आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा कार्ड) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डवर रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठविली जाणार आहे.
आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,
या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे.
आभा हेल्थ कार्डचे लोकांना फायदे काय आहेत?
- तुम्ही नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यास, तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही.
- उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही. तुमच्या मेडिकल स्लिप्स, रिपोर्ट्स इत्यादी गहाळ होण्याची भीती राहणार नाही. तुम्ही सहजपणे तुमचे रेकॉर्ड ऑनलाइन ठेवू शकाल.
- आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, याची संपूर्ण माहिती असेल. तुमचा रक्तगट कोणता आहे, तुम्हाला कोणता आजार झाला आहे, सोबत तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेला होता. ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल.
- मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
- ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
- वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.आभा हेल्थ कार्ड विमा कंपन्यांशी जोडले गेले आहे. ज्याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणे देखील सोपे होईल.
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.
या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल.
याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे कार्ड म्हणजेच तुमचं आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीटही करू शकाल.
या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागदं सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील. त्यामुळे समजा तुमच्याकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.
- आभा कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार लिंक असलेला मोबाइल क्रमांक
आभा आरोग्य कार्ड कसे बनवावे किंवा काढावे ?
– नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे.
– होम पेजवर क्रिएट आभा नंबर असे बटन असेल, त्यावर क्लिक करावे.
– पुढच्या पेजवर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (आभा) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.
आधार कार्ड आणि वाहतूक परवान्याचा वापर करून हेल्थ कार्ड तयार करता येते.
– आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर वाहतूक परवान्याचा पर्याय निवडावा.
राज्यात आतापर्यंत २ कोटी ४४ लाख नागरिकांनी आभा हेल्थ कार्डची नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असल्याचे आरोग्य सेवा विभागााने सांगितले.
आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खासगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जाऊन बनवू शकता. किंवा मग घरबसल्या ऑनलाईनही बनवू शकता.
आता आभा कार्ड ऑनलाईन कसं बनवायचं हे पाहू.
- यासाठी सगळ्यात आधी https://ndhm.gov.in/ असं सर्च करायचं आहे.
- यानंतर ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
- इथल्या Create ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.
- इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
- आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे. तशी सूचना इथं दिलेली असेल. मग next या पर्यायावर क्लिल करायचं आहे.
- सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.
- सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि मग next वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून next वर क्लिक करायचं आहे.
- पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल. Aadhaar Authentication Successful झाल्याचीही सूचना तिथं असेल. त्यानंतर next वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मग next वर क्लिक करायचं आहे.
- तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेसही आभा क्रमांकाशी जोडू शकता.जोडायचा नसेल तर इथल्या skip for now या पर्यायावर क्लिक करा.
- आता स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करायचं आहे.
- तुम्ही याआधी आभा अॅड्रेस तयार केलाय का, असा प्रश्न तिथं विचारला जाईल. तिथल्या no वर टिक करून sign up for ABHA Address रकान्यात क्लिक करायचं आहे.
- इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे.
- खालच्या रकान्यात तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा address तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करायचं आहे.
- तुमचा आभा नंबर आभा address बरोबर लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. आता BACK चं बटन दाबायचं आहे.
आभा कार्डमध्ये गोपनीयतेसाठी काय सुविधा आहे?
आभा कार्ड बनवून तुमची हिस्ट्री कोणाकडेही जाण्याची भीती आहे. असा विचार करत असाल तर तसे अजिबात नाही. गोपनीयतेसाठी सरकारनेही एक चांगलं पाऊल उचललं आहे. तुमच्या संमतीशिवाय तुमचा मेडिकल हिस्ट्री कोणीही जाणून घेऊ शकत नाही. कारण जो मोबाईल क्रमांक आभा हेल्थ कार्डसाठी दिलेला आहे. त्यावर लागलीच OTP येतो. ज्याद्वारे तुमच्या कार्ड वापरासंबंधी संमती विचारली जाईल.
ABHA साठी अॅप आहे का?
होय, तुम्ही प्ले स्टोअरवरून ABHA अॅप डाउनलोड करू शकता. या अॅपचे पूर्वीचे नाव एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड होते.
तुम्ही घरबसल्या बनवू शकता आभा हेल्थ कार्ड
- यासाठी सगळ्यात आधी https://ndhm.gov.in/ असं सर्च करा.
- त्यानंतर ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
- इथल्या Create ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.
- इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
- आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे. तशी सूचना इथं दिलेली असेल. मग next या पर्यायावर जा.
- सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.
- सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग नेक्स्टवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून पुढे जा.
- पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल.
- Aadhaar Authentication Successful झाल्याचीही सूचना तिथे येईल. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मग next वर क्लिक करायचं आहे.
- तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेसही आभा क्रमांकाशी जोडू शकता.
- आता स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करा.
- इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे.
- खालच्या रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा अॅड्रेस तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करा.
- तुमचा आभा नंबर आभा अॅड्रेस लिंक झाल्याचा मेसेज स्क्रिनवर येईल.
- https://youtube.com/shorts/NzCxMgldt68?si=ssvC3rPJpRT4Fpq1
आभा कार्ड डाऊनलोड कसं करायचं?
- आता हे आभा कार्ड डाऊनलोड करण्यासाठी healthid.abdm.gov.in असं सर्च करायचं आहे. इथं लॉग-इन करायचं आहे.
- आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. आभा नंबर, जन्म वर्ष आणि तिथं दिलेलं गणित सोडवून Continue वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ही माहिती Validate करायची आहे. कंटिन्यू वर क्लिक. ओटीपी टाकून Continue वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचं आभा कार्ड दिसेल. इथल्या Download या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
- इथं तुम्ही तुमच्या आभा कार्डवरील ईमेल, फोन नंबर आणि इतर माहिती माहिती एडिट करू शकता. तसंच ते delete किवा deactivate करू शकता.
याची सुरक्षितता किती आहे?
आभा कार्डचे फायदे आपण पाहिलेच. पण, यामुळे प्रायव्हसी आणि सायबर सेक्युरिटीचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता सायबर तत्ज्ञांना वाटते.
या हेल्थ कार्डमध्ये आपली सगळी माहिती डिजिटली ठेवली जाणार आहे. या माहितीला एका सर्व्हरवर एकत्र केलं जाणार आहे.
खासगी पद्धतीनं सुरक्षित वातावरणात लोक त्यांचा डेटा सांभाळून ठेवू शकतील, असा सरकारचा दावा आहे.
पण, सायबर सुरक्षाविषयक तत्ज्ञ यासंबंधीच्या धोक्याची पूर्वसूचना देत आहेत. एखादा डेटा एखाद्या सर्व्हरवर ठेवला आहे, तर त्याच्या सुरक्षेसाठी तुम्ही सरकारवर अवलंबून राहता, असं त्यांचं म्हणणं आहे.