सकारात्मक विचारांमुळे सर्व काही होत नसले, तरी ते तुम्हाला आशादायी बनवितात आणि तुमची उद्दिष्टे साधण्याची प्रेरणा देतात. त्यातून तुमचे जीवन अधिक समृद्ध होते हे निश्चित.(प्रगती)
आपण जसा विचार करतो तसे होतो असे म्हटले जाते ते योग्य आहे.
आशावादी अथवा सकारात्मक विचार करणारी व्यक्ती संकटांत संधी शोधते आणि निराशावादी व्यक्तींना संधी म्हणजे संकट वाटते ते याचमुळे.
आपल्याला प्रगती करावयाची असेल, तर आधी आपले विचार बदलले पाहिजेत. ते कसे करावे हे पाहा.
जीवनात प्रगतीची संधी सदैव असली, तरी तिचा फायदा घेणे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते.
त्यात महत्त्वाचे असतात आपले विचार. आपण ते कसे करतो यावर भवितव्य ठरते.
नकारात्मक विचार कायम नुकसानच करतात. उदा. तुम्ही स्वतःला कुरूप, आळशी अथवा जीवनात अपयशी ठरल्याचे समजत असाल, तर या विचारांचा परिणाम मेंदूवर होऊन तो तसेच वागायला लागतो.
मग तुम्ही तुमची कामे टाळायला लागता, निराश होऊ लागता. त्याचे कारण एकच : तुमचा मेंदू वास्तव आणि आभास यातील फरक ओळखत नसणे.
तो तुम्हाला यातील फरक दाखवत नसल्यामुळे तुमचा स्वभाव बदलून जातो. पण, आशादायी विचार केलात, तर प्रगती होणे कठीण नसते. यात बदल होण्यासाठी काही उपाय आहेत.
प्रगती होईल हा प्रयोग करून पाहा…
तुमचे डोळे बंद करा आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यासारख्या एखाद्या छान दृश्याची कल्पना करा.
केवळ असा विचार केल्यामुळेसुद्धा तुम्हाला किती आनंद मिळतो हे समजेल.
त्याचे कारण म्हणजे, तुम्ही कल्पनेत पाहत असलेले दृश्य तुमच्या मेंदूने वास्तवात आणून दाखवणे. आता मनात काही नकारात्मक अथवा निराशावादी विचार आणा आणि त्याची अनुभूतीही येईल. तुमचे शरीर त्यावरही विश्वास ठेवते.
म्हणजे, आपण दिसायला वाईट असल्याचा विचार करत राहिलात, तर तुमचे शरीर त्याला खरे मानते. याच्या उलट आपण दिसायला चांगले आहोत, आनंदात आहोत आणि निरोगी आहोत असा विचार केलात तर शरीर त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देईल.
शब्दांमधील सामर्थ्य तुमच्या लक्षात आता आले असेल. तुमचे विचार आणि शब्द तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतात किंवा नैराश्याच्या गर्ते तही ढकलू शकतात.
शब्द आणि विचार म्हणजे जादू आहे आणि सकारात्मक विचारांचा कायम फायदा होतो. यासाठी आत्मविश्वास हा घटक मोलाचा असतो.
तुम्ही ठामपणे उच्चारलेल्या शब्दांतून अथवा विचारांतून तो प्रकट होतो. तुमचे विचार बदललेत तर जगही बदलते. शरीर आणि मनाचे संतुलन साधले जाऊन तुम्ही नैराश्यातून बाहेर येता.
आपल्याला समाधानी जीवन हवे असेल, तर सकारात्मक विचार आवश्यक असतात. त्यांच्यामुळे निरोगी जीवन लाभते आणि दुर्बल रोगप्रतिकारशक्ती, स्थौल्य किंवा मधुमेहासारख्या जोखमीसुद्धा कमी करता येतात.
सकारात्मक विचारांमुळे औषधे घेणे, आहारावरील निर्बंध टाळता येत नसले, तरी जीवन सुखकारक होण्यास त्यांची मदत होते.
सकारात्मकतेसाठी शब्द आणि भावना हे दोन घटक महत्त्वाचे असतात. शब्द केवळ बोलून चालत नाही, तर ते अनुभविता आले पाहिजेत. ‘माझी प्रकृती उत्तम आहे,’ असे म्हणताना तुम्हाला त्याचा अनुभव आला पाहिजे.
त्यासाठी आपण तसे असल्याची कल्पना करा. तुमचे शब्द आणि भावना एकत्र येतात तेव्हा ते सुपरपॉवर होतात. प्रख्यात विनोदी अभिनेते जिम कॅरी यांचे एक विधान यासाठी लक्षात ठेवा.
ते म्हणतात, ‘तुम्ही ते पाहू शकत असाल आणि त्यावर विश्वास ठेवत असाल, तर ते स्वीकारणे फार सोपे असते.’
जीवनात सकारात्मक जाणिवा होण्यासाठी काय उपाय आहेत ते पाहा.
भीतीवर मात करा : (प्रगती होईल)
‘मी धाडसी आहे,’ अशी जाणीव स्वतःला करून देत राहिलात, तर तुमच्या चिंता आणि भीती कमी होत जाते.
सकारात्मक राहा : (प्रगती होईल)
‘मी आशादावादी आहे,’ किंवा ‘मी कोणत्याही स्थितीबरोबर मुकाबला करू शकतो,’ असे विचार करायला लागलात, तर कोणत्याही समस्येकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकता.
तणाव कमी करा : (प्रगती होईल)
‘तणावाच्या कोणत्याही प्रसंगात मी शांत राहू शकतो,’ असा विचार केलात, तर तुम्हाला तणावाबरोबर योग्य प्रकारे सामना करता येऊन त्याचे ओझे कमी होण्यास मदत होते.
दुसऱ्यावर ठपका ठेवू नका.
उद्दिष्टांची पूर्तता :
स्वतःमध्ये सतत सुधारणा करण्याची तयारी ठेवा.
‘माझी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी काम करणार,’ यासारख्या विचारामुळे तुम्हाला प्रेरणा मिळून तुम्ही ती गाठता.
आत्मविश्वास वाढवा : (प्रगती होईल)
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला शिका.
‘मी बहुमूल्य आहे,’, ‘मी चांगला आहे,’ किंवा ‘माझ्याकडे सर्व काही पुरेसे आहे,’ असे स्वतःला सांगत राहा. त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढतो.
‘माझा स्वतःवर विश्वास आहे,’ यासारख्या विचारांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढून प्रगती होते.
हस्तांदोलन करताना दुसऱ्याचा हात घट्ट पकडा.
तुम्हाला जे घाबरतात त्यांना तुमच्या मनाचा हळवा कोपरा देखील दिसू द्या. समोरच्या व्यक्तीशी नजर भिडवून बोला.
मी चूक केली, असे म्हणायला अजिबात बिचकू नका.
एखादी गोष्ट माहीत नसेल तर तसे स्पष्ट सांगायला लाजू नका.
निरोगी राहा :
‘मी निरोगी आणि बळकट आहे,’ असा विचार केल्यामुळे तुम्ही आरोग्य जपण्याबाबत जागरूक राहता आणि त्याचा फायदा प्रकृती उत्तम राहण्यात होतो.
नातेसंबंध दृढ करा :
‘मी एक चांगला मित्र आहे,’ हा विचार तुम्हाला नातेसंबंध दृढ करण्यासाठी मदत करतो. केवळ मित्रच नव्हे, तर अन्य सर्वांबरोबर तुमचे संबंध सौहार्दाचे राहतात.
भेटल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या आधी हॅलो म्हणा.
दुसऱ्याला तुमची गरज भासेल तेव्हा मदतीला धावून जा. काहीही झाले तरी तुम्ही दिलेला शब्द पाळा.
समाधान शोधा : ‘माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे,’ असा विचार केलात, तर तुम्ही समाधानी राहाल. तुमचे जीवन आनंदी होईल.
सगळ्यांचे स्वागत करा :
‘माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी मी तयार आहे,’ अशा विचारामुळे तुम्ही शांत राहता. हा विचार तुम्हाला सकारात्मकही बनवितो.
आयुष्यात सगळे चांगलेच घडेल असे गृहित धरून चालू नका.
शब्द आणि भावनांचे संतुलन साधण्यामुळे उद्दिष्टांची पूर्तता होण्यास मिळत जाते प्रेरणा
सकारात्मक विचार म्हणजे निरर्थकता असल्याचे काहींना वाटत असले, तरी त्यामागे शास्त्र आहे. शिवाय, असे विचार करण्यात वाईट काय? आपल्याबाबत काही चांगले विचार करण्यामुळे नुकसान काय होणार ?
आशादायी असणे चांगलेच असल्याने तसेच विचार करा आणि समाधानी जीवन अनुभवा.
आनंदाचे क्षण गवसण्यासाठी विचार पद्धती बदला.