जितकं मिळतं त्यापेक्षा अधिक दया.

आजकाल यश मिळवणं सोपं झालंय. आपल्याशी स्पर्धा करणारंच कुणी उरलेले नाहीय. तुम्हाला आयुष्यात पुढं जायचं असेल तर एक किलोमीटर अधिक जा.

हे एक अधिक किलोमीटर अंतर गेलात की स्पर्धाच नाही. तुम्हाला कामाचा जेवढा मोबदला मिळतो त्यापेक्षा थोडं अधिक काम करण्याची तुमची तयारी आहे का?

तुमच्या माहितीतले किती लोक अशा प्रकारे थोडं जास्त काम करायला तयार आहेत? फारच थोडे असतील बहुतेक लोकांना मोबदल्याएवढंही काम करायचं नसतं.

त्याशिवाय आणखीही दुसऱ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना कमीत कमी काम करायचं असतं.

नोकरी चालू राहावी म्हणून ते पाट्या टाकत असतात.

फार थोडे लोक मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करायला तयार असतात.

ते लोक अधिक काम का करतात? तुम्ही जर या शेवटच्या गटातले असाल तर मग तुम्हाला स्पर्धा कोठे आहे? मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्याचे काही फायदे असतात.

तुमचं काम कोणतंही असो किंवा कुठंही असो, अधिक काम करण्यामुळे तुमची किंमत वाढते.

त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

लोक तुमच्याकडे नेता म्हणून पाहू लागतात.

इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात.

वरिष्ठ तुमचा आदर करू लागतात.

तुमच्या कनिष्ठांची आणि वरिष्ठांची तुमच्यावर निष्ठा बसते.

त्यामुळे सहकार्याचं वातावरण निर्माण होतं.

तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे वा व्यक्तीसाठी काम करत असाल तर ईश्वराला स्मरून प्रामाणिकपणे खरोखरच काम करा.

– किम हबार्ड

अशा कार्यक्षम व इमानदार माणसांना सगळीकडे नेहमीच मागणी असते, त्यांचं वय, अनुभव आणि औपचारिक शिक्षण काहीही असो, ही माणसं कष्टाळूपणे काम करतात. वक्तशीर असतात आणि समंजस असतात.

ही माणसं काळजीपूर्वक ऐकतात आणि काटेकोरपणे आज्ञा पाळतात, खरं बोलतात, आणीबाणीच्या प्रसंगी बोलावल्यानंतर मागं सरकत नाहीत.

ही माणसं कामाचा बाऊ न करता त्यातून निर्माण होणाऱ्या गोष्टीवर भर देतात. ती आनंदी आणि शिष्टाचार पाळणारी असतात.

जे काही करायचं, दयायचं असेल त्याचं मोल वाढेल असं करा. उदाहरणार्थ, नुसतं भेटणं हा निव्वळ उपचार ठरतो.

मात्र त्या भेटण्यात आपुलकी, प्रसन्नता असेल आणि त्या भेटीने समोरच्या व्यक्तीला धीर मिळेल / तिचं दुःख हलकं होईल/तिला विवंचनांचा विसर पडेल/आल्हाद वाटेल तर त्या भेटीचे मोल नक्कीच वाढते.

म्हणजे कृती तीच, पण ती मनापासून, अधिक चांगल्या प्रकारे केली तर तिचं मोल वाढतं.

कोणतीही कृती करण्याआधी हा विचार जरूर करा.

यशाचं रहस्य अगदी दोनच शब्दांत सांगायचं म्हणजेः ‘अधिक काहीतरी’ करणं.

यशस्वी ठरणारे लोक जे आवश्यक आहे ते तर करतातच शिवाय ‘अधिक काहीतरी’ करतात.

ते त्यांचं कर्तव्य करून थांबत नाहीत तर ‘अधिक काहीतरी’ करतात.

विजेते, यशस्वी लोक हे सौजन्यशील, उमदे असतातच – त्याचबरोबर ‘अधिक काहीतरी’ करणारे असतात.

ते भरवशाचे तर असतातच- पण ‘अधिक काहीतरी’ करणारे असतात.

यशस्वी लोक त्यांच्याकडून होईल तितके तर करतातच पण ‘अधिक काहीतरी’ करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे धावण्याची स्पर्धा.

यात शेवटच्या टप्प्यात प्रत्येक स्पर्धक अटीतटीने आपापल्या संपूर्ण शक्तीनिशी धावत असतो.

मात्र चढाओढीत सरस ठरण्यासाठी आपली सर्वोच्च क्षमता ओलांडून जो इतरांपेक्षा ‘अधिक काहीतरी’ करतो, तोच स्पर्धक विजेता ठरतो.

भरवसा, जबाबदारी आणि लवचिकता यांच्या अभावी आपली क्षमता हे एक लोढणं ठरतं.

वाखाणण्याजोगी शैक्षणिक कारकीर्द असलेली अनेक बुद्धिमान माणसं आयुष्यात अयशस्वी होतात किंवा अगदी सामान्य दर्जाचं आयुष्य का जगतात? 

कारण, ‘कामं का होत नाहीत’ या विषयातच ती माणसं तज्ज्ञ होतात आणि नकारात्मक ऊर्जेचा संचय करतात.

त्यांना ज्याच्याबद्दल पगार मिळतो ते काम करायचं नसतं किंवा कमीत कमी काम करायचं हेच त्यांना भूषण वाटत असतं.

मग ते अपयशी आयुष्य जगत असल्यास नवल ते काय? जेव्हा आपण मोबदल्यापेक्षा अधिक काहीतरी देतो किंवा करतो तेव्हा आपण आपल्याशी होणारी स्पर्धा नाहीशी करतो.

खरं म्हणजे अधिकाधिक उत्तम कामगिरीसाठी आपली स्वतःशीच स्पर्धा सुरू होते.

अशी मनोवृत्ती ही बुद्धिमत्ता किंवा पदवी यांच्यापेक्षाही अधिक महत्वाची आहे.

लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा…

Leave a Comment