ड जीवनसत्त्वे व आरोग्य विषयक माहिती, भाग 2 : डॉ प्रमोद धुमाळ

आजच्या काळात सगळ्या ऐशआरामाच्या गोष्टी घरबसल्या मिळत आहेत. त्यासाठी कोठे उठून जायची गरज नाही. त्याचा परिणाम म्हणून विविध आजारांच्या रूपाने समोर येत आहे. (ड जीवनसत्त्वे)

तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्ही दिवसेंदिवस तणाव आणि आजारपणाने घेरलेले असता. यामधून बाहेर निघण्यासाठी काही उपाय –

चालणं अत्यंत सोपा व्यायाम आहे. यामुळे शरीराला जास्तीत जास्त फलदा होतो. कारण यामुळे शरीराच्या सगळ्या मांसपेशी सक्रिय होतात. शिवाय हा व्यायाम करायला याचंही बंधन नाही

प्रत्येक वयातील व्यक्ती व्यायामाचा लाभ घेऊ शकतात. शिवाय कोणत्याही वेळेस तुम्ही चालू शकता. मात्र एका निश्चित वेळेत चालण्याने या व्यायामाचा अधिक फायदा होतो.

यामुळे पेशींना आराम मिळतो. याशिवाय चालण्याचे इतरही लाभ आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात…

नियमित चालण्यामुळे पायाच्या पेशी, हात, पोट आणि छातीला योग्य बळ आणि आकार मिळतो.

• नियमित चालण्यामुळे मेंदुला आराम मिळतो. तणाव कमी होतो. तसंच उच्च रक्तदाबही कमी होतो.

• सगळे अवयव निरोगी राहण्यास मदत होते. इंद्रियांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. रक्तप्रवाह उत्तम होण्यास मदत होते. ज्यामुळे सेक्सुअल पॉवर वाढण्यासही मदत होते.

जास्त वेळ चालण्यामुळे मधुमेह, हृदयरोग,रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

• निसर्गातील स्वच्छ हवा आणि ताजेपणा मिळविण्यासाठी सकाळी चालणं हे एक चांगलं माध्यम आहे.

• असं म्हणतात की, निसर्गाविषयी विशेष प्रेम असणारी व्यक्ती एक चांगली लेखक, कुशल संगीतज्ञ तसंच उच्च कोटीचा कलाकार असतो. या दृष्टिकोनातूनही फिरणं लाभदायक ठरतं.

• चालण्याची सवय असणारी व्यक्ती वाहनांचा कमीत कमी वापर करते, ज्यामुळे आर्थिक बचतही होते.

रोज मॉर्निंग वॉक करा, जमल्यास रनिंगही करा.

ऑफिसमध्ये जाताना लिफ्टचा वापर करू नका. जिन्याचा वापर करा.

जर घरी कुत्रा पाळला असेल तर त्याला फिरायला घेऊन जा.

● तुम्ही स्वतः मुलांबरोबर वेळ घालवा, त्यांच्याबरोबर खेळा, बाग लावा.

तळलेले पदार्थ आणि चरबी युक्त पदार्थ टाळा.

● स्वतःला कामात व्यस्त ठेवा. तुमचे मन लागेल त्या कामात वेळ घालवा.

● शक्यतो योगा आणि प्राणायम करा.

तणाव कमी करण्यासाठी जीवनात सकारात्मक विचार करा.

तारुण्याच्या रक्षणासाठी नियमितपणे चालणं-पळणं फायदेशीर ठरते

हाडं ठेवा आयुष्यभर मजबूत (ड जीवनसत्त्वे)

हाडांच्या आरोग्यावर वाढत्या वयाचा दुष्परिणाम होतो. महिलांमध्ये याचं प्रमाण अधिक आढळतं. (ड जीवनसत्त्वे)

पण चांगली गोष्ट ही की, संतुलित-पोषक आहार आणि व्यायामाच्या जोडीने तुम्ही हाडांच्या रोगाला लगाम लावू शकता…

मोनोपॉजचा (menopause) सामना वयाबरोबर बोन मास किंवा घनत्त्व कमी होतं. (ड जीवनसत्त्वे)

मोनोपॉजनंतरच्या (menopause) पाच-सात वर्षात महिलांच्या हाडांच्या घनत्त्वामध्ये २० टक्के कमी आढळते. म्हणून वेळोवेळी डॉक्टरांकडून आपल्या हाडांच्या आरोग्याविषयी जाणून घ्यायला हवे.

ड जीवनसत्त्वाविषयी तीन वर्ष सातत्याने चाललेल्या एका संशोधनात आढळल की, भारतातील महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाचा (vitamin D) अभाव आढळतो.

१० पैकी ७ महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आढळते. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून ड जीवनसत्त्व (vitamin D) आपल्या शरीराला मिळत असतं.

महिलांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते. ड जीवनसत्त्व शरीरात कॅल्शियमची पातळी कायम ठेवण्यास मदत करते, तसंच फॉस्फरसलाही नियंत्रित ठेवते.

कॅल्शियमची गरज : हाडं मोठ्या प्रमाणात कॅल्शियम शोषून घेतात. जेव्हा शरीरात या खनिजाची कमतरता निर्माण होते, तेव्हा सांध्यांमध्ये बेदना जाणवू लागते.

२० ते ४० बयोगटातील व्यक्तींनी दररोज १०० मिलीग्रॅम कॅल्शियम शरीरात जाईल, याची काळजी घ्यावी. बाढत्या वयाबरोबर हे प्रमाण वाढत. भरपूर प्रमाणात कॅल्शियमयुक्त संतुलित आहाराचं सेवन महत्त्वाचं आहे. (ड जीवनसत्त्वे)

वयस्कर स्त्री-पुरूषांनी रोज १२०० मिलीग्रॅम कॅल्शियमचं सेवन करणं गरजेचं आहे.

दुग्धजन्य पदार्थ, मासे, पालेभाज्या, ब्रोकोली, बदाम, सुकं अंजीर, सोया दूध हे कॅल्शियमचे उत्तम पर्याय आहेत.

व्यायाम खूप आवश्यक :(ड जीवनसत्त्वे)

योग्य व्यायाम शरीरात शक्ती, संतुलन आणि लवचिकता कायम राखण्यास मदत करतो. महिला वेट विअरिंग एक्सरसाइजने सुरूवात करू शकतात.

हाडांची शक्ती वाढविण्यासाठी असा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा, हाडांवरील लोड कॉम्प्रेस होईल. धावणे, अॅरोबिक्स, सतत पायऱ्या चढणं, नाच, टेनिस, बास्केटबॉल हे हाडं उत्तम होण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

जाता जाता गाजराविषयी माहिती जाणून घेऊया..(ड जीवनसत्त्वे)

गाजर खाऊन आपण सुंदर दिसू शकतो, असे म्हटल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

कारण गाजरामध्ये कॅरोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम, विटामिन-सी, विटामिन, डी फॉलिक ऍसिड, बी कॉम्प्लेक्स असे शरीरासाठी अनेक उपयुक्त घटक असतात. 

गाजरात असलेले कॅल्शियम शरीरामध्ये सहज पचते. त्यामुळे गाजर खाऊन आपण शरीराला लागणारी कॅल्शियमची गरज भागवू शकतो.

गाजराचा रस पिण्यातून देखील ही गरज भागू शकते. गाजराचा हलवा किंवा बर्फी करण्याऐवजी गाजरे चावून खावीत. त्यामुळे दात हिरड्या मजबूत होतात आणि त्याबरोबरच गाजराचा नैसर्गिक रस पोटात जातो.

गाजरामध्ये विटामिन- अ भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे निरोगी, टवटवीत राहतात. त्यासाठी अधूनमधून खाण्यामध्ये गाजराचा समावेश करावा.

गाजर मधुमेहामध्ये फार उपयुक्त असल्यामुळे मधुमेही व्यक्तींनी गाजराचा रस प्यावा, असे सांगितले जाते.

गाजरामधील ई जीवनसत्त्वामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ शकत नाही. 

गाजराचा रस हा कर्करोगासारख्या व्याधीवर विजय मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर मर्यादित प्रमाणात गाजर खाण्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही. गाजर खाण्यामुळे पचन सुधारते.

पोटाच्या, आतड्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी गाजराचं सेवन करावं.

अनेक लोकांना पोटात जंत होण्याची समस्या असते, या समस्येवर मात करण्यासाठी दररोज सकाळी एक कप गाजराचा ज्यूस पिल्यानं हा आजार कमी होतो.

त्याचबरोबर तुम्हाला जुलाबाची समस्या उद्भवत असेल किंवा मळमळ होत असेल, तर त्यासाठी गाजराचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं.

गाजर खाण्याचे फायदे (ड जीवनसत्त्वे)

१) रक्तातील साखर नियंत्रित करते : (Controls sugar)

गाजर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह रोखण्यात मदत मिळते. अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की गाजराचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. त्यामुळे भविष्यात टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो.

२) हृदयासाठी चांगले : (good for heart)

तुम्ही हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्यांशी झुंज देत असाल, तर गाजर खूप उपयुक्त ठरू शकते. कारण गाजरं पोटॅशियमने युक्त असतात.

पोटॅशियम शरीरातील धमन्या, रक्तवाहिन्यांसाठी आवश्यक असते. पोटरॅशियममुळे रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत होते. त्यामुळे रक्तदाब कमी होतो.

३) त्वचा चमकदार बनवते : (glow your skin)

तुम्हाला मुरूम, त्वचारोग, पुरळ इत्यादी

त्वचेचे आजार बरे करायचे असतील, आहारात गाजराचा समावेश करावा. गाजरांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेच्या आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत करतात.

शरीरात पोटॅशियमची कमतरता असल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. तथापि, आपल्या आहारात गाजरांचा समावेश केल्यास त्वचेच्या कोरडेपणाचा सामना करण्यास मदत होते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

1 thought on “ड जीवनसत्त्वे व आरोग्य विषयक माहिती, भाग 2 : डॉ प्रमोद धुमाळ”

Leave a Comment