ऍपल / आय-फ़ोन कम्पनी चा मालक स्टीव्ह जॉब्स स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने २०११ साली मृत्यू पावला. त्यांचे हे शेवटचे शब्द …
व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली… इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले…
तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.
आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय. (स्टिव्ह जॉब्स)
आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…
आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतंः
त्यात कदाचित नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं…
सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो... अगदी माझ्यासारखा...
परमदयाळू निसर्गाने आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच… संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.
आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही… केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.
जेव्हा जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजकांची नावे घेतली जातात, तेव्हा त्यामध्ये दुसरे तिसरे कितीहि नाव असले तरी , एक नाव निश्चितच येते आणि ते नाव आहे स्टिव्ह जॉब्स (Steve Jobs). चला जगात बदलावं आणणाऱ्या स्टीव्ह जॉब्सविषयी मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया.
संगणक युगाची सुरवात झाली तेव्हा १९६० चे दशक हे मेनफ्रेम कॉम्प्युटर्सचं होतं. आकाराने खूपच मोठे आणि खूप महाग असे हे कॉम्प्युटर.
शिवाय वापरायला पण ते अवघड असत. म्हणून मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तज्ज्ञ मंडळीच ते वापरत. नंतर आले १९७० चे दशक, हे मिनी कॉम्प्युटर्सचं दशक असे म्हणता येईल. (स्टिव्ह जॉब्स)
हे कॉम्प्युटर्स मेनफ्रेमपेक्षा कमी किमतीचे असल्यामुळे लहान मोठ्या कंपन्या ते वापरू लागल्या. पण, सामान्य माणूस वापरू शकेल असे कॉम्प्युटर आणखी कोणी बनवले नव्हते.
आयबीएमसारख्या (IBM) मोठ्या कंपनींना लहान कॉम्प्युटर्स बनवण्यात खास रस नव्हते. त्यांना सामान्य माणूस वापरू शकेल असा कॉम्पुटर बनवण्यामध्ये जास्ती फायदाही नाही, असे देखील वाटत होते. (स्टिव्ह जॉब्स)
पण, स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनिएक (वॉझ) या दोघांनी मात्र पहिला वैयक्तिक कॉम्प्युटर (पर्सनल कॉम्प्युटर – पीसी) बनवून, आयबीएमसारख्या बड्या कंपनीला ते किती चुकीचा विचार करत आहेत हे दाखवून दिले.
स्टीव्ह आणि वॉझ या दोघानी बनवलेला पीसी हा वापरण्यासाठी एकदम सोप्पा, लहान आकाराचा, शिवाय मिनी कॉम्प्युटरपेक्षा खूपच कमी किमतीचा होता.
बघता बघता लोकांना पीसी नावाचा हा प्रकार भन्नाट आवडला. या सोबतच स्टीव्ह जॉब्स याने जग बदलायला सुरुवात केली आणि आता तर मोबाइलद्वारे जगभरात मोठी क्रांती घडली असून, अनेक गोष्टी सुलभपणे करणे शक्य झाले आहे. नंतरच्या काळात स्टीव्ह जॉब्जने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर प्रचंड संपत्ती कमावली.
अब्जाधीश असलेल्या स्टीव्ह जॉब्जचे वयाच्या ५६ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. आजारी असताना शेवटच्या दिवसात त्याने जगण्याविषयी काही विचार मांडले. ते असे…
मी व्यावसायिक जगातील यशोशिखरावर पोचलो. इतरांच्या दृष्टीने माझ्या आयुष्यात यश भरलेले आहे.
मात्र, काम सोडले तर माझ्या वाट्याला आनंदाचे क्षण फारच कमी आलेले आहेत. आयुष्याच्या शेवटी संपत्ती म्हणजे सर्व काही नसते.
● आनंदाने आणि मनापासून स्वागत करणे.
● आजारी असताना बेडवर पडून राहणे आणि आयुष्यातील सगळ्या घटना त्याच समाधानी मनाने आठवल्यावर माझ्या लक्षात आले की, जी काही ओळख आणि संपत्ती मी मिळवली आहे आणि ज्याचा मला अतिशय अभिमान वाटतो तो आता मृत्यूच्या समोर गळून पडला आहे आणि संपत्ती व ओळख अर्थहीन ठरली आहे. (स्टिव्ह जॉब्स)
● जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?…” आजारपणाचा बिछाना”
● तुमची कार चालवण्यासाठी तुम्ही चालक ठेवू शकता, तुमच्यासाठी संपत्ती कमवायला माणसे ठेवू शकता. पण, तुमचे आजारपण स्वतःवर घ्यायला कुणाला मोलाने ठेवता येत नाही. पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही कधीही नेमू शकत नाही.
● कार, संपत्ती, फोन अशा सगळ्या गोष्टी आपण गमावू शकतो आणि परतही मिळवू शकतो. पण, एक गोष्ट अशी आहे की, ती एकदा गमावली की, परत मिळवता येत नाही. ती म्हणजे आयुष्य.
● हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही… आणि ती असते “आपलं आयुष्य” ” काळ “” समय “.
● हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.
● जेव्हा माणूस शस्त्रक्रिया दालनात जातो तेव्हा त्याच्या लक्षात येते की, आयुष्यात आपल्याकडून एक पुस्तक वाचायचे राहून गेले. ते म्हणजे, बुक ऑफ हेल्दी लाइफ, तुम्हा आत्ता आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर असलात, तरी एक दिवस असा निश्चित येणार असतो ज्या दिवशी सगळ्यावर पडदा पडणार असतो.
● तुमच्या कुटुंबाविषयी असलेले प्रेम, जोडीदाराविषयीचे प्रेम, मित्रमैत्रिणींसाठीचे प्रेम हा तुमच्यासाठी खजिना असतो. तेव्हा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, स्वतःवर उपचार करा.
● आपले वय वाढते तसे आपल्याला शहाणपण येत जाते. ३०० डॉलरचे घड्याळ घालायचे की ३० डॉलरचे? दोन्ही घड्याळांमध्ये सारखीच वेळ दिसणार आहे. ३०० डॉलरचे वॉलेट घेतले किंवा ३० डॉलरचे.
● त्यातील पैशाची किंमत सारखीच असणार आहे. तुम्ही ३०० चौरस फुटांच्या घरात राहा किंवा ३००० चौरस फुटांच्या. एकदा आयुष्यात एकटेपणा आला की, चौरस फुटांचा हिशेब काहीच उपयोगाचा नसतो.
● तुमच्या लक्षात येईल की, तुमच्या अंतर्मनातील आनंद हा महागडे घड्याळ, वॉलेट किंवा आलिशान बंगला यामुळे मिळत नसतो. तुम्ही इकॉनॉमी क्लासने प्रवास करा किंवा बिझनेस क्लासने जेव्हा विमान खाली जाते तेव्हा सगळेच खाली जातात,
● तेव्हा मला वाटते की, तुमच्या लक्षात आले असेल जेव्हा तुमच्या बरोबर तुमचे नवेजुने मित्र असतात, भावंडे असतात आणि तुम्ही त्यांच्या गप्पा मारता, हास्यविनोद करता, गाणी गाता, जगभरातील विषयांवर वाद घालता त्यात खरा स्वर्गीय आनंद असतो.
● स्वतःकडे दुर्लक्ष करू नका… स्वतःच स्वतःचा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.
● हवं तिथे जा… हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं हृदय आणि या दोन हातांमधे असते.
● "लोक माणसं वापरायला शिकतात, "आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा, आणि माणसं जपायला हवीत.
● तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.
● चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये. (स्टीव्ह जॉब्स)
● कुटूंबावर, पती-पत्नीवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम उधळत जा.
● सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो. (स्टीव्ह जॉब्स)
● शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात ‘आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय’ ही जाणिव असते… ते पुस्तक असतं “निरोगी जगण्याचं पुस्तक”.
● आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!!
जाता जाता आरोग्यविषयक काही गोष्टी जाणून घेऊ या
कडक गरम पाण्याने केस होताहेत निस्तेज !
हिवाळ्यामध्ये मध्यमवयीन नागरिकांसोबतच अनेक तरुणांनाही केस गळतीचा सामना करावा लागतो. थंडीमध्ये आंघोळ करताना कडक पाण्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. या पाण्यामुळे केस कोरडे व कमकुवत होतात, त्यामुळे हिवाळ्यात केस गळतात. हिवाळ्यात जास्त प्रमाणात केस गळत असतील तर वैद्यकीय सल्ला घेऊन त्वरित उपचार करण्याची गरज असते.
हिवाळ्यात केस गळती का वाढते?
• हिवाळ्यात त्वचेसोबतच केसही कोरडे पडतात. या ऋतूमध्ये केसांना अतिरिक्त पोषणाची गरज असते. गरम पाण्याचा वापर जास्त प्रमाणात केला तर केस अधिक गळतात.
• या ऋतूमध्ये केस गळणे समस्या निर्माण होते. यावर उपाय करणे गरजेचे आहे. केस गळती थांबवण्यासाठी कारण ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे ठरते. केसांच्या लांबीमुळे अधिक केस गळत असल्याचे आढळून येते.
काय काळजी घ्याल?
आहार : केस गळती थांबवण्यासाठी आहारात फळांचा वापर वाढवला पाहिजे, मोड आलेली कडधान्य खाणे, भाज्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. आहारात जास्त प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे याकडेही लक्ष द्यावे,
शाम्पूचा वापर : रसायन नसलेला सौम्य शाम्पू केस धुण्यासाठी वापरावा हे तुमच्या केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल. केसात कोंडा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत. केसांच्या पोतानुसार त्याचा योग्य वापर करावा.
कंडिशनरचा वापर करा : शाम्पू सोबत कंडिशनरही बाजारात उपलब्ध आहेत, त्याचा योग्य वापर फायद्याचा ठरतो. हेअर मास्क वापरल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो.
होममेड हेअर मास्क देखील वापरणे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.
पूर्वीच्या तुलनेत हल्ली केसांच्या आरोग्याबाबत चांगलीच जागरूकता आली आहे. हिवाळ्यात केसांच्याही अनेक समस्या उद्भवतात. केस कोरडे होणे, केस गळणे, केसात कोंडा होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
या ऋतूत केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जाहिरातींना बळी न पडता आपल्या केसांसाठी आवश्यक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करावा,
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.