आरोग्य प्रश्न : लहान मुलांची पाठ का दुखते?
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी उपाययोजना केल्याचा दावा शिक्षण विभाग करत असला तरी मुलांच्या खांद्यावरचे ओझे कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्यामुळे फुगलेल्या दप्तराच्या ओझ्याने पाठदुखीची समस्या वाढली आहे.
लहान मुलांची पाठ का दुखते?
स्कूलबॅगचे ओझे कितीही उपाययोजना केल्या तरी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होताना दिसत नाही. पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली व अन्य शैक्षणिक साहित्य यामुळे मुलांच्या दप्तराचे वजन वाढतच आहे. त्यामुळे लहान मुलांची पाठ दुखत असते.
मोबाइलचा अतिवापर : कोरोना काळात मुलांना मोबाइल वापराची सवय लागली आहे, ती अजूनही कायम आहे. मोबाइलचा अतिवापर मानदुखी आणि पाठदुखीस कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
लॅपटॉपचाही परिणाम (आरोग्य)
शाळा आणि क्लास यांच्या मधून मिळणाऱ्या वेळेत विद्यार्थी टीव्ही पाहतात. यामुळे मानदुखीचा ब्रास वाढतो. काहीवेळा शाळेचे प्रोजेक्ट करण्यासाठी लॅपटॉप मांडीवर घेऊन स्क्रीनकडे वाकून बघण्यामुळेही मुलांमधील हा त्रास वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्यायची गरज आहे.
प्रश्न : काळजी काय घ्याल?
व्यायाम अभ्यास, खेळाव्यतिरिक्त व्यायामाची गरज आहे. शाळकरी मुलांनी कवायत, सायकलिंग, चालणे अशा शारीरिक हालचाली कराव्यात.
नियमित ब्रेक
स्क्रीन पाहात अभ्यास करताना अर्ध्या तासानंतर ब्रेक घेण्याची सवय लागावी. अर्ध्या तासानंतर मुलांनी उठून पाय मोकळे करून पुन्हा जागेवर बसावे.
बसण्याची सवय (आरोग्य)
ऑनलाइन शिक्षण घेताना किंवा अनेक
वेळा मुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली हे कमी वयातील पाठदुखीचे मोठे कारण ठरत आहे. मुले खेळताना शरीराची काळजी घेत नाहीत, लहान मुलांची हाडे नाजूक असतात. जरा जरी मार लागला तरी दुखापत होते. त्यामुळे लहान वयात मुलांच्या हाडांना फार जपण्याची गरज आहे. कमीत कमी ओझे कसे देता येईल याचा विचार करावा.
रॉक म्युझिक ऐका, हा आजार होईल नियंत्रणात
मधुमेह म्हणजेच डायबेटिस हा आजार संपूर्ण जगासमोर मोठी समस्या बनला आहे. यात शरीरातील ग्रंथींमधून स्रवल्या जाणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झालेले असते. याच इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहत असते. यामुळे संशोधक शरीरात नैसर्गिकपणे इन्सुलिन तयार व्हावे यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतात. अशातच रॉक म्युझिक ऐकल्याने शरीरातील ग्रंथींमधून काही मिनिटांतच इन्सुलिन स्रवण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचे स्वित्झर्लंडमधील एका संशोधनातून
समोर आले आहे. इन्सुलिनमुळे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होत असते; परंतु स्वादुपिंडाची क्षमता कमी झाल्यास रक्तात साखरेचे प्रमाण वाढत जाते.
अनेक घटकांचा परिणाम
■ शरीरात सतत इन्सुलिनची निर्मिती होत राहावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून संशोधकांनी एक उपकरण विकसित केले. हे एका कॅप्सूलमध्ये ठेवून तिचे शरीरात रोपण केले जाते. याला बाहेरून नियंत्रित करता येते.
■ इन्सुलिनची निर्मिती सुरू करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी विविध प्रकारांचा अभ्यास केला आहे.
■ त्यावेळी लक्षात आले की, बाहेरील प्रकाश, तापमान, इलेक्ट्रिक फिल्ड यांचा इन्शुलिन निर्मितीवर खूप परिणाम होत असतो.
- त्यांच्या असेही लक्षात आले की, काही मिनिटे संगीत ऐकले तरी शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन स्रवले जाते.
५ मिनिटांत सुरू रॉक म्युझिकमधून शरीरात इन्सुलिन स्रवले जाते, याचा संशोधकांना पहिला पुरावा मिळाला. प्रयोग सुरू असताना प्रख्यात ब्रिटिश रॉक बँड क्वीनचे गाजलेले गाणे वी विल रॉक यू’ हे वाजवले असता केवळ पाच मिनिटांत इन्सुलिन तयार करणाऱ्या उपकरणाच्या मदतीने ७० टक्के इन्सुलिन स्रवले गेले; तर पुढच्या १५ मिनिटांत ते पूर्णपणे स्रवले गेले होते.
क्लासिकल म्युझिकचा उपयोग नाही क्लासिक म्युझिक तसेच गिटारपेक्षा रॉक म्युझिकमुळे इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ‘द एवेंजर्स’ या चित्रपटाच्या टायटल साँगमुळेही मोठ्या प्रमाणात इन्सुलिन स्रवले गेले. म्हणजेच हाय पिच असणाऱ्या गाण्यांमुळे हा परिणाम साधता येतो, असे लक्षात आले आहे.
प्रश्न :१० तास टीव्ही बघताय ? तुमचा होणार ‘गजनी’
५० हजारांहून अधिक केसेसचा अभ्यास
वृद्धापकाळात निवांतपणे टीव्ही पाहणे हाच बहुतांश जणांचा कार्यक्रम असतो. परंतु एकाच जागी १० तासांपेक्षा अधिक काळ बसून राहिल्याने स्मृतिभ्रंशाचा आजार होण्याचा धोका असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे लेखक डेव्हिड रायचल यांनी याबाबत संशोधन केले आहे.
यासाठी ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ५० हजारहून अधिक जणांचे अध्ययन करण्यात आले. यासाठी संपूर्ण एक आठवडा सहभागींना दर दिवशी २० तासांसाठी एक्सेलेरोमीटर लावण्यात आला होता. याद्वारे त्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यात आली. डेव्हिड रायचल म्हणाले की, दीर्घकाळ कोणतीही हालचाल न
करता बसून राहिल्याने स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) होण्याचा धोका असतो. यासाठी दर अर्ध्या तासाने उठून उभे राहिले पाहिजे किंवा अन्य प्रकारची हालचाल केली पाहिजे.
प्रश्न : थॅलेसेमिया म्हणजे काय; काय काळजी घ्याल?
थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक अनुवंशिक आजार आहे. या आजाराची लक्षणे ही वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच दिसायला सुरुवात होते. त्यात बाळाचे हिमोग्लोबिन कमी होऊन बाळ पांढरे पडायला सुरुवात होते. शारीरिक व मानसिक वाढ होत नाही. या आजारावर कुठलाही उपचार नाही.
परंतु रक्त संक्रमण बोन मॅरो ट्रान्सप्लांट आदी उपचाराने थॅलेसेमिया नियंत्रणात आणता येतो. या आजारात रुग्णाला वारंवार रक्त द्यावे लागते.
नेमका आजार काय? (आरोग्य)
थॅलेसेमिया हा जनुकीय आजार आहे. थॅलेसेमिया मेजर आणि थॅलेसेमिया मायनर असे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात. यात थॅलेसेमिया मेजर असलेल्या रुग्णांना पंधरा ते वीस दिवसांनी रक्त द्यावे लागते. रुग्णांमध्ये लाल रक्तपेशी तयार होत नाहीत. लाल रक्तपेशीत हिमोग्लोबिन नावाचे लाल रंगाचे प्रोटीन असते.
प्रश्न : कशामुळे होतो? (आरोग्य)
थॅलेसेमिया हा आजार अनुवंशिक असून तो आई-वडिलांकडून मुलांना होतो. दोन थॅलेसेमिया वाहकांच्या विवाहातून जन्माला येणाऱ्या बाळाला हा आजार होतोच. लाल रक्त पेशीतील हिमोग्लोबिनच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या जीन्समध्ये असामान्यता है थॅलेसेमिया होण्यामागील आणखी एक कारण आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील (हिमॅटोलॉजी विभागाकडे) या सर्व रुग्णांना निःशुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.
प्रश्न : काय काळजी घ्याल?
दोन मायनर थॅलेसेमियाग्रस्तांनी विवाह केला तर जन्माला येणारे मूल हे थॅलेसेमिया मेजर राहण्याचा धोका अधिक असतो. अशा मेजर रुग्णांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते. त्यामुळे विवाहपूर्वी भावी जोडप्यांनी थॅलेसेमिया मायनर आहे का नाही याची तपासणी करून घेणे संयुक्तिक
ठरते.
प्रश्न: बाळ पोटातच असताना कोणती चाचणी कराल?
दोन थॅलेसेमियाग्रस्तांनी विवाह केल्यानंतर गरोदरपणात होणारे शिशू हे थॅलेसेमिया मेजर तर नाही ना याची तपासणी करता येते. त्यासाठी गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात प्री नेटल ही तपासणी करता येते. या तपासणीनंतर पुढील निर्णय घेता येतो.
थलेसेमिया आजारात रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या
लाल रक्तपेशी पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळे सर्व पेशींना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला थकवा, अशक्तपणा किंवा श्वासाचा त्रास होऊ शकतो. तसेच कोणतीही लक्षणे नसू शकतात किंवा फक्त सौम्य अशक्तपणा असू शकतो. थॅलेसेमिया मेजर गंभीर लक्षणे असल्यास त्यांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता भासते.