SUCCESS MADE SIMPLE
यशस्वी होण्यासाठी
१. नेमकं काय पाहिजे ते ठरवा.
२. स्पष्ट, नेमक्या शब्दांत लिहून घ्या.
३. पूर्ण करण्याची अंतिम तारीख निश्चित करा.
४. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांची यादी बनवा.
५. योग्य क्रमाने ही यादी लावा (पुढे आवश्यकतेनुसार या यादीत किंवा क्रमात बदल केला जाऊ शकतो.)
६. ताबडतोब कामाला लागा. बिल्कुल विलंब करू नका.
७. रोज काही ना काही करा.
शिक्षक दार उघडून देतो. पण आत प्रवेश तुम्हालाच करावा लागतो.– चायनीझ म्हण
समजा तुम्ही वेटलिफ्टिंगचं साहित्य आणि वेटलिफ्टिंगचं पुस्तक घरी आणलं तर त्यापासून तुम्हाला किती फायदा मिळतो हे कुठली गोष्ट ठरवेल?
तुम्ही त्याचा किती वापर करता ही गोष्ट.
बिल्कुल त्याच प्रमाणात तुम्हाला त्या साहित्याचा फायदा होईल ज्या प्रमाणात तुम्ही त्याचा वापर कराल.
बोलणं पुरेसं नाही, चालणं आवश्यक आहे. ज्ञान पुरेसं नाही, कृती आवश्यक आहे. किती लोक असतील ज्यांच्याकडे ज्ञान आहे. पण ज्ञानानंतर कृती पाहिजे.
किती असंख्य अपयशी लोक असतील ज्यांच्याकडे यशस्वी (SUCCESS) माणसाइतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त ज्ञान आहे. पण कृती नाही.
लक्षपूर्वक ऐका, मोठ्याने सांगतोय – सगळा खेळ कृतीचा
आहे.
सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. परिस्थिती बदलावी असं तुम्हाला वाटत असेल तर आधी तुम्हाला बदलावं लागेल. परिस्थिती सुधरावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्रथम तुम्हाला सुधरावं लागेल.
आपण काय करू शकतो या दृष्टीने आपण स्वत:कडे पाहतो. आपण काय केलेलं आहे या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहतात.
-H.W. Longfellow
आधी करा, नंतर सांगा – रशियन म्हण
तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका.
करून दाखवा.
- योजना
- ध्येय (SUCCESS) संपादन करण्यासाठी योजना निश्चित करा.
- लक्षात ठेवा योजनाशून्य कृती प्रत्येक अपयशाचं कारण आहे.
- तुमच्या योजनेमधे ‘आज’ करण्यासाठी काहीतरी समाविष्ट करा.
- योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवतो.
- झाड तोडण्यासाठी माझ्याकडे आठ तास असले तर त्यातले सहा तास मी कुन्हाडीला धार लावण्यात घालवेन.
- सुरुवात
- वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. सुरू करण्यासाठी कोणी कशाची वाट पाहतो, कोणी कशाची. कोणाचा प्रश्न असतो – पैशांशिवाय मी सुरुवात कशी करू शकतो?
- पण खरा प्रश्न आहे- सुरुवात केल्याशिवाय पैसे कसे येतील ? यशस्वी (SUCCESS) व्यवसायाची सुरुवात किंवा व्यवसायाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी जे भांडवल तुम्हाला लागेल ते पैशाच्या रूपात नाही. विचाराच्या रूपात आहे. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा विचार, सुरुवात हा कुठल्याही कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
वाट पाहू नका. सुरुवात करा. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही. जिथे तुम्ही आहात तिथून, जी काही साधने तुमच्याकडे आहेत त्यांना घेऊन सुरुवात करा. आत्ता फक्त सुरुवात करा आणि तुमचं डोकं प्रतिसाद देईल. सुरू ठेवा आणि कार्य पूर्ण होईल -Goethe
स्पष्टता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जे लोक अतिशय प्रभावीपणे काम करतात त्याचं सर्वात प्रमुख कारण हेच असतं की त्यांचं उद्दिष्ट त्यांच्यासमोर बिलकुल स्पष्ट असतं.
तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे माहीत असल्याशिवाय ते मिळणार कसं? निश्चित ध्येयच समोर नसेल तर जाणार कुठे? आणि तरीही कोणी गेला तरी पोहोचणार कुठे?
समुद्रप्रवासावर निघालेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. त्यामुळेच समोर ते इच्छित ठिकाण बहुतांश वेळ दिसत नसतानाही तो जात राहतो आणि अखेर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो.
ध्येय स्पष्टपणे ठरवून कागदावर लिहून घेणे हे ध्येयप्राप्तीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी एक निश्चित ध्येय आणि ते मिळवण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवण्याची गरज आहे.
ध्येय निश्चित करणे ही ध्येयप्राप्तीची सुरुवात आहे. ध्येय निश्चित झाल्यावर ध्येयप्राप्तीच्या वेडाने मनाला व्यापून टाका. एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपले ध्येय लिहून ठेवा. नेहमी डोळ्यांसमोर ठेवा.
Out of sight is out of mind असं म्हणतात. म्हणजे नजरेआड कुठली गोष्ट गेली तर माणूस विसरू शकतो किंवा तीव्रता कमी होऊ शकते. आणि खरं सांगायचं तर सगळा खेळ तीव्रतेचा आहे. तुमचं ध्येयच तुमचं जग होऊन जायला पाहिजे.
कुठल्याही मोठ्या यशाचा आरंभबिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा स्पष्ट निर्णय. ज्या क्षणी तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करून ते कागदावर लिहून घेता त्या क्षणी तुम्ही एक वेगळेपण अनुभवता. त्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा घेता. आणि स्वतःवर नियंत्रण असल्याची जाणीव सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
अपयशी माणूस ध्येयशून्यपणे भटकत राहतो. यशस्वी लोकांजवळ निश्चित ध्येय असतं.
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरच्या छळछावणीत तब्बल तीन वर्षे व्यतीत करणाऱ्या एका माणसाने निश्चित ध्येयाची आवश्यकता किंवा अनिवार्यता स्वतःच्या उदाहरणाद्वारे सांगितल…
फ्रॅन्कल यांनी जवळून छळाचं निरीक्षण केलं – छळ करणाऱ्यांचं आणि छळ सहन करणाऱ्यांचं – दोघांचंही. ते म्हणतात, ‘छळछावण्यांमधे सारख्याच परिस्थितीला तोंड देताना एक जण मरायचा आणि दुसरा वाचायचा’.
व्हिक्टर फ्रॅन्कल यांना जे दिसलं ते असं की ज्या लोकांसमोर आयुष्यात काही निश्चित ध्येय होतं ते लोक वेगवेगळ्या छळांतून जिवंत बाहेर यायचे. पण ज्याच्याजवळ जिवंत राहण्याचं काही कारण किंवा उद्देश नव्हता असे लोक सहज आणि पटापट मरून जायचे. (अखेरीस या छळछावण्यांमधून शंभरात सरासरी चार पाच लोकांची जिवंत सुटका झाली.)
जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात. तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक.
यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा, आपल्याला काय पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान. कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
1 thought on “यशस्वी होण्यासाठी : SUCCESS MADE SIMPLE”