खजूर विषयी व इतर आरोग्य विषयक माहिती भाग 3 : डॉ प्रमोद धुमाळ

यालेखात खजूर खाण्याचे फायदे व इतर आरोग्य समस्या बद्दल जाणून घेऊया

नियमितपणे धावण्याचा व्यायाम केल्यास नैराश्य (डिप्रेशन) नष्ट होते. नैराश्यावर धावणे हा औषधाइतकाच प्रभावी उपाय असल्याचे अॅमस्टरडॅम येथील व्ही.जे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

या शास्त्रज्ञांनी १४१ वैफल्यग्रस्त रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. या वेळी ४५ लोकांना नैराश्यविरोधी औषधे देण्यात आली, तर ९६ लोकांना १६ आठवडे धावण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला.

शेवटी दोन्ही गटातील ४४ टक्के लोकांना नैराश्यापासून आराम झाला, तर धावणाऱ्या लोकांचा लठ्ठपणा कमी झाला. हृदय सुधारले आणि शरीर सुदृढ बनले.

या संदर्भात प्रा. बँडा पेनिनक्स म्हणाले, की ज्या लोकांनी दररोज काही मिनिटे धावण्याचा व्यायाम केला, त्यांचे नैराश्य १६ आठवड्यांनंतर औषध घेणाऱ्या लोकांइतकेच कमी झाले.

या अभ्यासात २.३ कोटी मुलांचाही समावेश होता. त्यातून असा निष्कर्ष निघाला, की वयाच्या १४व्या वर्षांपासून मानसिक विकार सुरू होतात.

नैराश्य असलेल्या रुग्णांना सतत दुःखी राहणे, कामात मन न लागणे, झोप कमी किंवा जास्त येणे, थकवा जाणवणे, मनाची एकाग्रता साधण्यास अडथळा येणे, सतत मनात मृत्यूचे किंवा आत्महत्या करण्याचा विचार येणे या अतिशय गंभीर मानसिक अवस्था आहेत. यालाच नैराश्य म्हणतात.

मन उदास राहते. यावर धावणे हा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे हॅपी हर्मो न्स तयार होतात. नकारात्मक विचार दूर होतात. चांगली झोप लागते व मेंदूला आराम मिळतो. वाढलेले वजन कमी होते.

व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. जगात नैराश्य असलेल्या रुग्णांची संख्या २८ कोटी आहे. त्यात १४ वर्षांच्या आतील २ कोटी ३ लाख मुलांचा समावेश आहे.

मेथी विषयी काही महत्वाची माहिती

मेथी वाताशी संबंधित समस्यांमध्ये, भूक न लागणे, अंगावरून पाणी जाणे, गॅसेस, मधुमेह, मंदाग्नी, मुख दुर्गंध, बहुमूत्रता, पोटाच्या विकारात लाभदायक ठरते.

● दररोज सकाळी काही न खाता एक चमचा मेथी दाणे पाण्याबरोबर सेवन करण्याने गॅसेस तसेच गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. वृद्धापकाळी होणाऱ्या गुडघेदुखीत हा उपाय विशेष परिणामकारक ठरतो. वेदनेशिवाय मेथीचा वापर स्नायुरोग, बहुमूत्र, रक्ताची कमतरता यातही प्रभावी ठरतो.

● मेथीचे दाणे रात्री भिजवा. सकाळी त्या पाण्याने चूळ भरा. यामुळे दात स्वच्छ होतील व मुखदुर्गंध नाहिसा होईल.

● थोड्या दुधात मेथी भिजवा, दोन तासांनी त्याचं उटण बनवून दररोज चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग नाहिसे होऊन चेहऱ्याचा रंग उजळेल.

● मधुमेह नियंत्रित करण्यासाठी जेवणात मेथी पावडर आणि जिऱ्याच नियमित वापर करा. फायदा होईल. कोशिंबीर, रायता यांना मेथीची फोडणी देऊन खाऊ शकता.

खजूर विषयी काही महत्त्वाचे:

खजूर शरीराला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. प्राचीन काळापासून माणूस खजुराची शेती करीत आला आहे.

खजुरामध्ये पोषक घटकांचं भरपूर प्रमाण असतं. खजुराच्या सेवनाने अनेक आजार नाहिसे होतात.

बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. म्हणूनच, बदलत्या हवामानाला पोषक असणारा आहार आपण घ्यायला हवा.

त्यामध्ये खजुराचा समावेश अवश्य करावा. खजुराला ‘गोड फळांचा राजा’ असंही संबोधलं जातं.

खजूर अनेक रोगांमध्ये सहायक आहे. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, चरबी, सोडियम, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, अ-ब-क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, झिंक, लोह, फायबर, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

मेंदू निरोगी राहण्यासाठी आणि हृदयाचा अशक्तपणा नाहिसा करण्यासाठी खजुरातील अँटिऑक्सिडंट तत्त्वं उपयोगी पडतात. खजुराचं सेवन डोळ्यांसाठीही लाभदायक ठरतं.

नैराश्यातून सुटका करण्याचं कामंही खजूर करतो. शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्याचं आणि चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढविण्याचं कामही खजूर करतो.

ऊर्जावर्धक आहे खजूर (increases energy)

खजुरामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज असतं. यांच्या सेवनानं शरीरात ऊर्जेचा संचार होतो. खजुराच्या सेवनानं शरीराला आलेला थकवा काही वेळातच दूर होतो. दूध-खजूर खाणंही आरोग्यवर्धक आहे.

शारीरिक दुर्बलता दूर करते

खजूर खूप सुकवला जातो. त्याला सामान्य भाषेत खारीक असं म्हणतात. एक ग्लास दुधामध्ये ४ खारका उकळवा. त्यानंतर त्यामधील खारका वेगळ्या खा व दूध प्या. नियमितपणे ४ महिने हा उपचार केल्याने शारीरिक दुर्बलता नाहिशी होते.

लैंगिक क्षमता वाढवितो

रात्रभर बकरीच्या दुधात खजूर भिजवून ठेवा. सकाळी तो बारीक करून घ्या. त्यामध्ये मध, वेलची मिसळून त्याचं सेवन करा. यामुळे यौनक्षमता वाढते व अनेक यौनसंबंधी रोगांपासून रक्षण होतं.

रक्तशुद्धीकरण करते खजूर

खजुरामध्ये पोटॅशियम आणि सोडियम भरपूर प्रम ाणात आढळतात. एका शोधानुसार, पोटॅशियमच्या सेवनामुळे स्ट्रोकची शक्यता कमी होते. खजुराचं सेवन नसांमध्ये असलेल्या अबरोधाला दूर करून रक्तशुद्धीकरणाचं काम करतो.

गर्भावस्थेत उपयुक्त ठरते

खजुराचं सेवन गर्भावस्थेत अनेक रोगांना दूर ठेवतं. हा गर्भाशयाला मजबूत करतो. शिवाय, याच्या नियमित सेवनानं बाळाच्या जन्माच्या वेळेस रक्तस्रावही कमी होतो. खजुराचं सेवन स्तनपान करणाऱ्या मातासाठीही गुणकारी आहे.

थोडक्यात : खजुराचं सेवन आबालवृद्ध, अशक्त व्यक्ती, गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आरोग्यदायी आहे. म्हणून, शक्तिवर्धनासाठी त्याचा आहारात जरूर समावेश करा.

रक्ताची कमतरता (Good for anemia) खजूर

रक्तनिर्मितीत लोहाची मुख्य भूमिका असते. खजुरामध्ये लोहाचं भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर करणं सहजशक्य असतं. खजूर शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढविण्याबरोबरच लाल रक्तकणांच्या निर्मितीतही सहायक ठरतो.

पचनशक्ती सुधारते खजूर (improves digestion)

खजुरामध्ये असणारे फायबर्स आणि अमिनो अॅसिड पचनशक्ती मजबूत करण्याचं काम करतात. रात्रभर खजूर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या पाण्याचं खजुरासह सेवन करणं पचनव्यवस्था व्यवस्थित करण्यास सहायक ठरतं.

डोळ्यांची काळजी अशी घ्या…

डोळे अधूनमधून, विशेषतः बाहेरून आल्यावर थंड पाण्याने धुवावेत. कधी कधी धुळीची अॅलर्जी निर्माण होऊ शकते, त्यामुळे वरचेवर डोळे लाल होणे, खाज सुटणे असे त्रास होऊ शकतात.

यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार केले पाहिजेत. डोळे येणे हाही एक नेहमी होणारा साथीचा आजार आहे.

त्यात डोळे लाल होणे, डोळ्यातून चिकट घाण येणे असे त्रास होतात.

हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णाने आपला रुमाल, टॉवेल वगैरे वस्तू वेगळ्या ठेवाव्यात आणि इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळावे.

दुकानदाराला विचारून औषधं घेऊ नयेत. डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा,

आहारात गाजर, पालक, मुळा यांचा समावेश असावा. त्यातून अ जीवनसत्त्व मिळतं.

पुस्तक वाचताना ३३ सेमी अंतरावर असावं. त्यावर पुरेसा उजेड असावा. 

डोळ्यांना मार लागणे किंवा अणकुचीदार वस्तूने इजा होणे हाही नेहमी घडणारा प्रकार आहे.

त्यात डोळ्याच्या रेटिनाला धक्का लागू शकतो. त्यामुळे डोळ्याला मार लागलेल्या सर्व गोष्टींनी काहीही त्रास होत नसला तरी डोळे तपासून घेणं गरजेचं आहे.

लहान मुलांची काळजी घेताना

मुलांना हल्ली आठवड्यातून एकदा डब्यात खाऊ आणण्याला परवानगी असते, तर काही शाळांमध्ये एक पोळी-भाजी आणि एक खाऊचा, असे दोन डबे द्यावे लागतात. अशावेळेस वेळेअभावी अनेक आया मुलांना बाजारातील पदार्थ देत असतात. पण, यामुळे मुलांचं पोट भरतं. पण, त्यांच्या शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. म्हणून, या डब्यात काय असावे आणि काय नसावे, यावर एक नजर :

काय हवे?

घावन, धिरडी, आंबोळी, थालिपीठ, डोसा, उत्तप्पा, पालक पुरी, सुरळी वडी, ढोकळा, व्हेज कटलेट, खाकरा, इडली चटणी, थेपला, व्हेज सँडविच, एग सँडविच, लाडू, वड्या, गुळपोळी, शिरा, नाचणी- सोया बिस्किटे.

काय नको?

बिस्किटे, केक, कुकीज, नानकटाई, क्रिमरोल, फरसाण, शेव, नूडल्स, वेफर्स, बॉबी, ब्रेड, वनस्पती तुपातील लाडू, मिठाया. (खाऊचा डबाही असावा पौष्टिक).

रक्तदाबाची समस्या

रक्तदाबाची समस्या दोन प्रकारची असते- उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब. सामान्यतः रक्तदाब १२०/९० असा असतो. जर दाब यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर या स्थितीला अनियंत्रित अवस्था असं म्हणतात.

तारूण्याचं रक्षण करतच आपण आपल्या सेक्सुअल लाइफचा आनंद घेऊ शकतो. पण आजच्या काळात हे शक्य आहे का?

घरात आणि ऑफिसमध्ये तणावाची स्थिती आणि आपला निष्काळजी स्वभाव यामुळे उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाच्या समस्या निर्माण होते, ही अनियंत्रित स्थिती आपल्या तारूण्यात बाधा आणते. तसंच आपली

जीवनशैलीही याला कारणीभूत आहे… रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे उपाय:

ताज्या फळं- भाज्यांचं सेवन : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी जास्त प्रमाणात जेवण करू नये.

तसंच उष्ण पदार्थांपासूनही लांब रहावं, आहारात नियमितपणे ताजी फळं आणि हंगामी भाज्यांचा समावेश करायला हवा.

मीठाचं प्रमाण कमी असावे (खजूर)

रक्तदाबाच्या रूग्णांच्या आहारात पोटॅशियमचं प्रमाण जास्त आणि सोडियमचं प्रमाण कमी असायला हवं. 
जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर मीठाचं सेवन अजिबात न करणं योग्य ठरतं.
तसंच डेअरी उत्पादनं म्हणजे साखर, रिफाइंड खाद्य पदार्थ, तळलेले-भाजलेले पदार्थ, कॅफिन, जंक फूडचं सेवनही प्रमाणात करायला हवं.

भरपूर पाणी पिणेः भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. दिवसातून कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी अवश्य प्या.

इतर उपाय

कमी प्रमाणात बाजरी, गहू, ज्वारी, मूग आणि डाळींचं सेवन करायला हवं. यामुळे रक्तदाब नियंत्रित रहातो. पालक, कोबी, दुधीभोपळा, पुदिना, लिंबू, कारलं या भाज्याही रक्तदाबाच्या रूग्णांनी अवश्य खाव्यात.

टॉन्सिल्सवर घरगुती उपाय

● दिवसातून कमीत कमी दोनदा मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.

● घसा दुखत असला तरी भरपूर द्रव पदार्थांचं सेवन करा.

खूप मसालेदार पदार्थ, धुम्रपान, कार्बो नेटिड ड्रिंकचं सेवन करू नका.

● घशाला आराम देण्यासाठी खडिसाखर खा किंवा औषधं घ्या.

● खोलीतील वातावरण शुष्क नसेल याची काळजी घ्या.

● अशावेळेस सूप किंवा थंड पेयं अजिबात पिऊ नका.

● गरम पाण्यात मध आणि लिंबू घालून हळूहळू थोडं थोडं पीत रहा.

ओवा : उत्तम पाचक

महिलांशी संबंधित रोग नाहीसे करण्याचा गुण ओव्यामध्ये आहे. वायू व कफाची कमतरता नष्ट करण्यासाठी, वेदना, पोटदुखी, उलटी, जुलाब, गॅसेस अशा आजारांमध्ये ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

आचार्य चरकांनी लिहिलेल्या चरक संहितेत ओव्याला वेदनाहारक व जठराग्नि प्रदीप्त करणारा पाचक म्हणून संबोधण्यात आले आहे.

● अजीर्णाचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी ३ ग्रॅम ओव्याचं सेवन केल्यास फायदा होईल.

● चेहऱ्यावर पिंपल्स किंवा सुरकुत्या आल्या असतील तर ४० ग्रॅम ओवा वाटून ४० ग्रॅम दह्यामध्ये फेटून रात्री चेहऱ्यावर चोळा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. दररोज वापर केल्यास लगेच फरक जाणवेल.

● एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा सुंठ चुर्ण गरम पाण्यात रोज सकाळ- संध्याकाळ घ्या. हिवाळ्यात होणाऱ्या दुखण्यांपासून आराम मिळेल.

● जर सांधे दुखत असतील तर सरसोच्या तेलात लसूण आणि ओवा घालून त्या तेलाने मालिश करा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Leave a Comment