हातात पैसा टिकत नाही? मग ‘हे’ उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही!

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे. हातात पैसे टिकत नाही

मित्रांनो आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो, पैसा घरात आल्यानंतर मात्र तो काही टिकत नाही हि बाब खूप लोकंच्या बाबतीत घडून येते.

परिणामी असे लोक ज्यांचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे त्यांचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते.

आजच्या ह्या लेखात आपण अश्याच काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण करतो आणि ह्याच चुकांमुळे आपण गरीब राहतो, ह्या चुकांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाहीत.

आपल्या घरात पैसा तर खूप येतो मात्र तो फार कमी कालावधीत संपून देखील जातो.

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ.

नोकरी आणि व्यवसाय इत्यादी केल्यानंतर आम्ही पैसे तर भरपूर कमावतो पण त्याला टिकवून ठेवायचे आणि त्याला दुप्पट करण्यासाठी आमची धावपळ सुरूच असते.

कमावलेले किंवा एकत्र केलेले पैसे घरात टिकवून ठेवणे गरजेचे आहे, यासाठी तुम्हाला घरात वास्तू दोष आहे का? याकडे लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे.

कारण तुम्ही भले लाखो रुपये कमावतं असाल पण त्या पैशांची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. तर जाणून घ्या त्या वास्तुदोषांबद्दल ज्यामुळे श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल बनतो —
कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल, की माझ्या हातात पैसा टिकत नाही.

यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही,

परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात.

अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो.

एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनःस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा.

  • पैसा एकाजागी ठेवू नका : हा तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. वास्तूशास्त्र देखील हेच सांगते.
    घरात सुरक्षितता पैसा कुठे ठेवायचा?वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.

घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे.

तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वृद्धी होऊ शकते.
घराच्या उत्तकेडील भागाला कुबेराचं स्थान मानलं जातं. म्हणूनच तिजोरी ठेवण्याची खोली ही उत्तरेकडील असावी. जर कपाटात धन ठेवायचे असले तर ते मधल्या किंवा वरच्या कप्यात ठेवावे.

वास्तूशास्त्रानुसार घरच्या तिजोरीला कुबेराची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे घरात तिजोरी ठेवताना योग्य दिशेत ठेवता की नाही हे जाणून घ्या. शक्यतो तिजोरी ही उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं.
वास्तूशास्त्रानुसार तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. त्यात किमान धन तरी नक्कीच ठेवावं.

यामुळे तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही.
याशिवाय तिजोरीवर कधीही जड वस्तू ठेवू नका. यामुळे घरात पैसे येण्यात अडचणी येतात. नेहमीच कर्जात बुडलेले राहता
घरात कुबेर यंत्राची स्थापना करा. याशिवाय कुबेर यंत्राची नियमित पूजा करा. यामुळे घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवणार नाही.

  • तिजोरी ठेवलेली खोली चौरस किंवा आयताकृती असावी. त्याचसोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावला जाऊ नये. त्याच्या आजूबाजूच्या भिंतींवर हवे तर फोटो लावू शकता.
  • तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेशद्वार असावं. हे प्रवेशद्वार खासकरुन उत्तर किंवा पूर्व दिशेने असणं केव्हाही उत्तम. दक्षिण दिशेला कोणतंही प्रवेशद्वार नसावं, याची काळजी घेणं मात्र फार जरुरी आहे.
  • तिजोरी असणाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर कमळात विराजमान असणारी आणि सफेद हत्तींकडून अभिषेक होत असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो असावा. यामुळे घरात संपत्तीची नेहमी वाढ होत राहील.
  • तिजोरीत कोणत्याही प्रकारचे अत्तर किंवा इतर कोणतीही गोष्ट ठेवू नये. त्याचप्रमाणे तिजोरीच्या वर कपडे, फाईल्स किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवू नये. तिजोरीच्या आत लाल रंगाचा कपडा ठेवणे शुभ मानले जाते.
  • तिजोरीखालील जमीन ही समांतर असावी. ही जमीन खडबडीत असल्यास दगड किंवा इतर काही गोष्टी ठेवून ती सरळ करावी.
  • तिजोरी असणाऱ्या खोलीचा रंग फिकट पिवळा असावा. तिजोरी ठेवण्याच्या खोलीला लाल, हिरवा, निळा रंग देऊ नये. तिजोरी त्या खोलीत स्थापन करण्याचा दिवस सोमवार, बुधवार किंवा गुरुवार असावा.

घरातला या दिशेला पैसे साठवू नका!

वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होतेच शिवाय संपत्तीची वाढही थांबते.

बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो.

पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न कराजर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान कोपर्‍यावर आपली नजर टाकवी.

देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धन नाश होतो. अशात उत्तर पूर्वीकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे टाळावे. (हातात पैसे टिकत नाही)

  • आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे. जर तुमच्या घरात नळांमधून पाणी टपकत असेल आणि पाइप लाइनहून लीकेज असेल तर हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहे.
  • वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळू हळू खर्च होण्याचे संकेत आहे. या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन जाते.
  • वास्तुनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलान चे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तरपूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा व्यय जास्त होतो. सांगायचे म्हणजे उत्तर-पूर्व दिशेत न फक्त उतार असायला पाहिजे बलकी पाण्याचा निकस देखील याच दिशेत असायला पाहिजे.
  • वस्तूनुसार घरातील मुख्य दाराचा धनाशी संबंध असतो. याच्याशी निगडित वास्तुदोष धन हानीचे संकेत असतात. जर कोणाच्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो. या प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते.
  • घर बनवताना ईशान्य कोपर्‍यासोबत उत्तर-पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तर-पश्चिम दिशेत खाली असेल, तर निश्चित रूपेण तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही. म्हणायचा अर्थ असा की उत्तर-पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे.
  • वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो. धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपर्‍यात धातूची एखादी वस्तू लटकवून ठेवायला पाहिजे. तसेच या कोपर्‍यात जर भेगा असतील तर त्याला लगेचच भरायला पाहिजे. असे केले नाहीतर धनहानी होते.
  • यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धन स्थानाचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणच्या भिंतीवर या प्रकारे ठेवाकी त्याचे तोंड उत्तराकडे असायला पाहिजे. जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही.
  • पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही. म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाक घर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो खर्च ही त्याच प्रमाणात होतो.
  • घरात तुटलेला बेड देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो. तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बलकी या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते. या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होत.
  • जर पैशांची बरकत हवी असेल तर घरात प्लास्टिकचे फूल आणि पौधे ठेवणे टाळावे. प्लास्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तसेच शिळे फूल देखील घरात ठेवू नये.

अनावश्यक आणि बाश्पळ अश्या वस्तूंवरती आपण खर्च करतो, अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूंमध्ये आपला पैसा खर्च होतो, परिणामी हातात पैसा राहत नाही.

मित्रांनो माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा ज्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होतात अश्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत

  • आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना आपण नेहमी उजव्या हातानेच घ्यावेत किंवा द्यावेत. समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच देईला सांगावेत व आपण देखील उजव्या हातानेच द्यावेत. कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका. उजव्या हाताने केलेले व्यवहार हे शुभ असतात. हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात, उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे. म्हणूनच धर्मशास्त्राच्या मान्ययतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत व पैसे द्यावेत.
  • पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात. खरंतर पैसे नीट मोजता यावेत ह्यासाठी अश्या प्रकारे आपण वागतो. मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून ते पैसे मोजू नयेत. ते तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो, त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. त्याऐवजी आपण पाण्याचा वापर आपण करू शकता.
  • जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत. महाभारत असेल, रामायण असेल इत्यादी हे सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाने उलटताना आपण थुकींचा वापर करतो. बऱ्याच जणांना सवय असते तर असे करू नका, अनेक मार्ग आहेत पाने उलटण्याची म्हणून आपण हे टाळावे हे अशुभ मानले जाते, धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात ३३ कोटी देवांना लावल्यासारखे झाले म्हणून आपण हे कटाक्षाने पाळावे.
  • नखे कापण्याच्या बाबतीत. तर आपण शक्यतो इतर कोणत्याही दिवशी नखे कापा मात्र रविवारी आपण आपल्या हातापायाची नखे कापू नये. ज्या घरात रविवारी हातापायांची नखे कापली जातात. त्या घरात सदैव दरिद्रता वास करते, माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाहीत. बरेचजण नखे काढून झाल्यानंतर ती हिकडे तिकडे फरशीवरतीच सांडतात. त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होते.
  • जेव्हा आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी. ज्यादिवशी हि रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही ह्यातील एकही रुपया आपण खर्च करू नका. दुसऱ्या दिवशी ह्या रकमेतील पैसे खर्च करू शकता. पण तर मित्रांनो ह्या होत्या काही चुका ज्या कि बहुतांश आपल्या कडून होतात. व त्यामुळे घरातील लक्ष्मी काही टिकत नाही. पैसे घरात टिकत नाही. परिणामी दरिद्रता वास करते.
  • लवंगाचा वापर (हातात पैसे टिकत नाही)
    पर्समध्ये सात लवंगा ठेवाव्या लागतात. असे केल्याने, तुमचा फालतू खर्च थांबतो आणि काही दिवसात तुम्हाला दिसेल की तुमचे पैसे वाचू लागले आहेत.
  • नाणे वापर
    घरामध्ये असलेल्या लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा मूर्तीला एक नाणे अर्पण करा आणि ते नाणे पिठाच्या डब्यात ठेवा. हा उपाय खूप प्रभावी आहे, असे केल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरात पैसाही टिकेल.
  • हिबिस्कस फुलांची हार (हातात पैसे टिकत नाही)
    अनेकवेळा असे घडते की तुमचे पैसे कुठेतरी अडकून पडतात आणि तुम्हाला ते अनेक दिवस मिळत नाहीत, तेव्हा असे घडते तेव्हा तुम्हाला शुक्रवारी देवी दुर्गाला हिबिस्कसच्या फुलांची माळ अर्पण करावी लागते. असे केल्याने तुमचे अडकलेले पैसे लवकर मिळतील.
  • तिळाचा वापर
    हरवलेले पैसे कधीतरी परत मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाला तीळ अर्पण करावे. असे केल्याने हरवलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
  • उधार दिलेले पैसे वापस घेण्याची योग्य पद्धत (क्रेडिट पुनर्प्राप्ती)
    जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील आणि तो तुमचे पैसे परत करण्याचे नाव घेत नसेल तर तुम्ही सूर्यदेवाला हिबिस्कसचे फूल आणि पाणी अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला तुमचे कर्जाचे पैसे लवकर मिळतील.
  • पाण्याच्या बाटलीचा वापर (हातात पैसे टिकत नाही)
    जर तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळाव्यात असे वाटत असेल तर सकाळी घरातून बाहेर पडताना मुख्य दारात पाण्याचे भांडे ठेवावे.
  • लक्ष्मी देवीला फुले अर्पण करा
    जर तुम्ही अनेक दिवसांपासून पैशाच्या समस्यांशी झुंजत असाल आणि तुमची आर्थिक समस्या संपत नसेल तर शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे.
  • कापूर दिव्याचा वापर
    जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल आणि तुम्हाला खूप दिवसांपासून प्रमोशन मिळाले नसेल तर तुम्ही सूर्यास्तानंतर मंदिरात जाऊन कापूर दिवा लावावा. असे केल्याने व्यवसायालाही चालना मिळते आणि पदोन्नतीचा प्रश्नही सुटतो.

पैसा कोणालाच पुरत नाही.. तो नेहमी अपुराच वाटतो पण चांगली मिळकत असूनही तुमचं सेव्हिंग होत नसेल तर… मेहनत घेऊन आणि चांगली मिळकत कमावूनही जर महिन्या अखेरीस तुमच्याकडे पैसे राहत नसतील तर त्यावर वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत. हे उपाय वापरून तुम्ही पैशांची तंगी दूर करू शकता.
.

Leave a Comment