शरीर व आरोग्याची काळजी कशी घ्यावी. दोन मिनिटं वेळ द्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार. कारण,आरोग्य हेच जीवन.
अवयव व विकार
१) पोट :- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.
२) मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.
३) पित्ताशय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही
४) लहान आतडे :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.
५) मोठे आतडे :- केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.
६) फुफ्फुसे :- केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.
७) यकृत :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.
८) हृदय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता.
९) स्वादुपिंड :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता.
१०) “डोळे” :- केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता.
११) “मेंदू” :- केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.
निसर्गाने माेफत मध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवाची योग्य काळजी घ्या योग प्राणायाम करा शरीर स्वस्थ तरच आपण मस्त शरीराचे कोणते ही अवयव हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या शरीरातील अवयवांची नेहमी काळजी घ्या.
तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार.
वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:
1. जीने चढू नका, गरजच असेल तर FC आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.
2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.
6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.
8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.
9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.
10. संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.
अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.
● वरचेवर मित्रांच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे, वेळ खर्च करा.
● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.
● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?
● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.
● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका.
● मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा.
● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा.
● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही.
● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.
● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.
● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा.
● आणी हो, तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
● मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल. त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा मुक्त दाद द्या.
म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा.
● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!
● क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका..!
● संकटे ही क्षणभंगुर आहेत त्यांचा सामना करा..!
● डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण, काळाच्या पडद्या आड गेलेले “जीवलग” परत कधीच दिसत नाहीत.
विरुद्ध अन्न घटक (शरीर व आरोग्याची काळजी) :
१) दुधासोबत फळे खाऊ नये.
२) दुधासोबत कुळीथ, वरी, वाल, मटकी, दही, चिंच, जांभूळ, आंबट पदार्थ, लसूण, पालेभाजी, मुळा, मसाल्याचे पदार्थ, मांसाहार, इ. खाऊ नये.
३) तुप व मध समप्रमाणात एकत्र खाऊ नये.
४) मिक्स भाज्या तसेच मिक्स मांस एकत्र शिजवून खाऊ नये.
५) फणसाची गरे खाल्यावर पानाचा विडा खाऊ नये.
६) मीठ असलेले पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास दूध फाटते आणि अपचनाचा त्रास होतो. म्हणून दुधाच्या चहाबरोबर खारी, बटर, टोस्ट, बिस्किटे इ. खाणे अयोग्य आहे. मात्र बिनदुधाच्या चहाबरोबर वरील पदार्थ खाऊ शकता.
७) दूध व केळी थंड तर मांस, अंडी, मासे उष्ण आहेत. ते एकत्र खाल्याने पचनशक्ती कमजोर होऊन अनेक व्याधी निर्माण होतात.
८) मनाविरुद्ध तसेच निसर्गाविरुद्ध अन्न खाणे शरीराला घातक असते.
विरुद्ध अन्नाचे दुष्परिणाम –
त्वचा विकार, कोड, रक्तक्षय, रक्तस्त्राव, अपचन, पोटाचे विकार, आम्लपित्त, तोंडाचे विकार, सूज, अशक्तपणा, आळस, रागीटपणा, मानसिक विकार इ.
मसाज का आहे आवश्यक? (शरीर व आरोग्याची काळजी)
आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते.
जरी आपण ग्रामीण भागातले असलो तर सहसा आपल्या शरीराची हालचाल तर होतेच म्हणून आपल्याला वाटेल की आम्हाला व्यायामाची काय गरज, पण व्यायाम हा आवश्यक असतोच. त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे.
पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलोय की लहान मुलांची तेलाने मालिश केली जाते, आणि असे केल्या केल्या लहान मूल अगदी शांत झोपी जाते.
योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मुलांची मालिश केल्यास त्यांची शारीरिक वाढ ही अतिशय लवकर होते. आज आपण पाहू प्राचीन काळापासून चालत आलेले मालिश म्हणजेच स्पर्श चिकित्सा पद्धत.
या पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात. अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते.
संवाहन श्रमहरं व्रस्यं निद्रा सुख प्रदम् । मांसा सृक्त्यक् प्रसन्नत्वम् कुर्याहातकफाप्रहमू ।।
म्हणजेच शरीराची मालिश करणे श्रमनाशक, धातूंना पुष्ट करणारे, झोप आणि सुखकारक तसेच स्वशोच्छास व त्वचा आणि रक्ताला स्वच्छ करणारी आणि वात कफ नाशक आहे.
मसाज चे फायदे :
१. तणाव दूर करण्यास मदत करते.
२. मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे दूर करते.
३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो.
४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते.
५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते.
६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते.
७. यामुळे आपल्याला झोप देखील चांगली लागते.
या व्यक्तींनी मसाज टाळावा
१) ज्या व्यक्तीला त्वचेचे आजार आहेत.
२) सूज किंवा जखम झालेल्या भागावर मसाज करू नये.
३) गर्भावस्थेत स्त्रियांनी मसाज करू नये.
४ ) हृदयविकार असेल तर मसाज करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच मालिश करावी.