सुतिका परिचर्या (नुकतेच बाळ झालेल्या आईने प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी)
प्रसूतीनंतर नुकतेच बाळ झालेल्या आईने घ्यावयाची काळजी
- प्रसूतीनंतर कळांमुळे स्री थकलेली असते त्यामुळे तिला विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते. वडीलधाऱ्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी समजून घेऊन त्या स्त्रीला विश्रांती द्यावी ज्यामुळे तिच्या शरीरातल्या वाताचे शमन होण्यासाठी मदत होते आणि ताकद भरून येण्यासाठी मदत होते.
2) पटबंध-नवव्या महिन्यात गर्भाशय छातीपर्यंत आलेले असते डिलिव्हरी होताच ते पुन्हा आकुंचन पावते म्हणजेच खाली ओटी पोटापर्यंत गर्भाशय लहान होतो. त्यामुळे पोटाला पोटांच्या स्नायूंना आधार देणे गरजेचे असते म्हणून पोट ,मऊ सुती कापडाने बांधावे. यामुळे कमरेच्या स्नायूंना व हाडांना देखील मदत होते. सिझेरियन झालेल्या स्त्रियांना टाक्यांवर दाब येईल अशी भीती असल्यामुळे ते पटबंध करत नाही परंतु असे न करता त्या स्त्रियांनी देखील पटबंध करावे त्यामुळे तात्यांना देखील फायदाच होतो. पटबंध त्या स्त्रीला सुखकर वाटला पाहिजे असा बांधवा जेवण होताना आणि रात्री झोपताना तो बांधू नये.
3) स्नेहन- म्हणजेच अंगाला तेल लावणे शक्यतो तिळाचे तेल कंबर पाठ पोट पाय यांना लावावे .यामुळे a)डिलिव्हरीच्या वेळी आलेला स्नायूंवरचा ताण कमी होतो. ब)स्नायू रिलॅक्स होतात c)थकवा दूर होतो d)शरीराला ताजे तवानेपणा होण्यास मदत होते.
4) डिलिव्हरीच्या वेदनांमुळे आणि श्रमामुळे ती स्त्री थकलेली असते आणि त्यासाठी तिला यवागू पिण्यास द्यावी. (यवागू बनवण्याची पद्धत-दोन ते तीन चमचे तांदूळ स्वच्छ धुऊन भाजून घ्यावा त्यात साधारण २०० ते ३०० ml पाणी घालावे तो तांदूळ शिजवून घ्यावा मग त्यानंतर त्यात जिरे- धने -काळी मिरी यांची चिमूटभर पावडर घालावी व मीठ चवीप्रमाणे घालावे व त्यात साधारण पाच ते सहा चमचे गाईचे तूप घालावे व गरम गरम ती पिण्यास द्यावी) - 5) पहिले तीन दिवस कडुनिंबाचा रस सकाळी साधारणतः तीन ते चार चमचे प्यावा निंब हे ज्वरहर आहे, रुक्ष आहे, त्यामुळे त्या आईस कोणतेही व्याधी होत नाहीत.
सुतिकेचा आहार (प्रसूतीनंतर नुकतेच बाळ झालेल्या आईने घ्यावयाची काळजी)
1) दूध -आईच्या शरीरात उत्तम व योग्य प्रमाणात दूध उत्पन्न व्हावे यासाठी बाळंतिणीने दूध पिणे जरुरीचे आहे शक्यतो गाईचे दूध असावे. बाळाला दूध पाजण्याआधी त्या आईने स्वतः अर्धा कप गरम दूध प्यावे. शतावरी कल्प सारख्या औषधाचा उपयोग केला असता दुधाची क्वालिटी सुधारते.
2) सुरुवातीला बाळाची भूक कमी असते परंतु क्रमाक्रमाने ती वाढत जाते त्यासाठी त्या आईने दररोज सकाळी एक मोठा कप भरून खीर प्यावे त्यात पुढील खिरींचा समावेश असावा-
अहळीवाची खीर, बदामाची खीर, खारकेची खीर ,खसखशीची खीर
3) ओव्याची पोळी-आई जी पोळी खाणार आहे त्यात थोडा ओवा घालावा त्यामुळे त्या आईस आणि बाळालाही गॅसेस पोट दुखी होत नाही
4) नारळाची आमटी-ही गरम गरम बाळंतीनीस द्यावी यामुळे तोंडाला चव तर येतेच परंतु दूध सुटण्यास मदत होते व बाळंतिणीची ताकद वाढते.
5) मेथीदाण्यांची उसळ-यामुळे हाडे मजबूत होतात फक्त पित्त प्रकृती असलेल्या स्त्रियांनी ही उसळ माफक प्रमाणात खावी.
6) डिंकाचे लाडू-यामुळे शरीरातल्या हाडे मजबूत होतात, बाळंतिणीची कंबर घट्ट व्हावी म्हणून देखील मदत होते.
7) अहळीवाचे लाडू-हाडी मजबूत होतात, ताकद वाढते व दूध येण्यासाठी मदत होते.(प्रसूतीनंतर)
8) बाळंतिणीने सकाळ संध्याकाळ एक-दोन चिमूट ओवा खावा यामुळे पचन चांगले होते व पोटदुखी थांबते ओवा खाऊन झाल्यानंतर बाळाच्या नाभीमध्ये घशातून फुंकर घालावी त्यामुळे बाळाची पोटदुखी थांबते.
पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी
1) पाळीच्या वेळी अग्निमांदय(आहार पचण्यासाठी आवश्यक असलेला अग्नी) कमी झालेले असल्यामुळे स्त्रीने हलका आहार घ्यावा. जड , शिळे, गरम पडणारे अन्नपदार्थ खाऊ नये.
कारण – या वेळात हलका आहार न घेतल्यास पोटात जास्त दुखणे ,पोट साफ न होणे ,मळमळणे ,अपचन, इत्यादी त्रास अधिक प्रमाणात होऊ शकतात
2) पाळीच्या दिवसात पूर्णतः स्त्रियांनी ब्रह्मचर्या पालन करावे
कारण – आयुर्वेद शास्त्रानुसार पाळीच्या वेळात वात वाढलेला असतो अशावेळी व्यवाय झाल्या असता अधिक प्रमाणात वात वाढून पाळीच्या स्रावाला अवरोध उत्पन्न होऊ शकतो.
3) पाळीच्या दिवसात अंघोळ करू नये
कारण – गर्भाशयाचे आकुंचन होऊन पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो त्यात अचानक गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे गर्भाशयाचे अधिक आकुंचन होऊन रक्तस्रावास अडथळा उत्पन्न होऊ शकतो
4) पाळीच्या वेळात देवपूजा, मंदिरात जाणे टाळावे
कारण- मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी अस्तित्वात असते त्यामुळे एक प्रकारे गुरुत्वाकर्षण गतीला अडथळा उत्पन्न होतो त्यामुळे पाळीत होणारा रक्तस्राव हा उर्ध्वगतीने जाऊ शकतो.(प्रसूतीनंतर)
5) पाळीच्या वेळात वात वाढेल अशा कोणत्याही गोष्टी स्त्रियांनी करू नयेत जसे की जोरात चालणे ,उड्या मारणे, अति हसणे ,बोलणे ,अधिक काम करणे.
(म्हणजेच सोप्या भाषेत बाळासाठी हानिकारक असणारा आहार व विहार)
आज कालच्या जगात अबोर्शन ही एक मोठी समस्या झाली आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी न घेणे ,जास्त प्रमाणात फास्टफूड खाणे, योग्य तेवढी विश्रांती न घेणे तसेच व्यायाम वगैरे न करणे इत्यादी आणि यासारख्या अनेक गोष्टींचा यात समावेश होतो.
गर्भिणीने कोणता आहार घ्यावा व घेऊ नये याबद्दल काही थोडीशी माहिती (प्रसूतीनंतर)
१) कोणत्याही प्रकारचे जड पडणारे अन्न खाऊ नये
२) गरम पडणारे अन्न खाऊ नये
३) त्याचप्रमाणे ऍसिडिटी म्हणजेच पित्त वाढ होणारे अन्न जसे की तुरडाळ अति मसाल्याचे पदार्थ इत्यादी खाऊ नये.
४) लसुन सुरण इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये
५) विरुद्ध अन्न जसे की, दूध भात, दहीभात , शिकरण, आजकालच्या फास्ट फूड मधील अन्नपदार्थ जसे की बर्गर आणि कोल्ड्रिंक चायनीज आणि कोल्ड्रिंक असे सगळे पदार्थ टाळावेत
६) गर्भिणीस इच्छा झाली असता भजी पाणीपुरी वडापाव इत्यादी गोष्टी घरात बनवून द्याव्यात बाहेरील उघड्यावरील हे आणि इतर कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नयेत.
७) हॉटेलचे पदार्थांमध्ये बरेचदा भाज्यांना रंग दिसावा यासाठी अनेक प्रकारचे कृत्रिम रंग वापरले जातात त्याचे प्रमाण जर जास्त असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून हॉटेलिंग चे पदार्थ तसेच घरात कोणत्याही पदार्थात रंग टाकून तसे पदार्थ खाऊ नये.
८) मांसाहार हा उष्ण (गरम)पडतो. त्यामुळे तो शक्यतो टाळावाच
९) कोणत्याही प्रकारचे शिळे अन्न जसे की रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचा चिवडा, फोडणीचा भात, रात्री बनवलेला कोणताही पदार्थ सकाळी खाणे असे सर्व प्रकार पूर्णतः टाळावेत.
१०) पपई, जास्त प्रमाणात आंबा इत्यादी फळे टाळावीत.
हे पदार्थ खावेत
१) जेवणामध्ये तुपाचा समावेश असावा. यामुळे जेवणाला चवही येते आणि शरीरात स्निग्धता टिकून राहते.
२) योग्य मात्रेत दूध प्यावे यामुळे आईला ताकदही मिळते आणि डिलिव्हरी नंतर बाळासाठी लागणारे दूध चांगल्या प्रकारे उत्पन्नही होते
३) परंतु दूध हे कोणत्याही प्रकारच्या अन्ना सोबत घेऊ नये पूर्णतः सेपरेट घ्यावे जसे की सकाळी उठल्यावर प्लेन दूध प्यावे किंवा संध्याकाळी प्यावे. नाश्त्याच्या आधी किंवा नंतर जेवणासह दूध घेऊ नये तसे केले असता त्याचा समावेश विरुद्ध अन्न यात होतो.
४) नवीन तयार केलेले ताजे आणि गरमच अन्न खावे यामुळे पोटातला पचनासाठीचा अग्नी ही चांगला राहतो आणि त्यामुळे जेवण रुचकरही लागते
५) सर्व प्रकारच्या फळभाज्या या अल्टरनेटली खाव्यात. पालेभाज्यांमुळे पित्त होण्याची शक्यता असते म्हणून त्या कमीत कमी खाव्यात.
६) कमीत कमी रोज एक फळ खावे. त्यात पपई पूर्णतः;जास्त प्रमाणात आंबा इत्यादी फळे टाळावीत.
७) भूक लागेल त्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतराने पौष्टिक व आवश्यक असणारे अन्न घ्यावे.
८) योग्य प्रमाणात पाणी प्यावे पाणी हे नेहमी एका जागी शांत बसून प्यावे वरून पाणी पिऊ नये. आठवड्यातून एकदा नारळ पाणीही घ्यावे.
९) आहारामध्ये बदाम अक्रोड अशा ड्रायफ्रूट्स देखील समावेश असू द्यावा.
१०) षडरसात्मक म्हणजेच सहा रसांनी युक्त असलेले असे अन्न खावे.
(मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय)
गोड, आंबट, खारट, तिखट, कडू ,तुरट अशा या रसांनीयुक्त अन्न खावे किंवा असे म्हणता येईल की हे सहा रस पोटात जायला हवेत.
Dr. Yogini Pawar
(लेखिका या प्रसुती-शास्त्रच्या अभ्यासक आहेत)
खूप अभ्यासपूर्वक उपयुक्त माहिती
Good Yogini
Keep it up n best luck👍🏻
Good
Keep it up 👍
I am proud of you 🎉🎊