दुसर्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे.

गोष्टनंबर 1 : आई व संस्कार

माझ्या आईनी काय म्हटले असते ?
केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मध्ये धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, येवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मिटर आधीच थांबला. त्याच्या मागून येणार्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्या मुळे तो थांबला आहे. त्याने ओरडून अबेल ला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हान ने त्याला ढकलुन अंतिम रेषे पर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला. पत्रकारांनी इव्हानला विचारले की तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?
इव्हान ने सांगितले माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.


रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलेस? यांवर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती! पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु सुवर्ण पदक जिंकु शकला असतास! इव्हान म्हणाला, त्या जिंकण्याला काय अर्थ होता? माझ्या मेडलला मान मिळाला नसतां! माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते? दुसर्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे.
धन्य ती माऊली आणि धन्य तिचे लेकरु.

गोष्ट नंबर 2 : नशीब…

याला म्हणतात नशीब!

पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन.

नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल, तर ती घडून राहते. राजाच्या घरात जन्माला येऊनही, एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते. पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एक अनाथ मुल ही मोठं इतिहास घडवून जातं. जेव्हा आपल्याला हे समजतं, तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात येते.

पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई-वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं. पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं. आज या मुलीला जन्म देणारे आई-वडील आतल्या आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत.

ही गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू (Lisa Sthalekar) लीजा स्थलेकरची.

१३ ऑगस्ट १९७९ रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लीजाचा जन्म झाला. लीजाचा स्वीकार करणं, तिच्या आई-वडिलांना शक्य नव्हतं, ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवास्तव अनाथालयात या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं ‘लैला’ असं नामकरण केलं.

त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देशभ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला पहिल्यापासून एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्याना मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी ‘सू’ ची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सूला तिच्या प्रेमात पाडलं.

कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. ‘सू’ ने लैलाच नाव बदलून ‘लीजा’ केलं. ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं.

हरेनने लीजाला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजाने क्रिकेट सुरू केलं. नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजाला क्रिकेटचा प्रचंड वेड होतं. पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकंच महत्त्व दिलं. लीजाने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरू ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीजापेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती.

पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं, अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. आई-वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली.

हीच लीजा ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली. आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते.

Leave a Comment