मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो? उपाय व उपचार

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज आपल्या देशातील तब्बल सात कोटींच्या आसपासचे लोक हे मधुमेहाने त्रस्त आहेत.

आजच्या ह्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपले प्रत्येकाचेच आयुष्य खुपच अस्थिर बनत चालले आहे.

आणि याच सर्वाचा परिणाम आपल्या शारीरीक आरोग्यावर होत असतो.

कारण आपण आपल्या शरीराची कुठलीही निगा राखत नसतो,काळजी घेत नसतो.ज्याचे परिणामस्वरूप आपणास विविध शारीरीक आजारांना सामोरे जावे लागत असते.

Diabetes: मधुमेह म्हणजे काय?
रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात.

यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात.

त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत.

पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते.

मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.

त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.

मधुमेह किंवा डायबेटीसमध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनचा वापर करण्यासाठीची यंत्रणा असमर्थ ठरते. यामुळे मधुमेहात रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढते.

साखरेचे शरीरात व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही.
वाढलेली साखर कोणत्याही कार्याशिवाय मुत्रातून बाहेर टाकली जात असते.
मधुमेहाचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्या, किडन्या, हृदय, डोळे, मेंदू- मज्जासंस्था (nervous system) यावर सतत होऊ लागतो.

Risk factor –

  • 45 वर्षांपेक्षा जास्त वय
  • लठ्ठपणा
  • Type 2 Diabetes Milletus चा कौटुंबिक इतिहास
  • प्री- डाइबेटिक
  • कमी व्यायाम करणे
  • कमी एचडीएल किंवा उच्च ट्रायग्लिसराइड
  • उच्च रक्तदाब
  • जेसटेशनल डाईबीटिस                                        
  • फॅट आणि कार्बोहायड्रेट  युक्त आहार
  • जास्त अल्कोहोल सेवन
  • PCOS असलेल्या महिला

Diabetes symptoms in Marathi : मधुमेहाची प्राथमिक लक्षणे


मधुमेह हा आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे त्याची प्रत्येकवेळी लक्षणे दिसतीलचं असेही नाही. मधुमेहाची लक्षणे ही रक्तातील साखरेची चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. मधुमेहात खालील लक्षणे जाणवू शकतात.

मधुमेह ह्या आजाराचे सर्वात पहिले आणि गंभीर लक्षण तसेच धोका हा आहे की ह्या आजाराचे आपणास सुरूवातीला कुठलीही लक्षण दिसुन येत नसते.

याचमुळे मधुमेह हा आपल्या शरीरात अनेक वर्षापासुन असून सुदधा आपल्याला हे कळत नसते.

म्हणुन ह्या डायबिटीसला सायलेंट किलर म्हणुन देखील ओळखले जात असते.जेवढे मधुमेह झालेले रूग्ण आज भारतात आहे त्यापैकी पन्नास टक्के मधुमुही हे मधुमेहाचे रूग्ण हे मधुमेहाचे रूग्ण म्हणुन तपासले जात असतात.

म्हणजेच त्यांना माहीत असते की आपणास मधुमेह झाला आहे पण उरलेल्या पन्नास टक्के रूग्णांना हे सुदधा माहीत नसते की त्यांना मधुमेह झालेला आहे.

कारण त्यांना मधुमेहाचे कधी कुठलेही लक्षण आपल्या शरीरामध्ये दिसुनच आलेले नसते.

ज्यामुळे योग्य वेळी त्यांच्या मधुमेहावर कुठलेही निदान होत नसते.आणि हे खुप धोक्याचे असते कारण मधुमेहाचे निदान न होता तो आपल्या शरीरात राहिला आपल्या नकळत आपल्या रक्तामधील साखर जर वाढत राहीली तर आपल्या शरीरावर मधुमेहाचे विविध दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

म्हणुन आपण वेळ असताच जागरूक असायला हवे आणि वेळेतच रुटीन पदधतीने आपल्या शरीरातील साखरेची तपासणी नियमित करत राहायला हवी.

कारण हाच एक मधुमेहापासुन बचाव करण्याचा तो आटोक्याच्या बाहेर जाण्याआधी त्यावर निदान तसेच उपचार करण्याचा एक उत्तम उपाय आहे.जो तज्ञ डाँक्टर देखील आपणास नेहमी सांगत असतात.

जेव्हा आपल्या शरीरातील साखर खुप वाढत असते किंवा वर जायला लागत असते तेव्हा पुढील काही लक्षणे आपणास आपल्या शरीरामध्ये दिसुन येत असतात.

डोळयांना धुसर दिसणे,डोळयांसमोर अंधारया येणे-

मधुमेहाचे अजुन एक महत्वाचे आणि सामान्य लक्षण म्हणजे डोळयांना धुसर दिसणे तसेच डोळयांसमोर अंधारया नेहमीच्या दृष्टीमध्ये बदल घडुन येणे हे असते.

सारखा थकवा येणे,शरीरात अशक्तपणा येणे,मरगळल्यासारखे वाटणे.

वजन कमी होणे :

मधुमेहाचे अजुन एक लक्षण आहे ते म्हणजे खुप जणांचे यात काहीही वजन कमी करण्याचा प्रयत्न न करता वजन कमी होत असते. ‎अचानकपणे वजन घटणे.

मधुमेहात आपण जे खात असतो ते अंगाला लागत नसते कारण शरीरात साखरेचे प्रमाण खुप जास्त वाढल्याने किडनी ते कमी करण्यासाठी सर्व साखर लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम करत असते.

जास्तीत जास्त भुक लागणे –

पेशींना जेव्हा अन्न,साखर जेव्हा प्राप्त होत नसते तेव्हा आपल्या मेंदुला असे वाटत असते की आपल्या शरीराला पुरेसे अन्न प्राप्त होत नाहीये त्यामुळे पेशींपर्यत साखर पोहचत नाहीये.

मग मेंदु आपल्याला साखर प्राप्त करण्यासाठी अधिक जास्त खाण्याच्या सुचना देऊ लागतो.म्हणजेच याने आपल्याला जास्तीत जास्त भुक लागत असते.

‎हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
‎डोळ्यांचे विकार, ‎मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,

याचाच अर्थ जेव्हा आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते.तेव्हा हे साखरेचे वाढलेले अतिरीक्त आणि त्रासदायी प्रमाण आपल्या किडनीला समजत असते.

तेव्हा आपली किडनी त्या शरीरात झालेल्या अतिरीक्त साखरेला लघवीवाटे तसेच युरिनदवारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते.आणि ह्याच शरीरात झालेल्या अतिरीक्त साखरेच्या प्रमाणाला कमी करण्याकरीता आपली किडनी जास्तीत जास्त लघवी तयार करू लागते.

जेणेकरून आपल्या शरीरातील जास्तीत जास्त साखर बाहेर टाकली जाईल.आणि आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण पुन्हा नाँरमल कंडिशनवर येईल.

आणि खुप मधुमेहाच्या रूग्णांना आपल्या लघवीला जायच्या रोजच्या प्रमाणापेक्षा जास्त लघवी होत असते म्हणुन जर आपणास आपल्या लघवीला जायच्या रोजच्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त लघवी होत असेल वारंवार रात्री अपरात्री सुदधा उठुन लघवीला जावे लागत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असु शकते.

अशा वेळी आपण डाँक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यायला हवा.
वारंवार पाण्याची तहान लागणे,सतत पाणी पिण्याची ईच्छा होणे –

डायबिटीसमध्ये जास्तीत जास्त लघवी होणे हे पहिले लक्षण ह्या दुसरया लक्षणाशी एकदम संबंधित आहे.कारण जेव्हा आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते.

तेव्हा आपली किडनी त्या अतिरीक्त साखरेच्या प्रमाणाला लघवीवाटे बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लघवी तयार करत असते.

आणि साहजिकच गोष्ट आहे की जर आपणास लघवी जास्त झाली तर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते.ज्याच्यामुळे आपल्याला वारंवार पाण्याची तहान लागते,सतत पाणी पिण्याची ईच्छा देखील होत असते.

म्हणजेच सतत लघवी झाल्याने तसेच होत असल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन आपल्याला वारंवार पाण्याची तहान लागत असते,तसेच सतत पाणी पिण्याची ईच्छा होत असते.

लघवी सारखी सारखी होत असल्याने तहान लागणे,जिभ कोरडी पडणे.तोंड कोरड पडणे ही लक्षणे जन्माला येत असतात.

म्हणुन जर प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार लघवीचा जाण्याचा त्रास होत असेल तर आपण याकडे दुर्लक्ष न करता वेळ असताच डाँक्टरांना एकदा नक्की दाखवायला हवे.
जेव्हा आपल्याला मधुमेह होत असतो आपल्या रक्तातील साखर रक्तातच राहुन जात असते ती पेशींपर्यत पोहचत नसते.किंवा पेशींना ती साखर वापरता येत नसते.

आणि पेशींना साखर वापरता न आल्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळत नसते.म्हणजेच आपण जे अन्न खातो त्याची साखर होऊन ते पेशीत जात असते आणि त्याचीच उर्जा आपल्या शरीराला प्राप्त होत असते.

आणि ही प्रक्रिया घडुन आली नाही तर आपल्या शरीराला पुरेशी उर्जा प्राप्त होत नसते.त्यामुळे आपल्याला सतत थकवा येत असतो आणि सतत मरगळल्यासारखे देखील वाटत असते.शरीरात अशक्तपणा जाणवत असतो.

जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
‎मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

‎मधुमेह असूनही रक्तातील साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या हृद्य, डोळे, किडनी, मेंदू आणि नाड्यांवर (मज्जासंस्थेवर) होतो.

त्यामुळे अनियंत्रित डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येणे, डोळे जाऊन अकाली अंधत्व येणे, किडन्या निकामी होणे, पक्षाघात (लकवा) किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी होऊन पाय कापून काढावा लागणे असे अनेक गंभीर दुष्परिणाम यामुळे होतात.
डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

अनियंत्रित मधुमेहामुळे अंधत्व, वृक्कसंबंधी आजार आणि अवयव शत्रक्रियेने काढून टाकणे याची पाळी येते. हृदयविकाराची आणि पक्षाघाताची शक्यता दुप्पट होते. मोतीबिंदु, ग्लौकोमा, आणि मधुमेह संबंधी रेटिनाचे विकार यांची शक्यता वाढते.

परिघीय चेता शोथ म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी-मधुमेहामध्ये हातापायाची चेताअग्रे संवेदहीन होतात. डायबेटिक फूट नावाच्या आजारात रुग्णास हाता पायांच्या बोटास किंवा पायास झालेले व्रण, गळू, जखमा यांचे ज्ञान होत नाही.

हातापायांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने रक्तपुरवठा नीट्सा होत नाही. अशामुळे जखमा बऱ्या होण्यास अधिक वेळ लागतो. साध्या साध्या जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या दूषित होतात.

वेदनाना झाल्याने रुग्णाचे नेमके आपल्याला काय झाले आहे याकडे दुर्लक्ष होते. जखम अतिदूषित झाल्यास जंतुविषे शरीरभर पसरून सेप्टिमिया होण्याची शक्यता असते.

हे टाळण्यासाठी डॉक्टर पायाचा दूषित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा निर्णय घेतात.

हृदयविकार आणि वृक्क विकार हे मधुमेही रुग्णाच्या गुंतागुंतीमुळे होणारे विकार आहेत. दीर्घकालीन आजारामध्ये अपोहन – डायलिसिस, वृक्करोपण किंवा वृक्क कामना करणे उद्भवू शकते.

मधुमेही मातांना झालेल्या मुलामध्ये जन्मजात दोष असल्याने यातना होणे हा अनिवार्य भाग आहे

योग्य उपचारांनी मधुमेह कंट्रोलमध्ये न ठेवल्यास किडनीच्या कार्यावर वाईट परिणाम होऊन किडन्या निकामी होऊ शकतात.
आता आपण जाणून घेऊया, त्या शारीरिक बदलांबद्दल जी एकप्रकारे मधुमेहाची प्राथमिक लक्षणेच असतात. हि लक्षणे दिसू लागली कि मधुमेह आपली शरीराला विळखा घालतोय हे समजून जावं.

तुम्ही वेळीच हि लक्षणे ओळखून त्यावर उपचार घेतले तर मधुमेहाला सहज हरवू शकता. पण जर तुमचे दुर्लक्ष झाले तर मात्र मधुमेह हाताबाहेर जाऊ शकतो.

म्हणून तुम्हाला हि लक्षणे माहित असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही ती लगेच ओळखून लवकर उपचार घेऊ शकता.

ब्लड प्रेशर आणि त्वचेशी निगडीत समस्या
सामान्यत: जेव्हा शरीरात ग्लुकोज व साखरेची मात्रा वाढू लागते तेव्हा हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होतो.

हे यामुळे होतं कारण रक्तात ग्लुकोज वाढल्याने रक्त गढूळ होतं आणि ह्या दुषित रक्ताचा प्रवाह संथ होऊन हे रक्त वेळेत हृदयापर्यंत पोहोचत नाही.

ते रक्त पोहोचावे म्हणून शरीर जोर लावते. यालाच उच्च रक्तदाब म्हणतात.

याव्यतिरिक्त त्वचेशी निगडीत समस्या सुद्धा दिसू लागतात. ग्लुकोजच्या वाढत्या मात्रेमुळे पांढऱ्या पेशी अकार्यक्षम झाल्याने रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.

यामुळे त्वचेवर इन्फेक्शन, जळजळ आणि अन्य समस्या सुरु होतात आणि या समस्या दूर होण्यास सुद्धा खूप वेळ लागतो.

खूप भूक लागणे आणि थकवा जाणवने
शरीरातील साखर आणि ग्लुकोज या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करतात.

या आपल्या शरीराचं इंधन आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. परंतु यांची मात्रा अधिक वाढल्याने इन्सुलिनची निर्मिती कमी होत जाते.

त्यामुळे एकाच ठिकाणी हि साखर व ग्लुकोज अडकून राहते व शरीरात असूनही त्याचा शरीरासाठी काही उपयोग होत नाही.

त्यामुळे शरीरात उर्जेची कमतरता भासते व हि उर्जा भरून काढण्यासाठी शरीर तुमची भूक वाढवते. म्हणूनच मधुमेहाच्या सुरुवातीच्या काळात अचानक मोठ्या प्रमाणावर भूक लागण्यास सुरुवात होते.

या कमी ऊर्जेमुळे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे शरीर खूप थकत जाते. अति मेहनतीची कामे करणे शक्य होत नाही आणि आळस वाढत जातो.

तर मंडळी हि काही लक्षणे आहेत जी दिसू लागल्यास तुम्ही तत्काळ मधुमेहाचे उपचार सुरु करणे आवश्यक आहे.
मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांकडूनचं उपचार करून घ्या.

स्वतःच्या स्वतः ऐकीव माहितीवर किंवा जाहिरात पाहून घरगुती उपाय करत बसू नका.

मधुमेह आहार काय असावा

मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.

जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.

मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही.

तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत.
मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याच सोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.
लवकर पचणारे फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे. जे लवकर पचतात आणि आतड्याना साफ ठेवण्यास मदत करतात.
मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्याचे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नये.
मधुमेह झाल्यास तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल.
डॉक्टर कडून सल्ला घेऊन मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक ‘मधुमेह आहार तक्ता’ बनवून घेऊ शकतात.

केळी
केळीमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. मात्र डायबेटिस रुग्णांनी एका वेळेस अर्धे केळी खावीत. त्यामुळे आपल्या शरीराची कार्बोहायड्रेटची कमतरता भरून निघते.

कारले  (mormodica charantia)
या वनस्पतीच्या फळांमध्ये आणि बियांमध्ये रक्तातील साखर कमी करणारे सर्वात सक्रिय घटक असतात.

यामध्ये ऑप्टिक फायद्यांपेक्षा चांगले सेरेंटिन (charantine) नावाचे सक्रिय तत्त्व असते.
4 ते 5 कारल्याचा अतिरिक्त रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
तुम्ही बियांची पावडर थेट किंवा काढ्याच्या स्वरूपात घेऊ शकता.

बेल ( agele marmelos)
ही वनस्पती आपल्या फळांसाठी प्रसिद्ध असली तरी आपल्याला त्याच्या पानांमध्ये रुचि आहे.
ते शास्त्रोक्त पद्धतीने मधुमेहविरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे. रोज चिमूटभर काळी मिरी सोबत पानांचा ताजा रस प्या .
हे तुमच्या रक्तातील साखर कमी  करेल .

नाशपाती

नाशपातीच्या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन व डायेटरी फायबर असतात, ज्यामुळे डायबिटीसमध्ये लाभ होतो.

मेथी ( trigonella greacum)
आयुर्वेदिक साहित्यात मेथीच्या बियांचे औषधी गुण वर्णन केले आहेत. अलीकडील अभ्यासात असे नोंदवले गेले आहे की , मेथीच्या बियांचा काढा
लघवीतील साखरेचे उत्सर्जन कमी होते आणि मधुमेहाची लक्षणे दूर होतात.

जांभूळ

जांभूळ – (eugenia jambolana)
जांभूळ फळाला विशिष्ट औषध आणि पारंपारिक आयुर्वेदिक औषध मानले जाते कारण ते स्वादुपिंडावर विशिष्ट क्रिया करते, फळ, बिया आणी  संपूर्ण फळाचा रस मधुमेहाच्या उपचारात उपयुक्त आहे.

बियांमध्ये jamboline  नावाचा घटक  आहे ज्याने स्टार्चचे साखरेमध्ये जास्त प्रमाणात रूपांतरण नियंत्रित होते.
अंतर्गत वापरासाठी ( internal use) बिया वाळवून , पावडर करा आणि तीन ग्रॅम पाणी किंवा ताकासोबत दिवसातून दोनदा घ्या.

जांभुळदेखील डायबेटीस नियंत्रण करण्यासाठी लाभदायक मानले जाते. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते.
मधुमेहावर नियंत्रण आणण्याकरता सर्वात अगोदर आपल्या जीवनशैली व आहारामध्ये बदल करणे आवश्यक असते.

मधुमेह हा मेटॅबॉलिक डिसअॉर्डर स्वरूपाचा आजार आहे. यामध्ये आपण जे पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतो त्यामधून जी साखर किंवा ग्लुकोज निर्माण होते ती रक्ताद्वारे संपूर्ण शरीरांमध्ये पसरवली जाते.

धात्री निशा – हळद पावडर आणि आवळा पावडर यांचे मिश्रण. हे सकाळी घेत्ल्याने विशेषतः मधुमेही डोळ्यांच्या समस्या (डायबेटिक रेटिनोपॅथी ) मध्ये उपयुक्त आहे.

त्रिफळा – आवळा हिरडा आणि भेहडा यांचे मिश्रण, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याव्यतिरिक्त ते बद्धकोष्ठतेपासून आराम देते डोळ्यांची काळजी घेते  आणि हे अँटीऑक्सिडंट्सचे खूप चांगले स्त्रोत आहे.

सफरचंद
डायबेटिस रुग्णांनी दररोज एक किंवा अर्धा सफरचंद खाल्ले पाहिजे. सफरचंदामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच सफरचंद कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यात देखील लाभकारक असते.

पीच : पीच या फळांमध्ये अत्यल्प प्रमाणात साखर असते त्यामुळे यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी प्रमाणात असते. हे फळ डायबिटीज रुग्णांनी खाणे चांगले असते.

पेरू
पेरूच्या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए व विटामिन सी आणि भरपूर प्रमाणात डायेटरी फायबर असते. पेरूमध्ये अल्पप्रमाणात शर्करा असते, त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी पेरू खाणे चांगले असते.

रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.
[बिलबेरी]] – नावाचे (इंग्लंडमधे मिळणारे) फळ ग्लूकोज नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार दूर करते.
लसूण – ग्लूकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते.
कांदा – ग्लूकोजची पातळी कमी ठेवत असावा. शरीरातील इन्शुलिन कांद्यामुळे उपलब्ध होते.

आफ्रिकन मिरची – मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.
मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.

डायबेटिसच्या रुग्णांनी आपल्या आहारामध्ये कारले, मेथी, शेवगा, पालक, वांगी, दोडके, गिलके, कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा, ब्रोकली, टोमॅटो, सोयाबीन, ढोबळी मिरची, फ्रेंच बीन्स, व सर्व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जास्त प्रमाणात करावा.

अशक्तपणा कमी करण्यासाठी अक्रोड, शेंगदाणे, खोबरे, काजू, इसबगोल, दही किंवा ताकाचे सेवन करावे.

मधुमेहाच्या रुग्णांनी रोज सकाळी उठून उपाशीपोटी एक चमचा मेथीदाण्याची पावडर ग्लास गरम पाण्यासोबत घ्यावीत किंवा रोज रात्री झोपण्याअगोदर जवसाचे दाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवावे व सकाळी हे पाणी उपाशीपोटी प्यावे.

एक तासानंतर शुगर-फ्री चहा किंवा अगदी फिके असलेले बिस्किटांचे सेवन करावे.
सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये व बिना मलईचे दूध १ ग्लास घ्यावे किंवा एक ते दोन वाटी दलिया व ब्राऊन ब्रेडचे सेवन करावे.

डायबेटिसच्या रुग्णांनी आपल्या आहारावर व दिनचर्या जास्त प्रमाणात लक्ष दिले पाहिजे. तसेच सोबत व्यायाम देखील करायला पाहिजे. डायबेटिस रुग्णांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये 60 टक्के कार्बोहायड्रेट, 20 टक्के फॅट्स, 20 टक्के प्रोटीन असे साधारणत: 1500-1800 कॅलरी ऊर्जा शरीराकरता रोज आवश्यक असते.

याकरता डायबेटिस रुग्णांनी रोजच्या आहारामध्ये दोन मोसंबी व तीन प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश अवश्य करावा.

झोपण्याच्या अगोदर एक ग्लास गरम दूधामध्ये १/४ हळद टाकून ते मधुमेहाच्या रुग्णास द्यावे.
एकाच प्रकारच्या पिठाच्या चपात्या किंवा भाकरी न खाता वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांना एकत्र करुन बनवलेल्या चपातीचा व भाकरीचा समावेश आपल्या आहारात करावा.
गहू आणि जवस हे दोन- दोन किलोच्या प्रमाणामध्ये घेऊन त्यामध्ये एक किलो हरभऱ्याची डाळ टाकावी.

हे एकत्र दळुन पीठ बनवून याप्रकारच्या मिश्र धान्यांच्या चपाती किंवा भाकरींचा समावेश डायबेटिस रुग्णांच्या आहारात असावा.

तेल न लावता बनवलेले दोन पराठे व एक कप दही सेवन करावे.
दुपारच्या जेवणाच्या अगोदर एक किंवा अर्धे सफरचंद, एक पेरू किंवा पपईची फोड खावी.
दुपारच्या जेवनामध्ये दोन चपाती, एक छोटी वाटी भात-वरण, एक छोटी वाटी दही व एक वाटी सलाड खावे.
संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये बिना साखरेचा ग्रीन टी व बिना साखरेचे बिस्किट खाऊ शकता.
रात्रीच्या जेवनामध्ये दोन चपाती व एक वाटी भाजी खाऊ शकता.

२५ ग्रॅम अळशीच्या बिया दळुन १ किलो गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करावे व त्या पिठाच्या चपात्या कराव्या व डायबेटिस रुग्णांना खावु घालाव्या. अळशीमुळे रक्तशर्करा नियंत्रणात राहते.
ग्रीन टी चे सेवन डायबेटिस रुग्णांकरता अतिशय फायदेशीर असते.ग्रीन टी असेल किंवा काळा चहा असेल दोन्हीही चहा डायबेटिसकरता चांगले असतात.मात्र त्यामध्ये साखर अजिबात वापरू नये.

पथ्य – अपथ्य
नवीन धान्य, तांदूळ, दुग्धजन्य पदार्थ, उसाचे विविध प्रकार पचनास जड असतात, पचनशक्ती कमी करतात, कफ कमी करतात, त्यामुळे प्रमेहासाठी वाईट.

प्रमेहवर आपण आहार योजनेद्वारे उपचार करू शकतो. हा आहार लठ्ठ व पातळ रुग्णानुसार असावा.
बार्ली-यव (जौ), मध, लहान धान्ये (नाचणी, लहान बाजरी, हरभरा, पॉप अप धान्य) , कडू भाजीपाला, भारतीय बोरासारखे बी असलेले लहान फळ विशेषत: लठ्ठ मेह रुग्णा साठी उपयुक्त आहेत.
पातळ प्रमेहा रुग्णासाठी  बेल ,  मांस, वेळेवर जेवण, जुना मध, उसापासून तयार केलेले अल्कोहोल, तेल, तूप याची शिफारस केली जाते.

नाचणी, लहान बाजरी, हरभरा, पॉप अप धान्य यांसारखी लहान धान्ये पचनास हलकी असतात आणि शिवाय क्लेद कमी करतात.

शरीरातून क्लेद बाहेर काढण्यासाठी, भाजलेले बार्ली /यव(जौ)(भाजलेले धान्यच पीठ  करून वापरावे), गहू , पॉप अप धान्य वापरता येते. मधुमेह साठी उत्तम.

डायबेटिस रुग्णांसाठी काही महत्त्वाच्या बाबी-

ज्या लोकांना मधुमेह हा आजार झाला आहे त्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात फायबर युक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत.

ज्यामध्ये जास्त प्रमाणात चोथा निर्माण होतो असे पदार्थ खाल्ल्यामुळे डायबिटीस आजारांमध्ये नियंत्रण ठेवता येते. तसेच लो फॅट व हाय फायबर फूड खाल्ल्यामुळे डायबेटीसमध्ये शर्करा नियंत्रणात राहते.

उच्च फायबरयुक्त भाज्या, फळे, तसेच सालीसकट असलेल्या डाळी, सगट धान्य तसेच जास्त फायबर युक्त फळांचे सेवन करावे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणता आहार घ्यावा, कोणता घेऊ नये यासाठीचे डायट चार्ट बनवून घ्यावे.
‎डॉक्टरांनी सुचवलेला आहार वेळच्या वेळी घ्यावा.

‎वेळेवर आहार न घेतल्यास मधुमेही रुग्णांमध्ये ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता असते.

यासाठी आहाराच्या वेळा पाळणे मधुमेहींसाठी अत्यंत गरजेचे असते.
‎मधुमेही रुग्णांनी दर चार तासांनी थोडे-थोडे खाणे आवश्यक असते. एकावेळीचं भरपेट जेवणे टाळा.
‎कमी कॅलरीजचा आहार घ्यावा. आहारात गरजेपेक्षा जास्त उष्मांक असल्यास त्यांचं रूपांतर चरबीत होते. यामुळे लठ्ठपणा होऊन इन्सुलिन निर्मितीस बाधा येते.

हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, हातसडीचा तांदूळ यांचा आहारात समावेश करावा. यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ती मधुमेहामध्ये जास्त उपयुक्त ठरतात.
‎मधुमेही रुग्णांनी साखरेचे गोड पदार्थ, विविध मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट (बिस्किटे, पाव, केक इ.), तेला-तुपाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, चरबीजन्य पदार्थ, कंदमुळे (बटाटा, रताळी इ.), जास्त गोड फळे (आंबा, फणस, चिक्कू, केळी इ.) आणि खारट पदार्थ खाऊ नयेत.

मधुमेहाच्या रुग्णांनी साखर खाऊ नये. साखर डायबिटीस बरे करण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढवते. त्यामुळे आपण साखर खाणे बंद करावे. आपण या ऐवजी गूळ घेऊ शकता.
डायबिटीज मधुमेहाच्या रुग्णांनी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
डायबेटिस रुग्णांनी प्रेशर कुकर आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये बनवलेले जेवण जेवू नये.
सूर्यास्त होण्याच्या अगोदर डायबेटिस रुग्णांनी रात्रीचे जेवण करून घ्यावे.
असे म्हटले जाते की मधुमेह हा आजार आनुवंशिक आहे. तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतो. मात्र ज्या लोकांना अनुवंशिक डायबेटिस नाहीव त्या लोकांना अचानक डायबिटीस त्रास सुरु झाला आहे त्या लोकांनी जर योग्य पथ्य -पाणी व आहारामध्ये लक्ष ठेवले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
डायबेटिसच्या रुग्णांमध्ये इन्शुलिनची स्त्रवण होत नसल्यामुळे डायबेटिसच्या रूग्णांनी गोड पदार्थ खाल्ल्यामुळे त्या पदार्थांचे पचन होत नाही व ते पदार्थातील साखर ही लघवीवाटे बाहेर येते. यालाच लघवीतून साखर येणे असे म्हणतात.

योगासनांचा योग्य वेळी सराव केल्यास आपल्याला मधुमेहामध्ये निश्चितच लाभ होतो.

डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम (Excercise workout tips) नियमितपणे करावा.
‎नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
‎व्यायामामध्ये चालणे, पळणे (जॉगिंग), सायकलिंग यासारखे व्यायाम करू शकता.
‎दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
‎व्यायाम करताना शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
‎व्यायामामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
‎रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळावे.
‎सततची बैठी जीवनशैली टाळावी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे.
‎मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.

धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

चला तर जाणून घेऊया काही महत्वाची योगासने ज्यामुळे मधुमेहामध्ये लाभ होतो –

सूप्तमत्स्येन्द्रासन
या योगासनांमध्ये पोटावर दाब दिला जातो. यामुळे पोटासंबंधीचे आजार बरे होतात तसेच स्वादुपिंडावर चांगला परिणाम होऊन इन्शुलिनचे प्रमाण वाढते व डायबिटीसमध्ये बऱ्याच प्रमाणात लाभ होतो.

शवासन
सर्व योगासनांचे प्रकार केल्यानंतर शवासन हा प्रकार शरीराला आराम देण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये संपूर्ण शरीर शिथिल सोडले जाते. ज्यामुळे शरीराला मानसिक तसेच शारीरिक विश्रांती मिळते व त्यामुळे आपल्या शरीरामधील सर्व संप्रेरके चांगल्या प्रकारे स्त्रवु लागतात. डायबेटिस रुग्णांनी शवासन केल्यामुळे अधिक चांगला फायदा मिळतो.नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.

कपालभाती प्राणायाम
हा सर्व आजारांवर अतिशय उपयुक्त असा योगासनाचा प्रकार आहे. यामध्ये आपल्या शरीरामध्ये पोटावर दाब येतो तसेच आपल्या शरीरातील नसांमध्ये रक्तसंचरण चांगले होते. ज्यामुळे सर्व नसा मोकळ्या होतात. डायबेटिसमध्ये कपालभाती प्राणायाम करणे अतिशय लाभदायक असते. कपालभाती प्राणायाम केल्यामुळे मन:शांती लाभते तसेच शारीरिक थकवा देखील निघून जातो. तसेच मेंदू देखील कार्यक्षम होण्यास मदत होते.

धनुरासन
धनुरासन केल्यामुळे आपल्या शरीरातील स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होते. स्वादुपिंडामधूनच इन्शुलिन स्त्रवत असते. त्यामुळे धनुरासन केल्यामुळे इन्सुलिनच्या निर्मिती वर परिणाम होतो व डायबेटिसमध्ये याचा आपल्याला लाभ होतो. तसेच धनुरासन केल्यामुळे पोटासंबंधी आजारामध्ये देखील लाभ होतो.

मधुमेहावरील उपचारासाठी आपले डॉक्टर रुग्णाची प्रकृती, मधुमेहाचा प्रकार, रक्तातील साखरेचे प्रमाण विचारात घेऊन मधुमेहावरील गोळ्या किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन देतील.
‎डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्यावीत.
‎नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी.
‎डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यामध्ये रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

डायबेटीसचे असे करतात निदान – Diabetes test :
मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण फास्टिंग शुगर टेस्ट किंवा पीपी शुगर टेस्टद्वारे तपासले जाते.

फास्टिंग शुगर टेस्ट –
ही चाचणी उपाशीपोटी केली जाते.

नॉर्मल प्रमाण – 70 ते 99 mg/dL पर्यंत.
प्री-डायबेटीस अवस्था – 100 ते 126 mg/dL पर्यंत.
मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर 126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.

पीपी शुगर टेस्ट (Post Prandial test) –
जेवणानंतर ही चाचणी केली जाते.

नॉर्मल प्रमाण – 140 mg/dL च्या आत असणे.
‎प्री-डायबेटीस अवस्था – 140 ते 200 mg/dL पर्यंत.
‎मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर 200 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.

मधुमेहावरील उपचाराचे चार प्रमुख उद्देश आहेत –
1) रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे.
2) डायबिटीजच्या दुष्परिणामापासून रुग्णाचा बचाव करणे.
3) वजन आटोक्यात ठेवणे.
4) उच्चरक्तदाब, हृद्यविकार यासारखे विकार होऊ न देणे.

नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.

Dr. Twinkle Harge

लेखिका या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून मधुमेह व निगडित आजाराच्या अभ्यासक आहेत.

Leave a Comment