धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याचा संकल्प करा. वास्तविक, शरीर, मन आणि आत्मा यांचे अन्न वेगळे आहे. पण, एकच अन्न तिन्हींसाठी उपयुक्त असेल तर यापेक्षा चांगले काय असू शकते? (धनत्रयोदशी)
आणि त्या अन्नाचे नाव आहे ध्यान. म्हणजे मेडिटेशन. ऋषीमुनींनी या अन्नाला अमृत म्हटले आहे. साधकांनी दररोज ध्यान करावे, असे ऋषी-मुनींनी सांगितले आहे.
यामुळे आपल्या शरीरात वाहणारी जीवन ऊर्जा निरंतर वाहते. ती स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराकडे आणि त्याउलट सहज प्रवाहित होईल.
आणि इथेच जीवनात आनंद येतो. आपण ध्यानाबाबत नियमित आणि गंभीर झालो तर आपल्या चेतनेला शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
योगामुळे संपूर्ण निसर्गात ऊर्जा संवर्धनाचे तत्त्व अगदी सोपे होते. आपली जीवन ऊर्जा आणि वैश्विक ऊर्जा यांच्यातील संबंध म्हणजे ध्यान.
आरोग्य कोणत्याही परिस्थितीत संपत्तीच्या वर आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संकल्प म्हणून जीवनात याची अंमलबजावणी करावी. आणि हा संकल्प पूर्ण करण्यात ध्यान महत्त्वाची भूमिका बजावेल.
कमळ, कलश, हत्ती, शंख… अशा अनेक गोष्टींना दिवाळीच्या पूजेत विशेष महत्व आहे. ही शुभाची प्रतीके आहेत. समुद्रमंधनातून सत्ययुगात या गोष्टी लक्ष्मीसोबत प्रकट झाल्या झाल्या होत्या.
त्यामुळे याप्रतीकांशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते. ती जीवनाची पूर्णता शुभ आणि समृद्धीसह प्रकट करतात, कारण त्यांचे मानसिक आध्यात्मिक महत्त्वही आहे.
यापैकी काही प्रतीकांशिवाय आपले कोणतेही धार्मिक विधी व उत्सव पूर्ण होत नाहीत. लक्ष्मीशी निगडित श्रीयंत्र व घुबड हेही खूप महत्वाचे आहे. ते समुद्रमंथनातून निघाले नाही, पण त्याशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते. (धनत्रयोदशी)
● हत्ती » बुद्धिमत्ता, स्मृती आणि सकारात्मकतेचे प्रतीक
समुद्रमंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली तेव्हा तिचे वाहन पांढरा हत्तीही तिच्यासोबत आला. या हत्तीत आकाशात उडण्याची क्षमता होती.
म्हणून अष्टलक्ष्मीमध्ये समाविष्ट तिच्या रूपांपैकी एक म्हणजे गजलक्ष्मी तो गज म्हणजे हत्तीवर स्वार आहे. दिवाळीला लक्ष्मीची पूजा करण्यासाठी चांदी, सोने किंवा मातीची हत्तीची मूर्तीही ठेवली जाते.
हे सकारात्मकता, स्मृती, बुद्धिमत्ता आणि चैतन्य दर्शवते. पैसे कमावण्यामध्ये ते तर्काचे प्रतीक आहे.
● कलश: ब्रह्मा, विष्णु, महेश आणि देवी यात समाविष्ट
समुद्र मंथनातून धन्वंतरी बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात अमृतकलश होता. त्यामुळे दिवाळीसह सर्व पूजा कलशाच्या स्थापनेने सुरू होतात.
कलशाच्या मुखाशी ब्रह्मा, कंठात शंकर आणि मुळाशी विष्णू वास करतात, असे मानले जाते. सर्वदेवी-देवता कलशात स्थापन होऊन शुभ कार्य करतात.
दिवाळीला कलशात पाणी भरून आणि खाली पैसे व धान्य ठेवून पूजा केली जाते. पूजेनंतर चिरस्थायी समृद्धीसाठी प्रत्येक खोलीत पाणी व अक्षता टाकल्या जातात.
● शंख: पांचजन्य शंख, याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, शंख हे चंद्र आणि सूर्याचे एकच रूप आहे. मध्यभागी वरुण, मागे ब्रह्मा आणि समोर गंगा व सरस्वती राहतात.
सागरमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि पांचजन्य शंख सागरातून निघाले. शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मीच्या मूर्तीवर शंखाने पाणी किंवा पंचामृत अभिषेक केल्यास ती प्रसन्न होते. (धनत्रयोदशी)
शिवलिंग आणि कृष्णालाही शंखांनी अभिषेक केला जातो. शंख हे मौन आणि शांतीचे प्रतीक आहे.
● कमळ » संपत्ती, वैभवासह शुद्ध बुद्धिमत्तेचाही त्यात वास
पद्म व इतर पुराणांमध्ये कमळाची स्तुती करण्यात आली आहे.चैत्र सप्तमीला ‘कमळ सप्तमी’ ही म्हणतात. विष्णूच्या चारपैकी एका हातात कमळ आहे.
लक्ष्मी कमळावर विराजमान आहे. त्यामुळे दिवाळीला लक्ष्मीला पूजेत कमळही अर्पण केले जाते. कमळ वैभवाचे प्रतीक आहे. लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण केल्याने मन शुद्ध होते व आर्थिक लाभही होतो.
ब्रह्मा पद्मासनात विष्णूच्या नाभीतून बाहेर पडलेल्या दोरीवरील कमळावर विराजमान आहेत.
● पारिजातक » पृथ्वीवर पडूनही देवीला अर्पण केलेली फुले
लक्ष्मीला पारिजाताची फुले आवडतात. त्याला हरसिंगार असेही म्हणतात. समुद्र मंधनातून देवी लक्ष्मीसोबत हे झाडही प्रकट झाले. देवराज इंद्राने ते स्वर्गात लावले आणि नंतर ते पृथ्वीवर आणले.
पारिजातकाची फुले नारळावर ठेवून लक्ष्मीला अर्पण केल्यास ती प्रसन्न होते. असे मानले जाते. विशेष म्हणजे पारिजातक फुले झाडावरून पडल्यानंतरही देवीला अर्पण करता येतात.
इतर सर्व फुले झाड किंवा रोपावरून तोडल्यानंतरच देवीला अर्पण करता येतात.
● चक्र » पैशाशी संबंधित समस्या दूर करते गोमती चक्र
गोमती चक्र हे चक्र असलेल्या शिंपल्या सारखे पांढरे असते. असे मानले जाते की है चक्र भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र आहे, ते नकारात्मक शक्तींना दूर करते. (धनत्रयोदशी)
पूजेच्या वेळी हे चक्र देवी लक्ष्मीजवळ ठेवण्याची परंपरा आहे. पूजा संपल्यानंतर ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवली जाते. असे मानले जाते की, यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
चक्र हे जीवनाच्या गतीचे प्रतीक आहे, गतिशीलतेनेच संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते.
यांचे विशेष महत्त्व
● श्रीयंत्र » हे आपल्या शरीराची रचना आणि ऊर्जेचे प्रतिरूप.
श्रीयंत्र शरीर रचना दर्शवणारे सर्किट आहे श्रीयंत्रात श्री लक्ष्मीचा कायम वास असल्याचे मानले जाते दुर्गा सप्तशतीनुसार, याची पूजा केल्यावर आदिदेवी सुख भोग व स्वर्ग देते.
श्रीयंत्राच्या स्थापनेचा शुभ दिवस म्हणजे दिवाळी दिवाळीत सोने, चांदी पितळ तांबे यांचे श्रीयंत्र खरेदी करून त्याची पूजा करण्याचे महत्व आहे. लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची स्थापना केली जाते.
● घुबड: किर्र अंधारात पाहू शकते, म्हणून लक्ष्मीचे वाहन.
दिवाळीच्या रात्री घुबड दिसणे ही लक्ष्मी च्या आगमनाची सूचना मानली जाते. कथा अशी आहे की, लक्ष्मी ला वाहन निवडायला सांगितले गेले. तेव्हा ती म्हणाली मी पृथ्वीवर येईन तेव्हा जो पशु, पक्षी किंवा प्राणी सर्वप्रथम माझ्यापर्यंत येईल ते माझे वाहन असेल.
लक्ष्मी अमावस्येच्या आली रात्री तेव्हा घुबड आधी आले. कारण कि ते किर्र अंधारातही पाहण्याची त्याच्यात विशेष क्षमता आहे.
भारतीय वैदिक परंपरेत लक्ष्मीचा अर्थ फक्त संपत्ती असा नाही. पैशातून मिळणारा आनंदही असतो. ऋग्वेदात लक्ष्मीला श्री म्हटले आहे. श्रीसूक्तात लक्ष्मीची पूजा आहे.
त्याच्या पहिल्या श्लोकात तिला ‘हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णराजतस्रजाम्’ असे म्हटले आहे. म्हणजेच जी सोनेरी रंगाची, सुंदर आणि सोन्या-चांदीच्या माळांनी सजलेली आहे.
तिला बाह्य व अंतर्गत दारिद्र्य दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे. तिची ‘कीर्तिमृद्धिं ददातु मे’ म्हणजे यश, नाव आणि कीर्ती देणारी देवी म्हणून पूजा केली जाते. ‘वाचः सत्यमशीमहि’ तिच्याकडून वाणीची सत्यता व सामर्थ्याची कामनाही केली आहे. (धनत्रयोदशी)
लक्ष्मीमुळे होतो बुद्धी आणि सिद्धीचा समन्वय
स्वर्गाचा राजा इंद्रानेही लक्ष्मीची व्यापक व्याख्या सांगितली आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांनी श्री महालक्ष्मी अष्टक रचले. याचा उल्लेख पद्मपुराणात आहे.
त्याच्या चौथ्या आणि पाचव्या श्लोकात त्यांनी लिहिले आहे – सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि । म्हणजे ती सिद्धी आणि बुद्धीबरोबरच मुक्ती देणारीही आहे. इंद्र म्हणतात, लक्ष्मी ही बुद्धी व सिद्धी यांचा समन्वय आहे. बुद्धी आणि ज्ञानानेच मोक्ष मिळवणे शक्य आहे.
शंकराचार्यांनी सांगितले, तिन्ही देवींत लक्ष्मीचे रूप आद्यशंकराचार्यांनी लक्ष्मी उपासनेसाठी कनकधारा स्तोत्र रचले. त्यात त्यांनी लिहिले:
गीर्देवतेतिगरुडध्वजसुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति । सृष्टिस्थितिप्रलयकेलिषुसंस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै
अर्थ : जगाच्या निर्मितीच्या वेळी लक्ष्मी सरस्वती होती. प्रलय झाला तेव्हा,ती शाकंभरी दुर्गा म्हणून आली. ती नारायणाची पत्नीही आहे. लक्ष्मी संपूर्ण आहे आणि ती संपूर्ण करते.
चाणक्य म्हणाले, धर्माच्या रक्षणासाठी लक्ष्मी गरजेची चाणक्यांनी लक्ष्मीचा व्यापक सांगितला. अनपेक्षित संकटांसाठी पैसे वाचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. आहे. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे ज्ञान, कौशल्य.
त्यांनी लिहिले- ‘कामधेनुगुना विद्या ह्यकाले फलदायिनी। प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्तं धनं स्मृतम् ।’
म्हणजे विद्येत कामधेनूसारखे गुण आहेत. वाईट काळातही फळ देते, प्रवासात आईसारखी व गुप्त संपत्ती होते. तुमच्याकडील विद्या हीच लक्ष्मी आहे.
लक्ष्मी म्हणजे सुख, आपुलकी व आदरासह येणारी समृद्धी.
कार्तिकेयाने भगवान शिवांना विचारले, दिवाळीत दानाचे काय फायदे? ते म्हणाले, धनत्रयोदशीपासून ५ दिवस दान केल्याने चिरस्थायी फळ मिळते
दिवाळीत काय दान करावे काय नाही?
दान व दीपप्रज्वलन कधी करावे? याचे फायदे काय? हजारो वर्षांपूर्वी असे प्रश्न कार्तिकेयाच्या मनातही आले तेव्हा त्याने वडील भगवान शिव यांना विचारले.
वेदव्यासांनी रचलेल्या १८ पुराणांतील पदापुराणाच्या हवाल्याने जाणून घ्या शिव यांनी काय उत्तर दिले…. “कार्तिकेय! आता तू कार्तिक मासात दिल्या जाणाऱ्या दीप-दानाचे महत्त्व ऐक.
ज्याने कार्तिक मासात भगवान केशवासमक्ष तूप व तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित केला, त्याने संपूर्ण यज्ञांचे अनुष्ठान केले आणि समस्त तीर्थांचे दर्शन घेतले.
मुला विशेषतः कृष्ण पक्षात पाच दिवस खूप पवित्र आहेत. कार्तिक कृष्णा त्रयोदशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयेदरम्यान जे काही दान केले जाते ते सर्व अक्षय आणि सर्व कामना पूर्ण करणारे आहे.
(पद्मपुराणानुसार, अन्नदान सर्व दानांत सर्वोत्तम आहे. जी व्यक्ती एखाद्या ब्राह्मणास किंवा गरिबास तिळाच्या दाण्याइतके सोने दान देते, ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह विष्णूच्या धाममध्ये जाते. (धनत्रयोदशी)
जो चांदी दान करतो, तो चंद्राच्या विश्वात पोहोचतो. जो गाय दान देतो त्याला सात बेटांसह पृथ्वीला पिकासह दान करण्याइतके फळ मिळते.)
कार्तिक कृष्ण अमावास्या (दिवाळी) या दिवशी पहाटे स्नान करा आणि देवता व पितरांचे पूजन व त्यांना नमस्कार करत पार्वण श्राद्ध (जसे पितृपक्ष, अमावास्या किंवा पर्वाची तिथी आदीवेळी केले जाणारे श्राद्ध) करा.
दही, दूध आणि तूप आदींनी ब्राह्मणांना भोजन द्या. घरातील महिलांनी प्रबोधकाळात (ब्रह्ममुहूर्त) लक्ष्मीला जागे करून पूजन केल्यास धन-संपत्तीची कमतरता भासत नाही.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा (गोवर्धन पूजा) सकाळी गोवर्धन पूजन करा. नंतर गोवर्धनाची प्रार्थना करा. या दिवशी मंदिरात सव्वा किलो बाजरी व तांदूळ दान केल्याने घरात सुख-समृद्धी व धान्याची कमतरता भासत नाही.
कार्तिक शुक्ल द्वितीया (भाऊबीज) या दिवशी यमाची पूजा करा. यमुनेत स्नान केल्याने मनुष्य यम लोक पाहत नाही. या दिवशी बहिणीच्या घरी तिच्या हातचे बनवलेले जेवण करणे उत्तम आहे.
बहिणींना वस्त्रदान करा. हे धन, यश, आयू, धर्म, काम व अर्थाची सिद्धी करणारे आहे.
धनत्रयोदशीपासून ५ दिवस घर, मंदिर व प्रमुख ठिकाणी तुपाचे दिवे तेवत राहिले पाहिजेत. यामुळे ज्यांचे श्राद्ध व तर्पण झाले नाही त्या पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो.
पितर कायम या अभिलाषेत राहतात की, आपल्या कुळातही एखादा उत्तम पुत्र निर्माण होईल जो कार्तिकमध्ये दीपदान करत श्रीकेशवास संतुष्ट करू शकेल.
कार्तिकाच्या कृष्णपक्षाची त्रयोदशी (धनत्रयोदशी) या दिवशी घराबाहेर यमराजासाठी दीप दिला पाहिजे. याने अकाली मृत्यूचा नाश होतो. दीप देताना हे म्हटले पाहिजे, ‘मृत्यू, पाशधारी काल व आपल्या पत्नीसोबत सूर्यनंदन यमराज त्रयोदशीला दीप दिल्याने प्रसन्न व्हावा.’
कार्तिक कृष्ण चतुर्दशी (नरक चतुर्दशी) यात जी व्यक्ती पहाटे स्नान करते तिला नरकात जावे लागत नाही. स्नानावेळी यमराजाच्या नावांचा उच्चार (यमाय नमः, धर्मराजाय नमः) करत जल अर्पण केले पाहिजे.
सुविचार
आपण नवे ध्येय न ठेवणे किंवा नवे स्वप्न न पाहण्याइतके कधीही म्हातारे होत नसतो.- सी. एस. लुईस