मुळव्याध हा सध्या एक गंभीर आजार बनू लागला आहे.पाइल्स (Piles) हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात.
हा रोग गुदाशय आणि गुद्द्वाराला प्रभावित करतो. जर मूळव्याध होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे (constipation) होणारा आजार आहे.
10 पैकी 3 ते 4 लोकांना मुळव्याधाचा त्रास आहे. मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे.
मूळव्याध (piles) ही एक अशी स्थिती आहे ज्यासाठी तत्काळ वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे. मूळव्याधा मध्ये रक्तस्त्राव (bleeding) होण्याचा अर्थ आहे मलाशय आणि गुद्द्वार मध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे. कधीकधी ही समस्या स्वतःच दूर होते, पण काहीवेळा लक्ष न दिल्याने ही समस्या आणखीनच वाढू शकते.
मुळव्याध कारणे: (Causes of piles)
1) शौचाच्यावेळेस रक्तवाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं, बराच काळ शौचालयात बसणं, बद्धकोष्ठता अशी काही याची कारणं आहेच.
हा आजार बद्धकोष्ठतेपासून सुरू होतो.
2) खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (चुकीची जीवनशैली आणि घाणेरडा आहार)
आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैली, सवयींमुळे असे आजार होत आहेत. लोक भरपूर पिझ्झा, चिझ, बर्गरसारखं फास्टफूड, मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
तसंच लोक आजकाल भाज्या, फळं कमी खातात, पाणी कमी पितात त्यामुळे त्रास होतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा यात मोठी भूमिका आहे.
3) बैठी जीवनशैली (sedentary lifestyle)
4) व्यायाम करताना अतिशय जड वजनं उचलणं यामुळे गुदद्वाराजवळील भागावर ताण येतो.
5) तसेच सतत अतिसार होणं, वजन वाढलेलं असणं, आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स कमी असणं.
शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे मूळव्याध होतो.
6) पाणी कमी पिणं. (मुळव्याध)
7) महिलांना गरोदरपणात बद्धकोष्ठता आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.
8) गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो, त्यांच्यावर अतिरेकी दाब पडल्यावर जळजळ सुरू होते. रक्तवाहिन्या सुजण्याची अनेक कारणं आहेत.
9) जेव्हा एखाद्या व्यक्तीला एक आठवड्यापेक्षा जास्त काळ बद्धकोष्ठता (comstipation) असते, तेव्हा त्याला मूळव्याधची समस्या देखील होण्याची शक्यता असते.
10) मूळव्याधातून रक्तस्त्राव होण्याचा अर्थ आहे की गुदाशय आणि गुद्द्वारमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे.
11) सतत जड वस्तू उचलणे
12) वाढलेले वजन किंवा स्थूलपणा, ४५ वर्षांपेक्षा जास्त वय, अनुवांशिकता.
या अशा गोष्टींमुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.
केसगळती वर उपाय: https://aplasarkar.com/679/
मुळव्याध लक्षणे (Symptoms of Piles)
1) मलविसर्जनाच्या वेळी रक्तस्त्राव (bleeding). शौचानंतर रक्तस्त्राव होणे. हे रक्त लालभडक रंगाचे असते.
2) गुदद्वाराला खाज किंवा वेदना (itching and pain)
3) सतत शौचास जाण्याची इच्छा होणे.
4) गुदद्वाराभोवती गाठ येणे किंवा गुदद्वाराभोवती वेदना होणे इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
5) शौचास साफ होऊ शकत नाही त्यामुळे गुदाशय आणि गुदद्वाराच्या भागाच्या नसा फुगतात आणि गाठी तयार होतात.
6) या वाढलेल्या चमड्यामध्ये किंवा गाठींमध्ये वेदना होतात आणि कधीकधी रक्त देखील येते.
7) मूळव्याधीच्या आजारात होणाऱ्या वेदना ह्या अनेकदा असहाय्य होऊ लागतात.
8) सतत ताण वाढत गेल्यास आत असलेले मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात. बाहेर असलेल्या मुळव्याधामुळे तेथे खाज येणे, रक्त येणे असे त्रास सुरू होतात.
9) गुदद्वाराजवळ कोंब बाहेर आल्यानंतर हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो.
10) गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूजणे.
11) मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्यास किंवा थांबल्यास मूळव्याध दुखत नाही.
12) शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे.
मूळव्याध प्रकार (types of piles)
या आजारात मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला अंतर्गत मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाह्य मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. या दोन्हींमुळे रुग्णाला रक्त येऊ शकते. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.
आत असलेला मुळव्याधाचा त्रास कधीतरीच होतो. मात्र या भागावर ताण आल्यास त्रास होतो.
बाहेरील मुळव्याधामध्ये पोटात मोठी समस्या निर्माण होते, जसे की बद्धकोष्ठता किंवा गॅस. यामध्ये पोटाचा खूप मोठा त्रास जाणवतो. अशावेळी ऑपरेशन हा एकच पर्याय असल्याचं सांगितलं जातं.
मूळव्याधीचे निदान(Diagnosis of piles):
आपल्या गुदाशयाची तपासणी करून डॉक्टर मूळव्याधीचे निदान करतात.
प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराच्या बाह्य बाजूस काही मूळव्याधीचे कोंब आहेत हे तपासतात. त्यानंतर अंतर्गत बाजू तपासली जाते. या तपासणीला DRE (Digital Rectal Examination) असे म्हणतात.
कोलोनोस्कोपी: (Colonoscopy)
काही वेळा कर्करोग किंवा मोठ्या आतड्याचा इतर काही त्रास नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर आपल्याला कोलोनोस्कोपी किंवा एन्डोस्कोपीचा सल्ला देतात.
गुदाशयाची तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपीनंतर डॉक्टर रुग्णाला कोणत्या प्रकारचा मूळव्याध आहे हे सांगू शकतात.
प्रोक्टोस्कोपी: (Proctoscopy)
काही वेळा प्रोक्टोस्कोप वापरुन पुढील अंतर्गत तपासणी करणे आवश्यक असते. प्रोक्टोस्कोप ही एक पोकळ नळी असते. प्रोक्टोस्कोप रुग्णाच्या शौचाच्या जागेतून आत शिरवाला जातो त्यामुळे आतील भागाची तपासणी करता येऊ शकते.
मूळव्याधावर उपाय:
तेव्हा मूळव्याधीवर काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मुळव्याधावर घरगुती काही उपाय आहेत जे उपयोगी ठरतात. याचा रोज वापर केला तर मुळव्याधासाठी ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही. हे उपाय कोणते जाणून घेऊया.
मूळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे सर्वोत्तम उपचारासाठी आवश्यक घटक आहे.
1) मुळव्याधाचा त्रास होऊ नये करिता सगळ्यात महत्त्वाच म्हणजे हायड्रेड राहणे. पाण्याची कमतरता असेल तर मुळव्याधाचा त्रास होतो. भरपूर पाणी प्यायल्यावर मल मऊ होते आणि मुळव्याधाचा त्रास कमी होतो.
पाणी पिण्याची योग्य पध्दत: ■ पाणी नेहमी च खाली बसून घोट घोट (थोडं थोडं) प्यावे. ■ पाणी कधीही उभारून पिऊ नये.
2) शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे मुळव्याध होतो.
फायबरयुक्त आहार मुळव्याधावर सर्वोत्तम आराम आहे. सफरचंद, भाज्या, तांदूळ, तृणधान्ये आणि काजूचे सेवन, काळे मनुक्यांचे सेवन केल्यास मुळव्याधापासून आराम मिळतो. काळे मनुके भिजवून खावेत.
3) नैसर्गिक उपचारात नारळाचे तेल मॉइश्चरायजर म्हणून काम करते. मूळव्याध झालेल्या जागेवर रुम टेम्प्रेचरमध्ये (Room temperature) खोबरेल तेल लावल्यानं खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
4) कोरफड हे आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाते. अँटी इम्फ्लामेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म आजार आणि जखम बरे करतात. त्यामुळे मुळव्याधावर आराम मिळतो. त्यामुळं वेदना आणि त्या जागेवरची खाज कमी होण्यास मदत होते.
5) मुळव्याध बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि त्यात मध टाकून त्याचं सेवन करायाला हवं. त्यामुळं या समस्येपासून आराम मिळू शकतो.
घरगुती उपचारांनी मुळव्याध बरा होतो का?
मुळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच घरगुती उपायांचा उपयोग होतो. फळं, भाज्या खाणं, जिरं घातलेलं पाणी पिणं याचा लाभ होऊ शकतो.
6) मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी जिरा आणि पाण्याची पेस्ट तयार करून त्या भागावर लावा, त्यामुळं वेदनेपासून सुटका होण्यास मदत होईल.
7) पोट आणि पचनाशी संबंधित त्रास असेल तर आवळा गुणकारी ठरतो. आवळा किंवा त्याचे चूर्ण बनवून खाल्ल्यास बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो. मुळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी आवळा आवर्जून खा.
हा आजार कोणत्या वयातील लोकांना होतो?
लहान मुलांमध्ये हा आजार फारसा आढळत नाही. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे पौगंडावस्थेतील मुलांना मल साठून राहाणं, शौचाला बराच वेळ लागणं असा त्रास होऊ शकतो.
साठी आणि सत्तरीमधील लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये मूळव्याधाचा त्रास सुरू होण्याची शक्यता वाढते.
हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. परंतु 20 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.
8) सफरचंदमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे मल मोकळा होण्यास मदत होते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. तेव्हा मूळव्याधीच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी सफरचंद उपयोगी ठरते.
ऑपरेशनची गरज पडू शकते का? खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली बदलूनही तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर ऑपरेशन करावं लागतं.
9) ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचं सेवन केल्यानंदेखील या समस्येचा त्रास कमी होतो. याचं सेवन जेवणानंतर करायला हवं, हे लक्षात ठेवा.
10) मूळव्याधीची समस्या जर सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा गाईचे तूप टाका आणि रात्री हे दूध प्यायलाने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो. दुधामुळे बद्धकोष्टतेच्या समस्येवर आराम मिळतो आणि मूळव्याधीचे दुखणे देखील कमी होते.
11) मूळव्याधीमुळं सूजलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईल लावणं हे देखील फायदेशीर ठरतं, त्यामुळं सूजही कमी होण्यास मदत होते.
12) त्याचबरोबर बर्फाचे काही छोटेछोटे तुकडे करून त्याला कापडात गुंडाळून मुळव्याध झालेल्या ठिकाणी १० मिनिटं लावल्यानं या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाला आराम मिळू शकतो.
मूळव्याध असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला टॉयलेटला जावं लागतं तेव्हा खूप वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही कोल्ड पॅक वापरू शकता. यासाठी बादली भरून थंड पाणी घ्या आणि एका वेळी 20 मिनिटे त्या पाण्यात बसून राहा.
■ शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी – • शौचाच्या वेळी कुंथू नये किंवा जोर करु नये. • शौचानंतरची स्वच्छता हळुवारपणे करावी. • शौचानंतर मऊ toilet paper वापरावा.
मुळव्याध त्रास असताना शक्यतो तिखट मसालेदार पदार्थ टाळावेत.
खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मूळव्याधाचा धोका होतो का?
होय, अर्थात होतो. आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैली, सवयींमुळे असे आजार होत आहेत. लोक भरपूर पिझ्झा, चिझ, बर्गरसारखं फास्टफूड, मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. तसेच लोक आजकाल भाज्या, फळं कमी खातात, पाणी कमी पितात त्यामुळे त्रास होतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा यात मोठी भूमिका आहे. सवयी बदला, मूळव्याध टाळा
13) शारिरीक फिटनेस अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे तुमचे चयापचय व्यवस्थित होत राहते. पचनसंस्था सुधारते आणि गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हालचाल असेल तर मलविसर्जन होणे सहज शक्य होते आणि मुळव्याधाचा त्रास कमी होतो.
14) रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
■ मूळव्याध झालेल्यांनी आहाराबद्दल कोणती काळजी घ्यावी? मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच लोकांनी आहारात बदल करावा. मैदा तसेच फास्ट फूड खाणं टाळावं. तसेच मूळव्याध कोणत्याही प्रकारचा असो सकस आहार घेतला पाहिजे.
15) याशिवाय शिराळ्याचा रसदेखील या आजारावर गुणकारी मानला जातो. त्यासाठी शिराळा आणि कडूलिंबाचं तेलाची पेस्ट तयार करून ती मूळव्याध झालेल्या भागावर लावायला हवी, त्यामुळं ही समस्या कमी होते.
16) पोटाशी संबंधित त्रास कमी करण्यासाठी मेथीचे दाणे गुणकारी आहे. एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन सकाळी खावी. यामुळे पोटाचा त्रास आणि पर्यायाने मुळव्याधाचा त्रास कमी होतो.
■ मूळव्याधावर कायमचा उपचार आहे का?आरोग्यदायी जीवनशैली हाच मूळव्याधावर कायमचा उपाय आहे. काही लोकांना ऑपरेशननंतरही मूळव्याध परतपरत येण्याची शक्याात असते. त्यांनी चांगला आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे.
(hemorrhoids) रक्तस्त्राव मूळव्याधासाठी औषधे उपलब्ध आहेत, पण काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते.
तसेच, मूळव्याधासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, जे बरे होण्यास गती देतात आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तस्त्राव हे मूळव्याधीचे लक्षण नसते त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
17) तुम्ही सिट्झ बाथ (sitz bath) घेऊन गुदद्वाराच्या भागात होणा-या वेदना आणि सूज कमी करू शकता. सिट्झ बाथसाठी एक टब भरून गरम पाणी घ्या आणि झाकणामध्ये बीटाडीन लिक्विड घाला आणि त्या पाण्यात थोडा वेळ बसून राहा. तुम्ही पाण्यात थोडं एप्सम सॉल्ट देखील घालू शकता.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.
18) दीर्घकाळ मूळव्याध असेल तर दररोज शौचाला, खुर्चीत बसण्याला त्रास होतो. रक्तस्राव तसेच मांसल गाठ तयार होणं याचा त्रास होतो. अशा स्थितीत शस्त्रक्रियेमुळे योग्य परिणाम होऊ शकेल. ऑपरेशननंतरही योग्य आहार आणि जीवनशैलीची सवय कायम ठेवावी लागते.
19) शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करायला नाही पाहिजे. असे केल्यामुळे शौच कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो.
20) काही औषधांमुळे (उदा: कोडीन वेदनाशामक औषधे) Constipation होतो. अशी औषधे घेणे शक्यतो टाळावे.
मांसाहार करणाऱ्यांना मूलव्याधात कोणता त्रास होतो? आपण जेव्हा चिकन, मटण, बिफ, पोर्क करी सारखे मांसाहारी पदार्थ खातो तेव्हा ते पचवण्यासाठी आपल्या आतड्यांना जास्त पाण्याची गरज लागते. जर अधिक प्रमाणात पाणी प्यायले नाही तर मग पचनासंदर्भातील त्रास होऊ शकतो आणि हीच स्थिती कायम राहिली तर मूळव्याध होऊ शकतो. त्यामुळे मांसाहारी लोक असा त्रास असेल तर मासे- अंडी खाऊ शकतात. ते पचवायला तुलनेत सोपं आहे.
मुळव्याध साठी लेझर उपचार काय आहे?
मूळव्याध साठी लेझर उपचार कमी धोक्याचा आहे. बाधित क्षेत्रात कोणतीही कापणी होत नाही. प्रभावित भागावर लेझर ऊर्जेचा अचूक रीतीने उपचार होऊ शकतो आणि ही समस्या त्वरित सोडविली जाते.
शस्त्रक्रियेनंतर रूग्ण त्वरित आपले सामान्य दिनचर्या सुरू करू शकतात.
मुळव्याध वर लेसर उपचारांचे काय फायदे आहेत?
वेगवान उपचार, कमी वेदना, उच्च परिणाम आणि लहान प्रक्रिया.
सामान्यत: शस्त्रक्रियेच्या पारंपारिक पद्धतीमध्ये प्रभावित भागात कापणी केली जाते. दीर्घकाळ पुनर्प्राप्ती, एकाधिक ड्रेसिंग्ज, क्लिनिकला भेट देणे आणि पुनरावृत्ती होण्याचा धोका असू शकते.
या सर्व गोष्टींचा विचारात घेऊन मूळव्याधासाठी लेझर ट्रीटमेंट करणे ही सर्वोत्तम निवड मानली जाते.
तुम्हाला हे समजले पाहिजे की मूळव्याध बद्धकोष्ठतेमुळे होतो आणि बद्धकोष्ठता हा खराब आहार आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे होतो.
त्यामुळे या दोन्ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे, धावणे आणि इतर शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.
विशेष सूचना: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.