अन्न कसे व कधी खावे : डॉ प्रमोद धुमाळ

आधुनिकतेमुळे जीवन खूप बदललं आहे. आपली जीवनशैलीही अनियमित झाली आहे. (अन्न कसे व कधी खावे) यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीसुद्धा पूर्णतः बदललेल्या आहेत. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात.

नंतर पोट दुखणे, पचन न होणे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. पण जेवण ही सर्वात महत्त्वाची क्रिया असून ती योग्यप्रकारेच केली गेली पाहिजे.

तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे.

कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला. 

अभ्यासकांनुसार, एकदाच पोटभर खाण्याऐवजी थोडं थोडं आणि दिवसातून तीन ते चार वेळा काही खायला हवं.

या अभ्यासात ३० ते ६९ वयोगटातील ११२२ पुरुष आणि २१६५ महिलांच्या जेवणाच्या सवयी व त्यांच्या शरीरावर एक अभ्यास करण्यात आला.

यातील अर्ध्या पुरुषांना आणि अर्ध्या महिलांना पटापट पोटभर जेवण करण्यास सांगितले. नंतर असे आढळले की, यांचं वजन इतरांच्या तुलनेत वेगाने वाढलं होतं. चला जाणून घेऊ चावून चावून खाण्याचे फायदे:

जेवताना अन्न नेहमी ३२ वेळा चावून खावे किंवा अन्न चावून खा, गिळू नका, असे वडीलधारे म्हणताना तुम्ही लहानपणी ऐकले असेल. खरे तर अन्नाचे पचन तोंडातून सुरू होते.

अन्न चघळल्याने तोंडात तयार होणारी लाळ आपण खात असलेले अन्न मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यासाठी पुरेसा वेळ देते.

अन्न पचण्यासाठी ते आतड्याच्या संपर्कात येणे आवश्यक आहे.

म्हणून ते जितके जास्त चघळले जाईल तितकेच ते आतड्यांशी संपर्कात येईल. त्यामुळे अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील.

सावकाश खाण्याच्या सवयीमुळे प्रत्येक घास चावून खाण्यास पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे पचनप्रक्रिया अधिक चांगली होते आणि वजनदेखील सहजरीत्या घटते.

हळूहळू जेवण केल्यास आपण ताटातील अन्नपदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकता. याव्यतिरिक्त जेवणाचा सुगंध, चवीमुळे आपल्या जीभेचे चोचले देखील पुरवले जातील. त्यामुळे भरपेट जेवण केल्याचं समाधानही मिळतं.

घास नीट चावून खाल्ल्यामुळे पुरेशी लाळ सुटून अन्नाला योग्य वंगण मिळतं. असं अन्न पोटात गेल्यावर ते पचनासाठी शरीराला फार कष्ट घ्यावे लागत नाही.

भरभर खाल्ल्यानं ही क्रियाच व्यवस्थित होत नाही आणि नीट न चावलेलं अन्न पोटात जाऊन तडस लागते. याचा थेट परिणाम आपल्या ऊर्जे वर होतो.

खूपदा मरगळल्यासारखं वाटतं, ते याचमुळे. जेवण एंजॉय करा. आवडीचा मेन्यू असला, तरी तुम्ही कितीवेळा जेवणाकडे लक्ष देता.

उदा. ताटात वाढलेल्या पदार्थांची रंगसंगती, सूपमधून निघणाऱ्या वाफा, पालेभाजीचा हिरवागार रंग, खरपूस भाजलेली भाकरी या सगळ्याचं कौतुक करत, सावकाशपणे त्याचा आस्वाद घेत कधी जेवलाय ?

32 वेळा अन्न चावून चावून सावकाश जेवण्याचे फायदे महत्त्व जाणून घ्या:

खालेल्ल अन्न अंगी लागते:-

पचेंद्रियाना जाणवेल अशाप्रकारे तल्लीन होऊन खाल्लेलं अन्न पचतं; तसंच त्याचा शरीरालाही फायदा होतो. चावून खाण्याची सवय पुढच्या आयुष्यातही खूप उपयोगी पडते; कारण या सवयीमुळे अन्नातील सर्व पोषकद्रव्यं शरीराला मिळतात.

प्रत्येक व्यक्तीची खाण्यापिण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजण सावकाश खातात, तर काही जणांना भराभर जेवण्याची सवय असते.

सावकाश जेवणारी लोक आळशी होतात आणि आजारी पडतात, असा गैरसमज असतो. खरे तर अन्न शांतपणे चावून खाण्यामुळे ते अंगी लागते.

शरीरासाठी उत्तम पोषणतत्वे मिळतात

वजन कमी होण्यास मदत व लठ्ठपणा वर रामबाण उपाय

प्रत्येक घास चावून खाल्ल्यास वजन कमी होण्यास बरीच मदत मिळते. वजन घटवण्यासाठी वर्कआउट करणारी मंडळी संपूर्ण दिवस शरीरातील कॅलरी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

सावकाश खाण्याच्या सवयीमुळे आपले पोट पूर्णतः भरते आणि वारंवार भूक लागण्याची समस्यादेखील उद्भवत नाही.

जेवण बारीक चावून खाल्ल्याने पोटात रसायनांची निर्मिती होते, ज्यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचन होतं. याने लवकर भूकही लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहतं.

बऱ्याच लोकांना आज उपाय केला की उद्या वजन कमी पाहिजे असतं पण माझ्या अनुभव नुसार ऐकाल तर हा उपाय तुम्ही 6 महिने करून बघा नक्की वजन कमी होईल.

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याआधी ही एक चांगली सवय लावली तर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या होणार नाही.

सकारात्मक प्रभाव व अन्नपोषण तत्वे शोषणास मदत होते.

जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं.

कॅविटीपासूनच बचाव व तोंडाची दुर्गंधीही येत नाही:-

जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही.

पचनक्रिया चांगली राहते व लाळ योग्य प्रमाणात तयार होते –

जेवण चांगलं बारीक चावून खाताना तोंडात लाळ तयार होते, याने पदार्थ मुलायम होतात. तसेच बारीक चावून खाल्ल्याने कार्बोहायड्रेट आणि फॅट्स वेगळं करते. याने पचनक्रिया चांगली होते. 

बॅक्टेरिया नष्ट होतात व मुखाचे अनेक आजारापासून बचाव होतो:-

जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.

जेवल्यावर गोड किंवा अनेकांना स्मोकिंग करण्याची सवय असते त्याची गरज भासत नाही.

उत्तम त्वचा आणि केस होतात.

जेवण केल्याचे समाधान :

काही लोक भराभर जेवण करतात. यामुळे पोटदुखी अथवा पचनाशी संबंधित समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो.

अन्नपदार्थ सावकाश खाल्ल्यास पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते आणि अन्नपदार्थांचं पचनदेखील सहज होण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या शरीरास पोषक घटकांचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो.

जेवण्यापूर्वी पाच अंग म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. धुतलेल्या पायांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहील आणि याने आमच्या पाचक प्रणालीची सर्व ऊर्जा जेवण पचविण्यात वापरली जाईल. पाय धुतल्याने शरीरातील अतिरिक्त गरमी दूर होते, ज्याने गॅस आणि अॅसिडिटीची तक्रार होत नाही.

संशोधन काय सांगते ? :

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील संशोधनानुसार, अन्न पुरेशा प्रमाणात चघळले जाते तेव्हा ते खूप लहान तुकड्यांमध्ये बदलते, ते गिळताना घशातील ताण कमी करते.

त्याचवेळी, हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा ते एन्झाइम्समध्ये सहजपणे विरघळतात, त्यामुळे पोषण अधिक प्रमाणात तयार होते आणि शरीरात वेगाने शोषले जाते.

अशा स्थितीत कमी अन्न असूनही शरीराला अधिक पोषक घटक आणि प्रथिने मिळतात.

कसे कराल जेवण?

पदार्थांचे छोटे छोटे तुकडे करुन खावे. पदार्थ तोपर्यंत चावत रहावे जोपर्यंत ते तोंडात व्यवस्थित मिसळत नाहीत. पदार्थ लगेच गिळायचे नाहीत.

पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. याने पचनक्रिया चांगली होत नाही. त्यामुळे पदार्थ आधी चावून बारीक करावे मग गिळावे. पदार्थ खाताना पाणी पिऊ नये.  

आपण योग्य प्रमाणात खात नसल्यामुळे असे होते. कधीकधी, आपण एकतर खूप कमी खातो किंवा आपल्या आहारातून आवश्यक पदार्थ काढून टाकतो.

म्हणून, तज्ज्ञ म्हणतात की, अनेकदा मूड खराब असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्वचा किंवा केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

निरोगी आरोग्यासाठी शाकाहारी असावं की मांसाहारी हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. वाईट काहीच नाही पण त्याचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. 

जर ३५ टक्क्यांमध्ये मांसाहार असेल तर तो योग्य प्रमाणात आहे. पण अनेकजण मांसाहारच १०० टक्के करतात तर ते चुकीचे आहे.

गोडाचे प्रमाण फार कमी असावे. सणावारांना फक्त गोडाचे पदार्थ खावेत. भारतीय संस्कृतीनुसार ताटात गोडाचे पदार्थ हे मध्यावर असतात. त्यामुळे ते तेवढ्याच प्रमाणात खाणे गरजेचे असते.

भरभर घाईने अन्न जेवण उरकण्याचे तोटे :

अनेकदा आपण गडबडीमध्ये फटाफट जेवण संपवण्याच्या नादात असतो. कामाच्या ताणामुळे

जेवणालाही वेळ न मिळण्याइतपत लोक स्वतःला व्यस्त बनवतात. त्यामुळे बहुतेक वेळा ५ ते १० मिनिटांतच जेवण उरकून टाकतात. मात्र, नीट शांतपणे आणि चावून जेवण न केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हीही हाच प्रकार करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आपण अन्न नीट चावून नाही खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. अन्नाला योग्यप्रकारे न खाल्ल्याने पचन प्रक्रियेमध्ये गडबड निर्माण होऊ शकते.

आज बरेचसे लोक मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. अर्थात या सगळ्याला अनेक कारणं जबाबदार आहेत.

पण आपल्या जीवनशैलीशी निगडीत कारणं आपलं आरोग्य बिघडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

खेडेगावात आजही लोक संध्याकाळी सहा वाजता जेवतात आणि लवकर झोपतात.

तर शहरांमध्ये इतक्या लवकर जेवणं हे योग्य समजलं जात नाही. आपल्यापैकी बरेचसे लोक यावेळात ऑफिसमध्ये असतात. म्हणून जर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता जेवू शकत नसाल तर किमान आठ वाजेपर्यंत तरी जेवण करायला हवं.

लवकर जेवण्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला मिळतात यामुळे वजन नियंत्रणात रहातं, सकाळी ताजंतवानं वाटतं, शरीर उत्साही, उर्जावान रहातं.

तसंच पोटाच्या समस्याही उदभवत नाहीत. म्हणूनच आपण इतरही फायद्यांविषयी जाणून घेऊयात, ज्यामुळे तुम्ही लवकर खाणं खाण्यास आणि लवकर झोपण्यास प्रेरीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात, रात्री लवकर का जेवावं, याविषयी…

अॅसिड रिफ्लेक्सपासून संरक्षण: (Prevents acidity ऍसिडिटी)

जर तुम्ही झोपण्यापूर्वी खूप जड जेवण केलंत तर तुम्हाला अंथरूणावर पडल्यानंतर अवघडल्यासारखं वाटेल. याशिवाय खाल्ल्यानंतर लगेच झोपण्यामुळे पचनही व्यवस्थित होऊ शकत नाही.

ज्यामुळे हार्टबर्नसारखी समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच जर तुम्हाला गस्ट्रिकसंबंधी समस्या अधिक जाणवत असेल तर तुम्ही रात्री लवकर जेवणाची सवय स्वतःला लावून घ्या.

लठ्ठपणापासून बचाव (prevents obesity and weight gain)

रात्रीच्या जेवणाची तुमचं बॉडी क्लॉक व्यवस्थित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे ओव्हरडाएट होण्यापासून व लठ्ठपणापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. संशोधनादरम्यान आढळलं की, रात्रीचं जेवण आणि लठ्ठपणा या दोन्हीचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. कदाचित यामागील कारण रात्रीच्या जेवणानंतर येणारी निष्क्रियता हे असावं. यावेळेस चयापचय क्रियाही मंद झालेली असते. म्हणूनच तुमच्या चयापचय क्रियेला गतिशील बनविण्यासाठी दिवसभरात छोटे-छोटं जेवण घ्या. रात्रीचं जेवण आठच्या आत घ्या. ही सवय तुम्हाला निश्चितपणे लठ्ठपणाला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करेल.

ऊर्जा कायम राहील ( Stay energized )

खूप रात्री उशीरा भरपूर खाण्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित नाश्ता करू शकत नाही.

अन्य माहिती

लसणाच्या पाच पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात १० ग्रॅम मध मिसळावा, हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.

लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यावर आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातावर ठेवावी. लगेच आराम मिळेल.

लसणात अॅण्टी बॅक्टेरियल (anti bacterial) तत्त्व असतात. त्याचा फायदा होतो. लसणात अॅलिसिनचे प्रमाण भरपूर आहे, तसेच सल्फरही आहे.

लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते. 

दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

1 thought on “अन्न कसे व कधी खावे : डॉ प्रमोद धुमाळ”

Leave a Comment