उपवास करणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला दिसतात. नवस केला आहे म्हणून, घराण्याची परंपरा आहे म्हणून अनेक जण आपल्याला सहन होत नसतानाही उपवास करतात, व स्वतःवर ताण ओढवून घेतात.
काही लोक वर्षानुवर्षे भक्तीभावाने त्यांना जमतील तसे उपवास करत असतात, तर काही लोक उपवास हे कर्मकांड आहे असे समजून त्याची अवहेलना करतात,
पण इंटरमिटंट फास्टिंग मात्र मनापासून करतात.
शतकानुशतके आणि आपल्या पूर्वजांच्या शहाणपणावर शंका घेतली जाऊ शकत नाही.
बहुतेक संस्कृतीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे उपवासाचा समावेश झालेला दिसतो. हा उपवास कसा करावा, त्याचे काय फायदे असतात
याबद्दल आपण आज आयुर्वेदशास्त्रानुसार माहिती करून घेणार आहोत.
health benefits उपवास हा शब्द ‘उप’ व ‘वास’ दोन शब्दांनी बनलेला आहे. उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणे.
त्यामुळे उपवास याचा शाब्दिक अर्थ मानसिक रित्या देवाच्या / आराध्याच्या जवळ राहणे असा होय.
उपवासाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरावर सकारात्मक प्रभाव बघायला मिळतात. आयुर्वेदात उपवासाला लंघन म्हटलेले आहे.
लंघन हा चिकित्सेचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरात कुठल्याही प्रकारचा दोष, मुख्यत्वे कफ व पित्त दोष, रुजू व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यावर उपचारस्वरूप लंघन केले तर दोषाचे रूपांतर रोगात होत नाही.
खाल्लेल्या अन्नाचे पाचनअग्निच्या मदतीने पचन केले जाते. काही कारणाने पाचनअग्निची मदत कमी पडली तर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही व त्यामुळे अर्धवट पचलेल्या अन्नाचा रस शरीरात तयार होतो, ज्याला आम म्हटले जाते.
हा आम शरीरात आमाशयाच्या आश्रयाने राहतो. त्याचे वेळेत पचन झाले नाही तर मात्र सर्व शरीरभर त्याची व्याप्ती होते. हा आम संपूर्ण शरीरभर पसरून वेगवेगळ्या ठिकाणी रोग उत्पन्न करू शकतो.
ज्याच्या शरीरात आम नाही त्याला निरामय म्हणजे निरोगी अशी संकल्पना आपल्याकडे आहे.
आमाच्या पचनासाठी आपल्याला पाचनअग्निला मदत करणे आवश्यक असते. कुठल्याही फॅक्टरीत कच्चा माल व्यवस्थित वापरला जात नसेल तर उत्पादनाच्या साखळीत अडथळे उत्पन्न होतात.
हा अडथळा कमी करायचा असला तर प्रथम चुकीचा कच्चा माल आत येणे थांबवावे लागते, तयार झालेले चुकीचे उत्पादन बाहेर काढावे लागते.
अशाच प्रकारे शरीरात आमाचा संचय झाल्यास लंघन करणे अर्थात शरीराच्या आत अजिबात अन्न न येऊ देणे वा सीमित प्रमाणातच अन्न देणे हा मोठा उपाय ठरू शकतो.
आमाची लक्षणे
शरीरात आम साठल्यावर शरीरावर काही लक्षणे दिसू लागतात. शरीराला जडत्व येते. आलस्य येते.
तोंडात कडवटपणा येतो. मळमळ, पोट दुखणे, आंबट ढेकर येणे, मल व गॅसेसला दुर्गंध येणे, ताकद कमी होणे, मन मरगळणे अशा प्रकारचे त्रास सुरुवातीला दिसू शकतात.
काही लोकांमध्ये सतत ज्वर (fever) असल्याची भावना जाणवू शकते. आम कमी करण्यासाठी लंघन करणे आवश्यक असते.
लंघन वा उपवास कसा करावा यासाठी काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.
वय : कमी वयात मानसिक व शारीरिक शक्ती चांगली असल्यामुळे उपवास सहन करणे सोपे जाते.
अगदी पाण्याशिवाय केलेला उपवासही युवावस्थेत सहन होतो, पण वय झाल्यावर असे उपवास करणे अवघड होत जाते.
वय जास्त झाल्यावर उपवास सहन होत नसल्यास मुगाची खिचडी, सूप वगैरे हलक्या व सुपाच्य गोष्टी खाण्यात ठेवाव्या.
प्रकृती : पित्तप्रकृती असल्यास युवावस्थेतही उपवास करणे अवघड जाते. अशा लोकांना उपवासाच्या दिवशीही काही तरी खाण्याची गरज भासते.
कफप्रकृतीच्या व्यक्तीची कुठल्याही उपवास सहन करण्याची ताकदही जास्त असते, न खाल्ल्ल्याने यांना हलके व ताजेतवाने वाटते.
वातप्रकृतीच्या व्यक्तींना युवावस्थेतही कधी उपवास सहन होतो, कधी अजिबात सहन होत नाही, यांची उपवासाच्या दिवशी खूप प्रमाणात चिडचिड होते.
त्यामुळेच पित्तप्रकृती व वातप्रकृती असलेल्यांनी हलका, सुपाच्य आहार घेऊनच उपवास करणे इष्ट ठरते.
खाण्यापिण्याच्या सवयी : दिवसभरात वारंवार खाण्याची सवय असल्याने उपवास करण्याची हळू हळू सवय करावी.
मानसिक व शारीरिक ताकद : उत्तम असल्यास उपवास करणे सोपे जाते.
ऋतू व वातावरण : यामुळे उपवासाच्या पद्धतीत फरक पडतो. आपल्या शास्त्रांमध्ये एकादशीला उपवास करण्याला महत्त्व दिलेले आहे.
ते आरोग्यासाठी हितकर असते असे सांगितलेले आहे. सर्व एकदाश्यांमधील आषाढी एकादशीला उपवास करणे अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहे.
चातुर्मासात उपवासांच्या वेगवेगळ्या पद्धती पाहण्यात येतात. एकभुक्त राहणे, एकाच प्रकारचे धान्य खाणे, एकच वस्तू किंवा एकाच प्रकारचे फळ खाणे इत्यादी.
चातुर्मासात अग्नी मंद असल्यामुळे अशा प्रकारच्या उपवासांची पद्धत जास्त सयुक्तिक वाटते.
उपवासाची वारंवारता व पद्धत : (उपवास)
आठवड्यातून किती वेळा उपवास करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.
इतर दिवशी व्यवस्थित खाणे-पिणे होत असेल तर आठवड्यातून किमान एकदा तरी एकभुक्त राहावे.
दर आठवड्याला उपवास करणे शक्य असल्यास एकादशी, चतुर्थी वा अन्य कुठलाही दिवस निवडून त्या दिवशी आहार कमी ठेवावा.
उपवासाला काय चालते? :
हा प्रश्न नेहमीच सगळ्यांच्या मनात असतो. उपवासाच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात, त्यापैकी आपल्याला काय सहन होते याचा अंदाज घेऊन त्यानुसार उपवासाच्या दिवशी आहार ठेवता येतो.
• फळ, फळांचे रस, दूध वा पाणी घेऊन उपवास करणे हा उपवासाचा पहिला प्रकार होय.
• दिवसातून एक वेळा नेहमीचा आहार घेणे व एकदा फळ, फळांचे रस, दूध वा पाणी घेणे हा उपवासाचा अजून एक प्रकार होय.
राजगिऱ्याची चिक्की, भगर, ताकाची कढी, शिंगाड्याची खीर वा थालीपीठ, बटाट्याचा कीस, रताळ्याचा कीस वा थालीपीठ, साबुदाणा वगैरे सेवन करून उपवास करणे हा आणखी एक प्रकार.
आपल्या पचनशक्तीनुसार यातील कुठलीतरी गोष्ट निवडता येते.
बऱ्याचदा लोकांना साबुदाण्याचा त्रास होतो. पण साबुदाणा व्यवस्थित भिजवला गेला, त्यात दाण्याचे कूट घालून, तुपाची फोडणी दिली व व्यवस्थित वाफ दिली तर साबुदाणा पचायला थोडी मदत होऊ शकते.
ज्यांना उपवास अजिबात सहन होत नाही त्यांनी उपवासाच्या दिवशी अशा प्रकारे साबुदाणा खाल्लेला चालू शकतो.
राजगिरा, भगर वगैरे गोष्टी पचायला हलक्या असल्यामुळे त्यांचे पचन लगेचच पचन होऊन जाते, पण साबुदाणा खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही.
त्यामुळे ज्यांना उपवासाच्या दिवशी शारीरिक श्रम करणे आवश्यक असेल त्यांनी साबुदाणा खाणे चालू शकते.
पण साबुदाणा प्रकृतीला मानवत नसला तर मात्र इतर गोष्टी खाण्यात ठेवाव्या.
• काही उपवासांच्या दिवशी मीठ वर्ज्य असते. शरीरात जास्त प्रमाणात मीठ गेल्यास शोथ उत्पन्न होऊ शकतो तसेच चयापचय क्रियेत त्रास येऊ शकतो.
त्यामुळे मिठाशिवाय आहार घेण्याची थोडी सवय ठेवणे चांगले.
ज्यांनी मिठाशिवाय उपवास केलेले असतात त्यांना ही जाणीव होते की त्यादिवशी थोडी ताकद कमी वाटली तरी पोट हलके राहते व शौचाला व लघवीला साफ झाल्यासारखे वाटते.
• ज्यांना उपवासाच्या दिवशी बटाटा खायची इच्छा असेल त्यांनी बटाटे उकडून, विस्तवावर वा ओव्हनमध्ये भाजून खाणे उत्तम.
बटाट्यांबरोबर लोणी, मीठ व मिऱ्याची पूड घालून खाणे आरोग्यासाठी चांगले असते. अशाच प्रकारे रताळेही खाता येतात. रताळ्याचा शिराही उत्तम लागतो.
• शिंगाडा अत्यंत पैष्टिक असतो, पण पचायला जड असतो. शिंगाड्याचा शिरा वा खीर खाता येते.
• ज्यांना उपवासाच्या या कुठल्याही गोष्टी सहन होत नाहीत, त्यांनी लंघन करण्यासाठी तूप घालून खिचडी खावी किंवा जेवणामध्ये सगळे पदार्थ न घेता कुठल्याही एका धान्याचा वापर केला तर पचनसंस्थेला आराम मिळू आमाचे पचन होऊ शकेल.
उपवासाचे फायदे (उपवास)
मलमूत्रपुरीषाणां विसर्गे गात्रलाघवे । हृदय-उद्गार-कण्ठ आस्य शुद्धौ तन्द्रा क्लमे गते ।। स्वेदे जाते रुचौ चैव क्षुत् पिपास सह उदये ।
मल मूत्र, वात, वगैरे सर्व मलांचे व्यवस्थित निष्कासन होणे, शरीरात लघुता येणे, छातीत मोकळेपणा वाटणे, शुद्ध ढेकर येणे, घसा मोकळा वाटणे, थकवा व मरगळ कमी होणे, घाम व्यवस्थित येणे, अन्नात रुची वाटणे, भूक लागणे, तहान लागणे व संतुष्ट होण्याची अनुभूती येणे ही योग्य पद्धतीने उपवास केल्यावर जाणवणारी लक्षणे आहेत.
उपवासाचे मानसिक फायदे…
अन्नापासून लांब राहणे ही सोपी गोष्ट नाही. लंघन करण्यासाठी स्वतःवर बराच अंकुश ठेवावा लागतो. त्यामुळे उपवास केल्याने,
• मनावर बंधन घालणे सोपे जाते.
• मानसिक एकाग्रता वाढते.
• आत्मविश्वास वाढतो.
• कुठलेही कार्य करण्याची धडाडी व निश्चय वाढतो.
• मानसिक जडत्व कमी होते.
मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करते आणि एक स्वच्छ त्वचा देते
उपवास (fasting) केल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते कारण पचन तात्पुरते थांबल्यास, शरीर त्याच्या पुनरुत्पादक शक्ती इतर प्रणालींवर केंद्रित करू शकते.
केवळ एक दिवस अन्न न घेतल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता सुधारते आणि यकृत, किडनी आणि इतर अवयव योग्यरित्या कार्य करत राहतात.
उपवासा मुळे वजन कमी होण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
उपवास केटोन्स रक्तप्रवाहात सोडून स्मृती आणि शिकण्याच्या कार्यक्षमतेचे संरक्षण करू शकतो.
उपवास रोगाचे बायोमार्कर सुधारू शकतो आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करू शकतो.
तुम्हाला तरुण बनवते
संशोधनात असे दिसून आले आहे की उपवासामुळे प्राण्यांमध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
जरी अद्याप मानवांवर आहे, परंतु बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की उपवासामुळे मुक्त रॅडिकल्स कमी होतात, जे प्रामुख्याने वृद्धत्वासाठी जबाबदार असतात.
उपवास देखील वाढत्या आयुर्मानासाठी मानले जाते.
Benefits of fasting उपवासा मुळे पेशींची तणावाचा सामना करण्याची आणि रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
इन्सुलिन संवेदनशीलता वाढली (उपवास)
healthy fasting उपवास केल्याने तुमचा मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की आठवड्यातून फक्त एकदा उपवास करणे आणि त्या दिवशी फक्त पाणी पिणे मधुमेहाचा त्रास कमी करू शकतो.
एवढेच नाही तर उपवासामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाबही कमी होतो.
● डिटॉक्सिफिकेशन (उपवास)
जेव्हा शरीर उपवास करत असते, तेव्हा ते कोणतेही फायदे न देता ऊर्जा वापरणारी कोणतीही गोष्ट आणि सर्वकाही फेकून देण्याचा प्रयत्न करते.
त्यामुळे शरीरात साठलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.
उपवासामुळे (fasting) रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
(fasting) उपवासा मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि एकूणच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
● मेंदूचे कार्य वाढवते (उपवास)
ब्रेन-डेरिव्ह्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर (BDNF) नावाच्या प्रथिनाचे उत्पादन वाढवून मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी उपवास ओळखला जातो.
न्यूरल हेल्थ वाढवणारी इतर अनेक रसायने BDNF द्वारे ट्रिगर केली जातात, जे नवीन न्यूरॉन्स तयार करण्यासाठी मेंदूच्या स्टेम पेशी सक्रिय करतात.
तुमच्या मेंदूच्या पेशींचे संरक्षण करण्यासोबतच, हे प्रथिने अल्झायमर आणि पार्किन्सन रोगापासून बचाव करण्यास देखील मदत करते.
सध्या आधुनिक तंत्रज्ञानानेही सिद्ध केलेले आहे की आयुर्वेदोक्त लंघन शरीरात चांगले परिणाम घडवून आणते.
लंघन कितीही चांगले असले तर काही व्यक्तींमध्ये लंघन करण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला नाही.
• कुठल्याही वातदोषाच्या रोगांमध्ये लंघन करू नये. भीती, राग, दुःख, फार प्रमाणात शारीरिक कार्य होणार असल्यास लंघन करू नये.
फार जास्त प्रमाणात पित्तदोषयुक्त ज्वर तसेच आगंतुक ज्वर व जीर्ण ज्वर असल्यास लंघन करू नये.
• तसेच सुकुमार व्यक्ती, गर्भिणी, बाळंतीण, क्षयरोग, जीर्णरोग असल्यास लंघन करू नये.
सध्या इंटरमिटंट फास्टिंग हा लंघनाचा प्रकार बराच प्रसिद्ध झालेला आहे. स्वतःची प्रकृती, वय वगैरेंचा विचार करून याचे पालन केले तर खूप चांगले परिणाम मिळतात असे दिसत आहे.
एकूणच लंघनासारखे महत्त्वाचे शस्त्र विचार करून चालवले तर चांगले परिणाम मिळू शकतील.
उपावृत्तस्य पापेभ्यः सहवासो गुणैः सह। उपवासः स विज्ञेयो न शरीरविशोषणम् ॥
उपवास (fasting) या शब्दाने केवळ शरीराची शोषण प्रक्रिया किंवा वजन उतरवण्याचा उपाय हा अर्थबोध करून घेणे चुकीचे ठरेल.
‘उप’ म्हणजे जवळ व ‘वास’ म्हणजे राहणे किंवा वसणे. तेव्हा दोष-अशुद्धी (शरीरातील आम व विषद्रव्य) दूर करून म्हणजेच पाप नष्ट करून स्वतःच्या बरोबर किंवा अंतरात्म्याच्या चांगल्या गुणांबरोबर राहणे, या प्रक्रियेला ‘उपवास’ असे म्हणतात.
मित्रांनो लेख वाचून कसा वाटला नक्की कळवा
पण सर्वात महत्वाचे डिजिटल उपवास म्हणजे मोबाइल टीव्ही पासून एक दिवस दूर नक्की रहा
डिजिटल उपवासविषयी पुढील लेखात जाणून घेऊया
धन्यवाद