चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर ताप आल्याचे निमित्त

अहेरी (जि. गडचिरोली): आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. अशिक्षित आई-वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. (चिमुकल्या दोघांचा मृतदेह)

दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली. दोघांनीही बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला.

अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले.

बाजीराव रमेश वेलादी (वय ६), दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी मृत भावंडांची नावे आहेत.

४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली.

काहीवेळातच दोघांची प्रकृती खालावली. थोड्या अंतराने दोघांचा मृत्यू झाला, आरोग्य केंद्रातून पत्तीगावसाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली.

हे सर्व समाजात चाललयं काय? आपला समाज इतका कसा असंवेदनशील असू शकतो?

अजून किती अंधश्रद्धा बळी जाणार?

खरंच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती का?

असे एक ना अनेक प्रश्न जनमानसातून विचारले जात आहेत

भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, नेमके कारण अस्पष्ट आहे. चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला; पण नातेवाइकांनी ऐकले नाही.

- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

आई-बापाची भाबडी आशा; पण… मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली;

पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्र्तीगावला पोहोचले.

दोघा पोटच्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी अंतर कापत आई- वडिलांनी घर गाठले.

कोणीही कधीही आजारी पडू द्या सर्वांनी आधी डॉक्टर कडे जाऊन च उपचार घ्या.

भोंदू बाबा अंगारे धुपारे करत बसू नका.

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. मृतदेह

अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच .

समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे.

याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला.

Leave a Comment