सायकलवरून सुरु झालेला निरमा वॉशिंग पावडरच्या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं

सायकलवरून सुरु झालेला निरमा वॉशिंग पावडरच्या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं.. आज त्याच निरमा पाऊडरची यशोगाथा.. 

आजही कपडे धुण्यासाठी घराघरामध्ये डिटर्जंट पावडरचा वापर केला जातो. आजा बाजारामध्ये विविध ब्रॅण्डच्या डिटर्डंट पावडर उपलब्ध आहेत. मात्र एक काळ असा होता की भारतातील बाजारात डिटर्जंट पावडर म्हणजे केवळ एकच नाव लोकप्रिय होत आणि ते म्हणजे निरमा. 

आज बाजारातून निरमा वॉशिंग पावडर चं नांव ऐकू येत नसलं तरी एकेकाळी या नावाने मार्केटमध्ये धुमाकुळ घातला होता. वॉशिंग पावडर म्हटलं का निरमा हे नाव प्रत्येकाच्या तोंडी होतं. लोक वॉशिंग पावडर मागण्याएवजी दुकानदाराकडे निरमा मागत.

८०च्या दशकात निरमा कंपनीला ग्राहकांना आकर्षित करण्याचा एक प्रकारे मूलमंत्र सापडला होता असं म्हणायला हरकत नाही. या कंपनीला जाहिरातीचा असा फंडा सापडला की प्रत्येकाच्या तोंडावर निरमाच्या जाहिरातीची धून होती.

निरमा पावडर बाजारातून गायब झाली असली तरी निरमा कंपनीने मात्र आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. निरमा कंपनी लवकरच ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस कंपनी खरेदी करणार आहे. २०१६ मध्ये निरमाने लफार्ज होल्सिमची भारतातील सिमेंट कंपनी खरेदी केली.

निरमा कंपनीची सुरुवात निरमा वॉशिंग पावडर या प्रोडक्टने झाली होती. करसनभाई पटेल यांनी खरं तर आपल्या स्वर्गवासी मुलीच्या आठवणीत तिच्याच नावाने ही कंपनी सुरु केली होती.

करसनाभाई पटेल हे साधारण शेतकरी कुटुंबातील होते. शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ एका सरकारी विभागात लॅब टेक्निशियनचं काम केलं होतं.

थोडी फार केमिकल्सची माहिती असल्याने त्यांनी स्वस्तामध्ये एक वॉशिंग पावडर तयार केली. नोकरीसोबत थोडं उत्पन्न वाढावं म्हणून त्यांनी घरातच वॉशिंग पावडर बनवण्यास सुरुवात केली होती.

घरातच सुरु केला वॉशिंग पावडरचा व्यवसाय

घरामागे असलेल्या मोकळ्या जागेत ते डिटर्जंट पावडर तयार करू लागले. त्यानंतर सायकलवरून फिरत ते या पावडरी विक्री करत. नोकरीवरून घरी परतले की ते ही कामं करत.

सायकल वरून वॉशिंग पावडरच्या विक्रीच्या सुरु झालेल्या प्रवासाने यशाचं शिखर गाठलं आणि बड्या ब्रॅण्डला टक्कर दिली.

ग्रामीण भागातील लोकांची गरज आणि त्यांच्या खिशाला परवडेल अशी वॉशिंग पावडर तयार केल्याने करसनभाई यांनी व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं.

त्यांनी त्यांची मुलगी निरुपमाच्या नावावरून निरमा या नावाने कंपनी सुरु केली.

सर्वात स्वस्त वॉशिंग पावडर

एकीकडे हिंदूस्तान युनिलिव्हर १५ रुपयांना वॉशिंग पावडर विकत असताना करसनभाई यांनी निरमा पावडर थेट ३ रुपयांना विकण्यास सुरुवात केली.

मार्केटिंगची चांगली माहिती असल्याने त्यांनी जाहिरातीमधून लोकांचं लक्ष वेधून घेतलं. देशभरात निरमा वॉशिंग पावडरची पसंती वाढली.

हिंदूस्तान युनिलिव्हरच्या रिनला टक्कर देण्यासाठी त्यानंतर निरमाने निरमा साबण लॉन्च केला. सुरुवातीला प्रमोशनसाठी ते पावडरसोबत साबण फ्री देऊ लागले.

निरमा वॉशिंग पावडर आणि साबणाची बाजारात ६० टक्के हिस्सेदारी होती. निरमाला टक्कर देण्यासाठी त्यानंतर बाजारात व्हिल साबण आला.

त्यानंतर जवळपास २००० सालानंतर निरमाला टक्कर देण्यासाठी विविध ब्रॅण्डनी बाजारात आपले डिटर्जंट प्रोडक्ट लॉन्च केले. यात घडी डिटर्जंटने निरमाला मोठी टक्कर दिली.

घडी डिटर्जंटमुळे निरमा हळूहळू मागे पडू लागली. बाजारात स्पर्धा वाढू लागल्याने करसनभाई यांनी सिमेंट आणि केमिकल्स बिझनेस आंत्रप्रेन्योरशिपकडे वळण्याचा निर्णय घेतला.

करसनभाई पटेल यांचा इतर व्यवसायाकडे प्रवास

करसनभाई यांनी अमेरिकेतील ‘सियरल्स वैली मिनरल्स ‘ ही सोडा अॅश कंपनी खरेदी केली. २०१० सालामध्ये करसनभाईंनी एक मोठा निर्णय घेतला.

निरमा वॉशिंग पावडरला डिलिस्ट करून इतर उत्पादनं आणि क्षेत्राकडे जास्त फोकस करण्याचं त्यांनी ठरवलं.

निरमाच्या डिलिस्टिंगनंतर निरमाने अधिग्रहणाच्या मदतीने सिमेंट बिझनेस मजबुत करण्यास सुरुवात केली.

२०१४ सालामध्ये निरमाने तब्बल १.४ अरब डॉरलला लाफार्ज सिमेंट ही कंपनी खरेदी केली. त्यानंतर बेंगळूरमधली स्टेरिकॉन फार्मा ही कंपनी खरेदी केली.

मार्केटमधील बड्या कंपन्यांची खरेदी करणार

यानंतर आता करसनभाई फार्मास्युटिकल मार्केटमधील आघाडीची कंपनी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची खरेदी करणार आहे. त्यामुळे आता फार्मा मार्केटमध्ये देखील निरमा विस्तार करण्यास सज्ज आहे.

करसनभाई यांनी त्यांचा व्यवसाय त्यांची मुलं राकेश पटेल आणि हिरेनभाई पटेल यांना सोपवला आहे. करसनभाई यांना २०१० सालामध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

लेख आवडला तर नक्कीच शेयर करा

Leave a Comment