तुम्ही पैशाला जपा पैसा तुम्हाला जपेल.

सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून येतात. हा गोष्ट म्हणजे पैसा.

पैशाचीसुद्धा मुलांप्रमाणेच जास्तीत जास्त काळजी घेऊन त्याचे योग्य संगोपन करून त्यात वाढ घडवून आणणे गरजेचे असते. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यावर नोकरी-व्यवसायामुळे तुमच्यासोबत राहतीलच असे नाही आणि पालक म्हणून त्यांच्या प्रगतीच्या आड न येता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणे योग्य असते, पण पैशाची वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं. ज्यामुळे त्याचे संगोपन केले, तर त्यात वृद्धी तर होईलच आणि आपल्या retirement नंतर तो आपली निश्चितच काळजी घेईल.

१. Retired Life साठी नियोजन हवं

समजा, आज तुमचे वय ३० वर्षे आहे. वयाच्या ६०व्या वर्षी नोकरी व्यवसायातून तुम्ही Retire होणार आहात असे गृहीत धरल्यास retirement नंतर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल; तर आजपासूनच आपल्या पैशाची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक ती गुंतवणूक नियमित करण्यास शक्य तितक्या लवकर सुरुवात करावी. उदाहरणार्थ, सध्या कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी ५०,००० रुपये लागत असतील, तर रिटायरमेंटनंतर जरी मुलांसाठीचे काही खर्च कमी झाले तरी वैद्यकीय खर्च या वयात वाढणार आहे. म्हणजेच ३० वर्षांनी आजच्या ५०,००० रुपयांची गरज भागविण्यासाठी आत्ताचा वाढता महागाई दर बघता त्या वेळचे सुमारे अडीच लाख रुपये दर महिन्याला मिळणे आवश्यक ठरेल.

२. गुंतवणुकीला लवकर सुरुवात व सातत्य आवश्यक

कमी वयात गुंतवणूक सुरू करणे आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या गरजांचा आढावा घेऊन त्या नियोजनात सतत सुधारणा करत राहणे गरजेचे असते. आर्थिक नियोजन जितक्या लवकर करू, तितका गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळत असल्याने कमी गुंतवणूक करून, उद्दिष्टपूर्तीसाठीची तरतूद करणे सोपे होते. नियोजनास उशीर झाल्याने बऱ्याचदा कमी वेळेमुळे पुरेशी तरतूद करणे शक्य होत नाही.

३. विम्याचे कवच गरजेचेच :

या नियोजनात काही कारणाने व्यत्यय आला, तर व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. यासाठी शक्य तितक्या लवकर मुदतीचा जीवन विमा अर्थात टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ पट भरेल इतके कवच असलेली टर्म पॉलिसी घ्यावी. सोबतच सुरुवातीस किमान तीन लाखांचे कवच असणारी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसी घ्यावी. पुढे दर पाच वर्षांनी साधारण एक लाखाने तिचे कवच वाढवत न्यावे किंवा टॉप-अप पॉलिसी घ्यावी.

४. इच्छापत्र :

आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही रक्कम पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. मात्र आपल्या पश्चात आपल्या मर्जीनुसार वाटप व्हावे यासाठी वेळीच ‘विल’ म्हणजेच इच्छापत्र तयार करून घ्यावे. अशा रीतीने पैशाचे योग्य ते नियोजन केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहून आपल्याला सेवानिवृत्तीचा आनंद स्वेच्छेने उपभोगता येईल.

सगळे रस्ते बंद आहेत असं वाटतानांच आतून ‘ सगळं चांगल होणारं आहे’ असा आवाज येत असतो, तो परमेश्वराचा असतो. त्याच्या अस्तित्वाबद्दल मनात कितीही शंका आल्या तरी तो कांही आपल्या आत्म्यात वास करायचा सोडत नाही. Self motivation म्हणजे दूसरं तिसरं कांही नसून तो आतला आवाज आहे, पण तो कांही एका रात्रीत निर्माण होत नाही, ती एक process आहे. 

छन्नी हातोड्याचे घाव जसे दगडाला एका सुंदर मुर्तीत परावर्तित करतात, तसं योग्य प्रकारे केलेली ध्यानधारणा (meditation ) उपासना मनाला,आत्म्याला हवा तसा आकार देऊ शकते. (पैसा)

मग हवं तेंव्हा निर्झरासारखं खळाळता येतं , फेसाळणाऱ्या उथळ धबधब्यासारखं धुंद होऊन बागडता येतं , हवं तेंव्हा न आवडलेल्या गोष्टींना , माणसांच्या न आवडणाऱ्या सवयींना आत खोल काळजात सामावुन मनाला डबकं न बनू देता ,वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं संथ वाहतां येतं , 

हवं तेंव्हा हृदयातल्या लाटांना कवेत ठेवून , भावनांच्या भरती ओहोटीशी सामना करून , समुद्राच्या पाण्यासारखं वरून आणि हळूहळू आतूनही शांत संयमी बनत जाता येतं! (Trust the process)

3 चुका ज्या 80% लोक करत आहेत त्या प्रत्यक्षात तुमच्या मनाला गोंधळलेल्या स्थितीत आणत आहेत.

1. मन आणि शरीरासाठी विश्रांती न घेणे ज्यामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा संपुष्टात येते.

2. “Multitasking” जिथे तुमच्या प्रत्येक दिवसातील २५% वेळ “Distractions” मुळे वाया जात आहे.

3. विनाकारण “Perfection” च्या दबावातून जाताना चिंता, तणावाला आमंत्रण देणे. या सर्व गोष्टींना कसे सामोरे जावे हे माहीत नसताना, खूप जास्त दबाव वाढवून आपल्या कार्यशक्ती कमी करवून घेणे.  

पैसा कमावण्यासाठी प्रयत्नांपासून दूर पळू नका, तर याविषयी जागृत व्हा. कामात दिरंगाई न करणारे आणि कोणतंही काम छोटं न समजणारे लोक कधीच बेरोजगार होत नाहीत.(पैसा)

नवीन गोष्टी शिकण्यात रूची दाखवणारे आणि लोकांच्या ज्ञानाचा सन्मान करणारे लोक खऱ्या अर्थाने पैशाचा विनियोग कसा करावा, हे जाणतात.

शिवाय, योग्य ठिकाणी बचत करतात आणि वायफळ खर्चही टाळतात. कारण अशा लोकांना पैशाचं हे सूत्र माहीत असतं :

पैशाची समस्या = निष्काळजीपणा + आळस + चुकीच्या सवयी – समज.

आपल्या सृजनात्मक विचारशक्तीच्या साहाय्याने लोकांना आवश्यक वाटणाऱ्या नवीन वस्तूंची निर्मिती करा.

मग तुम्हाला कधीच पैशाची समस्या भेडसावणार नाही, पण यासाठी कंजुषी न करता गरजूंना दान करण्याची सवय अंगी बाळगा.

कारण ही सर्व आहेत, समृद्धीची रहस्यं… तुम्हीही यांचा वापर करून तुमच्या जीवनात समृद्धी अनुभवा.

थांबलेला पैसा आणि साचलेलं पाणी एकसमान आहेत, अशा पाण्यातून दुर्गंधी येेऊ लागते.(पैसा)

Leave a Comment