आरोग्यविषयक माहिती व ज्ञान (साखर) भाग 2 : डॉ शंकर गांधिले

शरीरातील साखर कमीजास्त झाली तर कसे कळेल?

सकस आहार, नियमित व्यायाम याकडे दुर्लक्ष आणि दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली यामुळे अनेकांना रक्तात शुगर वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. हे प्रमाण वाढले तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. रक्तातील साखरेची पातळी वाढणे किंवा कमी होणे, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. त्यामुळे नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे.

साखर असामान्य होते तेव्हा काय होते?

दृष्टी दोष जाणवणे : शुगरच्या लोकांमध्ये दृष्टीदोष जाणवतो, दृष्टीदोषाची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. (साखर)
वारंवार लघवी : शुगर असलेल्या व्यक्तिला वारंवार लघवीला जावे लागते, अशी लक्षणे जाणवू लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जखम बरी न होणे : ज्या व्यक्तिला शुगरची समस्या आहे, अशा व्यक्तीची जखम लवकर बरी होत नाही. तसेच पुन्हा पुन्हा त्वचा संसर्ग होऊ लागतो.
आहार : जेवण नियमितपणे आणि नियोजनबद्ध रीतीने करणे गरजेचे आहे. दिवसातून तीन वेळा योग्य अंतर ठेवून आहार घेणे महत्त्वाचे आहे. मधल्या काळात हलकेसे खाणे शरीराला उपयुक्त ठरते.
थकवा जाणवणे : शुगरच्या व्यक्तिला कोणतेही काम करत असताना थकवा लवकर जाणवतो. अवजड काम करू नये, असे वाटते.

साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी…

व्यायाम : साखर असलेल्या व्यक्तीने रोज किमान एक तास व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे आजारांना दूर ठेवणे सहज शक्य होते. त्यामुळे व्यायामामध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे.
हृदयरोग, दृष्टी आणि किडनीच्या आजारांसह अनेक जुनाट आणि प्रमुख आरोग्य समस्या टाळण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असावे. जेवणात पालेभाज्यांचा समावेश करावा, वेळेवर जेवण, जास्त गोड पदार्थ खाण्याचे टाळावे, पुरेशी झोप आणि पुरेसा व्यायाम केला, तर शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य राखता येऊ शकते.

पोटाचा कॅन्सर टाळता येतो का?

रक्त, फुप्फुस आणि मुखाचा असे कर्करोगाचे प्रकार
आपल्याला ज्ञात आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे या कर्करोगांवर मात करणे सोपेही झाले आहे. वैद्यकीय उपचारात प्रगती झाली तसे कर्करोगाचे प्रकारही वाढू लागले आहेत. पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. आधुनिक जीवनशैली आणि आहारशैली यांचा दुहेरी परिणाम पोटातील अवयवांवर होऊ लागला आहे..
पोटाच्या कर्करोगात अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड (पँक्रिया) मोठे आतडे, यकृत (लिव्हर), पित्ताशय (गॉलब्लॅडर) इत्यादींचा समावेश आहे. त्यातही अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण देशात लक्षणीय आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण देशात खूप आहे. त्यामुळे भारतात अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.

या प्रकारात अन्न गिळताना त्रास होतो. तसेच गॅस्ट्रोऑइसोफॅगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) सारख्या पचनाच्या विकाराने छातीत वारंवार जळजळ होते. या स्थितीत जठरात अन्न गेल्यानंतर आम्ल पुन्हा अन्ननलिकेच्या वरच्या भागात येते. ही समस्या वारंवार होत असेल तर ती स्थिती भविष्यात गंभीर होऊन अन्ननलिकेचा कर्करोगही असू शकतो.

स्वादुपिंडाचा कर्करोग : स्वादुपिंडाचा कर्करोग होण्यामागचे निश्चित कारण माहीत नाही.
धूम्रपान आणि मद्यपान एकत्रित केल्यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका आहे. लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीना हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. कोणतेही व्यसन न करणाऱ्या व्यक्तींमध्येही हा कर्करोग आढळतो.

जठराचा कर्करोग : आपण खात असलेले अन्न अन्ननलिकेतून पोटाच्या एका भागात साठवले जाते, त्यालाच जठर म्हणतात.

तिथल्या रसांमुळे अन्न पचवण्यास मदत होते. जठराच्या कर्करोगाचे प्रमाणही आपल्याकडे वाढत आहे. हा कर्करोग पोटात एच पायलोरी बॅक्टेरिया या जंतूच्या दीर्घ संसर्गाने होतो.

यामध्ये पोटाचे लायनिंग खराब होते. तसेच यामुळे जठराला सूज येते. त्यामुळे पोटात कळा मारून येतात. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही, वेळीच यावर उपचार करणे अगत्याचे ठरते. अधिक मसालेदार आणि तिखट खाणे टाळायला हवे.

अनेकवेळा पोटाचा कर्करोग आनुवांशिकतेमुळेही होतो. हे सर्व प्रकार टाळायचे असतील तर उत्तम आहारशैली विशेषत: शाकाहार, फळे आणि भाज्यांचा नियमित आहार, व्यायाम, प्राणायाम, पुरेशी झोप घेणे आणि सर्व व्यसनांपासून दूर राहणे ही निरोगी जीवनशैली उपयुक्त ठरते.

जंकफूड टाळा
मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्यामागे जंकफूड, प्रोसेस फूड कारणीभूत आहे. यामध्ये आतड्याच्या आतील बाजूस गाठी येतात. कालांतराने या गाठीचे रूपांतर कर्करोगाच्या गाठींमध्ये होत असते.
अतिमासांहाराने हा आजार होतो. तसेच वारंवार होणारी बद्धकोष्टता हेही कर्करोगाचे लक्षण असू शकते.

यकृताचा कर्करोग
यकृताचा कर्करोग प्रमाणाच्या बाहेर दारूचे सेवन केल्यामुळे होतोच. त्याशिवाय कावीळ हा महत्त्वाचा घटक या आजारामध्ये असतो. काविळीचे बी आणि सी प्रकारमुळे यकृताचा कर्करोग नागरिकांना होत असतो.

पित्ताशयात खडे झाल्यामुळे पित्ताशयाचा कर्करोग होतोच असे नाही. त्याचे ठोस असे कारण नाही. मात्र पित्ताशयात खडे झाल्यास ते मोठे असतील तर अनेकवेळा पित्ताशय काढण्याचा सल्ला दिला जातो.

पोटाच्या आजारांवर कोमट पाण्यात लिंबू पाणी घेतले का?
रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू घेतल्यास पोटाच्या विविध आजारांवर गुणकारी ठरते. परिणामी, अनेकजण नित्यनेमाने हा उपाय करतात.

लिंबू पाणी पिण्याने अनेक फायदे होत असल्याने प्रत्येकाचे हेतूही वेगळे आहेत. अनेकांना हे पाणी पिल्याने पोटावरील चरबी वितळते, असाही समज आहे.

सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत होते. साखरेशिवाय लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

लिंबामध्ये ‘क’ जीवनसत्त्वासह पोषक तत्त्वेही असतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीर निरोगी राहणे, पोट विकारांपासून सुटका मिळते. पचनशक्तीलाही हे पाणी सहाय्यभूत ठरते.

(साखर)पचनशक्ती नीट नसल्यास गॅसेसमुळे त्रास होतो. वजनवाढीची समस्या असलेल्यांनाही हे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पोटाच्या आजारावर घरगुती उपाय
पोटाच्या आजारावर सकाळी कोमट लिंबू पाणी पिण्याने फायदा होतो, गॅसेस, अपचन, पोट गुरगुरल्यासारखे वाटणे, शौचास साफ न होणे अशा विकारांत फायदा होतो. वजन नियंत्रणात राहते.

हागवण लागल्यास बडीशेप, आल्याचा चहा उत्तम
उपाय ठरतो. कपभर गरम पाण्यात आले खिसून घालावे. त्यात बडीशेपचे गरम पाणीही मिसळावे. दोन्हींचा एकत्र चहा हागवणीपासून मुक्ती देतो.

ऋतू बदलताना पोटाची काळजी घ्या
ऋतू बदलताना शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. उन्हाळ्यानंतर हवामानानुसार विविध आजार पावसाळा तसेच हिवाळा सुरू होताना बळावतात. या बदलांशी शरीराने जमवून घेणे आवश्यक आहे.

धने पावडर आणि सुंठेचा काढा दोन चमचे धने पावडर व अर्धा चमचा सुंठेची पावडर | दोन ग्लास पाण्यात उकळून घ्यावी. थंड झाल्यावर थोडे थोडे करून प्यावे. यामुळे पचनशक्ती सुधारते.

पोट विकारावर आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. इंटरनेटवर सर्च करून कोणतेही उपाय करणे घातक ठरते. त्यामुळे वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेल्यांकडून उपचारांचे उपाय घेणे महत्त्वाचे ठरते. या उपचारांनी अनेक रुग्णांना पोट विकारापासून दिलासा मिळाला आहे.

स्मरणशक्ती वाढवायची idea?

१९ आणि २९ चा पाढा शाळेतल्या वयात कदाचित लक्षात • राहिला नसेल. पण हा पाढा पाठ करण्याचा प्रयत्न नंतरच्या वयात तरी आपण कधी केला का ? की पाठ होत नाही. म्हणून सोडून दिला तो दिलाच?.

आणि नंतरच्या वयात तर तो पाठ करण्याची गरजच काय म्हणून त्याकडे परत र लक्षच दिलं नाही? – अर्थात असं आपल्यापैकी बहुतेकांचं होतं. 

आता, आपलं वय कितीही असो, पाढा पाठ असण्याची गरज नसो, पाढा पाठ करून बघायचं का? २९ चा पाढा पाठ करायला किती दिवस लागतील? हा पाढा रोज, नियमित म्हटला तर लवकर पाठ होईल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाढा पाठ झाल्यावर सराव केला नाही तर विसरून जाईल का? आपली स्मरणशक्ती चांगली आहे का, हे तपासायचं असेल तर हा एक अतिशय उत्तम प्रयोग आहे. 

पाढा पाठ करणे याबरोबर अजून किती तरी मार्गांनी स्वत:ला तपासता येईल. कोणत्याही गोष्टीचा नियमित सराव केल्याने ती गोष्ट स्मरणकेंद्रात नक्कीच जाते.

कदाचित तुम्हाला हा रिकामपणचा उद्योग वाटेल पण, आजच संध्याकाळी एखाद्या बागेत जा. तिथे कितीतरी माणसं दिसतील, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात त्यांचं वर्णन करा. वय, पेहराव, चालण्याची पद्धत हे सगळं डोक्यात साठवून ठेवा.

घरी गेल्यावर आठवा. स्मरणशक्तीला ताण द्या. यातून आपण स्मरणकेंद्रातल्या पेशींना कामाला लावत आहोत. डोळे मिटून आपल्या घरातल्या एकेका खोलीमध्ये काय आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत, हे आठवा. एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत घडलेलं दृश्य पुन्हा एकदा आठवा. 

त्या दृश्यामध्ये काय काय होतं याचं बारकाईने वर्णन लिहून काढा. 

अभिनेते अभिनेत्री आपल्या लक्षात राहातातच. पण त्यांचे कपडे कोणत्या रंगाचे होते, मागच्या भिंतीवर कोणतं चित्र लावलेलं होतं, भिंत, सोफा, पलंग, खुर्च्या कोणत्या 

रंगाच्या होत्या ? यातलं जास्तीत जास्त आठवायचा प्रयत्न करा. किती गोष्टी आठवल्या ? किती निरीक्षणातून निघून गेल्या ? घराच्या बाहेर असताना आपल्या घरातल्या खिडक्यांच्या गजांचं डिझाइन कसं आहे, आठवतं का? गोष्टी सजगपणे बघणं याची नियमित सवय लागली की, स्मरणशक्ती वाढतेच. (साखर)

कमी रक्तदाबात सोडियमची गरज आहे का? 

रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. अयोग्य जीवनशैली व असंतुलित आहारामुळे या आजाराच्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरास आवश्यक सोडियमकरिता आणि दिवसभरात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवून, सोडियमयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करावा. (साखर)

शरीरासाठी उच्च रक्तदाब जितका धोकादायक आहे तितकाच कमी रक्तदाब देखील अपायकारक आहे . कमी होत असेलवर व खारट पदार्थाचा रोजच्या आहारा समावेश केला पाहिजे. 

कमी रक्तदाब ही एक समस्या आहे जी भूक, तणाव आणि हवामानामुळे उद्भवू शकते. याची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

रक्तदाब कमी होण्यास आपण घेत असलेला आहार कारणीभूत असतो. आहारात भरपूर प्रथिने, जीवनसत्त्वे, सोडियम, पोटॅशिअमयुक्त पदार्थ आवर्जून खावेत.

कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यास घाबरून न जाता लिंबू सरबत, नारळपाणी, ओ. आर. एस, फळांचा ज्यूस ताबडतोब घेतल्यास त्याचा फायदा होतो.  

सोडियमयुक्त आहारावर द्या भर 

फळे, फळांचा रस : रक्तदाब कमी झाल्यास त्यावर तत्काळ घरगुती उपाय करावेत. विशेषतः आहारात ताजी फळे किंवा फळांचा ज्यूस यांचे नियमित सेवन केल्यास कमी रक्तदाबात त्याचा फायदा होतो. (साखर)

हिरव्या पालेभाज्या: कमी रक्तदाब असेल तर नियमित हिरव्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप आहारात असावेच. यात जीवनसत्त्वांसह पोटॅशिअम व सोडियमची मात्रा अधिक असते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी हे उपयुक्त ठरते.

 कॉफी, डार्क चॉकलेट: कॉफी किंवा केफिन असलेले पदार्थ खाल्ल्यास रक्तदाब तत्काळ नियंत्रणात येऊ शकतो. सकाळी उठल्यावर लगेच एक कप कॉफी सेवन करावे.

दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी किंवा पुरेशा पातळ पदार्थांचे सेवन करणेही गरजेचे असते. रक्तदाबाच्या आजारात बॉडी हायड्रेटेड राहते.

डॉ शंकर गांधिले (लेखक हे आरोग्य विषयक गाढे अभ्यासक व मधुमेह-तज्ज्ञ आहेत.)

Leave a Comment