये डिलिव्हरी करायची असेल तर ती ९९.९९ % नैसर्गिकच होईल. तुम्हाला याबाबतीत काही शंका असेल तर तुम्ही तिकडे डिलिव्हरी करू शकता?
मित्राने आणि त्याच्या बायकोने निर्णय घेतला आणि दिवस भरल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरीचे बाळ घरी घेऊन आले…
एका छोट्या देशातील डॉक्टर हे अगदी सहज आणि आत्मविश्वासाने करू शकतात तर आम्ही कुठे कमी पडतोय.
शहर असो कि गाव भारतात सिझेरियनने जन्म घेणाऱ्या बाळांचे प्रमाण वेगाने वाढतेय…….
उत्क्रांतीच्या नियमानुसार सिझेरियन ने जन्मलेली मुलं वेदना आणि वेदनेची संवेदना गमावून बसणार आहेत….हे कुणाचे पाप असेल.?
लेखक: प्रा. डॉ. नानासाहेब थोरात
फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन लंडन